कैरी आंबा यांचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 8 April, 2022 - 11:38

चैत्र महिना आला.

कैरी आंबे येऊ लागले आहेत.

वाटली डाळ , मोकळे तिखट , कैरीचे पन्हे, कैरीची चटणी या मोसमाचे पहिले खाऊन झाले. फोटो काढले नाहीत, पण अजून दोनचारदा तरी बनेल. तेंव्हा बघू

हा धागा आंबा व कैरी यांचे पदार्थ व त्यांच्या आठवणीसाठी आहे.
images (1).jpegimages (1).jpeg

हे फोटो गुगलवरचे आहेत

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटली डाळ नाही, कैरीची डाळ..
वाटली डाळ भिजवून वाटून परतून लिंबू पिळून करतात..
कैरीची डाळ किंवा कैरीची डाळीची कोशिंबीर असं पण लांबलचक नाव आहे.. डाळ भिजवून कच्चीच वाटून, कैरी कीस आणि वरून खमंग फोडणी.. आ हा हा
परवाच करून झाली..

कैरी कांदा चटणी, कैरी भात करायचा आहे अजून

आमचुर घरी कुणी केले आहे का?>>>> कैर्‍यांचे पातळ काप,कापून आईने वाळवले होते.मस्त सुके झाले होते.ते काप आमटीत (डाळीच्या/करंदीच्या..सुके मासे) मस्त लागतात. वाळवलेले काप दळले नाहीत.

मला कैरी मिरची चटका ( जो ग्राहक संघात मिळतो) तो करून बघायचाय. ग्राहक संघात मिळतो त्याची चव अप्रतिम असते. पण आता ग्राहक संघातून ऑर्डर कोणाच्या थ्रू देऊ असा प्रश्न आहे. मी एका ओळखीच्यांकडून घ्यायचे, त्यांनी आता ग्राहक संघाचं सामान घेणं बंद केलं. असो. करून बघायचाय,
कैरी, मिरच्या, आणि मिरचीचा मसाला मिक्सर मधून काढत असतील बहुतेक असं वाटतं. मिठ थोडं जास्त असतं. आणि फोडणी.

कैरीच्या डाळीला आम्ही आंब्याची डाळ म्हणतो.

कैरी कांदा कोशिंबीर मस्त होते, नुसतं तिखट मीठ आणि गुळ किंवा साखर घालायचं. तिखट जरा जास्त घालायचं. नुसत्या कैरीचीही छान होते.

छोट्या कैऱ्या मीठाच्या पाण्यात घालून मुरवूनही छान लागतात.

उकडून घेतलेल्या कैऱ्यांचा गर काढून लोणचे किंवा कढी (सार) छान होते. त्या लोणच्याला आम्ही आम म्हणतो, फोडणी करून त्यात चार मेथी दाणे घालायचे आणि सुक्या लाल मिरच्या, मग गर घालून तिखट, मीठ, गूळ घालून छान होतं. आवडत असल्यास एखादी लवंग, थोडी मिरपूड, ओवाही छान लागतो.

कढी करताना बेसन लावावे लागतं.

कैरी आलं चटणी, तिखट मीठ गूळ जिरं घालून छान होते.

आलं सर्वांसाठी उत्तम साथीदार आहे. करवंद चटणी, कच्च्या हिरव्या चिंचेची चटणी.

जाडे पोहे घ्यायचे कच्चे त्यात तेल तिखट मीठ, कैरी, कांदा, ओलं खोबरं घालून कालवायचे आणि खायचे. मी साखर घालत नाही यात, हवी असल्यास घालावी.

भेळ छान लागते कैरी घालून.

कैरी ची सोल (तोरा सोल) वर देवकी ने सांगितले तसे.
आंब्याचे हूमान, Gojju, सासम/सासव, चीरीडलो आंबो, कोंकणी रेसीपीज.

रा mu, तुला विट्याची सोलं माहीत आहेत का? साबाने एकदा दिली होती.mitt आंबट.ते फळ काय असते तेही पाहिले नाही.
करीचे गोल घालून आंबट गोड, तिखट चवीचे लोणचे करायचे आहे.मस्त लागते.

मला फक्त कैरीची चटणी आणि कैरी भात करता येतो.
मला इथे पहिल्यांदा करणारी साठी कैरीचे लोणचे (सोपी रेसिपी) आणि कैरीचे पन्हे रेसिपी मिळाली तर फार बरं होईल.

डाळ भिजवून कच्चीच वाटून, कैरी कीस आणि वरून खमंग फोडणी>>>>> कोणती डाळ? कच्च्या डाळीने पोट खराब होत नाही का? (खाल्ली नाही कधी म्हणून विचारतेय)

हरबरा डाळ भिजवून वाटायची . वाटताना त्यात हिरवी मिरची घालायची . नंतरकैरीचा किस , मीठ, ,साखर घालून वरून कडीपत्ता ची खमंग फोडणी द्यायची .

मेथांबा ही छान होतो कैरीचा गूळ घालून . मला कैरी - कांदा चटणी ची रेसिपी हवी होती , कोणी सांगू शकेल का ?

पन्हे आज पहाटे केले.

रात्री दोन कैर्या पाण्यात घालून शिजवल्या
भरपूर वेळ शिजवल्या, शिजल्या की कैरीचा रंग फिक्कट होतो.
मग पाणी फेकून दिले
कैर्या थंड होऊ दिल्या , साली काढून सगळा गर बोटाने काढून भांड्यात ठेवला व मॅश केला

त्यातच गूळ क्रश करून घातला , गरजेनुसार ,
2 वेलदोडे ठेचून घातले
सगळे ढवळले
झाकून ठेवले व पहाटे थंड पाणी ओतले.

मस्त लागते

gandhi land.jpg

गर शिजवणे एक दोन तास आधी करून गूळ , वेलदोडे मिक्स करून ठेवावे, म्हणजे सगळे मिळून येते.

एकदम आयते केले तरी चालते.
कोण कोण लोक सगळे गाळूनही घेतात.

मंगलोरकडे ओल्या नारळाचं वाटण करून त्यात कैरीची भाजी करतात. सध्या येतात तश्या थोड्या गोड कैऱ्या हव्या त्यासाठी.

आंब्याची ओल्या खोबऱ्याची चटणी. भेळ (कच्च्या आंब्याचा कीस घालून) .आमटी.
पिक्या आंब्याचा शिरा. मोदकाच्या सारणात आमरस. आंबा बर्फी
आंब्याचे किसून सरबत. आंब्याचे बाठे भाजून त्यातल्या कोयीची काजूगर घालून चटणी.
बाकी इतरांप्रमाणेच.

Admin तोंपासू म्हणजे काय? मी नवीन आहे!
बाकी कैरीची डाळ,पन्हे आणि कोणालाही माहीत नसलेले माझ्या आईचे कैरीचे इन्स्टंट लोणचे! वा आयुष्य सार्थकी लागले,त्या लोणच्याची रेसिपी नंतर टाकतो,पण शाळेच्या खूप इयत्त्या ते लोणचे आणि पोळी खाऊन अर्थात घाई घाईने पळालो आहे

माझी एक आम्र मंजीरी म्हणून पाककृती आहे. आज पहिला आंबा खाल्ला . उद्या कैरीची चटणी व हातलोणचे घालीन. इथे मेली सगळ्याला लगेच बुरशी येते. काल फळे घेत होते आंबे कसे विचारले तर बाराशे ला डझन ते साडे सातशे मग नाही घेतले. त्यात तो म्हणे वो अभी जरा कडक है. मग माझा चेहरा बावळट झाला. मग रहने दो म्हणून मारून नेले आपले केळी पेरु चिक्कू घेतले. पण आज लेकीने आंबे आणलेच मुलींना देउन मी साइ डचे दोन बारके तुकडे खाल्ले. आता मी उद्या बघीन ते कडकवाले कधी पिकतात ते.

पण हे सुपर् मार्केटातले कोणचे त्री आंबे आहेत देवगड हापूस नव्हे. तो पारखूनच घ्यायला हवा.

मला कैरीची फर्मा स चटनी पण येते लिहिते रेस्पी.

रा mu, तुला विट्याची सोलं माहीत आहेत का? >>>>> बिंबल/बिंबला का? थोडी फार तोंडली सारखी लांबट असतात. लोणचे सोल बनवतो आम्ही. आंबसाण/ आंबट पणा साठी आमटी त वापरतो.
आप्पी मीडी कुणाला माहिती आहे? देवकी तुला माहीत आहे का?
आप्पी मीडीच लोणचे yummy. ( एक लोणच्याचा कैरी प्रकार )

आप्पीमिडी उप्पीनकाई

https://youtu.be/qyc05fNbHxM

त्या गुजरात पाणी लोणच्याचा हा कर्नाटकी भाऊ आहे.
गुजराती प्रकार मला थोडा incomplete वाटत होता, नुसतेच तेल पाणी मीठ, हा कर्नाटकी जरा बरा वाटला.

आता बरणी आणा!! लोणची प्लास्टिक बरणीत होतात काय ?

अळू लावायला ट्रे आणा
लोणच्याला बरणी आणा
Proud
ह्यांच्या व्याजात दर महिन्याला वाट्टेल तसली लोणची मिळतील!!

गुजराती पद्धत

पाण्यावरचे कैरी लोणचे

कैरी धुवून पाण्यात बुडवून ठेवावीत.

पाव वाटी एरंडेल तेलात दोन चमचे हळद घातली. बरणीत आतून चमच्याने सोडून माखून घेतले.

youtimageshare.com - oP9SYfI5Ux"

मग त्यात मीठ टाकले, मग एकेक कैरी टाकली. कैरीवरचे पाणी पुसायचे नाही.

थोड्या कैर्या, मग थोडे मीठ तेल, पुन्हा कैरी , पुन्हा मिश्रण
असे भरले व बंद केले.

आता दोन दिवस झाकून ठेवायचे, मग त्याला पाणी सुटेल. दोन दिवसांनी पुन्हा उघडून थंड पाणी किन्वा बर्फ टाकावा, त्या पाण्यात कैर्या पूर्ण बुडाव्यात. 20 दिवसांनी उघडून एकेक कैरी घेऊन धुवून कापून खाणे.

चिनी मातीची बरणी , कापडाने तोंड बांधणे इ केले नाही. साधी प्लास्टिक बरणी आहे.

youtimageshare.com - 01CEYEvIyM

छान. आमचगयाकडे अशा कै-या खडे मिठाच्या पाण्यात मुरवतात. त्याही बरेच महिने टिकतात. मिठ जास्त घालावे लागते.

आंब्याचं सासव ... भारी म्हणजे फारच मस्त लागतं. पिके गावठी आंबे फोडणीत मेथ्या घालून थोडे शिजवायचे, नारळ मोहोरी वाटून घालायचं आणि चवीला मीठ, तिखट आणि गूळ. रस अंगाबरोबर ठेवायचा. रच्याकने फोटो लास्ट year चा आहे.

20210523_102457.jpg

मला माहित आहे.. अप्पामिडी लोणचे ( काही लोक त्याला बाळ कैरी लोणचे पण म्हणतात) माझी आई बनवायची.. बिंबलं आणि करमल्ल दोन्ही चे लोणचे मस्त होते..

आज त्या आंब्याच्या बरणीत थंडगार पाणी अर्धा लिटर ओतले व जोरात हलवले
कैर्या पिवळट पांढरट पडल्या आहेत.

गोव्यात असेच लोणचे पसरट भांड्यात करून त्यावर दगड ठेवतात व दाबतात

यु ट्यूबवर एकाने हाच मसाला फासून आंबा , करवंद , गव्हार , आले, हळद मिक्स लोणचे बनवले आहे, त्यात पाणी घातलेले नाही.

बघू

त्यात पाणी घातलेले नाही...... हेच आईनेही सांगितले.फक्त मीठ आणि हळद लावून बरणीत भरायचे.
मी आज गुजू पद्धतीने केले,पण आजच थंड पाणी घातले.जे दुसऱ्या दिवशी घालायचे होते.बघू काय होते ते.

कसले एकेक सुरेख फोटो आहेत इथले.

रात्री आंबेडाळ, पन्हं केलेलं. मी थोडी मुगडाळ पण घालते चणाडाळ भिजवताना.

हो , साऊथ इंडियात राम नवमीला मूग डाळीची कोशिंबीर करतात आणि सोबत गूळ , लिंबू, पुदिना, सुंठ , काळीमिरी यांचे एक सरबत करतात. पानकम म्हणून.

Proud

पण पन्ह्यासदृश त्या पेयात कैरीच नसते , हे म्हणजे रामायणात राम नसल्यासारखे होईल.

https://www.misalpav.com/node/50039

एरंडेल तेल , हळद ,मीठ व लाल तिखट मिश्रण तयार केले , 25 मिली तेल.

थोडे बरणीला आतून फासले, मग दोन आंब्याना फासले , बरणीत भरले , त्यावर मिरच्या , गव्हार व लसूण हेही मुठमुठभर वेगळे वेगळे घेऊन मिश्रण फासून भरले , मिरच्या व गव्हार पाण्यात धुवून तसेच ओले असताना भरले

यात पाणी घालणार नाही

आज खाली भरपूर पाणी सुटले आहे. सगळे पदार्थ सुकत जातात.
henken ashi.png

गव्हार व मिरचीचे देठ तोडले नाहीत , लसूण मात्र सोलून घेतले.

सगळे पदार्थ स्वतंत्र घेऊनही लोणची होऊ शकतात , 15 दिवसांनी लोणचे मसाला , हिंग , मोहरी , जिरे पावडर इ गरजेनुसार घालता येईल किंवा हे बेसिक लोणचे तसेच ठेवता येईल.

किती दिवस टिकते ? युट्युबवर वर्षभर म्हणून दिले आहे.

कैरीचा तक्कु

१ तोतापुरी कैरी
३ चमचे कैरी लोणचं मसाला
अंदाजे अर्धी वाटी गूळ (गूळ कैरीच्या आम्बटपणावर कमी जास्तं करावा लागतो)
फोडणी साठी तेल, मोहरी,जिरे, हिंग, हळद, ९-१० मेथी दाणे
मीठ चवीनुसार

कैरी बारीक किसून घ्यायची, त्यात मीठ गूळ आणि लोणचं मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचं, खमंग फोडणी करून कैरीच्या मिक्श्चर मध्ये फोडणी घालायची, परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं, १५ दिवस - महिनाभर टिकते. आईची रेसिपी मला भयंकर आवडते. तोतापुरी ऐवजी दुसरी कैरी वापरता येते पण गुळाचे प्रमाण कमी अधिक करावे लागते.