Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंजू मी पण आत्ता उठले कुत्रा
अंजू मी पण आत्ता उठले कुत्रा फिरवून आणला थोडी साखि बनवली आता गेम इवेंट साडे बाराला सुरू झाला की तिथे जाणार फोन वर. पाउस पड्लेला दिसला.
तिच्या साठी तो इंटर्न छान आहे
तिच्या साठी तो इंटर्न छान आहे जोडी>>>>
नील (स्वानंद केतकर) नाव त्याचे. कदाचित पुढे तसेच दाखवतील. कारण त्या पार्टीच्या शेवटी शेवटी राधा त्या हितेनला सर्वांसमक्ष एकतर तुझ्या घरातल्यांना आपल्या नात्याबद्दल ठामपणे सांग नाहीतर मला विसर असे काहीसे सुनावते. त्याआधी म्हणजे जेव्हा पार्टीला जायच्या तयारीत असतात तेव्हा नील 'मी येणार नाही, राधाने मला फक्त formality म्हणून बोलावले आहे' असे सांगतो. तेव्हा सौरभ (पट्या) त्याला विचारतो, 'म्हणजे प्रेमाने, आपुलकीने बोलावले असते तर तू आला असतास का?' वगैरे वगैरे. म्हणजेच पुढे राधा-नील अशी जोडी दाखवायला चान्स आहे.
विक्षिप्त_मुलगा, तुम्ही किती
विक्षिप्त_मुलगा, तुम्ही किती मेहनत घेतली आहे त्यांच्या टेकनिकल चुका दाखवायला, आधी फोटो टाकले नव्हते, मग एडिट करून तेही टाकलेत
त्यांना ड्रामा कसा निर्माण होईल यात रस आहे फक्त, तुमच्यासारखे तांत्रिक बारकावे बघणारे प्रेक्षक अगदी कमी असतील. निलला ती आवडते बहुतेक. एकदा पट्याला अनामिका हो म्हणाली की परतफेड म्हणून पट्या नीलचं आणि तिचं जुळवून देईल. नीलने मदत केली ना मावशीला पट्याचं मार्गी लावायला. चित्रा एकाच साडीमध्ये असते का. एवढ्या उकाड्यात केसांचं एवढं भोंडलं कसं घेऊन फिरू शकते ती.
रच्याकने, अभिज्ञा भावेचा मोबाईल कोणीतरी हिसकावून घेतला ती रिक्षात बसलेली असताना, शूटिंग संपवून रात्री साडे दहाला ती घरी जात असताना इस्टन एक्सप्रेस हायवेवर हा प्रकार घडला.
Neel spoke nicely to tell
Neel spoke nicely to tell Radha her mistake in not acknowledging her mother's freedom of choice. Radha seems attention deficit. She can't see other people's point of view .
अनामिकाच सध्याच कॅरेक्टर
अनामिकाच सध्याच कॅरेक्टर कनफ्युझड दाखवतायत. ते रागावण्याच नाट्क करण्यापेक्षा सरळ स्पष्ट का नाही बोलत पटयाशी? हिचा नक्की होकार आहे की नकार आहे?
अचानक हिला पहिल्या नवर्याची आठवण येते अधूनमधून. ह्याआधी सिरियल सुरु झाल्यापासून ती त्याच साध नावही घ्यायची नाही.
आणि आता तर काय, राधापेक्षा हिला दुसर काहीही महत्वाच नाहीये म्हणे. आऊट ऑफ कॅरेक्टर वागतेय हल्ली. अरुने तिच्या डोक्यावर हात ठेवलाय वाटत.
आणि आता तर काय, राधापेक्षा
आणि आता तर काय, राधापेक्षा हिला दुसर काहीही महत्वाच नाहीये म्हणे. >> मागे लागलाय नं तो. नाहीतर हिला कोण विचारत होतं.
अचानक हिला पहिल्या नवर्याची
अचानक हिला पहिल्या नवर्याची आठवण येते अधूनमधून. ह्याआधी सिरियल सुरु झाल्यापासून ती त्याच साध नावही घ्यायची नाही >>> हो का. शनिवारचा बघितला नाहीये, दोन मिनिटं टीव्ही म्युट करून लावला तेव्हा हितेश bags घेऊन वाड्यात शिरत होता, आता ह्याचाही मु पो वाडा का.
आणि आता तर काय, राधापेक्षा हिला दुसर काहीही महत्वाच नाहीये म्हणे. आऊट ऑफ कॅरेक्टर वागतेय हल्ली. अरुने तिच्या डोक्यावर हात ठेवलाय वाटत. >>> हाहाहा.
रच्याकने, अभिज्ञा भावेचा मोबाईल कोणीतरी हिसकावून घेतला ती रिक्षात बसलेली असताना, शूटिंग संपवून रात्री साडे दहाला ती घरी जात असताना इस्टन एक्सप्रेस हायवेवर हा प्रकार घडला. >>> अरेरे.
नील (स्वानंद केतकर) नाव त्याचे. कदाचित पुढे तसेच दाखवतील. >>> हो असं वाटतंय.
अमा तुम्ही जमलं तर लिहीत जा सविस्तर इथेही.
अमा तुम्ही जमलं तर लिहीत जा
अमा तुम्ही जमलं तर लिहीत जा सविस्तर इथेही.>> पडत्या फळाची आज्ञा जी.
भाग७१: पट्या मिसानामिकाच्या घरी दोन मस्तानी पार्सल घेउन आला आहे. लट्पटीने घरात आत येतो व मस्तानी ऑफर करतो मिसा ला पण ती गप्प आहे. तो मस्तानी ऑफर करतो तर ती झिरमिळ्या केसाची मैत्री ण आतुन बाहेर येते चुकीच्या क्षणी. मिसानामिका म्हणजे पुण्यातच जास्ति फुलणारं भ्रमकमळाचे फूल आहे. लगेच कोमेजते लगेच बंद होते. कधी खुलणार पट्याची साठी आधी होईल आनि माई मावशीचे सहस्त्रचंद्रदर्शन
मोठे स्वगत स्वजो घशाला कोरड पडली असेल पण ही पट्ठी काय पाणी पण देत नाही. अजुन स्वतःला कॉलेज चंद्रिकाच समजते आहे. पीळ
प्रियाराधन पहिली बार नही जम्या अभी भी नही जमरा.
इक डे वाड्यात राधा हितेनला राहायची परमिशन मिळवते त्यामुळे नील खट्टू होतो. तो राधावर लाइन मारतो आहे. पण तिच्या डोळ्ञात हितेनच आहे. दिल आ गया गधे पे .....
मग स्वप्निल येतो व परत उरलेले स्वगत बोलतो. व नील ती मस्तानी मागुन खाउन टाकतो. काहीतरी प्रेमाबद्दल उच्च साउंडिंग वाक्य आहेत पण
अर्थ एकच बोल दो जो दिल मे है. उगीच पैशाला पासरी शब्द वापरले आहेत.
मामा हितेनला परवानगी देत नाही पन नागीण अहो तिच्यावर लक्ष देता येइल म्हणून राहुदे तिला इथे म्हणून मामाचे मन वळवते व हितेन ब्यागा घेउन आत येतो व एक रात्र मामाच्या खोलीत!!!
ह्यामुळे स्वजो चा भाउ विरघळतो व परत बायकोच्या प्रेमात येतो. त्यामुळे ती खुष होते. तिने ह्याचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
अमा तुम्ही इथे लिहायला सुरु
अमा तुम्ही इथे लिहायला सुरु केले ते बेस्ट वाटले... लिहित रहा
मिसानामिका, मामा .. हा हा हा....
पट्या पांढरा लेंगा आणि वर खादी कुर्ता घालुन घरात फिरतो... आजकाल ६०+ लोक सुद्धा ट्रॅकपँट आणि टीशर्ट घालतात... मग अगदी सदाशिवपेठेत असली तरी....
काल अनामिकाने घातलेला प्लेन निळा कुर्ता पांढरी ओढणी म्हणजे एकदम ज्ञानप्रबोधिनी,पुणे शाळेचा गणवेश दिसत होता..
अमा धमाल आणताय या धाग्यावरपण,
अमा धमाल आणताय या धाग्यावरपण, धन्यवाद _/\_
ते लेंगे नवे कोरे दिसतात अगदी. सचिन ट्रॅक पॅन्ट घालतो घरात. तो ऑफिसात टोपी काय घालतो. कोणत्या ऑफिसात अशी गांधी टोपी घालतात शिपाई. सुहासबाई मस्त मराठी शब्द पेरलेले हिंदी बोलतात. मजा येते ऐकायला. हिंटेनचे पप्पा बरी परवानगी देतात त्याला वाड्यात राहायला. राधाकडून काहीच डेपोसिट घेतले नाही, आता हितेंच्या भाड्याचे काहीच बोलणे नाही. सगळा हौशी मामला आहे.
आणी राधाचा बॉयफ्रेंड तडक
आणी राधाचा बॉयफ्रेंड तडक आपल्या खोलीत रात्रीसाठी वर्ग केला!!!!! हीच सर्वात पुढारलेली निघाली. पट्या बरोबर झोपायला पाठवायचे ना.
हे काय अमा, आता ही शिरेल पण
हे काय अमा, आता ही शिरेल पण बघायला लावणार तुम्ही. मस्त लिहिताय .
पडत्या फळाची आज्ञा जी >>> सो
पडत्या फळाची आज्ञा जी >>> सो स्वीट ऑफ यु अमा, धन्यवाद.
पटी आणि मिसा ही दोन्ही नावं आवडली, माबोकरांनी ठेवलेली.
मामा आधी समजलंच नाही, कोण उपटला असं वाटलं, हाहाहा . उशीरा ट्युब पेटली, माईमावशी.
आओ जावो, वाडा तुम्हारा चाललंय.
नील आणि राधाचं जुळावं म्हणून हितेनला आणलं असावं, आता हितेन कसा वाईट ते उगाचच दाखवतील.
अरे पट्या पटीचं दाखवाकी, हे उपकथानक मेन का करतायेत. बाकी नील राधा जोडी गोड दिसेल, हितेन एजेड वाटतो.
अनामिकाची आई येतेय आता.
अनामिकाची आई येतेय आता.
तेच ना, कशाला उगाच. एक ना धड
तेच ना, कशाला उगाच. एक ना धड होणार, भारंभार कॅरॅक्टर्स वाढवून ठेवतायेत.
शुभ प्रभात :
शुभ प्रभात :
बाग ऐशी: सौरभ मंडईतुन भाजी घेउन आला आहे. भरपूर भाजी ताजी ताजी व मेथी. व मामा ला उंडा भरुन बटाटे घालुन मेथीचे प्राठे हवे आहेत. व मामा चहा पण देत आहे. मामाला मिसानामिका ची सवय झालेली आहे म्हणे ती आता बोलत नाही तर चुटपुट लागली आहे. तुमच्यात काही का न होईना आम्च्याशी नीट बोल असे ती तिला सांगणार आहे म्हणे. मग फोन करकी म्हातारे. उगीच भोचक पणा. सौरभ थोड्या वेळाने जाउ म्हणतो.
राधा व हितेन प्रियाराधन राघु मैनेची जैन व्हर्जन चालू आहे. कांदा बटाटा नको म्हणे. राधा बीइन्ग हर युज्व ल फटकळ सेल्फ. हितेन तिला आईने दिलेले स्नेक्स दे म्हणतो. त्याल हिला ऑफिसला सोडायला वेळ नाही म्हणे. राधा आजी चा फोन कट करत आहे. दोघांनी अजून मम्मा पप्पा नाड्या सोडलेल्या नाहीत. स्नेक्स भरवत असावी. नील हे सर्व मजेने ड्रामा बघत आहे. राधा त्याला ऑफिसला सोडायला गळ घालते सौरभ हा टीन ड्रामा बघतो व नील ला ओके देतो.
इकडे नागिणीचा नवा डाव चालू आहे नवर्याच्या हपिस पब्लिकला कोकिला बेन च्या पिरॅमिड स्कीम मध्ये अडकवून!!! धिस इस बिग फेल.
पण त्या भावाला डोके नाही . ह्यांनी बुडवलेले पैसे पुढे भविस्य्यात सौरभ ला पे करावे लाग तील. भावजींच्या लग्नासाठी पैसे जोडेल म्हणे.
हा नवरा डोक्याव र पडलेला आहे बहुतेक. अगदीच मंद आहे
इकडे हपिसात भाउ एक चमकदार सुचना देतो व ती केरळी बाई त्याच्या हुशारीची जाणीव ठेवते. तिथे ही नागिणी चा फोन.
सौरभ च्या हपिसात मिसानामिका सौरभला इग्नोअर करायचा प्रयत्न करत आहे. फारच केविलवा णे प्रयत्न. आता उतर त्या सौंदर्याला कोन इतका भाव देइल पण ही उगीच चढून आहे. एकदा हो म्हटले की सर्व भाव संपेल व बायको पण पदरी येइल त्यात हा जरठ नवरा असल्याने जास्तिच नवरे गिरी करेल बहुतेक म्हणून ही जस्ट आवाक्याच्या बाहेर राहून हुलकावत असते. कावेबाज सुंदरी.
सौर भ मिसानामिकाला अगदी जुन्या पद्धतीच्या हपिसातले लोक केबिन मध्ये बोलवतात तसे बोलवतो व ती ही तशीच येते आत तिथे काही बोलने होते. बॉसला हा सर्व ड्रामा एकदम विरंगुळा टाइप आहे. मिसानामिका अबोला धरुन आहे रुसु बाई रुसु अग्गो बाई!!!
वल्ली नवृयाला हपिसात फोन करते. म्हणजे हा साडेदहाला गेला असेल ऑफिसात तर ती साडे अकराला फोन!! ही सोनाली कुलकर्णी सारखी जरड होत चालली आहे. असेल नसेल त्या मसल्स चेहर्यावरच्या वापरुन दाखवल्या की झाला अभिज्ञानय. वजन बारीक ठेवायच्या नादात चेहरा खराब होतो आहे. मग फिलर्स!!
मिसानामिका गोड गोड बोलत पट्याची विकेट घेत आहे. बोगस संवाद फक्त एकमेकांची तोंडे बघायला. हे नक्की वयाने वाढलेत का!!
पट्या परत तिला बोलवत आहे. ही तिथे डेस्क घेउन का आहे?! परत तेच तेच मिसानामिका मिस्टर पटवर्धन. हे ओफिसात काम कर णा र्या लोकांना मनोरंजन व्हावे म्हणून आहे का? मागे ताशा वाजत आहे.
आता हा तिला परत बोलाव्णार व ती उचकणार बहुतेक. परत फोन ट्रिक केल्यावर आत टकल्या घोरपडे आलेला आहे. जरठ नवरा फारच उतावळा झालेला आहे. ह्याला असे काम करायचा पगार मिळतो का?! हा पूर्ण टीपी सीन वेळ काढू असून
त्यात मिसानामिकाची काये करत वैतागलेली एंट्री आहे. बिचारा घोरपडे लटकलेला आहे. फक्त सौरभची नवी हेअर स्टाइल खर्च करुन केलेली हेअर इंप्लां ट अनेक बाजुने दाखवायला घेतलेला आहे.
पुढील भागात हातावर शिव बंधन बांधायचा समारंभ आहे. काय पण बोअर रोमान्स. फुळकावणी चहा आहे निव्वव्ळ.
खरतर चुक सौरभची होती.
खरतर चुक सौरभची होती. कसलीच पुर्वकल्पना न देता तो अनामिकाला प्रपोज करण्याचा मुर्खपणा करतो. तिला राग येण स्वाभाविकच आहे. आणि आता हा नको इतका मागे लागलाय हिच्या. अनामिकाचही चुकलच, सौरभचा मूळ 'पटया स्वभाव' तिने पुन्हा आणायलाच पाहिजे नको होता. आधीचा घुम्या सैरभ होता तेच बर होत.
आज पट्या आणि जोशीबाईंचा संवाद
आज पट्या आणि जोशीबाईंचा संवाद मला आवडला. शाळेतल्या बालभारती पुस्तकांची आठवण आली. अनामिकाच्या आईच्या अंगावर कित्ती तो चिखल चोपडला. पट्या स्कुटरवरून उतरेपर्यंत सुकलाही होता तो. थोडं तरी खरं दाखवायचं. त्या खड्ड्यालाही आश्चर्य वाटलं असेल की अरे बापरे एवढा चिखल आपण साठवून ठेवला होता? आता आईलाही पटवावं लागणार पटयाला.
पटीची आई, तिची बहीण वाटते.
पटीची आई, तिची बहीण वाटते. कोणीतरी प्रौढ हवी होती, अगदी तरी हरकत नाही पण सासू आधुनिक दाखवली आहे म्हणून ही अगदी जुन्या विचारांची दाखवणार असं वाटतंय, नऊवारी नेसलीय म्हणून नव्हे पण मालिकेत दोन टोके दाखवतात म्हणून वाटतंय.
अनामिकाची आई सारखी माझं घर का
अनामिकाची आई सारखी माझं घर का म्हणते, ते घर तर अनामिकेचं आहे ना. अनामिका वीस वर्षाची असल्यासारखं चाललंय सगळं. पटया तर फारच फिल्मी आहे. कुठेही खाजगीपणा, तरलता, प्रगल्भता नाही. राधा आणि हितेनला वेगळ्या खोलीत ठेवून काय सिद्ध करणार, त्यांना जे करायचंय ते कधीच करून झालं असेल. वल्ली काही दिवस नाही बहुतेक.
घर घेताना अर्धे पैसे कावेरी
घर घेताना अर्धे पैसे कावेरी आई ने दिले होते असा उल्लेख आला होता काल ..
>>त्यांना जे करायचंय ते कधीच करून झालं असेल
त्यांनी एम्पीके मधल्या प्रेम सारखे ठरवले असेक हम खायेगा पीयेगा तो शादी के बाद.. इथे लिव्ह-इन के बाद असं असेल
हितेंचे वडील म्हणत होते की
हितेंचे वडील म्हणत होते की अनामिकाची बरीच मालमत्ता आहे मग हे घर घेताना का आईकडून पैसे घेतले. सचिनची बॉस रंगाने काळी आहे पण तिला पांढरीफटक करून टाकलीये
राखेचामध्ये ती ओरिजिनल चांगली दिसत होती. हे लोक फोनला लॉक नाही करत का. कुणीही कुणाचाही फोन वापरू शकतो. त्या घरी आलेल्या जोतिष्याला रंगीबेरंगी लेडीज वाटावी अशी शबनम दिली होती जी त्याच्या ईतर गेटपला अजिबात शोभत नव्हती
अनामिका बाहेरून आल्यावर हात पाय न धुता सरळ स्वयंपाकघरात घुसते हे मलाही खटकलं.
सचिनची बॉस राखेचामध्ये होती??
सचिनची बॉस राखेचामध्ये होती???
पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या??? आणि कोणत्या भूमिकेत?
अनामिका बाहेरून आल्यावर हात पाय न धुता सरळ स्वयंपाकघरात घुसते हे मलाही खटकलं.>>>
जिथे मुंबईत lockdown सुरु असतांना, मुंबईच्या लोकल्स सर्वसामान्यांसाठी बंद असतांनादेखील झीवाले नायिकेच्या भावाला नोकरीच्या ठिकाणी ट्रेनने जातांना आणि पहिल्याच दिवशी ट्रेनमधून पडताना दाखवत होते, नायिकेला आणि तिच्या आईला उठसूट अंबरनाथ-जुहू हा प्रवास करतांना दाखवत होते त्यांच्याकडून तुम्ही करत असलेली अपेक्षा अनाठायी नाही का???
तिसऱ्या सीजनमध्ये होती.
तिसऱ्या सीजनमध्ये होती. भाग्या नायर नाव आहे तिचे. अभिरामची बायको होती ती मालिकेत आणि तिच्या अंगात शेवंताचे भूत असते.
एवढी चाळिशीतली बाई, जिने
एवढी चाळिशीतली बाई, जिने मुलीला एकटीने independently वाढवलंय तिला तिची आई अशी रस्त्याने हाताला ओढत घेऊन जाते आणि ही पण बावळटासारखी जाते मागे मागे
आणि स्वतःच्या सासूचा असा येताजाता अपमान पण ऐकून घेते. फारतर काहीतरी फुटकळ लाडंलाडं बोलत वाद घालते.
हल्ली फार बघत नाही ही सिरीयल.
हल्ली फार बघत नाही ही सिरीयल.
आणि स्वतःच्या सासूचा असा येताजाता अपमान पण ऐकून घेते. फारतर काहीतरी फुटकळ लाडंलाडं बोलत वाद घालते. >>> खरं आहे, हे काही सीन्स बघितले. दोन दिवस शेवटचे काही सीन्स बघितले.
कधी नव्हे तो पुर्ण एपिसोड
कधी नव्हे तो पुर्ण एपिसोड बघितला, आख्खा एपिसोड त्या सचिन आणि पट्याची चुकामुक सचिनच्या ऑफीसमधे यात गेला. नशीब शेवटी तरी समजतं दादाला, सचिन प्युन आहे त्या ऑफीसमधे.
हो ना, किती वेळ ह्या दरवाजाने
हो ना, किती वेळ ह्या दरवाजाने सचिन गेला त्या दरवाजाने पटया आत आला, तेच चालू होतं. सचिनला ईतकी घाई की जसं काही त्याच दिवशी मॅगझीन छापून येणारे. ते खाली सांडलेलं काय होतं नक्की. बॉसलाही प्रत्येक वेळी नाव घेऊन थँक्स म्हणायचं असतं. म्हणे छोटी कंपनी, शिपाईच पाच-सहा होते
ती रिसिपशनला बसलेली कसली खडूस आहे, एकतर सचिनला सांगत नाही कोणीतरी भेटायला आलंय, वरून संशयाने बघत असते सगळीकडे. वल्ली सुट्टीवर आहे बहुतेक. सचिनचा पगार आल्यावर कळलंच असतं तो मॅनेजर नाही ते. पट्याने सांगितलं बदली पाहिजे तर लगेच बदलीची ऑर्डर हातात. पट्याकडे लॅपटॉप असतो तरी राजीनामा लेखी, बदलीपण लेखी. त्या कळकट्ट ऑफिसकडे बघून वाटत नाही त्यांच्या अजून शाखा असतील.
त्या दिपू आणि इंद्राच्या
त्या दिपू आणि इंद्राच्या मालिकेची पिसं काढायला धागा नाही काढला का कोणी?? त्या मालिकेचा एक एपिसोड आज बघितला, त्यात 2-3 टेक्निकल चुका मिळाल्या!!!
ढोकळा आणि हिरवी चटणी होती ...
ढोकळा आणि हिरवी चटणी होती ... ते अर्थातच प्लेट ला धक्कावगैरे ओढून ताणून जमवलं.. सचिन चं बिंग फुटावं म्हणून
Pages