प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

धनुडी : मस्त कानातले.

आता एक नवा धागा काढावा का 'धनुडी की ग्लोईंग त्वचा का राज'?

आता एक नवा धागा काढावा का 'धनुडी की ग्लोईंग त्वचा का राज'? >> अगदीच.
अमृताक्षर साठी एक धागा झाला आता एक धनुडी साठी आणि एक सामो च्या कलेक्शन साठी पण Happy
ज्वेलरी बॉक्स- इथले सगळे सुंदर दागिने ठेवण्यासाठी
IMG_20211011_192832-min.jpg

ए काय मस्त ज्वेलरी बॉक्स आहे. त्याची कडी पण पण किती छान.
मी सद्ध्या जी कोरियन सिरीयल बघतेय "होम टाऊन चा चा चा " त्यात तो चीफ हॉग त्या डेंटिस्ट ला एक ज्वेलरी बॉक्स करून देतो त्याची कडी सेम अशी आहे. तो ज्वेलरी बॉक्स पण मस्त होता.

अनु चोकर आवडला.

हे वेगवेगळे स्टोन - यलो जेड, कार्नेलिअन, फ्लुराईट, रेड जॅस्पर, मूनस्टोन, अमेथिस्ट वगैरे.
वरती ते टंबल्स ओवण्याकरता लोकरीचा गोफ.
मी रोज बदलते खडा. लॅबोडराईट आवडतो मला, आणि रेड जॅस्पर.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLVYFG68wsNVr1QbQt6X6X8x5UUOGF3N9nX4oTVKVjfGCNOJOZfT3ymN5mvGthVXQKCujVmZRaUUibtfnDgklLfUNeF4D-F_Zivj79V5sGztzQ7W1oTr51n9oflU1dy2z-GRJJjChAXx7svEQr1_sej69g=w469-h625-no?authuser=0

Pages