हट्टीपणा

सल्ला हवा आहे

Submitted by निल्सन on 13 December, 2021 - 10:26

मला माझ्या ४ वर्षाच्या मुलाबाबतीत एक सल्ला हवा आहे. साधारण दीड वर्षाचा असल्यापासून तो व्यवस्थित बोलू लागला आहे. खूप हुशार आहे. सगळ्या गोष्टी नीट समजतात. गाड्यांची आवड असल्याकारणाने गाड्यांची रचना पाहून बहुतेक गाड्यांची नावे ओळखतो. बिल्डिंग मध्ये कोणाकडे कोणती कार आहे, रस्त्यावर जाताना शेजारून कोणती कार गेली हे तो अगदी दीड वर्षापासून सांगत आलाय. खूप मस्ती करतो, हट्टपणाही तेवढाच करतो.

हट्टीपणा

Submitted by रमेश पुष्पा on 6 June, 2021 - 14:58

खाताना तुकडे तुकडे करून खाणार,
तरीही चपाती गोल गोल हवी.

पिताना कोमट करून पिणार,
तरी कॉफी गरम गरम हवी.

घालताना झटकून घालणार,
तरीही कपड्यांना कडक इस्त्री हवी.

जनतेकडे दुर्लक्ष केले तरी,
जनतेची मते हवी.

गाडी चालवायला येत नाही तरी,
मोठी गाडी हवी.

घर सांभाळायला येत नाही तरी,
घराची चावी हवी.

ढीगभर साड्या असल्या तरी,
नवीन कोरी साडी हवी.

अभ्यासाचा कंटाळा वाटत असला तरी,
पुस्तकाची माडी हवी.

दुसऱ्यांशी नीट वागता येत नाही,
तरी मैत्रीचे नाते हवे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हट्टीपणा