वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Clickbait संपवली. खूप engaging वाटली पण शेवट अ आणि अ आहे.
Video upload झाल्यावर ip adress नाही का शोधू शकत ???
आणखी काही प्रश्न आहेत पण spoilers होतील म्हणून राहूदेत

भारतात ब्रूकलिन चा नवा सिजन (जो इतर ठिकाणी आता जुना झालाय) कुठे बघायला मिळाला आहे का कोणाला ?
मला जर 15 दिवसांसाठी सुद्धा अमेरिकेत जायला मिळालं तर हे टास्क माझ्या लिस्टित दुसऱ्या नंबर वर आहे. (पहिल्या नंबर वर बूस्टर घेणे हे आहे :फिदी:)

Prime वर unpaused पाहीली, आवडली. 4 शॉर्ट फिल्म्स आहेत, त्यातली नागराज मंजुळे ची वैकुंठ खूप चर्चेत आहे सध्या.

स्टे क्लोज पहिली काल फायनली. सॉलिड एंगेजिंग आहे. बिंज करून संपवूनच टाकली. पुढे पुढे थोडा अंदाज येतो गुन्हेगार कोण असेल याचा. पण टेकिंग आवडलं.

नेफ्लि वर हार्लन कोबेन चीच "गॉन फॉर गुड" बघून संपवली. स्टे क्लोज आवडली असेल तर ही आवडेल बहुतेक. यात कथा बरेच वेळा फ्लॅशबॅक्स आणि प्रेझेन्ट असे स्विच होत रहाते त्यामुळे लक्ष देऊन बघावी लागते. पण मस्त आहे ही पण. बरेच इंटरेस्टिंग ट्विस्ट्स आहेत प्लॉट मधे, सस्पेन्स फिगर आउट करता येत नही सहजा सहजी Happy
मूळ फ्रेन्च आहे मी इन्ग्लिश डब्ड वर्जन सिलेक्ट केले. कलाकार, जागा सगळे अनोळखी वाटते त्यामुळे. नीस (फ्रन्स) मधले लोकेशन्स फार सुंदर आहेत.

गॉन फॉर गुड>>> आहे लिस्ट मधे. स्टे क्लोज आवडलेली. नेफ्लि आता सजेस्टच करतोय तर बघावं Wink

आफ्टर वी फेल बघितला का कोणी ? मुव्ही आहे का सिरीज माहित नाही.

स्टे क्लोज. छान घेतलीय. पूर्ण सिरीज भर व्यापून राहिलेल्या डार्क वातावरणामुळे बघताना दडपण येतं. पूर्ण बघूनच संपवली.

स्टे क्लोज पहिली काल फायनली. सॉलिड एंगेजिंग आहे. बिंज करून संपवूनच टाकली. पुढे पुढे थोडा अंदाज येतो गुन्हेगार कोण असेल याचा. पण टेकिंग आवडलं.>>+१

चांगली आहे का gone for good?
लिस्ट मध्ये आहे पण उगाचच पुढे ढकलत होते बघणं. बघते आता.
स्टे क्लोज आवडली होती.

चांगली आहे का gone for good? >>>> +१००० .
मी पण बघायला सुरुवात केली होती पण काही वेळाने बंद केली .
मला पण स्टे क्लोज आवडली होती.

वा वा. केजो ची सीरीज, त्यात माधुरीकाकू ! एंटरटेनमेन्ट झाली तर झाली, नाही तर मस्त नावं ठेवायची तरी सोय नक्की होईल Wink

सेकंड ईनिंग त्यांचीच सक्सेसफुल होते ज्यांच्या अभिनयात ताकद
असते . माधुरीचे छान दिसणे. नाचणे. तिच्या अदा आता हुकमी ठरणार नाहीत. अभिनयाला मर्यादा आहेत त्या ऊघड होणार. अर्थात हे असूनही एखादा रोल त्या मर्यादांच्या आत राहून तिला सूट होणारा असेल तर आजही तिचा फॅन बेस मोठा आहे. आमच्याघरीही मराठी मालिका आवडीने बघणारा प्रेक्षकवर्ग आहे ज्यांना केवळ माधुरीची सिरीज आहे हेच पुरेसे आहे ती बघण्यासाठी Happy

All of us are dead सिजन 1 मस्त आहे नेफ्लि वर. 3 भाग बघून झालेत. झॉम्बि आहे, मूळ कोरियन. आता पर्यंत तर मस्तच चालू आहे. कोरियन सिरीजचा कंटेंट भारी असतो , ड्रामा पण ठासून भरलेला असतो.

Pages