मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे. आपण फोटोंचा झब्बू मायबोलीवर अनेक वेळा खेळतो, तसाच हा शब्दांचा झब्बू! संयोजक आपल्याला शब्द देतील, तो मिळाला, की त्याला अजून कायकाय म्हणता येईल, ते लिहा. त्या शब्दाचा अर्थ, मूळ शब्दाशी असलेलं नातं, अर्थछटेतील फरक, त्या अनुषंगाने काही माहिती असेल, तर ते सगळं लिहिलंत तर सोन्याहून पिवळं! गंमतीशीर किंवा माहितीपूर्ण वाक्यात शब्दप्रयोग केलात, तर अजून मजा येईल.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच शब्द टाकावा, जेणेकरून सार्यांनाच खेळात मजा येईल.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - गोधडी
झब्बू १- घोंगडी,
झब्बू २ - कांबळं,
झब्बू ३ - वाकळ,
झब्बू ४ - लपेटं,
...
इत्यादी.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - चप्पल
झब्बू १- वहाण,
झब्बू २ - पादत्राणे,
झब्बू ३ - जोडे,
झब्बू ४ - खडावा,
...
इत्यादी.
--------------------------------------------------------------
या उपक्रमा-अंतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात (भारतीय वेळेप्रमाणे) रोज सकाळी १ आणि संध्याकाळी १ नवीन शब्द देण्यात येईल. झब्बू हा चालू शब्दावरूनच दिला (म्हणजे कालच्या/परवाच्या शब्दावरून नको) तर खेळ व्यवस्थित चालू राहण्यास मदत होईल.
--------------------------------------------------------------
दिनांक २५ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - माठ
आलेले झब्बू - घडा, मडकं, रांजण, गाडगं, सुरई, कुंजा, गरिबांचा फ्रीज, घट, डेरा, मटका, सुगड, बुडकुले, खुजा, कुंभ, बोळकं.
अपेक्षेपेक्षा वेगळ्या अर्थाने आलेले झब्बू - ढ, मठ्ठ, ठोंब्या, बुद्धु, बिनडोक.
आजचा दुसरा शब्द आहे - साडी
आलेले झब्बू - लुगडं, पातळ, उभे लावणं, धाबळी, जुनेरं, चीर, चिरडी, नेसू, धडुतं, आलवण.
साडीचे प्रकार - इरकल, पट्टू, वझाई नारू, कांजीवरम, पैठणी, शालू, पुणेरी, नारायणी, पटोला, संबळपुरी, टाण्ट, मुग्गा, चंद्रकळा, अष्टपुत्री.
--------------------------------------------------------------
दिनांक २६ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - शेत
आलेले झब्बू - शिवार, वावर, फड, वाफा, रान, मळा, काळी आई, वाडी, शेतजमीन, बाग, खाचर, पीक, शेतभूमी, क्षेत्र, बगिचा, परस, आगर, कृषिक्षेत्र, हरितगृह, शेताड, कुरण, भुई, ताटवा, कुळागर.
संबंधित शब्द - वरकड, कोरडवाहू, जिरायती, मीठागर, बागायती, भातशेती, मत्स्यशेती, मोत्याची शेती, हायड्रोपोनिक.
(वरील शब्दबाहुल्यावरून आपल्या शेतीप्रधान प्रदेशातील भाषिक समृद्धीची आणि वैविध्याची कल्पना येते, हे जाता जाता नमूद करायला हरकत नाही).
आजचा दुसरा शब्द आहे - सांडशी
आलेले झब्बू - चिमटा, पक्कड, गावी, इंगळी (सोनारी धंद्यातील एका ठराविक चिमट्यासाठी शब्द), सांडस.
संबंधित शब्द - सांडणे (द्व्यर्थी)
--------------------------------------------------------------
दिनांक २७ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - पलंग
आलेले झब्बू - खाट, मंचक, बाज, दिवाण, चारपाई, खाटलं, बेड, गादी, वळकटी, बिस्तर, बाजलं, माचा, पर्यंक, तल्प, बिछाना, पथारी, घडवंची, अंथरूण, शय्या, आईची मांडी (छोट्या बाळासाठी), पाळणा.
संबंधित शब्द - पलंगपोस.
आजचा दुसरा शब्द आहे - बडबड्या (बडबडी व्यक्ती)
--------------------------------------------------------------
दिनांक २८ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - आमटी
आजचा दुसरा शब्द आहे - पळी
--------------------------------------------------------------
दिनांक १ मार्च -
आजचा पहिला शब्द आहे - काठी
आजचा दुसरा शब्द आहे - श्रीमंत (व्यक्ती)
तर मंडळी, 'श्रीमंत' ह्या शब्दासाठी साधारण समान अर्थाच्या, तुमच्याकडे किंवा कुठेही वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचा झब्बू सुरू होऊ द्या!
थोडे गुगलता "मोघे" म्हणजे
थोडे गुगलता "मोघे" म्हणजे मातीचे मडके असाही एक अर्थ कळाला
ज्ञानेश्वर माउलींच्या एका कूट अभंगात याचा उल्लेख आढळतो
काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥
घडेचिना त्याने घडली तीन मोघे ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥
उभे लावणं.
उभे लावणं.
कोकणात आंघोळ झाल्यावर लज्जा रक्षण होईल इतपत मोठं सुती कपडा बायका घालतात. त्यात सोवळ्याने पूजा, स्वयंपाक करणे अपेक्षित आहे का काय.. नक्की कल्पना नाही. पण मग पातळ घालून ते उभे लावणं दोरी वर वाळत पडलेलं बघितलं आहे.
आलवण - हे तांबडे बहुधा नऊ
आलवण - हे तांबडे बहुधा नऊ वारी वस्त्र, पूर्वी विधवा स्त्रिया नेसत. तो शब्द फक्त त्या वस्त्राला आहे की साडी या सामान्य अर्थानेही वापरतात हे नक्की माहित नाही.
तो शब्द फक्त त्या वस्त्राला
तो शब्द फक्त त्या वस्त्राला आहे >>>> हो maitreyee
अमितव >> तुम्ही म्हणताय ते धाबळी असावे. लोकरी की सुती खात्रीने आठवत नाही. पण सोवळ्याचे पूजेचे / स्वयंपाकाचे असायचे.
जुनेरं
जुनेरं
हे साधारण साडीलाच म्हटलेलं ऐकलं आहे.
साडी -क्रियापदं
साडी -क्रियापदं
नेसणं
नेसवणं
बदलणं
फेडणं
धुणं
वाळत घालणं
मला उभे लावणंच म्हणायचं आहे.
मला उभे लावणंच म्हणायचं आहे. पूजा आमची आत्याबाई करायची, पण ते करणं बंधनकारक नाही.
मागच्या झब्बूतले लिहायचे
मागच्या झब्बूतले लिहायचे राहिलेले ---
सुगड संक्रांतीच्या पूजेला वापरतात स्वाती२ यांनी लिहीलेय तसे. काळे-लाल जोडीने वापरतात.
+ कोरे सुगड आणून रथसप्तमीला त्यात दूध तापवतात व उतू घालवतात. सूर्योदयानंतर अंगणात चुलीवर.
बुडकुले म्हणजे गोल बुडाचे छोटे माडके (लिटरभर पाणी राहील इतके )
किंवा vijaykulkarni नी लिहीले तसे भातुकलीमधील गाडगी / भांडी.
लहान मूल बसवल्या जागीही अस्थिर हालचाली करते त्याला आजी बुडकुल्यासारखा चळवळू नकोस म्हणायची.
*************
साडीचे समानार्थी --
धाबळ/ळी -- लोकरी, सोवळ्याचे वस्त्र
चीर -- जुना शब्द उदा : चीर-चोळी, चीरहरण (हिंदीत )
पैठणी -- शुद्ध रेशमी + सोने-चांदी जरीकाम असलेली साडी
चंद्रकळा --- काळी, खडीचे ठिपके असलेली साडी
अधरीय-उत्तरीय -- दोन भागात खाली धोतरासारखे नेसलेले; वर ओढणीसारखे घेतलेले वस्त्र. पौराणिक मालिकांत दिसते
अष्टपुत्री -- मराठी विवाहात लग्न ज्यावर लागते ती साडी ( मंगलाष्टक विधी, मामाची साडी )
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच शब्द टाकावा, जेणेकरून सार्यांनाच खेळात मजा येईल.
साडी शब्दाच्या जवळचे शब्द
साडी शब्दाच्या जवळचे शब्द(अर्थीने नाहीत)
सडा, सांडा,सांड
चिरडी - लहान साडी
चिरडी - लहान साडी
नेसू
नेसू
मला उभे लावणंच म्हणायचं आहे >
मला उभे लावणंच म्हणायचं आहे >>> हो पूर्वी मीही बघितलं आहे उभे लावणे, कोकणातच.
धडुतं
धडुतं
छान प्रतिसाद येत आहेत. काही
छान प्रतिसाद येत आहेत. काही शब्द नव्याने कळले तर काही विस्मरणात गेले होते ते आठवले.
आता पुढचा शब्द आहे 'शेत'. त्यावर झब्बू येऊ द्या. कृपया एका वेळेस एकच शब्द लिहा. सलग एकाहून अधिक नको, जेणेकरून अनेकांना प्रतिसादाची संधी मिळेल. मध्ये दुसर्या कुणाचा प्रतिसाद आला तर मग तुम्ही पुन्हा एक शब्द झब्बू म्हणून देऊ शकता. (एकपानी झब्बू आहे, गड्ड्या झब्बू नको
)
शिवार
शिवार
वावर
वावर
फड (उसाचा)
फड (उसाचा)
वाफा
वाफा
रान
रान
मळा
मळा
काळी आई
काळी आई
वाडी
वाडी
शेतजमीन
शेतजमीन
बागा (विशेषत: फळांची शेती_
बागा (विशेषत: फळांची शेती_ )
खाचर (विशेषत: भाताचं)
खाचर (विशेषत: भाताचं)
पीक
पीक
( कुठं गेलाय अण्णा म्हणल्यावर पिकाला पाणी पाजाया गेलाय असं उत्तर मिळतं म्हणजे शेतावर गेला म्हणून पीक लिहिलंय)
शेतभूमी
शेतभूमी
क्षेत्र
क्षेत्र
बगिचा
बगिचा
Pages