चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉरर्स आवडत असतील तर मॅलिग्नंट आवडेल. तशी ट्रीटमेंट चांगली आहे.

मी रिसेंटली नोबडी पाहिला. खूप मारामारी. डोक्याला ताप नाही. नुसता रक्ताचा सडा Lol

जेम्स बाँड बहुतेक सगळे बघून झालेत. तरी पियर्स ब्रॉस्नन हा पियर्स ब्रॉस्ननच ! रॉजर मूरचे बाँडपट हे अगदीच अ अ च्या वळणाने जात होते - टिमोथी डाल्टनने त्याला एकदम हिंस्र केले. ब्रॉस्नन ने तो चार्मिंग बाँड आणला. डॅनियल क्रेग कधी कधी आवडतो बाँड म्हणून. कॅसिनो रॉयल आवडलेला. क्वांटम ऑफ सॉलेस मध्ये नाही आवडला.

ब्रॉसन पण अ आणि आ स्टंट करण्यात कमी नव्हता
दरीतून खाली पडणाऱ्या विमानकडे उडी मारून, त्या विमानाच्या वेगापेक्षा वेगाने खाली जाऊन, विमानात घुसून, ते चालवून वरती आणणे हे कुठल्याही साऊथ इंडियन मुव्ही पेक्षा कमी नाही Happy

अनपॉजड दुसरा भाग कोणी पाहिला का प्राईमवर? मंजुळेची वैकुंठ स्टोरी चांगली आहे ऐकलंय. >>>
हो मी पाहिला. सगळ्या कथांमध्ये मलाही नागनाथ मंजुळेची वैकुंठ अतिशय आवडली.

विमान आणि मूनरेकर यांची तुलनाच नाही Lol पण बहुतेक ज्या वेळेस त्या गोष्टी लिहील्या गेल्या (अपोलो चा कालखंड) त्यावेळेस कदाचीत लवकरच घडेल असे वाटले असेल. तसे पहाता आता बेझोस किंवा मस्क जे करतो आहे त्यामुळे मूनरेकर अ अ राहणार नाही असेच वाटते Lol

ते विमान बिमान वाचून वॉर मधला ह्रितीक सीन आठवला.
विमान काय, त्याला लटकणं काय, त्यातून बाहेर आलेली जीप काय, त्यावर मारामारी करून शेवटच्या क्षणी टूणकन उडी मारून विमानावर जाणं काय.एकंदरच सगळा गुरुत्वाकर्षण ,संवेग अक्षय्यता, हवेच्या दाबाचा नियम सगळ्या नियमांना चुना लावणारा प्रकार होता.

रेड नोटिस मधेही बरेच अ व अ आहे, तोफेचा गोळा उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून ह्या दरवाज्यातून येवून त्या दरवाज्यातून अचूक बाहेर पडतो, ड्वेन थोडक्यात(?) वाचतो. त्यावर रायन रेनल्ड्स मिनी प्रवचन देतो जे मजेशीर आहे.

आता द स्पाय हू लव्हड मी चाल आहे. माझा पहिला बॉण्ड पट. नववीत असताना पाहिलेला. अजिबात आठवत नाही आता.
लोखंडी दाताला आला. तो आठवला आणि ते एक भले मोठे डायनिंग टेबल.

वरच्या पिक्चरांच्या लिस्टित मिशन इम्पॉसिबल बद्दल कसं नाही लिहिलं कोणी? Happy >>>> mission impossible ghost protocol माझा सगळ्यात आवडता मूव्ही.
:Ur line is not long enough
: Noooo shitt
एक नंबर आहे तो पूर्ण पिक्चर.

हो मी पाहिला. सगळ्या कथांमध्ये मलाही नागनाथ मंजुळेची वैकुंठ अतिशय आवडली..>>>>>>>>>>>>> मी काल २ गोष्टी बघितल्या. वैकुंठ - एकदम अंगावरच येणारी आहे, रडू फुटत होतं मधे मधे.... गोंद के लड्डू - नीना कुल्कर्णी ची ठिके.

वैकुंठ - एकदम अंगावरच येणारी आहे, रडू फुटत होतं मधे मधे...
>>>फीडबॅक बद्धल धन्यवाद... आज बघणार होतो आता स्किप करेन...

मी जरा तमिळ pothum puthu kalai-2 आणि अनपॉज्ड-2 मधे गोंधळ केला Lol
अनपॉज्ड-2 पहिल्या दोनच गोष्टी पाहिल्यात. तमिळ पूर्ण पाच गोष्टी पाहिल्यात.छान आहेत. पहिल्या चार हलक्याफुलक्या.. शेवटची जरा इमोशनल आहे.

वैकुंठ - एकदम अंगावरच येणारी आहे, रडू फुटत होतं मधे मधे... << हो... एकदम अंगावरच येणारी आहे... एन्ड बघितलाच नाहीये अजुन. आज बघेन

आठवला आत्ता सगळा पिक्चर. सबमरीन, मिसाईल, टोर्पेडो.. काय भारावलेले दिवस होते. एखादे जहाज पण इतके डिटेल मधे पहिल्यांदाच पाहिलेले तेव्हां. त्यातून ती बॉण्डकार, पाण्यात गेल्यावर तिची मिनी सबमरीन बनते. त्या वेळी ते तसले सीन आले की डोळे झाकून घ्यायचं वय होतं. Lol घरी न सांगता मोठं पाप केल्याचं फिलींग आलेलं. अलंकार थेटरला मॉर्निंग शोला बिनधास्त सोडायचे. मेन शो ला बहुतेक अर्जुन होता. आणि मॅटिनीला री-रन ला आलेला काला पत्थर. अमिताभचा आ वासलेल मोठं पोस्टर. त्याच्या बाजूला ००७ ! हे सगळं एकत्रच डायजेस्ट केल्याने आता काहीही पचतं.

मेन शो ला बहुतेक अर्जुन होता. आणि मॅटिनीला री-रन ला आलेला काला पत्थर. अमिताभचा आ वासलेल मोठं पोस्टर. त्याच्या बाजूला ००७ >>> परफेक्ट! आश्चर्य म्हणजे त्यातले दोन्ही हिंदी चित्रपट अजूनही बघवतात. बॉण्ड मात्र नाही.

आशूचॅम्प - तो विमानापेक्षा वेगाने खाली जाउन वगैरे म्हणजे गोल्डन आय किंवा टूमॉरो नेव्हर डाइज ची इण्ट्रो ना? पिअर्स ब्रॉस्नन आवडला होता तेव्हा मूर पेक्षा (आणि डाल्टन पेक्षा नक्कीच). बहुधा आम्ही सुरूवातील पिअर्स ब्रॉन्सन म्हणायचो.

खरे म्हणजे बॉण्डपटात "तसले" फार काही नसे. एखादा एल आकारात असलेले पांघरूण वाला बेड सीन ज्यात बॉण्ड अर्धा व ती बॉण्डगर्ल पूर्ण झाकलेली व एक दोन सूचक संवाद. पण तेव्हा ते भारी वाटे.

ते एल आकाराचे निरीक्षण माझे नाही. कोठेतरी वाचले. पण चपखल आहे.

ते एल आकाराचे निरीक्षण माझे नाही. कोठेतरी वाचले. पण चपखल आहे. >>> Lol
त्या वेळच्या हिंदी सिनेमातले कॅबरे नृत्य आता भजन कीर्तन म्हणून खपेल इतके सोज्ज्वळ वाटेल. पण त्या वेळी पाण्यालाही आग लावेल असे अमूक तमूक चे नृत्य अशी शेवटच्या सिनेमाच्या पानावरच्या जाहीरातीवर लाईन असायची. Lol
अवांतर : नंतर "मोठे" झाल्यावर ब्ल्यू लगून पहायला गेलो होतो. तोपर्यंत आधीच्या रनला पाहिलेल्यांकडून वर्णनेच ऐकली होती आणि हा पाहणे मस्ट असल्याचे झाले होते. राहुलला धोरण कडक असल्याने स्केच पेनने मिशा काढून आणि शिलङावलेली सिगारेट हातात घेऊन त्याच हाताने तिकीट द्यायचे प्लान केलेले असल्याने सिगारेट शिलगावताना ठसका लागल्याने सर्वांना डोअरकीपने हाकलून दिले होते. Sad

राहुलला धोरण कडक असल्याने स्केच पेनने मिशा काढून आणि शिलङावलेली सिगारेट हातात घेऊन त्याच हाताने तिकीट द्यायचे प्लान केलेले असल्याने सिगारेट शिलगावताना ठसका लागल्याने सर्वांना डोअरकीपने हाकलून दिले होते. >> अय्या काय हे. मी व मैत्रीणीने आठवीत सत्यम शिवम सुंद्रम बघितलेला डेक्कन मध्ये तेव्हा स्कर्ट ब्लाउ ज घालुनच गेलो होतो पण सारखे डोअर कीपर येउन हाक लून देतो कि काय अशी भीती वाटत होती झीनत अमान चेच आशीर्वाद होते म्हणून बघता आला. दिल के टूटने की आवाज नाही आती. जल जले आfunction at() { [native code] } ते है. हे वाक्य अजून लक्षात आहे. अनेकदा माबो वर वापरता येइल परफेक्ट.

एखादा एल आकारात असलेले पांघरूण>>> भारी आहे उपमा आणि निरीक्षण.. फक्त एल उलटा निघाला. मिरर ईमेज असती तर आताच एखादा बाँडपट बघायला घेतला असता Wink

राहुल चे धोरण फारच कडक होते. आम्हाला evil dead पण नाही सोडलेले.
बाँडपट हे अगदीच अ अ असत पण मी आधी लिहिल्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्या सिनेलात असं बघायला मिळत नसे.
अ अ वरून आठवलं की हॉलिवूड चे बरेच सिनेमे अ अ असतात पण ते ज्या conviction ने दाखवतात त्याला तोड नाही . उदा marval चे सगळे सिनिमे.
बॉलीवूड ने प्रयत्न केला की ते विनोदी होतात . खूप आधी रुद्राक्ष नावाचा एक सिनेमा आला होता. खूप जाहिरात केलेली , भारी बंडल होता.

संजय जाधव म्हणतो तसे ..conviction का पैसा हे बॉस .....

डाँकिहेड पाहिला, आवडला. एका अंडरअचिवरची स्टोरी, इंडीयन सेटिंगमधे असं ढोबळमानाने म्हणता येइल. रायटर्+डायरेक्टर्+लीड रोल एकिनेच निभावले आहेत. कथानक रजायनात घडत असल्याने ओळखीच्या जागा शोधत होतो. Wink मोनाने रजायना का आवडते याचं वर्णन एका वाक्यात केलेलं आहे - आय कॅन रीच एनिव्हेर इन रजायना इन २५ मिनिट्स, टॉप्स. उदयशेठ्ना कळेल मी काय म्हण्तोय ते... Proud

मेरी निम्मो बघितला . आठ -नऊ वर्षाच्या मुलाची गोष्ट . अंजली पाटील अन छोटासा करण दवे !! क्या बात मस्तच..... छान chemistry जुळणं वगैरे म्हणतात तसं झालंय. नक्की बघण्यासारखा चित्रपट!

काल the quiet place पाहिला प्राईमवर.. थ्रीलर,जरासा भयपट आहे..

the quiet place आमच्याकडेही लावला होता. वेगळी कन्सेप्ट म्हणून मी बघितला थोडा वेळ. पण मग शांततेने पकायला झाले म्हणून उठलो. तरी पिक्चर वाईट नसावा.

चांगला आहे पुढे...सुरुवात जरा बोर होते..पुढे पुढे थ्रीलींग आहे.

Screenshot_20220203-161416_Facebook.jpg

तापसी म्हणजे डोळे मिटून विश्वास ठेवायचा आणि डोळे उघडून तिच्यासाठी बघायचा. हिरोईजम दाखवणारी एकमेव हिरोईन आहे ती..

Pages