लज्जतदार-मसालेदार कैरीची कोशिंबीर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 March, 2012 - 06:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) छोट्या कैर्‍या ५-६ मोठ्या असतील तर १-२
नुसती कैरी पाहूनच तोंपासु की नाही!:स्मित:

२) १ मोठा चमचा मिठ
३) १ मोठा चमचा साखर
४) पाऊण चमचा लाल मसाला किंवा लाल तिखट
५) १ चमचा गोडे तेल

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कैर्‍यांचा सुगंध घेत घेत कैर्‍यांची साले सुरीने काढा. छोट्या कैर्‍या असल्यास त्याचे दोन भाग करून कोय काढून टाका. बाठेवाल्या असल्यास तशाच किसण्यासाठी ठेवा, किसुन झाल्यावर बाठे टाकता येतात.

२) आता कापलेल्या कैर्‍या किसून घ्या. ही प्रक्रिया करताना तोंडाला पाणी सुटणे, लहान मुलांनी मध्येच कैर्‍या पळवणे असे प्रकार होऊ शकतात. अगदीच अनावर झाल्यास एखादा तुकडा तोंडात टाका. Happy

३) किसामध्ये मिठ, मसाला, साखर टाकुन एक चमचा कच्च्या तेलाची धार सोडा (कच्च्या तेलाची म्हणजे न तापवता वगैरे). हा किस हाताने एकजीव करा म्हणजे तुमच्या हाताची चवही त्याला येईल. पण न राहवून बोटे तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या Lol धिर असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि रसाळ लज्जतदार, मसालेदार कोशिंबीर तयार होईल.

हा मी अधीरपणाने न मुरवाता काढलेला तयार कोशिंबीरीचा फोटो.

अधीरपणाने काढण्याचे कारण ह्या फोटोवरून समजेलच Happy आमची बच्चेकंपनी मुरायच्या अधीच तुटून पडली होती कोशिंबीरीवर.

वाढणी/प्रमाण: 
कितीही केली तरी कमीच.
अधिक टिपा: 

विशेष टिप म्हणजे मुलांना आधी सांगूच नका हा प्रकार करणार आहात नाहीतर तुमच्या पाककृतीत मध्ये मध्ये अडथळे येतील Lol मुलेच काय काही मोठी माणसेही अडथळा आणतात घाई करुन.

जर साखर मिठाचे प्रमाण कमी वाटले तर नंतर थोडे टाकावे.

मसाला असला तरी हा प्रकार मुले आवडीने खातात.

तेल आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल.

लाल तिखट असल्यास पाव चमचा पुरे.

माहितीचा स्रोत: 
लहानपणीचे उद्योग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

फोटो पाहूनच लाळ टपकली Wink

आम्ही साखर नाही घालत ह्यात.... मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जायचो तेव्हा सकाळी दूध पिऊन झाल्यावर आमराईत जाऊन प्रत्येकी एक अशी कैरी तोडून आणायची आणि हे लोणचं आपलं आपलं ताजं ताजं करायचं आणि न्याहरीला मऊभाताबरोबर ओरपायचं असा रोजचा कार्यक्रम असायचा. चवीला म्हणून बहिणीचं, भावाचं लोणचं घेऊन चाखून बघायचं आणि मग तू जास्त घेतलंस, माझं लोणचं संपवलंस असं भांडत भांडत लोणच्याची खुमारी वाढवायची... मस्त दिवस होते ते!

अम्म्म्म्म्म्म्म्म...... मस्त आंबट चिंबट चव ... फोटो बघुनच.... लागला Happy

मसाला म्हणजे कुठला मसाला? लोणच्याचा का? की नुसते लाल तिखट??

निषेधार्ह धागा आहे

असली चित्रे पाहून समाजात हिंसाचार बोकाळू शकतो

तोंड चाळवणे व तडफडवणे या कलम १०२ व २०२ खाली आपल्याला रुपये पाचशेचा दंड ठोठावण्यात येत आहे

ओके जागू Happy आमचा आंब्याचा सिझन संपला पण कधी कधी एशियन शॉप्समधे थायलंड वगैरेहून आलेल्या कैर्‍या मिळतात... आंबट नसतात एव्हढ्या पण तरीही... करून बघेन Happy

जागुतै.. दुष्ट आहेस अगदी..
किती तो दुसर्‍यांवर अत्याचार करावा म्हणते मी... Proud

पहिला फोटो बघुनच मी गार.. Sad तोंपासु कैर्‍या

वर्षु, चातक धन्यवाद.

बेफीकीर वकिलाच्या बायकोकडूनच काय दंड मागताय Lol

लाजो अग आंबट नसतील तर साखर कमी घालायची.

चिउ :स्मितः गरम हो.

देशात नसल्याचा सगळ्यात मोठा त्रास मला होतो तो एकदा कैर्‍या बाजारात यायला लागल्या की.....आणि मग पुढे हापूस पहिल्या पावसाची सर निघून जाईपर्यंत दिसेनासा होईस्तो..त्यामुळे या अत्यंत सुंदर रेसिपीसाठी स्वतःचाच निषेध करायला हवा...बघुया आता आपल्या स्टाइलच्या कैर्‍या आंबे खायला कधी मिळणारेत ते...
मस्त रेसिपी एकदम बालपणात घेऊन जाणारी....

आजच कै री आणायला हव्वीच Happy जागूली, मस्त कोशि. आम्ही पण लहान्पणी कैरी बारीक चिरून ति.मि. घालून खायचो.. :लाळ टपकणारी भावली:

ललिता, जयश्री, अवल, वत्सला, अनघा धन्यवाद.
कैरी म्हणजे बालपणीची आठवणच नाही का सगळ्यांची.

तिकडे भरवाँ करेला करताना थोडे कैरीचे तुकडे नकळत बाजुला काढले गेलेच. Wink मग मीठ, तिखट घालून थोडे मुरवले आनि दिवसभर एक एक फोडीचा चट्टा-मट्टा केला. Happy

Pages