मला माझ्या ४ वर्षाच्या मुलाबाबतीत एक सल्ला हवा आहे. साधारण दीड वर्षाचा असल्यापासून तो व्यवस्थित बोलू लागला आहे. खूप हुशार आहे. सगळ्या गोष्टी नीट समजतात. गाड्यांची आवड असल्याकारणाने गाड्यांची रचना पाहून बहुतेक गाड्यांची नावे ओळखतो. बिल्डिंग मध्ये कोणाकडे कोणती कार आहे, रस्त्यावर जाताना शेजारून कोणती कार गेली हे तो अगदी दीड वर्षापासून सांगत आलाय. खूप मस्ती करतो, हट्टपणाही तेवढाच करतो. मोबाईलचे व्यसन आहे ( ह्यावरची चर्चा त्या धाग्यावर वाचली आहे त्यातून जमेल तेव्हढे उपाय घेऊन त्याचा स्क्रीन टाईम कमी करत आहे) मोबाईल मधले गेम, त्यातील charectars, व्हिडिओ मधील प्रसंग, तारक मेहता मधील सर्व पात्रे, त्या भागाची स्टोरी असे सगळं काही समजत. त्याला भेटणारा प्रत्येकजण त्याचे खूप हुशार मुलगा म्हणून त्याचे कौतुकच करतात.
हे सगळं सांगायचे कारण म्हणजे तो अगदी नॉर्मल मुलगा आहे. परंतू अभ्यासाच्या बाबतीत मात्र एकदम उलट आहे. जून पासून jr kg मध्ये त्याची ऑनलाईन शाळा सुरू झाली पण तो अजिबात बसत नव्हता. सामदामदंडभेद सगळं करून झाले पण तो काही अभ्यास करायला तयार झाला नाही. अजून लहान आहे, ऑनलाईन नाही बसणार वैगरे विचार करून आम्ही पण नंतर बघू म्हणून सोडून दिले. कधी मी, कधी त्याची मोठी बहीण, कधी नवरा असे सगळे त्याला घेऊन अभ्यासाला बसवू पाहत होतो पण तो १ मिनिटाच्या वर कधी बसला नाही. मग गेल्या महिन्यात त्याची शाळा offline सुरू झाली. तेव्हापासून शाळेत त्याला लिखाण देऊ केले परंतू त्याला काही समजतच नाही. ना त्याला अक्षर गिरवता येत, ना त्याला अक्षर ओळखता येत. त्याला रेषा, रंग काही कळत नाहीत. फक्त रेड कलर तेव्हढा ओळखतो. नीट पेन्सिल पकडतही नाही. कितीतरी वेळा समजावले पण त्याला काही लक्षातच राहत नाही. एक महिना झालं पण त्याला A तर सोडा सरळ रेघ पण काढता येत नाही. टीचर नेहमी आम्हाला बोल लावतात की त्याला काही समजत नाही. इतर मुले ५० पर्यंत अंक काढतात, याला १ पण काढता येत नाही.
काय करावे अजिबात सुचत नाहीये. मी काय करू ज्याने मला समजेल की माझ्या मुलात काही प्रोब्लेम तर नाही ना. कधी कधी असे वाटते की अजून खूप लहान आहे नंतर होईल ठीक पण इतर मुले तर हे सगळं नॉर्मली करत आहेत पण फक्त यालाच समजत नाही. आणि हो एक सांगायचे राहिले की याला आम्ही गेल्यावर्षीपासून gymnastics चे क्लासेस पण लावले आहेत. तिथली टीचर पण म्हणालेली की याचे कशात लक्ष नसते, सारखं बाहेर बघत असतो, त्याला क्लासला पाठवू नका.
ही समस्या किती लहान, मोठी आहे मला समजत नाही पण कृपया मी काय करायला हवे याचे मार्गदर्शन करा.
सल्ला हवा आहे
Submitted by निल्सन on 13 December, 2021 - 10:26
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
diagnose if he is suffering
diagnose if he is suffering from ADHD through some real doc
+1 जिद्दू
जिद्दू +१
शिवाय ऑटिझम, डिसलेक्सिया, दृष्टी तपासून घेणे. घाबरवायचा हेतू नाही. आई म्हणून खूप मनस्ताप होतो हे समजू शकते. तुम्हाला व बाळाला शुभेच्छा. अजून लहान आहे, होईल सर्व ठीक !!
जिद्दू+१
जिद्दू+१
जिद्दू +१
जिद्दू +१
ऑटिझम, एडीएचडी अशा
ऑटिझम, एडीएचडी अशा स्पेक्ट्रमवर आहे का किंवा काही लर्निंग डिसॅबिलिटी आहे का हे डॉक्टरांशी, बालरोगतज्ज्ञांशी बोलून तपासून घ्या. या कंडिशन्सचा आणि मुलांच्या हुशारीचा फारसा संबंध नसतो, मेंदूतील 'वायरिंग' वेगळ्या पद्धतीचे असते. लिहिण्यात किंवा वाचण्यात अडथळे येतात त्याचे कारण मुलगा आळशी आहे, मंद आहे असे नसते तर त्यां ची आकलन/ग्रहण प्रक्रिया वेगळ्या पद्धतीची असते.
काळजी करू नका. असे नसायची शक्यताही आहेच. पण कधीही तज्ज्ञा़ंकडून तपासून घेतलेले बरे! शुभेच्छा!
(कृपया, असे काही निदान झालेच तर फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, कसलेही तोडगे, उपाय, होमिओपथी, आयुर्वेद वगैरे करत बसू नका. याला औषधे नसतात तर वेगळ्या पद्धती ने शिकवायला लागते)
आणि समजा काही अगदी काहीही
आणि समजा काही अगदी काहीही निघालच, ऑटिझम, डिसलेक्सिया, दृष्टी तरी अजिबात काळजी करु नका. औषधं असतात, काउन्सिलिंग वगैरे प्रकारही असावेत. बिलकुल टेन्शन नही लेनेका! शेवटी सो कॉल्ड नॉर्मल - नॉर्मल म्हणजे बहुसंख्य लोकांचा अनुभव/ रेंज असते. कधीकधी आपण किंवा आपले मूल त्या स्पेक्ट्रमवर किंचीत हटके पडलेलं असतं. त्यानी काडीचेही बिघडत नाही.
असो. फार प्रीचिंग झाले असेल तर क्षमस्व. पण स्वतःच्या एका डिसॉर्डर मुळे या सर्वाचा अनुभव आहे.
बाकीचे योग्य तो सल्ला देतीलच.
बाकीचे योग्य तो सल्ला देतीलच. पण लिखाण, अंक या बाबतीत अभ्यासाला बसवून ते करून घेऊ नका. त्याला नुसतीच पाटी-पेन्सिल/खडू, कागद- क्रेयॅान किंवा फळा-खडू देऊन त्यावर काय खरडायचे ते करू द्या. माझा मुलगा कित्येक महीने फक्त गिरघोट्या काढत होता. मग फक्त सरळ रेष, आडवी रेष, गोल कसाबसा काढू लागला. मग फक्त हातावर हात ठेऊन आकार गिरवून घ्यायचे, मग अंक आणि अक्षरांकडे वळा. प्ले डोने अंक-अक्षरे करायला शिकवा.
एक दिवशी एक रंग घ्या. त्या रंगात्या सगळ्या वस्तू, कपडे गोळा करायला सांगा. कलर बूक आणा. त्याला हवे तसे त्यात रंग भरू द्या.
Starfall नावाचे ॲप लहान मुलांसाठी छान आहे. त्यात अंक,अक्षर, रंग, आकार सगळ्याची ओळख, गेम आहेत.
आय कॉन्टॅक्ट करतो का?
आय कॉन्टॅक्ट करतो का?
तो लेफ्टी आहे का आणि लिखाण उजव्या हाताने करवले जातेय का? चित्रे काढतो का? त्याला रंग देऊन पेंट करायला सांगितले तर करतो का...
मोटार स्किल्स कसे आहेत ते बघा... एकावर एक स्टॅक्स रचतो का... गाडी खेळणे दिले तर गाडीसारखा खेळतो का?
डॉक्टरांना दाखवा नक्कीच... लहान आहे .. होईल व्यवस्थित...
वर बरोबरच लिहिलेले आहे.
वर बरोबरच लिहिलेले आहे. डॉक्टर काय म्हणतील त्या प्रमाणे पुढील अॅक्षन घ्यावी. माझ्या तर्फे ऑल द बेस्ट.
अजून म्हणजे खाण्यातील प्रोसेस्ड फूड कमी करा. घरी बनवले ले, ताजे जेवण व स्नॅक्स द्या. पोट नीट भरते आहे ना त्या कडे लक्ष द्या. अगदीच आवड असल्यास एखादी ट्रीट द्या.
मुळात नन्न्हीसी नाजूक जान आहे त्यामुळे त्याला भरपूर प्रेम व विश्वास द्या आई बाबा आपल्याला समजून घेत आहेत हा विश्वास द्या. रागवून धाक दाखवून काही करायला लावू नका. थोडी शिस्त गरजेचीच आहे पण त्याला भीती बसेल इतके नको. त्याला आतून भीती एकाकी वाटते आहे का ते चाचपून बघा व त्याला भरपूर अशुअरन्स द्या.
मन एकाग्र करायचे काही व्यायाम असतात. पण त्याच्या कलाने करवून घ्या.
तुमचा आई बाबा व मूल ह्यातील बाँड function at() { [native code] function at() { [native code] } अगदी नाजूक व त्याच्या साठी महत्वाचा आहे तो कोणत्याही परिस्थितीत टेन्शन मध्ये येउ देउ नका बाकी सर्व बाह्य परिस्थिती आहे.
त्याला पशू पक्षी झाडे पाने फुले ह्यात रस असल्यास थोडे थोडे एखादे झाड लाव्णे फुले पाने वहीत प्रेस करणे. एखादी चिउ माउ दाखवणे असे करा. त्या बाँडिन्ग ने पण फार मदत होते.
पहिल्यांदाच शाळेत जातो आहे का
पहिल्यांदाच शाळेत जातो आहे का? तर त्याला शाळेत रुळायला, रुटिन कळायला वेळ लागेलच. लहान आहे अजून खूप. असे बरेच चंचल विद्यार्थी पाहिले आहेत. ४-५ महिन्यांत रूळतात. हळूहळू शिकतात सगळं. घाई करून प्रेशराइज् करू नका.
आणि मुख्य म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे डॉक्टर व्हिजिट कराच टु बी ऑन सेफर साइड.
तुम्ही लिहिलेले सर्व अगदी
तुम्ही लिहिलेले सर्व अगदी माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलाला बर्यापैकी लागू होते.रंग, शेप ओळखणे, क्रेयॉनने रेघ मारणे जमत नाही. शिवाय तो अजूनही बोबडा बोलतो. फक्त त्याला मोबाईलचे व्यसन आहे असे मी म्हणणार नाही.
त्याची ऑनलाईन शाळा असते, आम्ही मिटींग जॉईन करुन तिथे बसायचो. तो सुरुवातीला अजिबात बसला नाही. आजकाल त्याची आवडती जंगली प्राण्यांची माहिती चालू आहे म्हणून बसतो. तो शाळा चालू असताना ईकडे तिकडे करत बसला तर आम्ही हाक मारुन बोलावतो, पण त्याला बसायला फोर्स करत नाही. अभ्यास सोडून त्याचे वागणे नॉर्मल आहे. कदाचित स्लो लर्नर असेल, करेल हळूहळू असे म्हणून आम्ही जास्त लोड घेत नाही.
तुम्ही फार टेन्शन घेताय का?
त्याला जर गाड्या आवडतात तर प्रत्येक गोष्ट त्या आवडीचा वापर करुन शिकवता येते का, हा प्रयत्न करुन बघितलं आहे का? म्हणजे ही बघ ब्लॅक कार, व्हाईट कार, राऊंड टेल लॅम्प, रेक्टँग्युलर शिल्ड वगैरे वगैरे. गाड्यांची नावे शिकवण्याच्या निमित्ताने लेटर्स, स्पेलिंग्ज शिकवता येतील. अंक, counting पण शिकवता येईल. मी आज काल हा प्रयोग करत आहे. बोलताना मुद्दाम जे शिकवायचे आहे ते शब्द पेरुन बोलायचे, जे आपण एरवी करत नाही. म्हणजे घरातल्या घरात आपण खुर्चीवर बस असे म्हणतो, त्या ऐवजी मी जा त्या यल्लो खुर्चीवर वर बस, आज बघ ग्रीन कलरची भाजी केली आहे, रेड कलर चे बीट आहे असे... मला मुलामधे थोडी थोडी प्रगती दिसत आहे.
जे काही शिकवायचे आहे ते डायरेक्टलीच शिकवायला हवे असे नाही, indirectly पण शिकवता येईल.
प्रत्येक मुलाचा शिकण्याचा वेग वेगळा असणार. सध्याच्या शाळा आणि त्यातले शिक्षक याबद्दल न बोललेलच बरं!
मुलामधे खरेच प्रॉब्लेम आहे का? की तुम्ही पीअर प्रेशर खाली आहात? बाकिच्यांना जमते मग याला जमायला हवे असे वाटत आहे का?
तुम्हाला जर ऊत्तर सापडत नसेल तर वर लिहिलेले (डॉक्टरांशी, बालरोगतज्ज्ञांशी बोलून बघण्याचे) पर्याय तपासून पहा. शाळेत काऊन्सलर आहे का? त्यांच्याशी बोलता येईल का?
असे लिहिलेले वाचून
असे लिहिलेले वाचून डायग्नोसिस करणे डॉक्टरांना पण शक्य नसेल.
असे क्राउड कन्सल्टेशन घेण्यापूर्वी आधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बालरोग तज्ञांना आधी दाखवून त्यांच्या सल्ल्या नुसार पुढील तज्ञांना दखवावे.
(जर हे आधीच केले असेल तर तसे नमूद करून त्यांनी काय सल्ला दिलाय, आणि तो का पर्याप्त वाटत नाही याचा खुलासा करावा.)
वर बऱ्याच जणांनी लिहिले आहेच.
वर बऱ्याच जणांनी लिहिले आहेच....
खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा....
अतरंगी प्रतिसाद आवडला. ४
अतरंगी प्रतिसाद आवडला. ४ वर्षाच्या मुलाला १ ते ५०, A-Z ही फारच जास्त अपेक्षा आहे. इतर मुले करतात हा मापदंड असू नये. भारतात बोलत नाही, हे करत नाही, ते करत नाही... याची टेप ज्येनांपासून सगळे वाजवतात. त्याला केराची टोपली दाखवा. बोलत मात्र रहा त्याच्याशी. सामदामदंड अभ्यासासाठी करू नका. शिस्तीसाठी तुमची मर्जी.
डॉ. भेटून कॉग्निटिव्ह टेस्ट कराच पण तुमच्या माहिती वरुन मला काही वावगं वाटलं नाही. ह्या वयात ऑनलाईन बसवणे अ_ श_क्य आहे. शाळेची गम्मत वाटण्यासाठी काय करता येईल ते करा. नाही काही शिकला तरी सध्या फार फरक पडत नाही, शाळेत जावं मात्र वाटलं पाहिजे. गणित, लेखन नाही आलं तरी भाषा येते आहे का इकडे लक्ष द्या. भाषा आली की सगळं वेळ आली की जमेल. जे काही शिकवाल ते गम्मत (फन) आहे वाटुनच शिकवा. दैनदिन व्यवहारातुन वर अतरंगी म्हणताहेत तसं इन-डिरेक्टली गप्पा आणि त्यातुन ओळख पुरेशी ठरेल.
अतरंगी छान पोस्ट. तो नर्सरी
अतरंगी छान पोस्ट. तो नर्सरी मध्ये होता का? की एकदम एल के जी मध्ये आला आहे? हल्ली नर्सरी मध्ये शेप्स, 1 ते 20 नंबर , रंग, रेघोट्या मारणे आणि a to z करून घेतात. माझी मुलगी पण अजिबात बसत नाही ऑनलाइन शाळेत धड. ऑफलाईन एक तास जात आहे सध्या , तिथे बसते. लेफ्टी आहे त्यामुळे सध्यातरी अक्षराचा नीटनेटकेपणा अजिबात नाही. लिहायचा प्रचंड कंटाळा करते. एल के जी म्हणजे फारच लहान आहे हो. पण तरीही तुम्हाला फारच वेगळेपणा जाणवत असेल तर नक्की तज्ञांचे मत घ्या. शुभेच्छा.
प्रतिसादासाठी सर्वांचे
प्रतिसादासाठी सर्वांचे धन्यवाद.
त्याचे जे नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलवे की यासाठी दुसऱ्या कोणी डॉक्टरला भेटू. ठाण्यातील चांगले डॉक्टर कुणाला माहित आहेत का?
अतरंगी, मी पण indirectly
अतरंगी, मी पण indirectly शिकवायच प्रयत्न करते. येताजाता दिसणाऱ्या गाड्यांचे रंग ओळखायचा खेळ खेळतो पण त्याला लाल रंगच ओळखता येतात. इतर रंग कितीतरी वेळा खेळातून शिकविण्याचे प्रयत्न केला पण तो नाही सांगू शकत. पण गप्प नाही बसत चुकीचे उत्तर देतो बिनधास्त
असे क्राउड कन्सल्टेशन
असे क्राउड कन्सल्टेशन घेण्यापूर्वी आधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बालरोग तज्ञांना आधी दाखवून त्यांच्या सल्ल्या नुसार पुढील तज्ञांना दखवावे.>>> नक्की ही समस्या आहे की नाही हेच मला समजत नव्हते कारण या वयात अभ्यास न करणे हे मला problematic वाटत नव्हते. पण दोन्ही ठिकाणाहून त्याला काढण्यासाठी सांगितले गेले म्हणून थोडे टेन्शन आले होते. त्यामुळे नक्की काय करावे यासाठी माबोकरांची मदत घेण्याचे ठरविले.
Chraps, आय कॉन्टॅक्ट, भाषा
Chraps, आय कॉन्टॅक्ट, भाषा वैगरे सगळे ठीक आहे. चित्रे काढत नाही आणि रंग करायला सांगितले तर सगळ गिरवून ठेवतो कारण त्याला एका ठिकाणी बसून काही करण्याचा लगेच कंटाळा येतो. मी बोर झालो हे ठरलेले वाक्य.
निल्सन
निल्सन
ठाण्यात असाल तर डॉ साने यांना एकदा भेटा
ते लहान मुलांचे डॉ आहेत
ज्युपिटर मध्ये सकाळी 9 ते 2 असतात
ज्युपिटर ची फाईल असेल तर 9च्या आधीच जाऊन फाईल देऊन नंबर लावता येईल नाहीतर कॉल करून अपॉइंटमेंट घ्या. ( ते उपलब्ध नाहीत म्हणून असी डॉ ची घेऊ नका, साने यांच्याशी बोलायचे असे सांगा)
ते उगाच गरज नसताना काही औषध टेस्ट सांगत नाहीत , पण गरज वाटली तर नेमके कुठून करायचे हे सांगू शकतील.
त्यांचं opd श्रीजी आरकेड ला होतं आताही असेल तर माहीत नाही ( इथे नंबर लागणे कठीण आहे)
खरं तर इतक्या लवकर का आकडे आणि अक्षरं शिकवतात हा प्रश्नच आहे. साधारण पाचव्या सहाव्या वर्षी जे मुलं सहज आणि लवकर शिकू शकतात ते त्यांना तिसऱ्या चौथ्या वर्षी शिकायला लावून शिकवण्याचा वेळ आपण वाढवतो यामध्ये मुलं आणि आपण दोन्ही फ्रस्ट्रेट होतो असं मला वाटतं.
( उदाहरण द्यायचं तर poti training दोन महिन्याचा बाळाला द्यायला जाऊ का आपण? आणि आपण सुरुवात केली तरी योग्य वेळ आली, की ते शिकतात आपोआप आणि कमी त्रासात, तसंच)
3 / 4 वयात ही घे अक्षरं आणि गिरव, हे घे अंक आता पाठ कर असं शाळा सांगतात आणि आपण अभ्यास करायला बसवायचा प्रयत्न करतो आणि मग अब्ब्यास म्हणजे जबरदस्तीने करायची वैतागावणी गोष्टं असं मुलांना डोक्यात बसतं.
खरंतर इयत्ता पहिली दुसरी पर्यंत तरी काही होमवर्क वगैरे नकोच.
त्यामुळे वर अतरंगी यांनी लिहिलं तर इतर बोलण्यातून , गप्पा मधून जे ज्ञान द्यायचं आहे ते देत राहा. हा 'अभ्यास' असं कॅटेगराईज करू नका, तुम्हाला आणि त्यालाही सोपं होईल कायम.
अति हुशार मुलांना शाळेचा पॅटर्न , सतत तेच रिपीटटीव् टास्क आवडत नाहीत.
जिमन्स्टिक मध्ये जर कोच असे सांगत असेल तर कोच बदला. किंवा नुसत्या मैदानी खेळासाठी मावळी मंडळ, सरस्वती क्रीडा संकुल, बालभवन यापैकी काही बघा निदान काही महिने तरी. लहान मुलांना जिमन्स्टिक मध्ये (स्वतःची आवड नसेल तर) रुळायला वेळ लागू शकतो. त्याला बाहेर बघायला आवडतं कारण कदाचित बाहेर गाड्या असतील.
काळजी करू नका, सगळं नीट असेल. ठाण्यात काही हवं तर नक्की विचारा
शुभेच्छा
थँक्यू सावली.
थँक्यू सावली.
मुलगा सरस्वती क्रीडा संकुलाच्या gymnastic च्या वर्गात आहे. तुम्ही सांगितले तसेच मैदानी खेळाबद्दल त्याच्या शिक्षकांनी सांगितले आहे.
डॉ. साने कडे मुलीची आणि मुलाचीही फाईल होती. श्रीजी आर्केड मध्ये जात असू. पण सध्या डॉ केतकर कडे जात आहोत. साने जेव्हढे मृदुभाषी आहेत त्याच्या अगदी उलट केतकर रूड आहेत. त्यामुळे याबाबतीत सानेंकडे जाणे योग्य होईल असे वाटते आहे.
ठाण्यात डॉ ओंकार हाजीरनिस
ठाण्यात डॉ ओंकार हाजीरनिस म्हणून आहेत, ते ही या बाबतीत योग्य सल्ला देऊ शकतील। उथळ सर इथे आहेत
डॉक्टराना दाखवुन बघाच पण फाइन
डॉक्टराना दाखवुन बघाच पण फाइन मोटार स्किल डेव्हलप होण्यासाठि मुलाना वेगवेगळे टेक्श्चर हॅन्डल करायला द्या,जस वेगवेगळे मणी,दोरी,पिठ, प्लेडो,पाणी
लपाछपी खेळताना१ तो १० काउन्ट करा, घरातले वेगवेगळेजिन्नस काउन्ट करा अस बटाटे,कान्दे, टोमॅटो हे मोजायचे त्याला नुसत बरोबर ठेवा, फोर्स करु नका.
थोड तेढी उगली करुन कराव लागेल अस वाटत आहे.
४ वर्शापर्यत त्याना फक्त गिरवता येण आणी पेन्सिल धरता येणच अपेक्षित असत, ३ वर्शाच्या मुलाकडून घोक आणी ओक ही आपल्याकडची पद्धत चुकीचीच आहे.
माझी मुलगी साडे तिन वर्शाची असताना प्रिस्कुल इयरमधे ,शाळेत बसायला अजिबात तयार नव्हती, रोज रडायची, मी एच ४ वर होते त्यामुळे ती ३ दिवस जे काही २ तास शाळॅत जायची तेवढावेळ तीला दिसेल अस एका खुर्चीवर बसुन राहायचे याउलट मुलगा जो अगदी चिकटूराम होता त्याने पहिल्या दिवशी मला दारातुन बाय केले आणि दिवसभरात एकदाही मला मिस केले नाही तर मलाच रडायला आल होत.
सान्गायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येल मुल वेगळ असत, डॉक्टराचा सल्ला घ्याच पण रन्ग ओळखता येत नसेल तर डोळे पण तपासुन घ्या.
गुगल केल्यावर खालील माहिती आलीये तेही बघा
What milestones should a 4 year old be doing?
4- to 5-Year-Old Development: Movement Milestones and Hand and Finger Skills
Stand on one foot for more than 9 seconds.
Do a somersault and hop.
Walk up and down stairs without help.
Walk forward and backwards easily.
Pedal a tricycle.
Copy a triangle, circle, square, and other shapes.
Draw a person with a body.
यातले फिजिकल टास्क जमत असतिल तर मोअर स्क्रिन टाइम हा प्रॉब्लेम असु शकेल.
इथे छान छान सल्ले मिळाले
इथे छान छान सल्ले मिळाले आहेत. डॉकना दाखवुन घ्या. ट्रिकी सिच्युएशन आहे पण तरी माझा अजुन एक सल्ला हा कि त्याचा फोन गेमटाइम हा कटाक्षाने कमी करा.
फोन बघण्यापेक्षा टीव्ही बघुद्यात. हल्ली बऱ्याच लोकांचा (मुले / मोठे सर्व) पेशन्स खुप कमी झाला आहे आणि तो फोन / गेममुळे असावा कि काय अस मला नेहमी वाटतं कारण स्पेशली गेम्स मध्ये सगळंच इन्स्टंट होत असतं किंवा अँक्सिएटी फार वाढवली जाते.
हे दिवस पण फार विचित्र होते. मुलं लहान असून बाहेर खेळायला वगैरे फार जात येत नव्हतं सो सगळ्यांनाच फोन सोयीचा होता.
थोडे महिने (पेशन्स असणाऱ्या टीचरकडे) योगा करायला पाठवुन बघा अर्थात मोकळ्या हवेत खेळुन शारीरिक दमणूक हि प्रचंड महत्वाची आहे.
तुमच्या लेकाला माझ्या खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
जिद्दू +१
जिद्दू +१
अर्थात इतर सर्व मायबोलीकरही फार सुंदर मार्गदर्शपर सल्ले देत आहेतच.
नीट अक्षर/अंक ओळख झालेली नसतांना लिखाणाची घाई का करत आहात ? प्रत्येक मुलाचा फिजिकल तसेच मानसिक/बौद्धिक ग्रोथ चार्ट वेगळा असतो. त्यामुळे त्याला थोडा वेळ द्या. तुम्हीही टेन्शन घेऊ नका. सर्व छानच होईल. तो व्यवस्थित बोलतो, कार्सविषयीचे त्याचे ज्ञान असे कितीतरी पॉझिटीव्ह पॉईंट्स आहेत.
त्याला मोबाईल आवडतो तर alphabet songs, number conting / Phonics Fun चे काही व्हिडीओज लावून द्या. फ्लॅशकार्ड्स, कलरिंग बुक्स, LeapFrog ही आणू शकता.
तुम्हांला आणि तुमच्या छोट्या car enthusiast ला खूप खूप शुभेच्छा !!!
रंगाचा उल्लेख वगळला तर अगदी
रंगाचा उल्लेख वगळला तर अगदी माझ्याच मुलाबाबत लिहीलेय असे वाटले. केजीमधे त्याला बुगाटी वेरॉन सारख्या गाड्या ठाऊक होत्या. पण लिखाण करताना कंटाळा. एकाग्रता नाही. डॉक्टर म्हणाले हायपरअॅक्टीव्ह असल्याने अंगातली रग जिरवण्यासाठी त्याला खूप दमवले पाहीजे. त्यामुळे तायक्वांदो / सायकलिंग / बॅडैंमिटन असे त्याला आवडेल त्यात वेळ घालवू दिला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. काही वर्षांनी आपोआप लिहायला पण लागला. मराठी / हिंदी लिहीताना कंटाळा होता तो ही वयानुसार कमी झाला.
पण अजूनही एकदा वाचलेले पुन्हा वाचायचा कंटाळा करतो.
तुम्हाला हेच लागू होईल असे नाही. तुमच्या नेहमीच्या लहान मुलांच्या डॉक्टरचे म्हणणे काय आहे ते कळवा. इथे सर्वांनी काळजीने सांगितले आहेच. पण डॉक्टरांना फक्त समस्या काय आहे तेव्हढेच सांगा. अमूक एक आजार आहे का या पूर्वग्रहाने डॉक्टरांकडे जाऊ नये. त्यांना पाहू देत. अजून एक दोन डॉक्टरांना दाखवूनही फरक पडला नाही तर मग वर दिलेल्या शक्यतांचा विचार करावा.
मोठ्या मुलांचा (शाळकरी आणि
मोठ्या मुलांचा (शाळकरी आणि त्यापुढील) किंवा प्रौढांचा IQ काढतात, त्याचप्रमाणे अगदी छोट्या मुलांची DQ टेस्ट (development quotient) असते. ती केली तर मुलाची मानसिक वाढ वयाप्रमाणे आहे का, वाढीत/ शिकण्यात काही disabilities आहेत का हे कळतं. माझी डिलिव्हरी 6व्या महिना संपल्यावर लगेच 3ऱ्या दिवशी झाल्यामुळे, बेबीच्या मानसिक वाढीमध्ये कदाचित काही प्रॉब्लेम्स असु शकणार होते. तसे खरंच आहेत का, असतील तर लगेच कळावेत आणि त्यावर उपाय करता यावेत म्हणुन आम्ही पुण्यात एका सायकॉलॉजीस्ट कडे DQ टेस्ट केली होती. KEM हॉस्पिटलमध्ये ही सोय आहे, रादर KEM मध्ये चाईल्ड डिपार्टमेंट अतिशय प्रशस्त आणि अद्ययावत आहे. तुमच्या मुलाच्या डॉक्टरला विचारून तुम्ही ही टेस्ट करून मनाची खात्री करून घेऊ शकता. सगळ्या शंका तरी दूर होतील.
हे गुगल ज्ञान -
Development quotient - A developmental assessment for children under age 3 is an attempt to assess various aspects of the child's functioning, including areas such as cognition, communication, behavior, social interaction, motor and sensory abilities, and adaptive skills.
प्रतिसादकांचे आभार. खूप
प्रतिसादकांचे आभार. खूप चांगले सल्ले आले आहेत. जे घरी करून पाहण्यासारखे आहे त्यातले बरेच आधीच केलेले आहे आणि रंग सोडून counting (हे तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीत करतो पण फक्त लपाछपी करताना), वस्तू गोळा करणे वैगरे जमते त्याला. भाषा हिंदी मराठी दोन्ही मिक्स येतात. काल तर व्हाइट कलर पण ओळखला.
अतरंगी म्हणतात तसे कदाचित पिअर प्रेशर पण असेल. तसेच राधिका म्हणते तसे आधी त्याला अक्षर ओळखच नाही आणि डायरेक्ट लिहायला लावल्यामुळे कदाचित त्याला जमत नसेल.
आज त्याच्या टीचर सोबत बोलून तिला सांगते की काही दिवस त्याला फक्त अक्षर ओळख करून घ्या. इथे दिलेल्या सल्ल्याप्रमाणे घरी थोडे प्रयत्न करून बघते आणि काही दिवसांनी डॉक्टरांना जाऊन भेटते.
या आधी मी शक्यतो त्याला अभ्यासाला घेऊन बसणे टाळायची कारण तो खूप कंटाळा करतो आणि उगाच वैताग येईल असे वागत राहतो. त्यात माझा पेशंस लेव्हल खूप कमी असल्या कारणाने उगीच हात उगारला जातो. म्हणून फक्त इंडिरेक्टली जे शिकवता येईल ते बघायचे. त्यातही त्याला लगेच समजते की हे अभ्यास आहे. तू अभ्यास शिकवतेस म्हणून खेळणेही टाळतो.
शाळेतून लिखाण करत नाही ही कंप्लेंट सतत येऊ लागल्यामुळे टेन्शन आले होते.
या आधी मी शक्यतो त्याला
या आधी मी शक्यतो त्याला अभ्यासाला घेऊन बसणे टाळायची कारण तो खूप कंटाळा करतो आणि उगाच वैताग येईल असे वागत राहतो. त्यात माझा पेशंस लेव्हल खूप कमी असल्या कारणाने उगीच हात उगारला जातो.>>>>>
तुम्हाला वाटते त्याने शिकावे, अभ्यास करावा, पण त्यालाही अभ्यास करावा असे वाटते का?
एखाद्याला असते अभ्यासाची आवड, एखाद्याला नसते. तुमच्या धाकाने तो अभ्यास करत असेल तर तो कायम तुम्ही सांगाल तितकेच करणार, त्यात सुद्धा जितके टाळता येईल तितके टाळायला बघणार. आपण जितकी सक्ती करु, अभ्यास लादायचा प्रयत्न करु तो तितका त्याचा तिटकारा करायचे चान्सेस जास्त आहेत ना?
आपला मुळ उद्देश अभ्यास करुन घेणे हा नसून त्याला अभ्यास करायला प्रेरीत करणे हा आहे. आपण काय जन्मभर त्यांचा अभ्यास घेत बसणार आहोत का?
त्याने अभ्यास करायला हवा या हट्टापायी तो आपल्याच पासून दूर गेला, आपल्याला टाळायला लागला तर काय उपयोग? अभ्यास तर होणार नाहीच पण मुल पण दुरावेल.
मुलाला जास्त सक्ती न करता, आपली सगळी कामे संभाळून चिडचिड न करता संयमाने मुलांसोबत बसून त्यांना अभ्यासाची गोडी लावणे हे कसब आहे.
मी पण माझ्या मोठ्या मुलावर सुरुवातीला चिडून, रागावून अभ्यासाला लावायचा प्रयत्न केला पण हे वर्क होत नाही हे लक्षात आल्या पासून आता अॅप्रोच बदलला आहे. आपण जरा कल्पक व्हायला हवे. फक्त आपल्या धाकाने मुले अभ्यास करत असतील तर तो धाक आज ना उद्या झुगारला जाणार आहे, तेव्हा काय?
शाळेतून लिखाण करत नाही ही कंप्लेंट सतत येऊ लागल्यामुळे टेन्शन आले होते.>>>>
या शिक्षकांना आधी धारेवर धरा. त्यांना म्हणाव, सगळी मुले सारखी नसतात, तो लिखाण करत नसेल तर तुम्ही त्याच्याकडून करुन घ्या, त्याला जास्त वेळ द्या. दोन दोन पालक आठ दहा तास नोकर्या करुन आमच्या पाल्यात काय कमी आहे हे ऐकायची फी देत नाहीत म्हणाव. आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही शाळा बदलतो.
शाळा आणि शिक्षक हे सर्विस प्रोव्हायडर आहेत. आपण, आपला पाल्य हे त्यांचे क्लाएंट आहोत. शाळांना जरा जास्तच डिमांड असल्याने शेफारले आहेत.
हे जरा उद्धट वाटेल, पण आजकालच्या बर्याच शाळा आणि त्यातला शिक्षकांचा अॅप्रोच चुकत आहे असे वाटते आहे. नको तेवढे स्पर्धात्मक वातावरण तयार केले जात आहे. त्याचा धंदा केला जातोय. ह्याला पालक आणि शाळा दोन्ही जबाबदार आहेत. मधल्या मधे मुलांचे हाल होत आहेत.
एकटा असतो तेव्ह तो काय करतो
एकटा असतो तेव्ह तो काय करतो
नको तेवढे स्पर्धात्मक वातावरण
नको तेवढे स्पर्धात्मक वातावरण तयार केले जात आहे. त्याचा धंदा केला जातोय. ह्याला पालक आणि शाळा दोन्ही जबाबदार आहेत. >> पोपटाचा डोळा.
शाळा बदला.... टोकाचा सल्ला
शाळा बदला.... टोकाचा सल्ला आहे मान्य.... पण ४ वर्षाच्या मुलांना ५० पर्यंत पाढे लिहायला लावणारी शाळा म्हणजे मुख्य प्रॉब्लेम आहे ....
प्ले ग्रुप आणि ज्युनिअर केजी हे फक्त मुलांना एकत्र येउन खेळण्यासाठी असावेत असं मला वाटतं...
मी पण माझ्या मोठ्या मुलावर सुरुवातीला चिडून, रागावून अभ्यासाला लावायचा प्रयत्न केला पण हे वर्क होत नाही हे लक्षात आल्या पासून आता अॅप्रोच बदलला आहे. >> नवीन अॅप्रोच काम करतो आहे का ? आमच्याकडे सध्या हाच प्रॉब्लेम आहे सो या वाक्याकडे एकदम लक्ष गेले.. :-):-):-)..... इथे लिहा की नक्की काय केले ? इतरांना पण उपयोग होइल
ठाण्यातील चांगले डॉक्टर
ठाण्यातील चांगले डॉक्टर कुणाला माहित आहेत का? ,>>>> डॉ मनोज वाकडे नौपाडा
खूप चांगले डॉ आहेत मुलांचे, ते प्राथमिक निदान साठी त्यांना दाखवू शकता
सगळ्यांचे छान सल्ले. तुम्हाला
सगळ्यांचे छान सल्ले. तुम्हाला आणि पिल्लूला खूप शुभेच्छा! मुले अनुकरणशील असतात. पालक दिवसभरात काहीच लिहीत नसतील, पालक/ भावंडे व्यायाम करत नसतील तर मुलांना उपजत गोडी असावी ही अपेक्षा का? हल्ली सगळं मोबाईलवर असतं. तो मोबाईलवरच झटपट अक्षरे नि आकडे शिकेल. मग कधीतरी गिरवायला लागेल.
सीमंतिनी +१. हेच लिहुन
सीमंतिनी +१. हेच लिहुन प्रतिसाद खोडलेला.
) पुस्तक वाचता? तुम्ही रोज एकत्र बैठे/ मैदानात काय खेळ खेळता? तुम्ही वही पेन घेऊन रोज त्याच्यासमोर किती वेळ लिहिता? तुम्ही किती वेळ त्याच्या समोर स्क्रीनवर (काम + मनोरंजन) असता?
तुम्ही त्याच्या समोर दररोज किती वेळ हार्डकव्हर (पेपरबॅक पण चालेल
एका बालमानशास्रज्ञ स्त्री
एका बालमानशास्रज्ञ स्त्री आहेत नाव विसरले त्यांनी थिअरीच ही मांडलेली आहे की - मुलांचा खेळ हाच त्यांचे 'रेहरास्/काम/दैनंदिन काम' असते. आपल्या जीवनात दैनंदिन व्यवहराचे/कामाचे जे महत्व तेच मुलांच्या जीवनात खेळाचे महत्व असते. सो दे आर वर्किंग व्हेन वी थिंक दे आर प्लेइंग.
तेव्हा खूप खेळू द्या हो. १-५० पाढे मला एम एस स्सी काय आत्ता पन्नाशीच्या सुमारासही येत नाहीत/ यावे असे वाटत नाही/ काही अडत नाही वगैरे वगैरे.
पन्नासपर्यंत पाढे नाही, आकडे.
पन्नासपर्यंत पाढे नाही, आकडे.
पण हेही केजी मध्ये यायची गरज वाटत नाही.
ओह करेक्ट. बरोबर. हे केजी
ओह करेक्ट. बरोबर. हे केजी मध्ये येणे अजिबात एक्स्पेक्टेड/अपेक्षित नाही.
1 ते 100 आकडे तर आहेत आणि
1 ते 100 आकडे तर आहेत आणि स्पेलिंग पण आहेत सिनिअर केजीला. अजून 3 महिने बाकी आहेत तर आमच्या शाळेत झाले पण हे सारे डिसेंम्बर मध्येच. एक आकडी बेरीज , वजाबाकी पण आहे. स्पेलिंग तर विचारू नका ap, an, ag, un, ed, ad, at, in, on, ox, ot असे 100/200 शब्द तर आरामात झाले असतील म्हणजे map, tap, lap, gap मग bin, tin, kin , man, tan pan, can आणि पोरं बरोबर वाचतात. साईट वर्ड तर एल के जी पासून आहेत, ते जवळ जवळ बरेच झालेत. कुठलं लेटर काय साउंड करत हे एकदा लक्ष्यात आलं की बरोबर वाचतात पोरं. हिंदी वर्णमाला आहे म्हणजे अ ते अ: आणि क ख ग घ..ती पण आता सम्पेल ह्या महिन्यात. दशक, एकक ही कन्सेप्ट आहे. 10 आकडे गाळून नंबर लिहायची टेस्ट पण आहे म्हणजे 7 , --, 27,37, --, 57. हा सी बी एस इ चा पोर्शन आहे. आय सी एस इ ह्याहून फार अचाट आहे असं ऐकलंय
टॉर्चर आहे एवढया लहान मुलांना असे फारच वाटत आहे.
चार वर्षे वयाला ५० पर्यंत
चार वर्षे वयाला ५० पर्यंत पाढे , सगळे रंग वगैरे ओळखता येणे ही अपेक्षा अवाजवी आहे.
साधारण प्रीस्कुल/किंडरला ,जेवण स्वःताच स्वता जेवणे, रांगेत पेशन्टली उभ राहून आपला टर्न यायची वाट बघणे (मुलांच्यात २ सेकंदाचा पण पेशन्स नसतो म्हणुन), पसारा केल्यावर तो आवरायला मदत करणे, निरिक्षण करणे , स्वतःच्या आयडियाज एक्स्प्रेस करता येणे, गोष्ट ऐकल्यावर नंतर ती वर्गात त्यांना समजली आहे तशी १-२ ओळित सांगता येणे, शांत बसून ऐकणे , सुचना फॉलो करणे (उदा. सुचना : फायर ड्रिल आहे. रांगेत उभे राहून चटकन बाहेर पडा. ),कात्री धरता येण ,कविता म्हणनं/वाचण (rhyme: मराठी शब्द लक्षात येत नाही. पण ताट : पाट, पेला:गेला असे शब्द) ,आणि सगळ्यात महत्वाचे इतर समान वयाच्या मुलांशी खेळता येणं/कम्युनिकेट करता येणं इत्यादी गोष्टी जनरली शाळेतुन expect केल्या जातात/जाव्यात. थोडक्यात लाईफ स्किल्स यावेत. त्यांना नंबर्स वगैरे यावेत ही अपेक्षा अवाजवी आहे.
किंडरच्या वर्गाच्या शेवटी त्यांना १-१० अंक येणे, स्वतःचे नाव लिहिता येण, चार रंग , ३-४ शेप्स ओळखता येण, (काही) अल्फाबेंट्सचे साउंड हा जनरल मापंदंड समजला जातो.
तुम्ही डॉक्टरांबरोबर जरुर सल्ला मसलत करा. परंतु इतर सर्व बाबतीत (सोशलायझेशन, खेळणं वगैरे) हे तुमचे कन्सर्न असतील तर ते आधी डिस्कस करावेत अस मला वाटत. नंबर्स येत नाहीत वगैरे नाही.
वसंत विहार जवळ डॉ. वैजयंती
वसंत विहार जवळ डॉ. वैजयंती इंगवले आहेत. खूप चांगला अनुभव आहे यांचा. या पालकांचे counselling देखील करतात..
केजी(विशेषतः लोअर आणि अप्पर
केजी(विशेषतः लोअर आणि अप्पर केजी ला) भारतात वयाच्या मानाने बरंच जास्त लिखाण काम असतं.मलाही पानंच्या पानं लाटा(म्हणजे बम्पटी लंपटी, वर कर्व्ह आणि खाली कर्व्ह असलेल्या लाटा), स्मॉल, कॅपिटल लेटर्स मुलीला असल्याचं आठवतं. आठवड्यात एक गृहपाठ असेल तर हसत खेळत थोडं आज थोडं उद्या करत होतोही.
इतकं लिहिणं इतक्या लहान मुलांनी, चुकीचं आहे खरं.पण ते गेली अनेक वर्षं शाळांमध्ये आहे हेही खरं.
(अभ्यास, पहिला नंबर, उत्तम अक्षरात लिखाण याने प्री स्कुल ला घंx फरक पडतो हे लक्षात घेऊन मुलं येता जाता करतील तितकं करावं, बाकी भगवान भरोसे.दैदिप्यमान कामगिरी करायला अजून किमान 16 वर्षं संधी येत राहणार आहेच.आता पॉटी ट्रेनिंग नीट झालं आणि शाळेत नीट डबे खाऊन आलं तरी पुरे.वन डे ऍट अ टाईम.सगळे प्रश्न एकदम सुटणार नाहीयेत.)
हे अमानुष आहे.
हे अमानुष आहे.
मुलं आनंदाने जितकं करतील ते करा, बाकी सोडून द्या.
पहिली पर्यंत स्पेलिंग शिकवायचीच असतील तर साऊंडआऊट करुन जी करतील तेवढीच आणि तशीच करू द्या. जसं स्कूल = skul/ skool, फोन = fon इ. एकत्र बसुन पुस्तकं वाचताना बरोबर स्पेलिंग आलं तर पॉईंटआऊट करा, पण एकही गोष्ट पाठ करायला अजिबात प्रोत्साहन देऊ नका. वारंवार डोळ्यासमोर (साईट वर्ड) दिसत राहिल्याने बरोबर काय ते आपोआप येऊ दे.
यमक असलेली पुस्तकं निवडा. त्यातील वाक्य गाण्यासारखी म्हणा आणि यमक म्हणजे काय, आणखी कुठले शब्द असे असतील इ. बद्दल बोला.
पहिलीत जाईपर्यंत स्वतःचं नाव लिहिता आलं तरी चिक्कार झालं.
>>पॉटी ट्रेनिंग नीट झालं आणि शाळेत नीट डबे खाऊन आलं तरी पुरे. >>
अगदी अगदी!
टॉर्चर आहे एवढया लहान मुलांना
टॉर्चर आहे एवढया लहान मुलांना असे फारच वाटत आहे.>> बाप रे ! एवढा अभ्यासक्रम??? हा अभ्यास्क्रम इथे साधारण दुसरी- तिसरिच्या मुलाना आहे. तरिही आलच पाहिजे वैगरे असा कोणताही फोर्स नाही.
आपण सतत ही तुलना केली आणि सिस्टीम चुकीची आहे हे जाणवत असल तरी भारतिय पालकाना त्याप्रमाणे चालण्याशिवाय पर्याय नाही हेहि आहेच.
काल वाचलेला धागा, पण याबाबत
काल वाचलेला धागा, पण याबाबत सल्ला द्यावे ईतकी पात्रता नाही. त्यामुळे प्रतिसाद वाचण्यातच धन्यता मानली. ते सगळेच छान आलेत.
व्यक्ती तितक्या प्रकृती. लहान मुलांबाबत हे जास्तच होत असावे. जसे प्रत्येक मूलातील गुणविशेष वेगळे असतात तसेच प्रत्येक मुलाचा शारीरीक आणि बौद्धीक वाढीचा स्पीडही वेगळा असू शकतोच. कारण आमच्या घरातही अशी दोन टोकाची मुले मी बघतो आहे. हल्ली खरेच खूप स्पर्धा वाढली आहे. पालकांनाही खूप भिती आहे पोरं मागे पडतील याची. आमच्याकडेही हेच चालते. तरी नशीब बाप माझ्यासारखा आहे म्हणून पोरांना कसले टेंशन देत नाही वा ती कसले घेत नाहीत
पण तरीही ते ऑटीजम सारखे काही चारचौघांपेक्षा वेगळी समस्या असेल तर एक्स्पर्ट ओपिनिअन घेणेच चांगले.
अवांतर - चार वर्षांच्या
अवांतर - चार वर्षांच्या मुलाला gymnastics चे क्लासेस कुठे शोधलेत. मी मध्यंतरी माझ्या सात वर्षांच्या मुलीसाठी शोधत होतो. पण जवळपास मिळाला नाही कुठला..
ठाण्यात dr साने जे ज्युपिटर
ठाण्यात dr साने जे ज्युपिटर ला असतात , पण त्यांची अपॉइंटमेंट 3 दिवस आधी घ्यावी लागते...
दुसरे चिरंजीवी हॉस्पिटलमध्ये dr. कुलकर्णी आणि dr पारुल
वडवली ला dr दरंदले म्हणून आहे
वडवली ला dr दरंदले म्हणून आहे ,
त्याच्या कडे आ जी बा त जाऊ नको.........
आता किंडरगार्टनमध्ये छोटे
आता किंडरगार्टनमध्ये छोटे शब्द लिहिणे, ३-४ शब्दांची वाक्य बनवणे व वाचणे हे आहे. बिफोर व आफ्टर नंबर्स आहेत. नंबरची स्पेलिंग्स आहेत. दर रोज ग्रुहपाठ आहे. आणि मुख्य म्हणजे केजीतल्या मुलांची शाळेत जे काय शिकवले त्याची दर रोज उजळणी करुन घेणारे पालक आहेत. उजळणी करुन घेतात हे कळले तेव्हा मला आपण फारच बेजबाबदार पालक आहोत असा गिल्ट आला होता. सुदैवाने तो लगेच गेला
जोक्स अपार्ट, तुम्ही वैद्यकिय सल्ला घेणार आहातच. त्याचबरोबरीने खालील गोष्टी करुन पहा.
फुलं, प्राणी, पक्षी, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, रंग, शेप्स, गोष्टी यांची बोर्ड बूक्स, फ्लॅश कार्डस्, जिगसॉ पझल्स मिळतात, ती वापरा. स्पेलिंग बनवायचे ठोकळे मिळतात ते वापरा. ऍक्टिविटी बुक्स मिळतात, त्यात डॉटेड लाईन्स वापरुन सरळ रेषा, कर्वस् गिरवता येते, ती वापरा. छोटा व्हाईट बोर्ड व मार्कर्स घेऊन द्या. त्यावर काहीही गिरबटण्याची मुभा द्या. मॉडेलिंग क्ले मिळते, त्याने लेटर्स, नंबर्स, शेप्स बनवण्याचा खेळ खेळा. सक्ती करू नका. सुरुवातीला हात लावला नाही तर आजुबाजुला दिसेल अशी ठेवून द्या. त्यांचे कुतुहल जाग्रुत होतेच. हे सगळे ग्रॅजुअली होउ देत.
या गोष्टी विकत घ्यायला जाल तेव्हा शक्यतो मुलाला सोबत घेऊन जा. आणि आपण हे घेऊया का असे जंटली नज करा. ऑनलाइन घेणार असाल तर त्याला दाखवून त्याच्या पसंतीने घ्या.
कुठेतरी वाचले होते की मुलांचा अटेन्शन स्पॅन हा फार तर वयाच्या दुपटीएवढी मिनीटे असतो. हे मी नेहमी लक्षात ठेवते. त्यापलीकडे एखादी गोष्ट लावून धरू नका. तुम्हाला ती गोष्ट ब्रेक घेवून दिवसातून चार वेळा करवून घ्यायची तयारी ठेवावी लागेल सुरुवातीला.
चांगले सल्ले येत आहेत.
चांगले सल्ले येत आहेत. धन्यवाद पुन्हा एकदा.
त्याची मोठी बहीण रोज बसते अभ्यासाला त्याच्यासमोर. त्यालाही घेते सोबत. कधी मूड असेल तर बसतो आणि वही खरडवून खराब करतो. पेन्सिल sharp करणे, खाडाखोड करणे असेल उद्योग करत राहतो. थोड्यावेळाने बोर झालो म्हणून तिलाही खेळायला उठवतो.
कुणीतरी विचारले तो एकटा असताना काय करतो. तर जेव्हा तो टीव्ही किंवा मोबाईल बघत नसेल तेव्हा बुहतेक वेळ किचन मध्ये खाऊचे डब्बे शोधत राहतो. नाहीतर घरतल्या घरात सायकल चालवतो, खेळणी खेळतो, सोफ्यावरून उड्या मारत राहतो.
Pages