मला माझ्या ४ वर्षाच्या मुलाबाबतीत एक सल्ला हवा आहे. साधारण दीड वर्षाचा असल्यापासून तो व्यवस्थित बोलू लागला आहे. खूप हुशार आहे. सगळ्या गोष्टी नीट समजतात. गाड्यांची आवड असल्याकारणाने गाड्यांची रचना पाहून बहुतेक गाड्यांची नावे ओळखतो. बिल्डिंग मध्ये कोणाकडे कोणती कार आहे, रस्त्यावर जाताना शेजारून कोणती कार गेली हे तो अगदी दीड वर्षापासून सांगत आलाय. खूप मस्ती करतो, हट्टपणाही तेवढाच करतो. मोबाईलचे व्यसन आहे ( ह्यावरची चर्चा त्या धाग्यावर वाचली आहे त्यातून जमेल तेव्हढे उपाय घेऊन त्याचा स्क्रीन टाईम कमी करत आहे) मोबाईल मधले गेम, त्यातील charectars, व्हिडिओ मधील प्रसंग, तारक मेहता मधील सर्व पात्रे, त्या भागाची स्टोरी असे सगळं काही समजत. त्याला भेटणारा प्रत्येकजण त्याचे खूप हुशार मुलगा म्हणून त्याचे कौतुकच करतात.
हे सगळं सांगायचे कारण म्हणजे तो अगदी नॉर्मल मुलगा आहे. परंतू अभ्यासाच्या बाबतीत मात्र एकदम उलट आहे. जून पासून jr kg मध्ये त्याची ऑनलाईन शाळा सुरू झाली पण तो अजिबात बसत नव्हता. सामदामदंडभेद सगळं करून झाले पण तो काही अभ्यास करायला तयार झाला नाही. अजून लहान आहे, ऑनलाईन नाही बसणार वैगरे विचार करून आम्ही पण नंतर बघू म्हणून सोडून दिले. कधी मी, कधी त्याची मोठी बहीण, कधी नवरा असे सगळे त्याला घेऊन अभ्यासाला बसवू पाहत होतो पण तो १ मिनिटाच्या वर कधी बसला नाही. मग गेल्या महिन्यात त्याची शाळा offline सुरू झाली. तेव्हापासून शाळेत त्याला लिखाण देऊ केले परंतू त्याला काही समजतच नाही. ना त्याला अक्षर गिरवता येत, ना त्याला अक्षर ओळखता येत. त्याला रेषा, रंग काही कळत नाहीत. फक्त रेड कलर तेव्हढा ओळखतो. नीट पेन्सिल पकडतही नाही. कितीतरी वेळा समजावले पण त्याला काही लक्षातच राहत नाही. एक महिना झालं पण त्याला A तर सोडा सरळ रेघ पण काढता येत नाही. टीचर नेहमी आम्हाला बोल लावतात की त्याला काही समजत नाही. इतर मुले ५० पर्यंत अंक काढतात, याला १ पण काढता येत नाही.
काय करावे अजिबात सुचत नाहीये. मी काय करू ज्याने मला समजेल की माझ्या मुलात काही प्रोब्लेम तर नाही ना. कधी कधी असे वाटते की अजून खूप लहान आहे नंतर होईल ठीक पण इतर मुले तर हे सगळं नॉर्मली करत आहेत पण फक्त यालाच समजत नाही. आणि हो एक सांगायचे राहिले की याला आम्ही गेल्यावर्षीपासून gymnastics चे क्लासेस पण लावले आहेत. तिथली टीचर पण म्हणालेली की याचे कशात लक्ष नसते, सारखं बाहेर बघत असतो, त्याला क्लासला पाठवू नका.
ही समस्या किती लहान, मोठी आहे मला समजत नाही पण कृपया मी काय करायला हवे याचे मार्गदर्शन करा.
सल्ला हवा आहे
Submitted by निल्सन on 13 December, 2021 - 10:26
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सगळ्यांचे प्रतिसाद छान आहेत,
सगळ्यांचे प्रतिसाद छान आहेत, वाचतेय. मी काही वेगळं लिहीणार नाहीये. निल्सन सगळं नीट होईल, काही वर्षांनी हा धागा वाचून हसू शकाल.
4 वर्षे म्हणजे अजून लहान आहे.
4 वर्षे म्हणजे अजून लहान आहे. सायमन सेझ गेम माहीत आहे का? सायमन सेझ टच your nose/chin/hands..असे सगळे बॉडी parts, मग ग्रीन chair, black table असे रंग, 2 sticks, 3 plates ase नंबर्स खेळता येतात. वर लिहिलंय तसं हसत खेळत ओळख. तो वहीवर खरडतो म्हणताय, ते खरडू द्या, तीच सुरुवात असते. खोड रबरने खोडतो, तर मोटर skills develope होतातच. डॉक्टर सल्ला नक्की घ्या, फक्त पीर प्रेशर नका घेऊ.
इकडे कोणे एके काळी "शिवाजी
इकडे कोणे एके काळी "शिवाजी म्हणतो " असा खेळ होता.
अजून एक, मोटर स्किल्ससाठी
अजून एक, मोटर स्किल्ससाठी YouTube वर videos मिळतील, अगदी साध्या घरातील गोष्टी वापरून खेळता येतील अशा गेम्स म्हणुन द्या. मुलांना खूप आवडतात.
मुळात आपण ४ वर्षांचे असताना
मुळात आपण ४ वर्षांचे असताना हे सगळं करत होतो का? पहिलीत जाण्याआधी फक्त बालवाडीत. तिथेही गाणी म्हणणे, नाचणे आणि खेळणे यापलीकडे फार काही केल्याचं आठवत नाही. लिहायला शिकणं हा प्रकार पहिलीत गेल्यावरच सक्तीचा होता. पण म्हणून आता आपण राहिलोय का तसेच? झालीच की प्रगती आपोआप. तशीच त्याचीही होईल. मुलांच्या जास्त मागे लागलं की त्यांचा कंटाळा एक्स्पोनेंनशियली वाढतो. त्यात पुन्हा टीव्ही, मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन असतंच. बाहेर जाऊन खेळण्याची फार सोय नसते. मग फक्त कंटाळाच येतो, सगळ्याचाच. त्यात आता शाळा सुरू नाहीत त्यामुळे इतर मुलांमधे मिसळणं होत नाही. त्याचाही परिणाम होतो.
मुलांना आपण जन्माला घातलं की लगेच रेसमधे उतरवतो. उपडी वळण्यापासून, रांगणे, चालणे, बोलणे आणि इतर बर्याच गोष्टी दुसर्या मुलांपेक्षा कमी समाधानकारक असतील की लगेच भीती निर्माण होते. मग सक्ती चालू होते. त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार, आवडीनुसार सगळं व्हायला हवं हे विसरतो आपण.
सोफ्या वर उड्या मारणे
सोफ्या वर उड्या मारणे आमच्याकडे पण होते. मी सापडेल म्हणजे शोधल्यावर सापडेल असा खाउ घरात इथे तिथे लपवून ठेवत असते. हे अजुनही आहे. मला एव्ढेच वाट्ते त्याची ही जर्नी त्याला आनंददायक व मजेची अशी करुन देण्यात मदत केली तर त्याला हा लर्निन्ग कर्व्ह सोपा जाईल.
पूर्ण सोलुशन मी कधीच बोलुन दाखवत नाही पण तेमिळेल असे रस्ते पायवाटा तयार करते. मध्ये दगड धोंडे असतील ते तुच बाजूला कर म्हणून बाजूला होते.
धागा वाचून राहवलं नाही म्हणून
धागा वाचून राहवलं नाही म्हणून प्रतिसाद देतोय
माझा मुलगा या वर्षी jr kg ला आहे . तुम्ही जी लक्षणे सांगितली तीच माझ्या मुलात पण आहेत. तुमच्या साम दाम दंड निती मध्ये मी दंड जास्त वापरला पण एक दिवस वाटलं की इतका लहान मुलगा कशी पेन्सिल धरू शकेल. म्हणून आता रागावणं किंवा दम देणे बंद केले आहे
शाळांच्या अपेक्षा अवाजवी आहेत. बऱ्याच मुलांचे पालकच सगळं करत असतात
माझ्या मुलाचे पेन्सिल नी अक्षर उमटत नव्हते. मी त्याला डार्क शेड 2B पेन्सिल आणून दिल्या. मग रेष उमटू लागल्यावर त्याला लिहायचा थोडा उत्साह आला. अजूनही थोडा वेडावाकडा काढतो अक्षरे पण त्याला माहीत आहे की त्याला काय काढायचं आहे
राहिला प्रश्न रंग आकार ओळखण्याचा जमेल हळूहळू. मी पॅनिक झालो होतो पण तुम्ही होऊ नका...ससा कासव च्या गोष्टी मधलं कासव जिंकत शेवटी
दुसरा मुद्दा की एकाग्रता नाहीये....आमचा पण तोच प्रॉब्लेम आहे....एकाच वेळी दहा ठिकाणी लक्ष...ही हायपर ऍक्टिव्ह मुलांची लक्षणे आहेत.
माझा मुलगा 3 वर्षांचा असल्यापासून बाहेरील लोकं सोसायटी गार्ड दुकानदार इतर नातेवाईक यांना व्यवस्थित उत्तर देतो. आहारात कुठल्याही प्रकारचे नाटक नाही. इतर मुलांना आपल्या खेळण्या देतो.
त्याच्या शाळेच्या मते अभ्यास वगैरे पेक्षा हे महत्त्वाचे
पेन्सिल नीट धरण्यासाठी मी केलेले उपाय
1. डार्क शेड च्या पेन्सिल आणणे
2 लहान बाळांचे सॉक्स ला 3 बोट जातील असे छिद्र करणे आणि मग पेन्सिल धरायला देने
3. छोटा कापसाचा बोळा घेऊन हातात धरायला देणे
मागे सांगितल्याप्रमाणे मी
मागे सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या टीचरला सांगितले होते की सध्या काही दिवस मुलाला फक्त अक्षर आणि रंग ओळख शिकवा नंतर लिहायला द्या. त्याप्रमाणे त्यांनी गेले तीन दिवस जास्त वेळ अक्षर ओळख व थोडा वेळ लिखाण शिकवले. काल त्याला मी नवीन पाटी (एक बाजू पेन आणि एक बाजू खडूने लिहायची) आणली. तेव्हा त्याने त्यावर A to F काढले.
अजून लेटर्स आणि नंबरची mat पण आणली आहे की letter काढून पुन्हा वेगवेगळ्या शेपमध्ये बनविता येते. त्यासोबत पण थोडावेळ खेळला आणि नंतर बोर झाला 
रंग अजून शिकविले नाहीत.
अजून काही दिवस किती प्रोग्रेस होते ते बघते आणि लागलीच तर डॉक्टरांची मदत घेते.
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या सल्ले, मार्गदर्शन कामी येत आहे. अजूनही काही सल्ले असल्यास सांगावे.
मस्त गं
मस्त गं
गोंडू मस्त शिकूदे, आणि तुला फार व्याप होणार नाही इतकी मस्ती कडून स्वतः मजा पण करुदे.
सगळं व्यवस्थित होईल.
मस्त गं
मस्त गं
गोंडू मस्त शिकूदे, आणि तुला फार व्याप होणार नाही इतकी मस्ती कडून स्वतः मजा पण करुदे.>>+१
निल्सन,
निल्सन,
कॉग्निटिव टेस्ट्स करुन घेणार आहात ते उत्तमच, काही कमतरता असल्यास योग्य उपाय होतील. मात्र चार वर्षाचे मूल एकावेळी १० मिनिटे पेक्षा जास्त वेळ अभ्यास करणार नाही हे धरुन चालायचे. त्याला भरपूर गोष्टी वाचून दाखवा. ए का गिरवायचा किंवा ए फॉर अॅपल कशासाठी असे मुलांना होते. मात्र तिच अक्षरे एकासमोर एक येतात आणि त्यात गोष्ट असते हे लक्षात आले की त्या गोष्टीच्या ओढीने मूल अक्षरे आपण्हून शोधू लागते. सुट्टीच्या दिवशी पुस्तकातल्या सुचनांनुसार कागदाची वेगवेगळी विमाने करायची. आपण सुचना वाचायची आणि चित्रात बघून मुलाने कागदाला घडी घालायची. असेच टोक नसलेली कातर वापरुन इतर पेपर क्राफ्टही करता येइल. खाऊच्या खोक्यावरची अक्षरे - त्यातून तयार होणारे खाऊचे नाव, बाहेर जेवायला जातो त्या हॉटेलचे नाव, मेनू कार्डावरची अक्षरे, कपड्याच्या टॅग वरची अक्षरे अशी सगळी अक्षरे कामाची अहेत हे मुलाच्या लक्षात येवू द्या. मुलाला गाडीच्या जडणघडणीवरुन गाड्या ओळखता येतात म्हणजे त्याचे निरीक्षण उत्तम आहे आणि त्याला चित्रांची भाषाही चांगली कळतेय. अक्षरे ही एक प्रकारची चित्रच. कपड्याच्या लेबलवरचा एस हा स्मॉल साईज म्हणून, बुटाच्या तळव्यात लिहिलेला ५ हा बुटाचे माप असे व्यवहारातून आकडे, अक्षरे शिकवले तर मुले सहजतेने , ओझे न घेता शिकतात. भाजी साठी चार बटाटे काढून आण, कोशिंबीरीसाठी तीन गाजर काढून दे असे घरकामात सहभागी करुन घेत शिकवायचे. रंगांची नावे लक्षात येण्यासाठी बोलताना त्याचा वापर करायचा. मुलाचा किंवा आपला कपड्याचा खण लावताना कपडे रंगानुसार सॉर्ट करुन ठेवायला त्याला मदतीला घ्यायचे. लहान ताटल्या-वाट्या मुलाला पुसायला द्यायच्या म्हणजे हात वळायला लागतो.हाताला ग्रीप कमी पडत असल्यास साधे फोमचे पेन्सील ग्रीपर उपयोगी पडतात. खरे तर इतल्या लहान मुलांना लेखनाचा आग्रह नसावाच पण सिस्टिम तशी आहे तर थोडे फार करुन घ्यायचे.
भारतात आजकाल मुलांना फार धावडवतात. नात्यातील मुलांच्या बाबतीत शाळेने मूल मागे पडेल म्हणून भीती दाखवणे, पालकांनी घाई करु नका सांगणे हे आता नेहमीचे झाले आहे. पालक ठाम रहातात आणि ६ व्या वर्षी मूल व्यवस्थित लेखन , ग्रेडच्या वरचे वाचन, स्वतःहून गृहपाठ पूर्ण करणे करु लागते. मनाला नवीन शिकायची ओढ निर्माण झालेली असते . अभ्यास म्हणजे कटकट हे समिकरण नसते.
अजून एक म्हणजे मुलाला सेल फोन कितीही हट्ट केला तरी देवू नका. मागितला की ऑफिससाठी आहे असे सांगायचे. मोठ्यांनीही त्याचा वापर करमणूकीसाठी करायचा नाही. सेलफोन हा मोठ्यांच्या कामाची वस्तू, खेळणे नाही हे बोलण्यातून- कृतीतून पोचवत रहा. टच स्क्रिन वापरुन झटपट मिळाल्यावर संथपणा आवडेनासा होतो. टिवी सारखी पॅसिव करमणूकही अर्धा तासापेक्षा जास्त नको. शेवटी टिवीवरची दिवसभराची करमणूक ही जाहीराती विकण्यासाठी असते. मुलाला गाड्या अवडतात तर खेळण्यातला टुल किट - गाड्या रिपेअर , छोट्या गाड्या आणि ट्रॅफिक मॅट , रोड कंस्ट्रक्शन सेट असे लुटुपुटीचे खेळण्यात रमतोय का बघा.
चार वर्षाच्या मुलाला जिम्नॅस्ट हेही फार लवकर होत आहे. हल्ली सगळ्याचेच क्लासेस असतात पण मुलाला उड्या मारायला सेफ जागा यापेक्षा जास्त अपेक्षा नसावी.
तुमच्या लेकराला खूप शुभेच्छा!
अनु, सोनाली थँक्यू.
अनु, सोनाली थँक्यू.
स्वाती, नवीन आयडियाज साठी धन्यवाद
स्वाती ताई पोस्ट मस्त!
स्वाती ताई पोस्ट मस्त!
हे महाराष्ट्र राज्य मंडळाचं
हे महाराष्ट्र राज्य मंडळाचं पहिलीचं गणिताचं पाठ्यपुस्तक.
यात १ पासून आकडे, समजायला, ओळखायला, बोलायला आणि लिहायला शिकवलं आहे.
पी डी एफ ची पान ८-९ पहा
हे इंग्रजीचं
यातही आधी बोलायला, ओळखायला आणि मग अक्षरं लिहायला शिकायचं आहे. पी डी एफचं पान ९
जर हे पहिलीच्या अभ्यासक्रमात आहे, तर केजीमध्ये त्यापेक्षा जास्त का शिकवतात नकळे.
जर हे पहिलीच्या अभ्यासक्रमात
जर हे पहिलीच्या अभ्यासक्रमात आहे, तर केजीमध्ये त्यापेक्षा जास्त का शिकवतात नकळे. >>> अहो केजी काय माझ्या भावचा मुलगा नर्सरी ला आहे त्याला सुद्धा १-२० अंक आणि AtoZ अक्षरे आहेत लिखाणात यंदा.
जर हे पहिलीच्या अभ्यासक्रमात
जर हे पहिलीच्या अभ्यासक्रमात आहे, तर केजीमध्ये त्यापेक्षा जास्त का शिकवतात नकळे.>>>>
स्पर्धा....
सगळ्यांना जितक्या लवकर मुलांना जे जे काही पढवता येईल ते ते पढवायचे आहे. त्यात मुलांचे हाल झाले तरी बेहत्तर....
आमचा वैयक्तिक अनुभव....
माझा मोठा मुलगा ज्या नर्सरी मधे होता तिथेच छोटा पण आहे.
मोठ्या मुलाच्या वेळेस अगदी व्यवस्थित होते, मिनि केजी, सिनिअर केजी पर्यंत मुलांना छान झेपेल असे सर्व काही होते. मुलाला शाळेत जायला प्रचंड आवडायचं. आम्हाला फारच चांगला अनुभव आला. म्हणून छोट्याला पण तिथेच टाकले.
पण मोठा मुलगा सिनिअर केजी मधून बाहेर पडल्यावर त्या नर्सरी स्कुलचे त्यांनी rebranding केले. फी वर्षाला ६० हजार वरुन थेट सव्वा लाख केली.
मोठ्या मुलाला सिनिअर केजीला जे काही होते, त्यातले काही काही छोट्याला आत्ताच आहे. अक्षरे, छोटे छोटे साईट वर्ड्स अन काय काय... कुठून तिथे टाकले असे झाले आहे. वारंवार त्याला त्या नर्सरीतून काढून टाकावे असे वाटत आहे. पण त्या नर्सरी स्कुल मधून आम्हाला हव्या त्या शाळेत त्याला प्रवेश मिळणार आहे म्हणून द्विधा मनःस्थितीत आहोत.
हो, नर्सरी पासून चालू करतात.
हो, नर्सरी पासून चालू करतात.(काही वर्षांपूर्वी छोट्या(ज्यांना फक्त प्री स्कुल आहे,पहिली नंतर ची शाळा नाही) शाळांची त्यातही स्पर्धा होती. 'आव्हान शाळेतली मुलं आव्हान शाळेत प्री स्कुल मध्ये इतकं लिखाण करतात की ती मोठ्या शाळांत पहिली ला सहज ऍडजस्ट होतात.' वगैरे.पण आता एकंदर सगळ्यांना यातला घंटापणा कळून लोक स्वतःला जमेल तितकेच गृहपाठ करतात.)
शिक्षक कडक नकोत प्री स्कुल ला(गृहपाठ न झाल्यास फिजिकल शिक्षा वगैरे.अगदी छोट्या शाळांत चांगले शिक्षक घेता न आल्याने हे प्रकारही घडतात.))
सध्याच्या अभ्यासक्रमाला आणि लिखाणाला (भारतात, आणि अगदी शहरातल्या ib बोर्ड च्या जास्त फी असलेल्या काही शाळा वगळता)पर्याय नाही.जमते तितके करावे बाकी सोडावे.(प्रत्यक्ष शाळा चालू होती तेव्हा आमच्या कडे पण 'मी बोर्ड वरच्या अर्ध्या गोष्टी लिहेपर्यंत टीचर ने बोर्ड पुसून नवा विषय चालू केलेला असतो' वगैरे सर्व चालायचं.)
स्पर्धा आहेच, किती मनावर घ्यायची आपल्यावर आहे.असे मनावर न घेणारे अनेक लोक निर्माण झाले तर चित्र बदलेलच.
मी सगळे कंस बंद केलेत का?
एक ते दहा अंक एक वर्ष लवकर
एक ते दहा अंक एक वर्ष लवकर शिकून स्पर्धेत टिकण्याचे फिल येत असेल तर धन्य आहेत...
मी सगळे कंस बंद केलेत का?
मी सगळे कंस बंद केलेत का?
घडतात.))>>> इथे एक जास्त झालाय
सोनाली, धन्यवाद. मला खात्री
सोनाली, धन्यवाद. मला खात्री होतीच मी कंसाचं गणित चुकवणार
कंसाचं गणित चुकलं नाही.
कंसाचं गणित चुकलं नाही.
(काही --
*इथे सुरू झालेला कंस *
-- घडतात.))
ला संपला आहे.
एवढा अभ्यास नको, ताण नको हे बरोबर. पण मग मुलांच्या मेंदूची वाढ चार पाच वर्षापर्यंत खूप होते, त्यामुळे ती स्पंज सारखी ,शिकवाल ते शिकत जातात वगैरे विशेष खरं नाही का?
हे व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटीचं ज्ञान असू शकतं. आज काल गुगल वर सगळीच माहिती असते आणि खऱ्या खोट्याचीपण पुष्टी करणारे बरेच पुरावे असतात, त्यामुळे फारच गोंधळ उडतो.
प्रत्येक मुलाची शिक्षण क्षमता
प्रत्येक मुलाची शिक्षण क्षमता वेगळी.थोडी ओळख करून देता येईल प्रगत अभ्यासाची, आवडला तर पुढे, नाही आवडला तर सोडून देता येईल.
अय्यो माझे कंस बरोबर आले!! धन्य धन्य कृतार्थ मी.
अतरंगी, तुमच्या पोस्टी रिलेट
अतरंगी, तुमच्या पोस्टी रिलेट होणार्या आहेत.
मी सगळे कंस बंद केलेत का?<<<
आमचा कंपायलर अडकला आहे. त्याला बंद होणारा एक जास्तीचा कंस दिसत आहे.
>> मुलांच्या मेंदूची वाढ चार
>> मुलांच्या मेंदूची वाढ चार पाच वर्षापर्यंत खूप होते, त्यामुळे ती स्पंज सारखी ,शिकवाल ते शिकत जातात >> वाढ म्हणजे स्पेलिंग पाठ करणे, आकडे लिहिणे, अक्षरं लिहिणे नाही.
नुसतं वेगवेगळ्या विषयांवर, भाषांत बोलून, वेगळ्या ठिकाणी, परिस्थितीत जाऊन त्यांना एक्सपोजर दिलेलं पुरेसं आहे.
शालेय शिक्षण ही मुलांची वाढ नाही.
शालेय शिक्षण ही मुलांची वाढ
शालेय शिक्षण ही मुलांची वाढ नाही.>>+१
(काही --
*इथे सुरू झालेला कंस *
-- गृहपाठ करतात.)
ला संपला आहे.
अमितव प्लस वन...
अमितव प्लस वन...
Pages