मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे. आपण फोटोंचा झब्बू मायबोलीवर अनेक वेळा खेळतो, तसाच हा शब्दांचा झब्बू! संयोजक आपल्याला शब्द देतील, तो मिळाला, की त्याला अजून कायकाय म्हणता येईल, ते लिहा. त्या शब्दाचा अर्थ, मूळ शब्दाशी असलेलं नातं, अर्थछटेतील फरक, त्या अनुषंगाने काही माहिती असेल, तर ते सगळं लिहिलंत तर सोन्याहून पिवळं! गंमतीशीर किंवा माहितीपूर्ण वाक्यात शब्दप्रयोग केलात, तर अजून मजा येईल.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच शब्द टाकावा, जेणेकरून सार्यांनाच खेळात मजा येईल.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - गोधडी
झब्बू १- घोंगडी,
झब्बू २ - कांबळं,
झब्बू ३ - वाकळ,
झब्बू ४ - लपेटं,
...
इत्यादी.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - चप्पल
झब्बू १- वहाण,
झब्बू २ - पादत्राणे,
झब्बू ३ - जोडे,
झब्बू ४ - खडावा,
...
इत्यादी.
--------------------------------------------------------------
या उपक्रमा-अंतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात (भारतीय वेळेप्रमाणे) रोज सकाळी १ आणि संध्याकाळी १ नवीन शब्द देण्यात येईल. झब्बू हा चालू शब्दावरूनच दिला (म्हणजे कालच्या/परवाच्या शब्दावरून नको) तर खेळ व्यवस्थित चालू राहण्यास मदत होईल.
--------------------------------------------------------------
दिनांक २५ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - माठ
आलेले झब्बू - घडा, मडकं, रांजण, गाडगं, सुरई, कुंजा, गरिबांचा फ्रीज, घट, डेरा, मटका, सुगड, बुडकुले, खुजा, कुंभ, बोळकं.
अपेक्षेपेक्षा वेगळ्या अर्थाने आलेले झब्बू - ढ, मठ्ठ, ठोंब्या, बुद्धु, बिनडोक.
आजचा दुसरा शब्द आहे - साडी
आलेले झब्बू - लुगडं, पातळ, उभे लावणं, धाबळी, जुनेरं, चीर, चिरडी, नेसू, धडुतं, आलवण.
साडीचे प्रकार - इरकल, पट्टू, वझाई नारू, कांजीवरम, पैठणी, शालू, पुणेरी, नारायणी, पटोला, संबळपुरी, टाण्ट, मुग्गा, चंद्रकळा, अष्टपुत्री.
--------------------------------------------------------------
दिनांक २६ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - शेत
आलेले झब्बू - शिवार, वावर, फड, वाफा, रान, मळा, काळी आई, वाडी, शेतजमीन, बाग, खाचर, पीक, शेतभूमी, क्षेत्र, बगिचा, परस, आगर, कृषिक्षेत्र, हरितगृह, शेताड, कुरण, भुई, ताटवा, कुळागर.
संबंधित शब्द - वरकड, कोरडवाहू, जिरायती, मीठागर, बागायती, भातशेती, मत्स्यशेती, मोत्याची शेती, हायड्रोपोनिक.
(वरील शब्दबाहुल्यावरून आपल्या शेतीप्रधान प्रदेशातील भाषिक समृद्धीची आणि वैविध्याची कल्पना येते, हे जाता जाता नमूद करायला हरकत नाही).
आजचा दुसरा शब्द आहे - सांडशी
आलेले झब्बू - चिमटा, पक्कड, गावी, इंगळी (सोनारी धंद्यातील एका ठराविक चिमट्यासाठी शब्द), सांडस.
संबंधित शब्द - सांडणे (द्व्यर्थी)
--------------------------------------------------------------
दिनांक २७ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - पलंग
आलेले झब्बू - खाट, मंचक, बाज, दिवाण, चारपाई, खाटलं, बेड, गादी, वळकटी, बिस्तर, बाजलं, माचा, पर्यंक, तल्प, बिछाना, पथारी, घडवंची, अंथरूण, शय्या, आईची मांडी (छोट्या बाळासाठी), पाळणा.
संबंधित शब्द - पलंगपोस.
आजचा दुसरा शब्द आहे - बडबड्या (बडबडी व्यक्ती)
--------------------------------------------------------------
दिनांक २८ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - आमटी
आजचा दुसरा शब्द आहे - पळी
--------------------------------------------------------------
दिनांक १ मार्च -
आजचा पहिला शब्द आहे - काठी
आजचा दुसरा शब्द आहे - श्रीमंत (व्यक्ती)
तर मंडळी, 'श्रीमंत' ह्या शब्दासाठी साधारण समान अर्थाच्या, तुमच्याकडे किंवा कुठेही वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचा झब्बू सुरू होऊ द्या!
सांबार ( दाक्षिणात्य )
सांबार ( दाक्षिणात्य )
रसम.. ( आंध्रा )
रसम.. ( आंध्रा )
दाळ -भोपळा घालून केलेलें
दाळभोपळा -भोपळा घालून केलेलें डाळीचें वरण, आमटी
पेंड पाला ( सोलापूर )
पेंड पाला ( सोलापूर )
ओसामण ( गुजराथी, रसम सारखे
ओसामण ( गुजराथी, रसम सारखे डाळीच्या पाण्याचे असते )
उडीद मेथी..
उडीद मेथी..
सोलकढी ( आमसूल/कोकम)
सोलकढी ( आमसूल/कोकम)
हुमण / तिखले ( गोवा, मासा)
हुमण / तिखले ( गोवा, मासा)
खडखडले कोळंबीचे ( सीकेपी )
खडखडले कोळंबीचे ( सीकेपी )
धूण - डाळीचे पाणी, पाणचट वरण
धूण - डाळीचे पाणी, पाणचट वरण /आमटी
सासव ( आंबा, अननस )
सासव ( आंबा, अननस )
पंचमेळ - पाच डाळींची आमटी
पंचमेळ - पाच डाळींची आमटी /वरण
भुजणे ( बोंबील, मांदेली ..
भुजणे ( बोंबील, मांदेली .. हिरवी चटणी घालून सार )
पिठी - कुळथाच्या पिठाची आमटी
पिठी - कुळथाच्या पिठाची आमटी किंवा पिठले
आंबोट तीख ( बांगडा - गोवा )
आंबोट तीख ( बांगडा - गोवा )
मुगा मोळ्या रांदयी ( मोड
मुगा मोळ्या रांदयी ( मोड आणलेल्या मुगाची आमटी ) कारवार
येसर / येसर आमटी
येसर / येसर आमटी
- मराठवाडी स्पेशल
फटकडी - कडधान्याशिवाय जास्त
फटकडी - कडधान्याशिवाय जास्त खोबरें घालून केलेली आमटी
कोजम्बू /कोळंबु
कोजम्बू /कोळंबु
- तंजावूरकर मराठी बांधवांचे तसेच जुन्या चेन्नईकरांचे (अजिबात गोड नसलेले) सांबार
मुगा गाठी .. ( गोवा )
मुगा गाठी .. ( गोवा )
सांडग्यांची आमटी
सांडग्यांची आमटी
रच्याकने नेहमीची आमटी-पोळी,आमटी-भात माझा आणि माझ्या मुलाचा अत्यंत आवडता पदार्थ.
येसवार - मसाल्याची आमटी
येसवार - मसाल्याची आमटी
सुरमई/प्रॅान्स/अंडा/चिकन करी
सुरमई/प्रॅान्स/अंडा/चिकन करी
रिबडी - (नगरी) आमटीची रबडी;
रिबडी - (नगरी) आमटीची रबडी; घट्ट आमटी; चिखलासारखा दाट पदार्थ.
वड्यांचं सांबार (सीकेपी
वड्यांचं सांबार (सीकेपी स्पेशालिटी)
आमटीच म्हणतो एरवी, डाळीच्या
आमटीच म्हणतो एरवी, डाळीच्या किंवा उसळीच्या आमटीला पण मेथी घातली तर डाळ मेथी म्हणतो. पालक घातला तर डाळ पालक.
गरम मसाला (वाटण) घालून केली तर गरम मसाल्याची आमटी, कारण नुसती आमटी म्हणजे आमचा गोडा मसालावाली.
आंबट लिहायला आले होते, जुने शेजारी कारवारी होते म्हणून हा शब्द माहिती पण श्रवूने आधीच लिहिलं असणार हे माहिती होतं.
बाकी बरेच प्रकार आलेत. मी उशिरा आले.
सपक पिठले - दोडके व पडबळ
सपक पिठले - दोडके व पडबळ यांचे वंजन घालून केलेली मुगाची आमटी
(टीप - अनेक नावं मी शोधून लिहिलीत. कुठून शोधलीत, ते उपक्रम संपल्यावर लिहितो
नवीन शब्द 'पळी' दिला आहे.
नवीन शब्द 'पळी' दिला आहे.
डाव
आमटी वाढायला पळी!
डाव
उलथणे(?) चालेल का?
उलथणे(?)
चालेल का?
Pages