मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे. आपण फोटोंचा झब्बू मायबोलीवर अनेक वेळा खेळतो, तसाच हा शब्दांचा झब्बू! संयोजक आपल्याला शब्द देतील, तो मिळाला, की त्याला अजून कायकाय म्हणता येईल, ते लिहा. त्या शब्दाचा अर्थ, मूळ शब्दाशी असलेलं नातं, अर्थछटेतील फरक, त्या अनुषंगाने काही माहिती असेल, तर ते सगळं लिहिलंत तर सोन्याहून पिवळं! गंमतीशीर किंवा माहितीपूर्ण वाक्यात शब्दप्रयोग केलात, तर अजून मजा येईल.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच शब्द टाकावा, जेणेकरून सार्यांनाच खेळात मजा येईल.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - गोधडी
झब्बू १- घोंगडी,
झब्बू २ - कांबळं,
झब्बू ३ - वाकळ,
झब्बू ४ - लपेटं,
...
इत्यादी.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - चप्पल
झब्बू १- वहाण,
झब्बू २ - पादत्राणे,
झब्बू ३ - जोडे,
झब्बू ४ - खडावा,
...
इत्यादी.
--------------------------------------------------------------
या उपक्रमा-अंतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात (भारतीय वेळेप्रमाणे) रोज सकाळी १ आणि संध्याकाळी १ नवीन शब्द देण्यात येईल. झब्बू हा चालू शब्दावरूनच दिला (म्हणजे कालच्या/परवाच्या शब्दावरून नको) तर खेळ व्यवस्थित चालू राहण्यास मदत होईल.
--------------------------------------------------------------
दिनांक २५ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - माठ
आलेले झब्बू - घडा, मडकं, रांजण, गाडगं, सुरई, कुंजा, गरिबांचा फ्रीज, घट, डेरा, मटका, सुगड, बुडकुले, खुजा, कुंभ, बोळकं.
अपेक्षेपेक्षा वेगळ्या अर्थाने आलेले झब्बू - ढ, मठ्ठ, ठोंब्या, बुद्धु, बिनडोक.
आजचा दुसरा शब्द आहे - साडी
आलेले झब्बू - लुगडं, पातळ, उभे लावणं, धाबळी, जुनेरं, चीर, चिरडी, नेसू, धडुतं, आलवण.
साडीचे प्रकार - इरकल, पट्टू, वझाई नारू, कांजीवरम, पैठणी, शालू, पुणेरी, नारायणी, पटोला, संबळपुरी, टाण्ट, मुग्गा, चंद्रकळा, अष्टपुत्री.
--------------------------------------------------------------
दिनांक २६ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - शेत
आलेले झब्बू - शिवार, वावर, फड, वाफा, रान, मळा, काळी आई, वाडी, शेतजमीन, बाग, खाचर, पीक, शेतभूमी, क्षेत्र, बगिचा, परस, आगर, कृषिक्षेत्र, हरितगृह, शेताड, कुरण, भुई, ताटवा, कुळागर.
संबंधित शब्द - वरकड, कोरडवाहू, जिरायती, मीठागर, बागायती, भातशेती, मत्स्यशेती, मोत्याची शेती, हायड्रोपोनिक.
(वरील शब्दबाहुल्यावरून आपल्या शेतीप्रधान प्रदेशातील भाषिक समृद्धीची आणि वैविध्याची कल्पना येते, हे जाता जाता नमूद करायला हरकत नाही).
आजचा दुसरा शब्द आहे - सांडशी
आलेले झब्बू - चिमटा, पक्कड, गावी, इंगळी (सोनारी धंद्यातील एका ठराविक चिमट्यासाठी शब्द), सांडस.
संबंधित शब्द - सांडणे (द्व्यर्थी)
--------------------------------------------------------------
दिनांक २७ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - पलंग
आलेले झब्बू - खाट, मंचक, बाज, दिवाण, चारपाई, खाटलं, बेड, गादी, वळकटी, बिस्तर, बाजलं, माचा, पर्यंक, तल्प, बिछाना, पथारी, घडवंची, अंथरूण, शय्या, आईची मांडी (छोट्या बाळासाठी), पाळणा.
संबंधित शब्द - पलंगपोस.
आजचा दुसरा शब्द आहे - बडबड्या (बडबडी व्यक्ती)
--------------------------------------------------------------
दिनांक २८ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - आमटी
आजचा दुसरा शब्द आहे - पळी
--------------------------------------------------------------
दिनांक १ मार्च -
आजचा पहिला शब्द आहे - काठी
आजचा दुसरा शब्द आहे - श्रीमंत (व्यक्ती)
तर मंडळी, 'श्रीमंत' ह्या शब्दासाठी साधारण समान अर्थाच्या, तुमच्याकडे किंवा कुठेही वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचा झब्बू सुरू होऊ द्या!
काटकी
काटकी
सोटा
सोटा
ओंडका??
ओंडका??
यष्टिका / यष्टी ( अंगयष्टी,
यष्टिका / यष्टी ( अंगयष्टी, याष्टिचीत)
किनार ( वस्त्राची -- करवतकाठी धोतर, जरीकाठी साडी)
लाठी काठी ( एक खेळ )
लाठी काठी ( एक खेळ )
टिपरी ( नगारा, ढोल वाजवायची
टिपरी ( नगारा, ढोल वाजवायची काठी; रासगरबा खेळायची काठी )
कांडे / कांडके ( ऊस, बांबू यांचा तुकडा --- ३-४ पेरे असतील इतका )
लाठी
लाठी
अडणा / आडकाठी ( दाराला अडसर
अडणा / आडकाठी ( दाराला अडसर म्हणून लावलेले लाकूड / काठी)
खुंटा ( गायीगुरे बांधण्यासाठी जमिनीत पुरलेली मजबूत काठी )
आखाडा
आखाडा
जनरली कुस्तीचा आखाडा असतो पण कोकणात एका काठीला ही आखाडा म्हणतात.
कोकणात आमच्याकडे घरांना गेट वैगेरे नसत. अंगणाच्या तोंडावर दोन खांब असतात विशिष्ट अंतर सोडून. त्यात जमिनी पासून दीड दोन फुटावर दुशीकडे गोल भोकं असतात. गुरं वैगेरे अंगणात शिरू नयेत म्हणून त्यात घालता काढता येणारी काठी अडकवून ठेवतात. आपण ती काठी ओलांडून जा ये करू शकतो किंवा मोठं सामान घरात आणताना ती काठी काढता ही येते , तिला आखाडा म्हणतात.
आकडी.
आकडी.
कोकणात ह्याला वेगळं नाव आहे, आठवत नाही. नगर साईडला आकडी ऐकलंय.
मोठ्या काठीला वर छोटी आडवी दांडी असते, झाडावरची फळं काढायला.
अंजू घळ म्हणतो आम्ही
अंजू घळ म्हणतो आम्ही
त्रिदंड ( यती / संन्यासी
त्रिदंड ( यती / संन्यासी यांचा दंड)
शीग / रूळ / गज ( लोखंडी काठी )
घाण्याच्या बैलाला बांधतात ती काठी
पळापळ करून नासधूस करणार्या गुराच्या गळ्यात मर्यादा म्हणून अडकवतात्त ती जड / लांब काठी
जमिनीला / काठाला रेटा देऊन होडी पाण्यात लोटतात ती उंच काठी
याची नावे आठवतात का कोणाला?
हेमाताई घळ वेगळी, तिला खाली
हेमाताई घळ वेगळी, तिला खाली जाळी असते, त्यात फळ पडते, हापूस काढताना वापरतात. ह्याला नुसती आडवी छोटी काठी असते, मी पेरू वगैरे काढायचे त्याने माहेरच्या कोकणात.
सासरी गडखी म्हणतात त्याला (नवऱ्याला विचारलं).
आडव्या काठीने एक्स
आडव्या काठीने एक्स अक्षरासारखी बेचकी होते. शेवग्याच्या शेंगा पाडायलाही वापरतात. नाव विसरले.
मेढ / मेढी / मेढे ( एका टोकाला फाटे असलेले उंच लाकूड, वेल किंवा कार्याचा मांडव वगैरेसाठी आधार म्हनून रोवतात )
पळापळ करून नासधूस करणार्या
पळापळ करून नासधूस करणार्या गुराच्या गळ्यात मर्यादा म्हणून अडकवतात्त ती जड / लांब काठी>> लोढणा
छडी
गुढी
बांबू
बांबू
वेत
वेत
सासनकाठी-- जोतिबाच्या जत्रेत
सासनकाठी-- जोतिबाच्या जत्रेत नाचवतात
जमिनीला / काठाला रेटा देऊन
जमिनीला / काठाला रेटा देऊन होडी पाण्यात लोटतात ती उंच काठी>> डोलकाठी बहुतेक.
देवाची काठी- हिला आवाज नसतो
देवाची काठी- हिला आवाज नसतो म्हणतात. योग्यवेळी बरोबर बसते( पाठीत )?
>>>>>देवाची काठी- हिला आवाज
>>>>>देवाची काठी- हिला आवाज नसतो म्हणतात. योग्यवेळी बरोबर बसते( पाठीत )?
वाह वाह!!!
नवीन शब्द 'श्रीमंत' दिला आहे.
नवीन शब्द 'श्रीमंत' दिला आहे. हा ह्या खेळातला शेवटचा शब्द.
सुखवस्तू
सुखवस्तू
धनवान
धनवान
अभिरुचीसंपन्न
अभिरुचीसंपन्न
समृद्ध
समृद्ध
काय श्रीमंत-कौतुकाने/उपहासाने
काय श्रीमंत-कौतुकाने/उपहासाने वापरायचे संबोधन
मालदार, बडी असामी
मालदार, बडी असामी
धनी
धनी
Pages