आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे ते लग्नाचे काहीच नाही का आज दाखविले...? नुसता फिलर एपिसोड! >>> तो एपिसोड ३० तारखेला आहे. स्टार वर सगळ्याच मालिकांचे आठ आठ दिवस आधीपासून प्रोमो दाखवायला सुरवात करतात. पण एका कोपऱ्यात कधी प्रकाशित होणार ती तारीख दिलेली असते.

शुभ प्रभात.

आज काही घड णार नाही हे सर्व ज्ञात आहे तरीही. द सीन ओपन्स विथ कां चन आजी डोळ्यात अश्रू आणून आता नवी सून येइल तिच्याशी कसे जुळ वून घ्यायची फिकीर करत आहे. ती आपल्या डोक्यावर मिरे वाटणार हे मला सहन होणार नाही असे करवादते. अरु बाई आता फॉर्मात येतात. उसासे घेत श्वास टाकत जुळवून घ्या अब बहुत देर हो गयी. टॉक टु अन्या इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम असे कस्टमर सर्विस वाल्यांच्या अलिप्त पणे उत्तर देते . ( मनात उकळ्या फुटत असेल इतकी वर्शे मला सासुरवास केला आता भोआकफ!!!)

कट टु संजना गुलाबे हिरव्या साडीत गौरीला नेकलेस अ‍ॅडजस्ट करायची विनंती करते. गौरी अ‍ॅज युजवल विचित्र टॉप घालून आहे. भोंगळ दिसते एकदम मग एकदम तिला माव्शीच्या काळ जीचा अ‍ॅटेक येतो. मग संजना तिलाच एक घट्ट मिठी मारते!!! व अन्याला फोन करते तो उचलत नाही

आजी आजोबा खाणे नको नको असा अवीचा आग्रह चालू असताना फुकट भाव खातात. अरु ला पण यश म्हणतो. पण सीरील न्याया प्रमाणे
जेव की वगैरे विचारले की समोरचे पात्र नाही नको म्हणते ( अन्नाचा अव्हेर अपमान !!! बिग इन्सल्ट टू फू ड ) पण अरू मी डबा घेतला आहे असे म्हणून उसासे टाकत अभी बरोबर चेक अप ला जाते.

अन्या अजून खाली आलेला नाही. त्यात हिला अभिच्य डब्याची काळ जी

अरू तिथून डोंबिवलीला जाईन म्हणते पन म्हातारी डोळ्यात पाणी आनून मला तुझी गरज आहे असे विनवते. तसे विनंती म्युझीक आहे. बासरीवाला कोंडवाड्यात डांबलेला बाहेर पडायचे प्रयत्न करतो आहे. रानोमाळ बासरी घुमते. कौटुंबिक वादाच्या वादळा वरून एक गोड हात फिरवते. आता तर सोब त कोरस वाले गायक पण आहेत.
अवी अप्पाना हातात पाणी देतो मग सतार वाला पुढे येतो.
ह्यात एक सतार वाजते ती एकदम एच्डी एफ सी एटिएम मध्ये आता पिन घाला ह्या आज्ञेनं तर एक धून वाजते तशी आहे त्यामुळे मला नेहमी आता पैसे कधी पड्तील टाक्कन असे फील्स येते. पण अरुचे उसासेच हाती येतात. समटाइम्स आय गेट अन्या.

अवि व अप्पांचा समजुतदार पॅट्रार्की संवाद येतो. बायकांच्या वागण्याचा अर्थ विषद करतात. मेल पर्स्पेक्टिव्ह. अप्पा म्हणतात आंजर्ल्याला जातो. पन अवि तिथेच रहा असा सल्ला देतो. घरावरचा कंट्रोल सोडून देउ नका म्हणतो. आपलाच दाम खोटा चा एक नाट्यप्रयोग होतो.

पण अरू ती अरूच. ( फाट की पण लाडकी चप्पल!!! ) नव्या सवयी लावणे अवघड जाते.

सं कॉलिन्ग अन्या बट नॉट पिकिन्ग अप.

नटलेली सं येते व अप्पांना अन्या कुठे आहे विचारायला येते. मी बघते म्हणते व आत जाते नटून. आईला विचारते आजी पण अ‍ॅक्ट्स टफ.
आज लग्न आहे तर अन्या कुठे गायब आहे ते सांगा असे सं म्हणते व रूम मध्ये बघायला जाते. यश तिला मूर्ख म्हणून घेतो.

सं बेडरू म दारावर नॉक करते. ( हीच ती बेडरूम ज्याचे दार तिने मुद्दाम उघडे ठेवुन अन्या बरोबर मिठी मारलेली असते. अरूला धक्का द्यायला. )
आता तिला धक्का बसतो. तो घरात नाही हे बघून संजना काळजी व्यक्त करते. तयार पन नाही. आता रजिस्ट्रार येइल पण नवरा पात्र नाही.
यश तिला सांगतो की काल रात्री ते बाहेर गेले आहेत. अजून आले नाहीत. संजना वैतागते. आप्पा तिला गप्प बसवतात

वेळ निघून जाईल म्हणून सं घायकुतीने यश ला त्याला फोन करायची विनंती करते. आता ही डेव्हलपिन्ग सिचुएशन झाली आहे. आता खंग्री म्युझीक वाला आजचे पैसे कमवायचे ह्या इर्षेने चहा पिउन आला आहे व फॉर्मात आहे.

अरू अभी संवादः मला संजना बद्दल सहानुभूती वाट्ते आहे. अन्या पळून गेला आहे असे संजना म्हणते. पहिल्यांदा पण तो आलेला नव्हता ह्याची तिला आठवण येते. मग एकदम अरु अभी सकाळी बाहेर गेल्याची याद येते. तिलानक्की माहीत असेल म्हणते तुझे आईबाबा फार पोचलेले आहेत. डिवोर्स फक्त नाटक आहे. मला गप्प करायला प्लॅन केला आहे असा आरोप करते.

आता प्रोमो अरू चे ओरडणे !!! किस्सा खलास शुभ वीकांत आता सोमवरीच काय ते कळेल
तोपरेन्त जय हिंद जय महाराष्ट्र.

सिनेमाची पिसे काढायला फार एन्ड, पायस अन स्वप्ना राज, आणि आई कुठे काय करतेसाठी मी अनु, नाद करायचा नाय.

किती डिटेलवारी पाहताय राव?

आज खंग्री म्युझिक लक्ष देऊन ऐकेन.

यांच्या घरात कोणाचंही लग्न , साखरपुडा धड पार पडत नाहीत. अभिचे दोन साखरपुडे अर्धवट राहिले. यशच्या साखरपुड्यात राडा. अरविंदच्या दुसर्‍या लग्नाचाही हा दुसरा अटेम्प्ट ना?

देशमुखांकडे एक अभि सोडला तर कोणीही नॉर्मल पद्धतीने संवाद म्हणत नाहीत. अरुंधती गायिका असूनही उसासत बोलते. बाकी सगळ्यांचीही अशीच आवाजाची पट्टी, आवेश कायम तेच. अभिही अनेकदा उरकून टाकल्यासारखं बोलतो. kind of irresponsible.
याबद्दल टीमचं कौतुक करावं की नाव ठेवावं ठरत नाहीए.

अमा एकदम तुफानी वर्णन! तुमच्यामुळेच मी म्युझिक निट लक्ष देवुन एकायला लागले

शुभप्रभात.

आजचा भाग पाहिला. अप्रतिम झाला आहे. लेखन छान. पण काही लिहिणे शक्य नाही. अन्या गायब आहे लग्नाची वेळ येते आहे. तर संजना बिथरलेल्या अवस्थेत घरी येते व तुमचा प्लॅन आहे त्याला गायब केले आहे. आता माझ्या कडे दुसरा पर्याय नाही. इथून सुरू करून आर्क जबरदस्त वाढवत समोरील प्रत्येकाला जसे की म्हातारे, गौरी यश अभि अरू अवि सर्वांना एकेक बारी अँटगोनाइज करत जाते. पोलीस कंप्लेंट करीन म्हणते
अरू अभी गाडी मागे वळवून परत घरी येतात. मग ती अरूवर पण ओरड ते व अनिरुद्ध येइपरेन्त मी इथेच राहणार् म्हणून मांडा ठोकून बसते.
आजीला चक्कर येते तर तुम्ही नाटक करत आहात म्हण ते. सारे जग आपल्या विरुद्ध आहे असे वाटणा र्‍या मनो रुग्णा सारखे तिला वाटू लागले आहे.

अन्या फोन करतो. व अरुशी बोलायचे म्हणतो पण ती त्याला घरीच बोलाव ते परत मेजर ड्रामा. संजना अन्याला थोबाडीत मारते. तरी अजून लग्न व्हायचे आहे. मग काय करेल कोण जाणे.

माझ्या बायकोचे स्थान अरुचेच आहे असे अन्या कबूल करतो. मला लग्न करायचे नाही म्हणतो. एपिसोड जबरद स्त रंगवला आहे. संजना चे थोडे सिरी अल अनुसार ओव्हर अ‍ॅक्टिन्ग आहे. पन तिने ते चांगले खुलवले आहे. असतात अश्या बायका.

अरु अवि यश ला आधी मिसिन्ग पर्सन कंप्लेंट दर्ज करायला सांगते.

प्रोमो मध्ये अन्या कुर्ता घालून आता रजिस्टर मध्ये सही करणार असे दाखवले आहे. आता तुम्हाला काही पर्याय नाही असे अरू म्हणते.
मेजर मेजर ड्रामा.
खंग्री म्युझिक वाल्याने आज जबरदस्त गांजा ओढून संगीत दिले आहे. बासरी सतार वाले सुट्टीवर. इथं त्यांचं काय काम.

जबरदस्त गांजा Lol
फूल पैसावसूल राडा!!
अरूंधती: यश, अविनाश भाऊजी पोलिसांकडे तक्रार करा.
संजना: अगं पण मी काय केलंय आता?
अरूंधती: तुझ्यासाठी नाही गं बाई! हे बेपत्ता आहेत तर पोलिसांना सांगायला नको का? Lol

अमा..:-) खंग्री म्युझिक वाल्याचा धंदा जोरात आहे आज....!
संजना ने साडीचा पदर फोल्ड करून का घेतला ते कळल नाही.... काठ दिसत नव्हता हाताच्या आतल्या बाजूचा......
बाकीचे सगळे स्तब्ध आणि संजना एकटीच बोल बोल बोलतेय...वाट्टेल ते
अनिरुद्ध चे पटले मला तर..की संजना सोबत त्याला कधीच लग्न नव्हते करायचे .....

खंग्री म्युझिक वाल्याने आज जबरदस्त गांजा ओढून संगीत दिले आहे>>> Lol हाहा, अजून हसतेय मी. आजचा भाग फुल्ल ऑन ड्रामा आहे, एक नक्की, संजना आणि शेखर जेव्हा जेव्हा असतात तेव्हाचा एपिसोड बघणेबल असतो.

अनिरुद्ध चे पटले मला तर..की संजना सोबत त्याला कधीच लग्न नव्हते करायचे ....>>>> हे तर मलाही पटायला लागले आहे कधीचे , जे आहे ते चालू दे , दोघी खुश राहील्या असत्या , पण मालिकावाले नसते राहीले Lol
संजनाची हौस, स्वत:च्या आणि इतरांच्याही डोक्याचा ताप वाढवायची.

माझ्या बायकोचे स्थान अरुचेच आहे असे अन्या कबूल करतो>>> ऑ? असं कसं म्हणतोय हा , त्याला तर ती कधीच आवडली नाही ना, तो पण गांजा ओढायला गेला होता का काय आता Rofl

त्यांच्यासाठी बायको आणि मैत्रीण/ प्रेयसी यांचे रोल वेगवेगळे आहेत.
त्याला बायको हीच हवी. घरचं सगळं बघणारी, सगळ्यांची काळजी घेणारी.
प्रेयसीला ते जमणार नाही. तशीही ती फक्त प्रेम करायला हवी.

त्यांच्यासाठी बायको आणि मैत्रीण/ प्रेयसी यांचे रोल वेगवेगळे आहेत.
त्याला बायको हीच हवी. घरचं सगळं बघणारी, सगळ्यांची काळजी घेणारी.
प्रेयसीला ते जमणार नाही. तशीही ती फक्त प्रेम करायला हवी.>> हे मेल लॉजिक ने एकदम परफेक्ट सिचुएशन आहे. त्या बायकांनी आपापल्या गरजा सांगायला व क्लेम करायला सुरू केले की गडबड होते.

हैद्राबाद साइड ला सेकंड वाइफला छोटा मकानच म्हणतात. एक बाप्या दोन रेशन कार्ड वर बाप म्हणून राहायला पण परवानगी आहे. नाहीतर त्या दुसृया फॅमिलीची उपासमारच होते.

आज टीव्हीवर एकही ब्रेक न घेता एपिसोड दाखवला. याआधीही एकदा असं झालं होतं.
मी एच डी चॅनेलवर पाहतो, तिथे जाहिरात एकच असते. बाकी प्रोमोज. आज तेही नाही.

संजनाचा आज मुरारबाजी झाला होता. काही न बघता तलवारी चालवत होती.
तिची पार बिचारी अवस्था करून टाकली.

सन्जनाची चिडचिड अगदी शिगेला पोहोचली होती त्याभरात एकदा खर आणि दोन्दा रिप्ले मधे अन्याला थोबाडावल तिने.
सगळ्यात मज्जा म्हणजे अनिरद्ध दारात येवुन उभ राहिल्यावर कॅमेरा त्याच्याकडे न्यायच्या आधी सगळ्याच्याच रिअ‍ॅक्शन अशा होत्या जणु अन्या या मुहुर्तावर तिसर्‍याच कुणाशी लग्न करुन आलाय.

आणि.. अन्याला मारताना तिचा हात त्याच्या गालापर्यंत पोहोचलाच नाही.. जस्ट थपड थापड म्युझिक आणि स्लो मोशन रेप्ले...

सगळ्याच्याच रिअ‍ॅक्शन अशा होत्या जणु अन्या या मुहुर्तावर तिसर्‍याच कुणाशी लग्न करुन आलाय. >>>> हो ना. मी सेम हेच म्हणाले सगळ्यांच्या रिएक्शन पाहून. अरूने सांगितलेलं ना already तो घरी येतोय ते तरी surprised reaction देत होते बावळट लोक.

संजनाचे उच्चार फारच खटकू लागले आहेत
मणून मी तुम्हाला सांगत होते..
माज्याशी कसे वागता तुमी लोक.....
अगदीच बंडल!
दिसत छान होती..पण केसांचा काहीतरी कर म्हणा...अगदीच रंगविलेले भकास कोरडे दिसतात..

फारच छान एपिसोड. सगळ क्रेडिट संजनाला.
अनिरुद्धने जसा घरावरच्या ताब्याचा एपिसोड रंगवला होता, तसाच हा संजनाचा. अरुचा नाहिये तसा एपिसोड जो तिने स्वत:ने खेचलाय.

अनिरुद्ध चे पटले मला तर..की संजना सोबत त्याला कधीच लग्न नव्हते करायचे ....>>>> हे तर मलाही पटायला लागले आहे कधीचे , जे आहे ते चालू दे , दोघी खुश राहील्या असत्या त्यांच्यासाठी बायको आणि मैत्रीण/ प्रेयसी यांचे रोल वेगवेगळे आहेत.
त्याला बायको हीच हवी. घरचं सगळं बघणारी, सगळ्यांची काळजी घेणारी.
प्रेयसीला ते जमणार नाही. तशीही ती फक्त प्रेम करायला हवी.>> हे मेल लॉजिक ने एकदम परफेक्ट सिचुएशन आहे. त्या बायकांनी आपापल्या गरजा सांगायला व क्लेम करायला सुरू केले की गडबड होते. >>>>>>>>> मला नाही पटले हे. अन्या स्वार्थी आहे.

संजना आणि शेखर जेव्हा जेव्हा असतात तेव्हाचा एपिसोड बघणेबल असतो. >>>>>>>>>>> अगदी अगदी. अभिच्या दुसर्या साखरपुड्यच्या वेळी सन्जना जो तमाशा करत होती हॉलमध्ये अन्याला घेऊन जाताना तोसुद्दा बघणेबल होता. एकदम सायको वाटत होती. तिचा डान्ससुद्दा छान होता.

अरुचा नाहिये तसा एपिसोड जो तिने स्वत:ने खेचलाय >>>>>>> आहे. अरुचा तो एपिसोड छान झाला होता ज्यात ती सासूला विचारते, 'मग घरन्दाज पुरुष काय करतात?"

तिघांमध्ये अरु बेस्ट आहे अ‍ॅक्टिंग मध्ये

ते च तर अन्याचे स्वार्थी अस णे जस्टिफाय केले जाते पण संजना किंवा अरू आता माझे मी बघते मला हे हवे आहे कि काँफ्लिक्ट होते.

तिघांमध्ये अरु बेस्ट आहे अ‍ॅक्टिंग मध्ये >>> हो. प्रोमोजमध्येही समजतं ते.

पूर्वी अन्या शिरा ताणत बोलायचा तसाच आता बोलतो का.

शुभप्रभातः

सिग्नेचर म्युझिक मागे वाजते. अन्या म्हणतो यु कांट फोर्स मी. पण सं म्हणते तुम्हाला हे क्ळायला हवे मेजर डायलॉग. मी तुम्हाला कोर्टात खेचीन. यु कांट एस्केप अन्या तिला समजवायचा प्रयत्न करतो. माझी फॅम्ली वगैरे त्याला आता आठवते. मी बुडले तर तुम्हा सर्वांना घेउन बुडेन अशी ती धमकी देते.

अरू म्हणते आता हे सर्व थांबवा व मुका ट्याने लग्न करा. खंग्री म्युझिक मागे भयंकर प्रमाणे वाजत राहते. मधून धाड ताड पण.
अरू सांगते आता हिच्याशी नाइलाजाने संसार करावा. तुम्ही फसवणूक करू शकत नाही. संजना तू असा कसा विश्वास ठेवलास. प्रेम करताना तुम्ही दोघांनी डोके बाजूला ठेवले कि काय!!!!( ह्याचे उत्तर होय असेच आहे पण सभ्य संकेता नुसार प्रतिसादात लिहिता येणार् नाही)

आई अपील करते ही आपल्या घरात पोलीस आण् णार म्हणे, बाबा अवि सर्व म्हणतात आता ती वेळ गेली आहे. आता मध्येच बासरी वाला आपण आहोत हे जाणवून देतो. बासरीतून एक आर्त किंकाळी.

अरू सांगते लग्न करा!!!

आता लग्नाच सीन आहे. ते लग्नाची सरकारी शपथ घेताना असा इकरार करते की. असे म्हणायचे आहे ते इकरार उर्दू शब्द आहे पण हे दोघे इ करार असे म्हणतात. ते नक्की ऐका. आता खंग्री मॅन ने बासरी वाल्याला अक्षता देउन बोलावले आहे बरोबर सनई टीम आहे.
दोघे मध्येच उत्साहाने उलथापालथ संगीत देत आहेत. अन्या मेल्या मनाने सर्व संवाद म्हणतो काही जान नाही.

कोणते तरी तीन मुली एक बाप्या विटनेस भाड्याने आणले आहेत. ते लोक लग्न झाल्यावर पारटी मागतात ते ही समृद्धी मध्ये.

आता भारतीय संगीत टीम पुढे सरसावते आहे. हार घालणे सतार वाला तंबोरा वाला सस्पे न्स संगीत हार घालताना.

ट्याव ट्यांव ट्या व ट्यांव...........

खंग्री मॅन मध्येच अ‍ॅटॅक आल्यासारखे पीसेस टाकतो.

सनई मॅन व कोरस मंगळ सूत्र बांधायचा सीन मध्ये फुटेज खातात. आता ह्याच्या राशीला कायम मंगळ लागल्या चे फीलिन्ग य्ते.

ते कल्टी मारतात लगेच व खंग्री मॅन चालू होतो. धडा धाड क्लायमॅक्स व एकदम शांत ता.

संवाद चालू. मैत्रीणींची बालीश बडबड. अन्या पत्थर की मूरत बन गया है.
हनीमूनला कुठे जा णार असे विचरतात . अरे १३ वर्शे झाला की. मधून मधून चंद्र आता खर्च कशाला?! आं त्यात त्याला जॉब नाही.

कट टू होम( ऑफ अन्या)
अरू उसासे टाकत समजूत घालत आहे. म्हातारा डोके बधीर झाले आहे म्हणतो. व आंजर्ल्याला जायचा प्लॅन करतो. अरू म्हणते इथेच राहा पण जरा तिच्याशी जुळवून घ्या. थोडे शांत संगीत दिले आहे . पियानो टाइप. परत उसासे हे अस्थिर झाले आहेत. करतील कसा तरी संसार वगैरे
अभी म्हणतो तिचे डोके बिघडले आहे व बाबांना आनंद काही मिळाला नाही इतकी धडपड करून.

अरू म्ह ण ते मी इशाला घेउन जाते. सतार वाला एटीएम संगीत मारतो. बास री वाला पण रानात एकटे बसल्याचे संगीत लावतो पण खंग्री मॅन चहा पिउन आला आहे. धाड धाड व सस्पेन्स संगीत. अरू निघायचे म्हणते. आता जा की बाय म्हणण्यात दोन वर्शे गेली!!!!
मग निलीमा तकलादू बोलते व गोड शब्दात वाभाडॅ काढते. सॅड संगीत किंवा एलेव्हेटर टाइप संगीत.

संजनाचा राग तुझ्यावर आहे आमच्यावर नाही म्ह णाते. सं व अ घरी यायला निघतात सं ला आता गृहप्रवेश करवून घ्यायचा आहे.
ते यायला निघतात व अरु अभी बाहेर जायला निघतात. दरवाज्यात क्रॉस होतात पण एकही संवाद नाही. किलर ग्लान्सेस फक्त.

आई जुन्या विचारांची आहे ती नक्की गृहप्रवेस करवेल पण निलीमा नक्की करेल स्वागत असे सं म्हणते.

खंग्री मॅन पुढील प्रसंगांची कल्पना देत आहे.

अवि लगेच वहिनी तू निघ तेस म्हणतो आता हा बाय बाय फार वेळ खेचला आहे. अरू त्यातही संस्कारी बहु प्रोटोकॉल प्रमाणे वाकून नम्स्कार
करायला सरसावते. पण अप्पा नक्को नकू वाकू नको. म्हणून सावरुन घेतात. किती गुणाची ग बाई माझी( का को णाची?!)

खंग्री इज इन फुल कंट्रोल आता तर तो मेन गेट पाशी कन्फ्रंटेशन चा सीन पण काहीच होत नाही.

आता प्रॉमो:
माप ठेवले आहे. संजना माप ओलांडून येणार आहे आता मी कायदेशीर रीत्या येउ शकते. तर आई ओरडून आत यायचे नाही असा आक्रस्ताळे प्णा करते व तिला त्या तच बहुतेक कसला तरी अ‍ॅटेक येतो. किम्वा बीपी शूट होत असावे( झी वाल्यांचा लाडका आजार) मग अरू अभी परत वळलेले असतात ती अरू धावत आई आई करत आत येते. ( हिचे टाके नक्की तुटत अस्तील रोज. )

संजना बघते तर काय सर्प्राइज सर्प्राइज!!!! माप तर अरू ने लाथाडले!!!!! काय हा अपशकून ( कोण लिहिते असले सीन!!!)

झाले एकदाचे दुसरे लग्न.

लग्न त्याच घरात झालं मग माप ओलांडून यायला परत बाहेर गेली का? माप कोणी भरून ठेवलं? अविनाशच्या बायकोने?

कालची गंमत - यश संजनाला म्हणतो तू थोडी वेडीबिडी झाली आहेस का? यावर गौरी त्याला समजवते - अरे तिची मानसिक अवस्था बरी नाहीए.

दोन्ही मध्ये फार फरक नाही.
संजनाला आणखी कोणी मित्र मैत्रीण नाही. बहीण अमेरिकेत. आईवडीलही गेले का?

लग्न गौरीच्या घरात झाले. एक् टेबल समोर रजिस्ट्रार. हा पीतांबर टोपी जानवे केले तर लग्न लाव् णारा गुरुजी पण दिसेल असाच आहे.

व केक कापायला उभे राहतात तसे सं अ एकीक डे दोन भाडोत्री व दुसरी कडे दोन. हे संजनाचे मित्र मैत्रीण कलीग असावेत.

अश्या रिलेशन मध्ये बॉयफ्रेंड्स बाईला सोशली आयसोलेट करतात तसे अन्याने केले असावे. अ‍ॅक्टिव्ह काळात.

Pages