शब्दांचा झब्बू

मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - शब्दांचा झब्बू

Submitted by संयोजक-मभादि on 24 February, 2022 - 20:19

मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे.

विषय: 
Subscribe to RSS - शब्दांचा झब्बू