Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी केक व्हेज करते म्हणजे
मी केक व्हेज करते म्हणजे त्यात अंड टाकत नाही. केक छान होतो जी बाजू भांड्याला लागलेली असते तिचा रंग छान ब्राउन येतो. परंतू ती बाजू थोडी कडक होते बाकी केक छान होतो. असे का होत असेल? व तसे न होण्यासाठी काय करावे लागेल? कोणी सांगू शकेल का? प्लीज.
मी केक व्हेज करते म्हणजे
मी केक व्हेज करते म्हणजे त्यात अंड टाकत नाही. केक छान होतो >>> सुनिता रेसिपी द्या ना तुमची..
जुई, ४ वाटी मैदा, २ वाटी पिठी
जुई,
४ वाटी मैदा, २ वाटी पिठी साखर, १ वाटी साजूक तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रूटस, बेकींग पावडर ४ चमचे असे साहित्य घेवून मैदा पिठीसाखर व बेकींग पावडर चाळणी ने चाळून एकत्र करावे त्यात तूप वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स टाकावे (गाजराचा किस टाकला तरी कॅरटा केक छान होतो) अंदाजाने दूध घालून मिश्रण मिक्सर वर थोडे फिरवावे म्हणजे केक हलका होतो व तूपाचा हात लावलेल्या भांड्यात मिश्रण घालून केक बेक करावा. केक छानच होतो.
मी ग्रीक दही वापरून बर्याच
मी ग्रीक दही वापरून बर्याच वेळा करते श्रिखंड. साअर क्रीम नाही घातले तर चालेल. मी कधी कधी घरात असेल तेव्हा घातले होते. प्रमाण असे नाही पण दही पातळ नाही होत व आंबट नसेल होत तोवर घालते. मग साकर येतेच ना व पातळ होवु शकते. तेव्हा तुला जसे घट्ट व चवीला आंबट हवे तसे घाल्.(हेच माझे तरी प्रमाण आहे.)
परंतू ती बाजू थोडी कडक होते
परंतू ती बाजू थोडी कडक होते बाकी केक छान होतो. असे का होत असेल? व तसे न होण्यासाठी काय करावे लागेल<<< सुनिता, ओव्हन चे टेम्प किती ठेवतेस? जास्त असेल तर केक कडक होतो कडेने...
लाजो धन्यवाद! आता टेम्प्रेचर
लाजो धन्यवाद!
आता टेम्प्रेचर थोडे कमी ठेवून पहाते. पुनश्च धन्यवाद.
सुनिता.
सुनिता, केक बेक करतांना किती
सुनिता, केक बेक करतांना किती तापमान असावं तेही सांगा..माझा केक नेहमीच बिघडतो..
अंड वापरता येत नाही म्हणुन..:(
आता करुन बघेन तुमच्या पध्दतीने..
मुग्धा, मी तव्यावर बारीक वाळू
मुग्धा,
मी तव्यावर बारीक वाळू घालून वाळू तापल्यावर त्यावर केकचे भांडे ठेवते. केकच्या भांड्यावर ताटली ठेवून त्या ताटलीवर पुन्हा वाळू ठेवते (म्हणजे वरून व खालून दोन्ही कडून उष्णता लागते.) त्यावर कढई पालथी घालते. व ३५ ते ४० मिनीटे ठेवते केक छान होतो. मात्र एकदा वाळू तापली की गॅस एकदम बारीक करून ठेवावा म्हणजे तो लागत नाही.
ओव्हन मधला माझा केक देखिल फसला तेंव्हा पासून असा सोप्या पद्धती ने बनवते अजून तरी फसला नाही.
फक्त काठाला कडक होतो. वरील सूचने प्रमाणे थोडा कमी वेळ ठेऊन पहाते म्हणजे कडक पणा येणार नाही.
जरूर करून पहा. नक्कीच छान होतो.
सुनिता.
कोणी पायसमची कृती सांगेल
कोणी पायसमची कृती सांगेल का???
मनःस्विनी, प्रत्युत्तरा बद्दल
मनःस्विनी, प्रत्युत्तरा बद्दल धन्यवाद. मला जरा अधिक माहिती द्याल का? ग्रीक योगर्ट बांधून ठेवायचे का? की कार्टनमधून आहे तसेच वापरायचे चक्का म्हणून?
अमी
इथे ओव्हनमधे केक करायच्या
इथे ओव्हनमधे केक करायच्या रेसिपी असतात त्यात नेहेमी केक ओव्हन मधून बाहेर काढल्यावर बेकिंग टिन मधून काढून बेकर्स रॅक ( जाळी ) वर थंड करा असं लिहिलेलं असतं. बेकिंग टिन मधल्या उष्ण्तेने ओव्हन्मधून काढल्यावरही तळ अन कडा कडक होऊ शकतात.
peacelily2025 :
peacelily2025 : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105628.html?1130862503 इथे बघा. तुम्हांला पाहिजे ते मिळू शकेल
अश्विनी१८ : पानाच्या खाली असलेल्या शोध सुविधेचा उपयोग केलात तर बर्याच गोष्टी सापडतील.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=1045613#...
इथे पाहा, काही मिळतंय का.
ज्वारीचं पिठ आणलय पण किंचित
ज्वारीचं पिठ आणलय पण किंचित चव कडवट वाटतेय, तर असं पिठ खाल्याने काही अपाय होत नाही ना? (विरी गेलेय त्यामुळे कळलच जुनं असेल पीठ म्हणून चव बघितली तर कडवट आहे थोडीशी. विरी नाही त्यामुळे भाकरी होऊ शकणार नाही, घावन करणारे)....दिनेशदा किंवा बाकीचे तज्ञ प्लीज सांगा खाऊन चालतं ना असं पीठ.
मिती, पिठ फारच जुने आहे.
मिती, पिठ फारच जुने आहे. शक्यतो न वापरले तर चांगले.
धनश्री, बार्बेक्यू सॉस हा साधारणपणे, खरपूस भाजलेल्या वा तळलेल्या पदार्थांबरोबर चांगला लागतो. बार्बेक्यू शक्य असेल तर अवश्य करावे. नाहीतर तो अगदी चिप्स बरोबर पण खाता येतो. टोबॅस्को सॉस माईल्ड असला तरी बराच तिखट असतो. तिखटाची आवड असेल तर कश्याबरोबरही खाता येतो. मेक्सिकन टॅको, पिटा ब्रेडचे सॅन्डविच वगैरे बरोबर चांगला लागतो.
स्नेहा, डायेट चा अर्थ वेगवेगळा असू शकतो. म्हणजे कुणाला प्रोटीन नकोत तर कुणाला फॅट्स नकोत. अश्या अनेक कृति इथे आहेत. जर काहि खास गरज असेल, तर आम्ही सगळे आहोतच.
अमि. ग्रीक दही जवळजवळ आपल्या दह्यासारखेच असते. त्यात फक्त साखर घालून श्रीखंड करता येईल.
आपल्याकडच्या आंबट चक्क्यात बरोबरीने साखर घालतात. पण मला ते फारच गोड वाटते. त्यामूळे चव बघत बघत, साखर घालणे योग्य.
धन्यवाद, दिनेशदा...मला वजन
धन्यवाद, दिनेशदा...मला वजन कमी राहील अशा रेसिपी हव्या आहेत.
सुनिता, या पानाच्या
सुनिता, या पानाच्या मथळ्यावरील ही सूचना पहा:
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
कृपया तुमची बिनअंड्याच्या केकची कृती नवीन धागा वापरून लिहिणार का? धन्यवाद.
कुणाला झटपट लिम्बु लोणचे
कुणाला झटपट लिम्बु लोणचे म्हणाजे जे पटकन मुरते,अशाची रेसिपी माहीती आहे का?मला ५/६ लिम्बाचेच करायचेय.
जुन्या मायबोलीत एक १ तारी पाक करून त्यात लिम्बाच्या फोडी टाकाय्च्या आशी १ रेसिपी पाहीली,पण ती नक्कि समजली नाही.
मदत समिती, माफ करा. (मी ते
मदत समिती,
माफ करा. (मी ते वाचलेच नव्हते).
नवीन पाककृती असा धागा वापरून 'तो' रेसिपी लिहीते.
तुमच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.
सुनिता.
तोषवी - इथे पहा माझी रेसिपी
तोषवी - इथे पहा माझी रेसिपी - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post.html
धन्यवाद दिनेशदा.
धन्यवाद दिनेशदा.
तोषवी, लिंबू कापून त्यात
तोषवी, लिंबू कापून त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व साखर घालून, जरा पाणी सूटले की मावे मधे १५ मिनिटे शिजवायचे. मग ते ५/६ दिवसात मूरते. असे सगळे एकत्र करुन कूकरमधे वाफवताही येते. (पण ते जास्त टिकत नाही)
स्नेहा, मी प्रयत्नपूर्वक माझे
स्नेहा,
मी प्रयत्नपूर्वक माझे वजन आटोक्यात आणले आहे. तेला तूपाचा मर्यादीत वापर. तळणे पूर्णपणे
वर्ज्य. रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी, सूपमधे शिजवलेले ओट्स. असा माझा आहार असतो. सोबत
भरभर चालण्याचा व्यायाम. मी वाचल्याप्रमाणे, शरिरातील चरबीच्या पेशी कमी होत नाहीत, तर
त्यांचा आकार कमी करता येतो. मी कुठलाच पदार्थ वर्ज्य केला नाही, फ़क्त तेल व तूप मर्यादीत,
आणि एकंदर आहारच मर्यादीत केला. हा फ़ॉर्म्यूला, सगळ्याना झेपेल वा चालेल असा नाही, पण
मला मात्र उपयोगी पडला.
धन्यवाद्,दिनेशदा..
धन्यवाद्,दिनेशदा..
स्नेहा, अगोने मोठा लेख
स्नेहा, अगोने मोठा लेख लिहिलाय वाचला का ?
वाचते आता.धन्यवाद....
वाचते आता.धन्यवाद....
मिनोति, दिनेशदा करून बघ्ते या
मिनोति, दिनेशदा करून बघ्ते या क्रुती प्रमाणे.कळवीनच कस झालय ते.
धन्यवाद.
धन्यवाद दिनेश.
धन्यवाद दिनेश.
सोया चंक्स वापरुन (दह्यात
सोया चंक्स वापरुन (दह्यात मॅरिनेट केलेले) करायच्या व्हेज बिर्यानि चि आयडिया मध्ये कुणितरि इथे दिलि होति त्याचि सविस्तर कृति मिळु शकेल का?
चिकन हॉट डॉग कसा बनवायचा? इथे
चिकन हॉट डॉग कसा बनवायचा? इथे चि. सॉसेजेस, लांबडे बन्स, केचप, मायो, मस्टर्ड, मिळते पण नक्की प्रोसीजर काय? वर पिकल्स घालतात ते काय? न्यु यॉर्क मध्ये रस्त्यावर मिळतो त्या हॉट डॉग मध्ये बीफ असते का? मला घरी परफेक्ट हॉट डॉग बनवायचा आहे. त्या भानगडीत ग्रॅन्युलर मस्टर्ड चा ड्बा आण्ला त्यात यलो पेस्ट बरोबर मोहरीचे काळे पण दिसते आहे या कारणास्तव टार्गेट ऑडियन्सने रिजेक्ट केले.
त्या मस्टर्डचे काय करायचे? लेट्युस घालायचे का?
अगोचा कुठला लेख. लिंक द्या ना
अगोचा कुठला लेख. लिंक द्या ना कुणी तरी
Pages