न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२३ ला जमणार नाही Sad रिलीज आहे.

वरच्या कारणांमधे "नवरा परगावी जाणार आहे", "त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे" ही कारणं पण अ‍ॅड करा Happy

मै, आजुन पुढच्या तारखांची अवेलेबिलीटी नाही कळु शकणार का? मला कोणतीही तारिख चालेल पण बाकीच्यांकरता म्हणतोय.

जानेवारीमधे फक्त २३ मिळू शकेल असे कळले. फेब्रुवारीचे माहित नाही. पण मार्च किंवा एप्रिल पहिला वीकेन्ड मधे जर डीसीचं मोठं एवे ए ठि ठरत असेल तर जस्ट आधी फेब मधे कशाला Happy

Lol त्यापेक्षा शिट्टीकर बरे. चार दोन का होइना पण जमतात, असे ठरण्याआधीच सांगता नाही झाली कधी (टुकटुक करुन पळुन जाणारी बाहुली :फिदी:)

मै, ते ही बरोबर आहे. फक्त जेवढे जास्त लोकं येतील तेवढी मजा जास्त येते. मार्च एप्रिल मध्ये डी सी मधलं ए वे ए ठी जरी असलं तरी जानेवारी एन्ड किंवा फेब्रुअरी मध्ये बारात सहजतेने येवु शकणार्‍या सगळ्याच माबोकरांचे ए वे ए ठी करण्यात काय हरकत आहे. Happy

अहो, शिट्टीकाकू, अधिवेशणाची सांगता तुमच्यातल्या काकूंनीच केलीये. बाराकरांनी 'सांगता करण्याबद्दल' अजून चकार शब्दही काढलेला नाहीय.

वाचला, मग? त्यांनी जानेवारीत करुयाच नको असं कुठे म्हटलंय?(ज्यांना जमेल ते येतील) फेब मध्ये करण्यापेक्षा मग एप्रिलमध्येच भेटू असं त्यांचं म्हणणं दिसतंय.

(पांशा:ए आपण पेटवतोय.. म्हणजे अहो जाहोच बोलायला हव ;))

पण जस्ट आधी फेब मधे कशाला अस म्हणाल्या थोड्या वेळाने फेबच्या जस्ट आधी २३ जान ला कशाला असही म्हणतील...

ए ए माझ्या नावाने काय गोंधळ चाल्लाय. मी आपलं असं तेव्हा मला वाटलं ते म्हटलं. पण फेब मधे करायचं असेल तर मी तयारच आहे! Happy (स्वगत : या पोस्ट्मुळे मी गोंधळ वाढवतेय की कमी करतेय ?!)

मला काय वाटतय ते मी म्हणायचा प्रयत्न करते मग तुम्हाला पण तसच वाटलं तर तुम्ही पण आपलं म्हणणं जसं वाटतय तसं म्हणा मग भलेही मला पुन्हा तसं वाटेल किंवा वाटलं तरी मी ते म्हणेनच असं नाही असं आपलं मला वाटतय (सध्या तरी).

ओह, पापलेट होय.... मला त्याच्या काही उपयोग नाही. पण तरीही मी येणारच.
अमृता, आता सांगता करण्याच्या भाषेपेक्षा लोकांना यायची गळ घाल बरं.

मी नंबर लावुन वर्षं लोटाली आहेत देसाई, त्यामुळे पा आ ला माझ्या मागे सगळ्यांचे नंबर. चिकन वाले कोणी येतायत की नाही? भाई तर नक्की आहेत आजुन कोण कोण चिकन खातं?

मला २३ जानेवारीला जमेल. पहाटे उठून व्यायाम, स्नान संध्या, पूजा, जपजाप्य, वैश्वदेव इ आटपून तीर्थ घेऊन, सकाळी ११ वाजता उपस्थित राहू शकेन. कुणि स्नानसंध्या पूजा आटोपून येतील त्यांनाहि तीर्थ मिळेल.

कुणि देव म्हणतात कुणि दगड. सगळे मानण्यार्‍याच्या मनावर!

मनापासून भक्ति असेल तर रंपा पण तीर्थ होईल, नाहीतर तीर्थपण रंपा होईल!!

Pages