प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

नाय बा
डबल नै करता येणार.त्यासाठी मग 32 लेंग्थ लागेल :)18 ने होणार नाही.

येइल अनु . अग एक टोक गळ्यापाशी धरुन दुसरं दोनदा गुंडाळायचं = दो न वेढे घ्यायचे. मग हुक लावायचा.
एकदम दुहेरी करुन नाही घालायची.

हो तसं जमेल.
फक्त गळ्याचा परीघ 4 इंच(18-16(+16 वाल्या नेकलेस मध्ये गळ्यापासून 2 इंच मार्जिन)) हवा असे वाटतंय.(किंवा मी काहीतरी घोळ घालतेय हिशोबात)

काय हे... आधी धागा न काढताच अख्खी साडी खरेदी केली??!! मायबोली आयडी रद्द करतील तुझा. बरं नंतर तरी- पिको घरी कसे करावे? फॉलचे मॅचिंग उजेडात बघावे का फ्लूरोसंट बल्ब खाली ? स्त्रिया साड्यांना अधिक इस्त्री करतात का पुरूष शर्टांना?? असे काही काढावे ना... धब्बा है तू............. Wink Light 1
छान आहे!!

कोणती साडी ते माहीत नाही. फॉल पिको सगळ आयतच होत.
सर्वान्चे आभार. इथे सोशल लाइफ आमच तरी नगण्य असल्याने साडी नेसा यचा प्रसन्ग ये त नाही

सामो खूप सुंदर साडी आणि तुम्ही दिसताय पण मस्त..चला लग्नाच्या धाग्यामुळे का होईना तुम्ही अमेरिकेत साडी खरेदी करून घातली आणि आम्हाला पाहायला सुद्धा मिळाली Happy

मस्तच सामो.
अम्रुताच्या धागा काढण्याचा असाही परिणाम Happy

सामो
किती सुंदर दिसतेय गं
सात्विक, calm अँड cool.

सुंदर आहे साडी!! क्लासि रंग आहे आणि भाव पण.++११११११ पारसी लोकांच्या साड्यांच्या बॉर्डर असतात वेगळ्या तशी वाटतेय. मला बाई तुझ्या सारखं लिहीता येत नाही. पण तू अफाट दिसत्येस.

सी Lol

Such a grace सामो,
मागे कोणती भारी वाली music सिस्टीम आहे का Happy

सी, as usual Lol

सामो किती गोड दिसतेयएस.
इथून प्रेरणा घेऊन साडी खरेदी करावीशी वाटली हेच खूप भारी वाटतंय. खूप आवडलं. आणि इथे लगेच फोटो ही दाखवलास म्हणून अधिक छान.

सर्वांचे आभार. Happy
होय श्रद्धा ती म्युझिक सिस्टिम नवर्‍याच्या आवडीची आहे, अनेक कॉम्पोनेंटस एकत्र करुन तो काहीतरी बनवत बसतो.

सामो फार गोड दिसताय. साडी फार सुरेख.

गळ्यात मात्र फक्त एक सर छान दिसला असता असं पर्सनली वाटतं, खूप गर्दी झालीय. सर साडीकिनारीला मॅचिंग आहे तो एक जास्त शोभुन दिसला असता, डार्क बिस्कीट कलर म्हणतात का त्याला.

होय अन्जु सर मस्त दिसला असता. खरे आहे. होय बिस्किट रन्ग आहे. कानातले बोल्ड असतील तर गळ्यात ना जूक हवे किन्वा मग उलटे.
खरच् गर्दी झाली आहे.

तुमचं स्माईल कयूट आहे सामो, चेहेरा तेजस्वी आहे, वर लिहायचं राहिलं.

अन्जु ते गळ्यातला अस एकत्रच आहे. तसव्ह आहे >>> अच्छा, मला वेगवेगळे सर वाटले.

तेजस्वी Happy
अग काल परवाच लॉरिअल्चा मडमास्क ला वुन झाला हाहाहा. खरच खरखरीत आहे. एक्स्फॉलिएशन होतं मग चेहरा उजळतो.

Pages