न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे, छे ! बारातल्या माबोकरांना मिसोकर काही बोलणार ? शक्य आहे का ? ... 'कुणीतरी' हे वाक्य नक्की वाचेल ह्याची मला खात्री आहे Proud

अरे हा बाफं येवढा वाहुन सुद्धा अजुन तारिख नक्की झाली नाही? २,९,१६,२३,३० पैकी कुठलीच जानेवारीतली तारिख जमणार नाहिये का? मग फेब्रुअरी ६,१३, २०, २७ ला आकडे लावा.
खरं जानेवारीत केलं तर बरं होइल.

त्यापेक्षा हिवाळी गटग फ्लोरिडात का नाही ठेवत? हॉलची गरज नाही. कँपिंग ग्राउंड बुक करू. सेंट जॉन नदीत कायाकिंग, कनुइंग, नदीकाठी बारबीक्यु, हायकिंग असं सगळं करता येईल.

भाई, प्लेन कशाला बुक करता? तुमच्या तिकडून डॉनल्ड, इव्हान्का मंडळी येतच असतात इकडे गॉल्फ खेळायला. तसंही विमानात चार-आठ सिटा मोकळ्या ठेवून येतात, त्यापेक्षा पाशिंजरं भरून न्या म्हणावं!

अरे हो बरी आठवण करुन दिली. बर्‍याच दिवसात डॉनल्ड्ला फोन नाही केला. आता करुनच टाकतो आठवण आली तशी नाहीतर बोंबलत बसेल फोन करत नाही म्हणुन. Happy

<<डॉनल्ड बारात असतो?? >>
ते डॉनाल्ड ट्रंप म्हणताहेत. त्याला बा रा तून न्यू यॉर्कमधे फोन करता येतो, अनिलभाईंना (ऐ. ते न. च ना!). अत्यंत हुषार नि हरहुन्नरी आहेत अनिलभाई. ट्रंप च्या you are fired या शोवर गेले होते तर त्यालाच you are fired म्हणून परत आले म्हणे. ख. खो. दे. जा.

इकडे मॉरिसटाऊनला भरपूर चार्टड प्लेन्स मिळतात. वैद्यबुवांना चौकशी करायला सांगा बरं. Wink
पन्ना, तयारी सुरु नाही झालेली. नुसतीच तोंडाची वाफ दवडणं सुरु आहे इथे. Proud

म्हणजे धुम्रपान का? <<<< वाफपान किंवा वाफौत्सर्जन होईल ते. मध्येच धुम्र कुठे आला...

****************************************
लोकहो , आमच्या हॉलची अव्हेलेबिलिटी आजच समजली. जानेवारी २३ ला मिळू शकतो.
करायचा का बुक?
मी २३ तारीख ब्लॉक केली आहे आत्ता . किती लोकांना जमतंय ? लवकर सांगा . त्याप्रमाणे मला आज -उद्या चेक पाठवायला लागेल, चेक त्यांना मिळाल्यावरच बुकिंग कन्फर्म होतं.
*****************************************

Pages