आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ama, तुम्ही पॉज करत करत लिहिता का? की कसे?>> सकाळी पाच ला उठते. चहा पिउन कुत्र्याला फिरवून आणते. मग घरचे काम उरकते साडेसहा परेन्त बहुतेक एपिसोड लोड होतो. एकदा बघून घेते. मग परत लावुन पोस्ट लिहिते. खरं तर एकदा परत हात फिरवून एडिट करुन शुद्धलेखन सुधारायला हवे. पण म ग पेशन्स आउट होतो. लवकर उठलेले असतो ना. मग एक झोप काढतो. मग उठून पेपर वाचणे, ऑफिसच्या मेल बघणे व मग उठून स्वयंपाक करून आवरून हपीस झिन्दाबाद. खरंतर लोकांना मजा येत आहे म्हणून अधिक मेहनतीने बघते.

अमा मस्तच.

मला तो नविन प्रोमो बघून आप्पांचा निर्णय योग्य वाटला, घर अन्या आणि अरुच्या नावावर केलं तो.

त्या हिंदीत तो क्लासमेट अनुपमावर प्रेम करत असतो आणि ती तिथली संजना त्या श्रीमंत क्लासमेटशी गळेपडू पणा करते मिन्स शब्दशः नाही पण तसंच. मराठीत कोण यंग आणतील अरु साठी काय माहीती मग इथली संजना असंच करताना दाखवतील.

सुदुपारः

काल रात्री गेम चा इव्हेंट चालू झाला . तो खेळत बसले.
कालच्याच हाय नो ट वर पुढे चालू होते त्यामुळे खंग्री मॅन सेट पीसे स टाकून काम चुकार पणा करत आहे मेला.
अप्पा परत परत प्रॉपर्टी डिव्हिजन चे रीझनिन्ग सांगत राहतो म्हातारा. आता दिले आहे ना मग किती फूटेज खायचे ते. सं . लगेच कटक ट चालू करते. पण अप्पा तिला तू मध्ये बोलू नकोस म्हणतात. अन्या व अरू जॉइन्ट ओनर आहात घराचे व अरूला कोणी बाहेर घालवू शकत नाही म्हणून एक बा प म्हणून तिला विनंती करतात. अरू लगेच उसासे युक्त उसासा टाकते काय ही घराची पीडा गळ्यात पडली असा चेहरा करते.

संजन अन्या रूम मध्ये येतात संजना नवा ड्रेसिन्ग गाउन घालून आहे. पण ती तीच जुनी टेप ओरडा आरडा करत चालू करते . इतकी शिरा ताणून
मच मच करत राहते. अन्या पण पकला आहे. तो पाच मिनिटे आईबरोबर शांत बसतो म्हण्तो तर संजना लगेच मिठी मारून माझ्याकडे लक्षच नाही तुझे म्हणते.

कट टु इंडिएन संगीत संतूर आई अप्पा अरू प्रेमळ संवाद. अरू पदोपदी सुवाक्ये सुविचार सुविनोद करत अर्धवट हसत आई ला सांगते की तुम्ही लवकर बर्‍या व्हा. कालचा गोंधळ आमच्या सहन शक्तीच्या बाहेर होता आई म्हणते लग्न झाले ल्या बाप्याच्या कशी काय ती प्रेमात पडली चूकच आहे हे असे ठासून सांगते. अरू परत काहीतरी सुवि चार ठोकते. लोक काय म्हणतील आता मला घर अर्धे मिळाले तर अप्पा परत त्यांची प्रॉपर्टी टेप लावतात. सो बोअरिन्ग.

विशाखा येते व आता अवि घरी सोडतो आहे म्हणते.
आजी म्हणजे लाडावलेली मोठी बाळ च आहे केदार का नाही मला भेटायला विचारते. विशाखा प्रॉपर्टी नको आहे तुम्ही बरोबर केलेत म्हण्ते.
अन्या आई कडे जातो म्हणतो तर दार उघडल्यावर समोर हातात कपड्यांचे लोड घेतलेली अरु दिसते. लगेच संजना संशयजना होते व तु आमचे बोलणे चोरुन ऐकत होतीस असे बोल लावते. अरू लगेच ठाम पणे तिची भूमिका सांगते. संजना परत सुरू होणार तर अन्या आईला भेटेल म्हणोन बाहेर पडतोच. संजना फारच मागे लागते. लगेच परत कधी येणार म्हणते. मेंदी मंगळसूत्र चे काही कौतूकच नाही म्हणते. व मिठी मारून राहते. अन्यावर काही परीणाम नाही. मम्मा फर्स्ट!!!

अन्या म्हणतो मला काही हक्का साठी भांडायचे नाही आहे.

हे दोन सवतींचे रोज एकमेकींशी भांडणे नाट्य प्रयोग चालू झाले आहेत.
संजना म्हण्ते तू अरू बद्दल दृ ष्टिकोण बदलून एकदा बघ. ती इन जनरल फार मॅनरलेस आहे. व उद्दाम बोलते. अर्थात असे कॅरेक्ट्र चांगले उभे कर्त आहे. सर्व मिळून ही समा धानी नाही संजनाचे पात्र.

अरू आम्ही अश्या वयाचे आहोत की तब्येतीची काळजी घेउ हे जास्त महत्वाचे वाट्ते. तुम्हाला नवे धुमारे फुटलेत असे उपहासाने म्ह ण ते.
मला इथे राहालया तुझी परवानगी मागायची गरज नाही. मला तुम्ही काही बोलू शकत नाही म्हणाते. खंग्री मॅन ढँटढँ तुकडे टाकतो. संजना आता विल विरुद्ध
अपील करायच्या मागे.

नेक्स्ट डे: सकाळ आनंदी संगीत. मुले आजीला चेअर मधून आणतात व घरगुती प्रेमाचे सीन आहेत. आई अप्पा प्रेम अभिला अनघाची आठवण.
इशा पळत येते व आज्जुडीच्या मांडीत डोके खुपसते.

मुले ओरडतात कॉफी म्हणून पण अरू डोळे वटारते.

अवि तयार होउन वाशीच्या घरी व ऑफिस वगैरे करत ओ म्हण तो. आजी त्यांना परत बोलावते. अरू भावजीला खायला सांगते.
अन्या व संजना तयार होउन खाली येतात. विमल ब्रेफा थालीपीठ आहे म्हणते जे अन्याला पण हवे असते पण संजना थांबवते व हेल्दी खा म्हणून ओट्स किनवा खायला सांगते. आजी म्हणते आम्ही खातो संजना म्हणते म्हणूनच तुम्ही दवाखान्यात जाता.

अरू लगेच मिडल मॅन अंपायर. मोठी पट्टी पढवते. आजी संजना टोमणा युद्ध चालू आहे. सर्व जणे ओरडून बोलत आहेत.
संजना अनिरुद्धाला थालिपीठ खायला मना करते.
लगेच आजी अनिरुद्ध च्या खायची जबाबदारी संजनाच्या गळ्यात टाकते. व विमलला पण तशी सूचना देते. संजना कसनुशी होती.
विमल ला सं जना विचारते मुसली आहे का घरात तर विमल म्हणते उसळी हो आहे ना.

इथे घर शीन संपतो.

प्रॉमो: हुकलेली सुहाग रात साजरी करायचा संअन्याचा प्लॅन अस्तो. तसे सेटिन्ग पण बनव्ले आहे. पन अन्या संजना जवळ येतात तोच निखिलचा मम्मा असा आवाज येतो!!!!!! कबाब में ह ड्डी आ गयी. लो कल्लो बात. गयी भैस पानी मे.

इथे पण खंग्री च संगीत का ब्रे!!!!

Happy अन्या आणि संजना ला एकच पोझिशन मध्ये प्रेम करता येतं का? नेहमी तसेच दाखवितात......
आणि निखिल कसा आला मध्येच...रात्री?.....

गेले काही भाग संजना सतत ओरडत बोलते, भुंकल्यासारखे वाटते ते.
बै! सासू-सूनेचे जरा पटले नाही तर एका घरात दोन चुली होतात. आणि इथे क्ष-बायको आणि नवी बायको एकाच घरात राहणार! संजना घर कामाला दुसरी/रा बाई/माणूस ठेऊ शकते पण तिची त्रेधातिरपीट उडालेली दाखविल्या शिवाय मालिकावाल्यांना शांती नाही मिळणार.
आता याघरात त्यांना सुहागरात करायला मिळणार नाही(स.मा.ला. च्या वळणावर) मग नुसती काम करून वैतागेल आणि संजना घर सोडून जाईल.

{अरू लगेच उसासे युक्त उसासा टाकते काय ही घराची पीडा गळ्यात पडली असा चेहरा करते.}

असा, चपखल वर्णन केलंय.

मी सकाळी व्हॉलीबॉल खेळायला व व्यायाम करायला जातो व तिथेच बसून अमा स्पेशल वाचतो. अमा इज ग्रेट. आणि अर्थात संध्याकाळी पाहतो आणि लिहिलेले आठवून हसत बसतो.

अमा, लिहा ना, वाट पाहतोय, आज पाहिली नाही का मालिका? अरे लोक्स हो. तो परेन्त ब्लॅक विडो सिनेमाचा रिव्यू लिहिला आहे तो वाचा.

शुभ प्रभातः

आज कालचीच घरगुती रचना पुढे चालू. त्यामुळे भारतीय संतूर टिं ग टिं ग आहे मागे. संजना अन्याला मी तुला टोस्ट ज्युस बनवून देते. ह्याला थालीपीठ लोण्याचा गोळा हवे आहे पण संजनाच्या भीतीने खायला बसत नाही. पुढे काही पिक अप करू म्हणून अन्या व संजना उपलब्ध अन्नाचा अव्हेर करून निघून जातात त्याचे सु अरूला वाइट वाट्ते. ऑस्सं कॉस्स!! आजी हावरट पणे लोणी थालिपीठ गप्पागप्प खातात.

आता हे संगीत कमी म्हणून कि काय गायन क्लास चालू आहे बागेश्री राग शिका. यश अरू ला गाणे म्हणायचा आग्रह करतो. उसासे क्वीन हसत आढे वेढे घेत बरं गाईन मी म्हणते. पण मला आधी सांग म्हणजे आईंचे सर्व उरकून येता येइल असे सुसून उसासत विचार करते. माईक समोर कसे बाई गायचे. मला काही ओव्हरनाइट स्टार व्हायचे नाही आहे अशी विनम्रतेची पराकास्ठा करते. परत गायन क्लास चालू आहे.
गौरी च पण आवाज चांगला आहे.

खंग्री मॅन वीकेंडला जिवाचा लोणाव ळा करून् येताना खारघर मध्ये इंग्लिश ब्रेफा करून बांद्र्यात सुशी हादडून आला आहे.
म्हणून गिटार चे रोमांटिक संगीत आल्हाददायक पद्धतीने आहे. ड्रमर पण डम डम कर्तो आहे. व संजना बेडरूमची सजावट करत आहे.
हनिमूनची तयारी.

बेड्रूम मध्ये बेडवर गुलाब पाकळ्यांचे हार्ट व फुलांची पखरण. अन्या आत येतो व १७ वर्शाच्या मुलासारखे हे काय विचारतो. संजना हळू गोड स्वरात त्याला सिड्युस करायचा प्रयत्न करत आहे. ओरडा आर डा बटन बंद ठेवले आहे त्यामुळे . संजना अन्याचे खाणे व हेल्थ मी बघेन असे आश्वासन देते. अन्या म्हणतो तू मला खाण्याच्या नव्या सवयी लावू नकोस. आता प्रेमाच्या बाता सोडून खाण्याचे च बातां होत राहतात.
ब्राउ न राइस सलाड खा म्हणते. अन्या म्हणतो मला जुने जेवण आवडते. संजना रोमांटिक बोलायचा आग्रह धरते. तेव्ढ्यात ती मम्मा ही हाक
ऐकू येते.
संजना व अन्या चपापतात . खंग्री मॅन ला सोमवार आठवला आहे व तो उत्साहाने जुन्याच ऑडिओ फायली अपलोड करतो
शेखर पण आला आहे. उशीराचा. निखिलच्या परीक्षेचा निकाल लागला आहे तो दाखवायला तो आला आहे. व इथेच राहणार म्हणतो घर मोठे आहे काय प्रॉब्लेम आहे. मम्मा तुला मिस करत होती. शेखर पण निखिल ला भरीस घालतो.

अरू कॉफी आइसक्रीम ऑफर करते. निखिल आनंदित होतो. शेखर ने फोन व मेसेज केलेला असतो पण संजना ने ते इग्नोअर केलेले असते.
निखिल बिचारा इथेच राहायच्या कल्पनेने खू ष झाला आहे. अरू त्याला ठेवोन घेते व त्याला विचारते निकाला बद्द ल.
अन्या संजना हनिमून वर पाणी पडले आहे. शेखर आई वेगळा पोर जरा प्लीज समजून घ्या अशी आई कांचन ना विनंती करतो.

संजना ओरडा मोड मध्ये जाते. हा ही तुमचा प्लॅन आहे ना अशी सुअरू व शेखर ह्यां वर आरोप करते. त्याला हवा तेव्ढा वेळ देउन रिलेशन शिप डेव्हलप होउ दे अशी विनंती करतो. संजना आरोप करते. शेखर नाकारतो. अरू मी बघेन म्हणते. तर संजना मुलाला पण ओढून घेतेस का विचारते. प्रत्येक बाबतीत मी जबाबदार आहे का विचारते अरू. वाद वाढत जातो. पन अन्या त्याला राहु द्या म्हणतो.

एकांत की कोई गुंजाइश ही नही. कबाब में छोटी हड्डी जो आ गयी. एक पीस टाकून खंग्री मॅन चहा ब्रेक घेतो.

प्रॉमो: कसलीतरी पूजा आहे. संजना जबरदस्त तयार होउन येते. तर विशाखा तिला हे सर्व बदल व मदत करायला ये म्हणते. आई तू का बस्तेस पूजेला असे निखिल म्हणतो. अरू ने बसायला हवे ना. निर्लज्ज अन्या सुरवार शेरवानी घालून बसला आहे पूजेला!!! चेहर्‍यावर तेच सडू उपाशी एक्स्प्रेशन . आगे आगे देखिए होगा होगा क्या.

जय हिंद जय महा रा ष्ट्र

मस्त लिहिलंय अमा..
खंग्री मॅन वीकेंडला जिवाचा लोणाव ळा करून् येताना खारघर मध्ये इंग्लिश ब्रेफा करून बांद्र्यात सुशी हादडून आला आहे.>>>> Biggrin

अन्या आत येतो व १७ वर्शाच्या मुलासारखे हे काय विचारतो... १७ वर्षाच्या मुलालाही कळेल खरे तर...हे काय आहे ते! Happy
चेहर्‍यावर तेच सडू उपाशी एक्स्प्रेशन....खरेच आहे.....! अन्या चे एक्स्प्रेशन्स बदलायला हवेत.... पण त्याच्या कॅरेक्टर ला काही व्हॅल्युच ठेवलेली नाही लेखिकेने.... अगदीच गोंधळलेली आणि नक्की काय हवे ते न कळलेली व्यक्ती रेखा....तो तरी नक्की कसे भाव दाखविणार!

तो तरी नक्की कसे भाव दाखविणार!>> गरम गरम थालीपी ठ वर घरच्या ताज्या लोण्याचा गोळा स्टील प्लेट मध्ये पण हवा आहे आणि क्रिस्टल बोल मध्ये तिरामिसू पण खायचे आहे. पण दोन्ही भांडी चमचे घासायए नाहीएत. हा तो भाव आहे. मति कुंठित.

संपवा एकदाची म्हणावं आता, कंटाळा आलाय तेच तेच दळण, संजनाचा आरडाओरडा, तेच ते आरोप, अरुचे उसासे, संजनाचं लग्न होऊनही का कटकट सुरु आहे अजून? तिला अन्या मिळालाय, अन्याला हवं होतं तसं दोन्ही बायका एकाच ठिकाणी मिळाल्या आहेत , अरुला अर्धे घर आणि तिची माणसं आहेतच , मग काय बाकी राहीलंय आता? नुसतं पाणी घालणं चालू आहे.

या मालिकेचा टी आर पी आजुनही खुप हाय आहे. एवढ्या लवकर नाही संपणार. आजुन अभीचे साखरपुडे/लग्न मोडायचे आहेत, ईशाचे प्रेमप्रकरण, यश- गौरीचे लग्न, संजनाची लोकाना कंटाळा येईपर्यन्त ओरडणे, आजी- अप्पाचे आजारपण, अरुच्या शाळकरी मित्राचे एकतर्फी प्रेम , मध्ये मध्ये सगळे सण साजरे करणे या मध्ये आजुन दोन-तीन वर्ष कुठे नाही गेले. मग प्रेक्षक वैतागतिल टी आर पी कमी होईल . त्यानंतर अन्या - संजनाचा घटस्पोट आणि अन्याचे तिसरे लग्न पण होईल .(अरुशी किंवा आजुन तिसर्याच बाईशी हे नाही सांगु शकत. ) अभीचा साखरपुडा न करता सरळ रजिस्टर मॅरेज होईल त्यानंतर मालिका बंद होईल.

शुभ प्रभात.
आज ते च ते च कौटुंबिक दळण नव्याने दळा यचे आहे. कालचाच संघर्ष परत चालू आहे. बावळे ध्यान निखिल येडपट चेहरे करत इथून इथ्ते बघते.
शेखर त्याला किती दिवस ठेवू परत कधी नेउ ते मला कळव म्हणून पसार होतो. आता ही भल्तीच जबाब्दारी अंगावर पडुन शिळ्या हनिमूनचा फोडणी भात फ्रिज मध्ये ढकलावा लागेल ह्या विचारान संजना कुंठित आहे व चक्क गप्प उभी राहते. ह्यात फक्त खंग्री मॅन व संतूर वाल्याला इंत्रेस्ट आहे डेली भत्त्याला जागून ते काम करत आहेत.

हे बघून आजीचे डोके परत फिरायला आहे सुअरू तिला घेउन हळू हळू जिना च्ढायला जातात.

अन्या सोफ्यावर पडेल म्हणतो व संजना निखिल बरोबर सजवलेल्या बेडरुमात. पण त्यावर निखिलची टिप्पणी दाखवलेली नाही.
सुरू सासूला अंगाई गीत म्हणून घर बंद करायला येते . आता संतूरवाला प्रेमळ तुकडे जोडतो. ती दार बंद करते. अन्या सोफ्यावर पडून तिच्याकडे हावरट पणे बघत आहे. पण ती निघून जाते.

नेक्स्ट डे पहाट आजी इशा फिरत आहेत गवतावर. निखिल आला आहे तयार होउन व फुल ऑन एनर्जीत आहे व आजीला पिडतो. त्याला बघून आजीचा मूड फिरला आहे. निखिल ला दूध हवे आहे कोको घालून इशा त्याला देते आजी म्हणते त्याचया आईला काहीतरी करूदे. हा सारखा इथे तिथे मधे मध्ये येत आहे . निखिल आगाउ पणे आजीला पण दूध प्यायला सांगतो कारण ती म्हातारी झाली आहे.

आता आजी व्हरांड्यात बसली आहे. सुरू येते व काळजी पूर्व क प्रश्न विचारते. अप्पा येउन सहजीवनात्मक प्रश्न विचारतात. आजी करवादते
निखिल दूध पिहोन आला आहे. व कराटेचे हात वारे करतो. आजी हताश झाली आहे तिला एक क्षण पण दुसृयावर function at() { [native code] } अटेन्शन गेलेले आव्डत नाही.

अरू तुळशी ची पुजा करते व निखिलला शिकवते( संस्कार संस्खार!!!) हे संजना गाउन मध्ये बघते. सुरू त्याची दुधाची मिशी पदराने पुसते. हा एक अजरामर क्षण आहे. मेरे पास मां है लेव्हल. हे पण संजना ला पसंत पडत नाही. अन्या पण वर आला आहे व अजून झोपेन म्हणतो कारण सोफ्यावर झोपून पाठ दुखते आहे .

आता खंग्री मॅ न उत्साहाने पर डे शिफ्ट क्लेम करायला बसला आहे. इन्सेप्क्षन टाइप संगीत दिले आहे.

सुरू निखिलचे कौतूक कर्ते आजी तिला गोकुळा ष्टमीची पूजा आहे तिला बसायला सांगते संजना गाउन मध्ये येउन मीच पूजा करेन मीच आता सून आहे मीच तुमचे सर्व कुळाचार संभाळेन म्हण ते. निखिल पण पूजा हायजॅक करायला रेडि आहे. मम्मा पन पूजा करेल

सुरू निखिलला सर्व समजावुन सांग म्हनते तर संजना परत कुरघोडी करते. आजी अप्पा कपाळ बड वती मोड.

आता घरी पूजेची तयारी हा हॅपी सिक्वेन्स आहे व तसेच पेपी संगीत आहे.
इशा: खायला काय करणार
विशाखा: काहीत अरी चमकदार.
अभि: नेहमीचे मी निघतो आनि उशीर होईल.
अप्पा: च्या खोड्या काढतत व सर्वांचे हॅपी क्लोज अप.
यश अनघाला बोलावा म्हणतो व सर्व अभीची टर खेचतात.
सुरू हो म्हन्टॅ व अभी गेल्यावर म्हणते मी इनिशिएटिव्ह घेणार् नाही( जे काय ते अभीलाच करूदे ह्या वेळी नशीब आपलं!!! हे आधी कळ ल ं असत तर अंकिताचे मोठे हॉस्पिटल आता परेन्त अभिच्य नावावर झाले अस्ते व अनघा संजना लेव्हलची मैत्रीण बनून दोघींचे कल्याण त्याने केले असते बापाच्या पावलावर पाउल टाकून.!!) बघा बाई नवा ट्रॅक.

गौरी हातात पाळणा घेउन ( हौ त ट्रॅजिक!!) व निखिलची लुडबूड चालत आहे. यश इशा इरि टेटिन्गली क्युट
ह्या सर्व कौटुंबीक दहि भातात एकद म तयार होउन तर्री येते. व पूजा कधी आहे असे विचारते( ही काय बोर्ड मीटिन्ग आहे?! ) गूग्ल कॅलेंडर प्रमाणे अटें ड करायला?!

विशाखा म्हणते तुला उपास आहे दिवस भर. संजना विशाखाच्या हातातला चहाचा कप घेते. उपास आहे म्हणून.

उसासे क्वीन लगेच सावरायला बघते. विशाखा बरोबर म्हणते तिला काहीतरी काम पण पडूदे. व निखिल बद्दल दया व्यक्त कर्ते.
निखिलला आई हाक मारते व अरु त्याला म्हणाते इथून च ओरडून उत्तर देउ नको जा आणि बघ काय म्हणतेय ते. मग फोडणीतला शेंगदाणा टणा टणा उडया मारत् वर जातो.

अजून एक उसासा. व कामाला लागा म्हणते. हाताने काहीतरी चालू आहेच.
सो द एपिसोड इज ओव्हर पुढील भागात अजून एक केदार बरोबर चमकदार कन्फ्रंटेशन. ते बाहेरचा जिना असता किंवा अंग्णात संजना अन्याला नवी बंगली बांधून दिली असती तर? पन माझं मेलीचं कोणी ऐकतच नाही. सारखे एकत्र बसून जिभा किसायच्या ह्यात काय पॉइंट आहे. लीव्ह देम अलोन.

प्रॉमो: संजना काही तरी कुरापत काढ ते. सुरू पण काहीतरी समजावणी पूर्वक बोलणार आहे.

जय हिंद जय महारा ष्ट्र.

Lol मस्त अमा.
मी ही मालिका बघत नाही त्यामुळे सगळी पात्रं कळत नाहीत. निखिल कोण आहे? संजनाचा मुलगा आहे का? आणि शेखर तिचा आधीचा नवरा आहे का?

हो वावे.
ते बाहेरचा जिना ….>>> मग आपल्याला दाखवणार काय? Happy
हा एक अजरामर क्षण आहे. मेरे पास मां है लेव्हल. >>>> अगदी. इथे मेरे पास तुम्हारा बेटा/ममता है!

Pages