खेळ: शब्दांचा झब्बू -२ : गावांची नावे

Submitted by संयोजक on 13 September, 2021 - 01:45

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांत माणूस
एकूण किती नावे अपेक्षित आहेत?

एक टाकाऊ आणि एक औषधीयुक्त/पवित्र समजला जाणारा पदार्थ मिळून बनलेले गाव.

?ल??र

बिन्गो! द्या पुढचं कोडं.

? के ?
रामायणातिल एक छोटीशी कथा इथे घडली अशी आख्यायिका आहे. जिल्हा नाशिक

ताकेड?

या छोट्याशा कुणास माहीत नसलेल्या गावाचा उल्लेख कन्याकुमारीत आढळतो. जिल्हा अमरावती.
चार अक्षरी.
पहिले अक्षर (जे मुळाक्षर नाही, रूप आहे) हे इंग्रजीतील एक मुळाक्षर.
दुसरे व तिसरे अक्षर मिळून एक छापील वर्तमानपत्राची आठवण करून देतात.
चौथे अक्षर एक विभक्ती.

टाकेद आहे ते>>
अरेच्चा हे आमच्या जवळ आहे एकदम मी जाऊन पण आलो. इथले कुंड छान आहे!

टिमटाला बरोबर.
आमच्या गावाहून अमरावतीला (बडनेरा रे. स्टे) जाताना हे गाव लागायचे. स्टेशनवरील फलकावर मराठी व हिंदी दोन्हीत टिमटाला असे लिहिले असायचे.
या नावाने आम्हाला गंमत वाटायची.

मंगळवेढा.

ज्यांनी अद्याप एकही कोडे दिले नाही, पण द्यायचे आहे अशा कोणी पुढले द्या. असे कुणी न दिल्यास २० मिनिटानंतर कोणीही द्या.

विरार

हे गाव आले की सांगा.
???
कळवा, बरोबर.

Pages