चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पाणी फ्लश वरून आठवले. तमाम हॉलीवूड वाल्यांना व आजकाल ही लागण झालेल्या बॉलीवूडवाल्यांना सूचना. एखादा हीरो किंवा हिरॉइन उलटी करत आहेत हा सीन दाखवायचा असेल तर तो/ती त्या सिंक/कमोड मधे वाकले व एक ठराविक आवाज काढला - इतपत बास आहे. आम्हाला कळते. आम्ही एरव्ही आपटणारी फुले बघून सुद्धा समजून घेतो काय चालले आहे (कधी कधी त्या उलटी सीनची मुळे या सीन मधे असतात). त्याकरता साग्रसंगीत उलटी, त्यातून बाहेर येणारे मटेरियल दाखवायची गरज नाही. आम्ही कधी कधी जेवताना तुमचे पिक्चर्स बघतो. पाहिजे तर आपटणार्‍या फुलांसारखे नवीन प्रतीक तयार करा उलटी-सीनचे. सेन्सॉरनेही R/MA/Adult च्या पुढचे एखादे रेटिंग द्यावे असल्या पिक्चर्स करता. Not suitable for dining audience!

ओठ, लाळ, जीभ इ ऐवजी फुलं चालतात तर गॅस्ट्रीक कंटेंट ऐवजी एम अँड एम का चालू नये? केक म्हणजे सिंक Wink

फा Lol
बधाई दो मध्ये भारतात शिवसागर स्टाईल रेस्टो भाज्या टेक आउट देतात तसले कंटेनर हा दोन नंबरचं प्रतिक म्हणून कॉईन केला आहे. सो नव्या प्रतिकांचं मार्केट चलतीत आहे. Proud

Lol उलटी का होते आहे त्यावरून अशी नुआन्स्ड प्रतीक वापरता येईल. म्हणजे गोड बातमीपायी हिरॉईनला उलटी झाली तर एम & एम. दारू पिऊन उलट्या करतात तर शिवसागर कंटेनर....

(कधी कधी त्या उलटी सीनची मुळे या सीन मधे असतात). Rofl
सी, आता असल्या केकचा फोटो बघितला तरी हेच आठवेल.. शी Lol

***** सॉरी. जेवण स्पॉयलर अलर्ट!********
शी नाही. ती आठवायला भाज्यांचा टेक आऊट कंटेनर.

फा Lol

Proud
शी वरून आठवले
एका चित्रपटात जिम कॅरी शी करायला बसतो. आणि पुढे काय होते हे दाखवायला आईसक्रीमच्या मशीनमधून सप्पकन सॉफ्टी बाहेर येताना दाखवलीय..

फा, अनुमोदन.
सध्या इतर काही (अ‍ॅनिमेशन वगैरे मध्ये जास्त करून) फोर डी/ फाइव्ह डी वगैरे अनुभवावर आधारित चित्रपट बघता / अनुभवता येतो म्हणे. म्हणजे चित्रपट थ्रीडी असतो, पण तिथे बसणार्‍या धक्क्यांनुसार आपली खुर्ची हलते, तिकडे पाणी उडालं की इकडे तुषार उडतात - असलं काय काय. हा विषय निघाला की मला नेहमी प्रश्न पडतो की त्यात स्लमडॉग मिलेनियर कसा दाखवतील दाखवला असता? स्लमडॉग चित्रपटात तो मुलगा संडासाच्या मधून खाली पिवळ्या चिखलात उडी टाकतो तो एक सीन आहे.

Rofl

पावनखिंडी बद्दल बहुतेक लोकांची कल्पना, "2 डोंगरातील चिंचोळी वाट, जिकडे दाराच्या चौकटीमगे लपवा तसे बाजी आणि मावळे लपून बसले होते आणि एका वेळी 1-2 सैनिक त्या वाटेने वर आले की त्यांना मारायचे, एखादवेळी मावळा मारला गेला तर नवीन मावळा त्याची जागा घ्यायचा" अशी असते .

पावनखिंड पहिला नाही, पण जे काही ट्रेलर पाहिले आहे त्या तुन डिजिटली created खिंड दिसली आणि पिक्चर पाहायचा उत्साह गेला

राधे श्याम खूपच काहींच्या काही आहे। ती हेगडे ट्रेन मधून बाहेर वाकून स्टंट काय करते खूपच डेंजरस। म्हंजे एक सुळसुळीत स्कार्फ कंबरेला बांधून त्याचा एक टोक दुसऱ्या कुणाकडे पकडायला देऊन हि बाहेर लटकते एकदा नाही दोनदा। दुसऱ्यांदा हिरो सुद्धा तिच्याबरोबर हा स्टंट करतो। काहींच्या काहीच। एक क्षणाला वाटते आता हि पोल ला ठपाक आपटते कि काय पण नाही। निदान हिरो तरी आपटेल पण कोणीच नाही।

पावनखिंडी बद्दल बहुतेक लोकांची कल्पना, "2 डोंगरातील चिंचोळी वाट, जिकडे दाराच्या चौकटीमगे लपवा तसे बाजी आणि मावळे लपून बसले होते आणि एका वेळी 1-2 सैनिक त्या वाटेने वर आले की त्यांना मारायचे, एखादवेळी मावळा मारला गेला तर नवीन मावळा त्याची जागा घ्यायचा" अशी असते .>>>>>>>>>>>>>>
हें असे आम्हाला लहानपणी सुद्धा कधी वाटले न्हवते।

सर्व राजघराण्यांनी सत्ता, संपत्ती , जागा, महाल , 7/12 हे सगळे खजिने स्वतःकडे ठेवले व जनतेला 10 हजार वर्षे खालील प्रॉपर्टी दिली

खंड ( पुस्तकांचे )

खिंड ( खैबर खिंड ते घोड खिंड)

खिंडार ( पडलेले बुरुज)

खंदक ( पूर्वी अमका राजा पाणी पीत होता म्हणे , आता शेवाळे असते आणि घरात नळ आहे , त्याचे मात्र कौतुक नसते)

खंडहर ( फाईव्ह स्टार हॉटेल राजाना , शनिवार वाडा जनतेला)

खिद्रापूर वगैरे ( पुरातन स्थापत्य शास्त्र म्हणे , हेमाडपंती 1 बी एच के कोण बांधून देईल का ? की भिंतीवर मृदुन्ग वाजवणार्या पुष्ट बायका कोरायच्या ? )

खांब ( लेण्या मधले )

खापर , खेळणी , खंजीर ( म्युझियम मध्ये नेऊन दाखवतात , तिथे सोने नाणे , हिरे दाखवत नाहीत )

पावनखिंडवाला मराठी इतिहासावर अजून 5 मुवि बनवणार आहे

मंजुळे 3 मुवि बनवणार आहे.

अजून एक किल्ला की कुठला तरी मुवि येत आहे

सर्व राजघराण्यांनी सत्ता, संपत्ती , जागा, महाल , 7/12 हे सगळे खजिने स्वतःकडे ठेवले व जनतेला 10 हजार वर्षे खालील प्रॉपर्टी दिली>> वॉट्सापवर तुफान पळेल ही पोस्ट Proud

पावनखिंडीबद्द्ल वर जे लिहिले आहे त्याला अनुमोदन! खिंडीतील लढाई कायच्या काय आहे. प्राण जाताना दिवा विझणे हे तर सरळ सरळ देवदासवरून उचललं आहे. त्यामुळे शोक, गांभीर्य वाटण्याऐवजी ते हास्यास्पद झालं आहे.
क्षिती जोग बडी बेगम म्हणून दिसली चांगली आहे पण तिचे उर्दू उच्चार अगदी मराठी वळणाचे वाटतात, त्यावर थोडी मेहनत घ्यायला हवी होती.
दीपाई बांदल या सुनेपेक्षाही तरूण वाटतात.
अर्थात काही प्रसंग जमून आले आहेत. महाराजांचं पन्हाळा सोडताआधीचं भाषण, महाराज आणि शिवा काशीद यांचा निरोप आणि 'रणी निघता शूर' या गाण्याची placement. युगत मांडली ची चाल catchy आहे पण चित्रपट जिथे वेगाने पुढे सरकायला पाहिजे तिथे या गाण्यामुळे उगाच ताणल्यासारखा वाटतो.

प्राण जाताना दिवा विझणे हे तर सरळ सरळ देवदासवरून उचललं आहे. >>> पूर्वीच्या अनेक मराठी पिक्चर्स मधेही ते होते. कदाचित सर्वांनीच जुन्या देवदासवरून घेतले असेल.

तसं नव्हे, 'प्रतीक' म्हणून नाही Lol
तो दिवा विझू नये म्हणून जिवापाड जपणं आणि पावसाने/वाऱ्याने दिवा विझला म्हणजे आता ज्याच्यासाठी दिवा लावलाय तो गेला हे समजणं.

Pages