Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आईवडीलही गेले का?>>>>
आईवडीलही गेले का?>>>>
वडील नाही आहेत, आई मुंबई मधेच असते ,जुन्या घरी जिथे संजना आणि शेखर चं पहिलं प्रेम फुललं होतं,
पण आता बेड रिडन आहे म्हणे
दाखवले नाही त्या माऊलीला कधी, संजना-गौरी चे डायलॉग असतात अध्ये-मध्ये ,औषधे देऊन आले वगैरे..
या अशाच मालिका दाखवत राहीले
या अशाच मालिका दाखवत राहीले तर दोन काय चार लग्ने देखील व्हॅलिड होऊन जातील Hindu marriage act मध्ये! अर्थात फक्त पुरूषांना! सेम स्टोरी role reverse करून दाखवली तर कोणीच पाहणार नाही. स्त्रियांना बिनडोक, कमकुवत आणि good for nothing दाखवण्यात, पाहण्यात आणि ठेवण्यातच सिस्टीम्स गुंतलेल्या आहेत.
हा सगळा बिनडोक कारभार चुलीत जावा असे वाटते पण गेले काही दिवस अमांच्या पोस्ट्स वाचून माझे मनपरिवर्तन होऊ लागले आहे! अमांना असेच चौकार षटकार मारता यावेत यासाठी या मालिका चालू रहाव्यात की काय असे वाटू लागले आहे! अमा,भारीच लिहीताय! अशीच पिसे काढीत रहा! तुमच्या पोस्ट्स वाचून जरा मनाला शांती मिळते.
प्रत्यक्षात द्बिपत्नीत्वाचं
प्रत्यक्षात द्बिपत्नीत्वाचं प्रमाण हिंदूमध्येही कमी नाही. बर्याच वर्षांपूर्वीची आकडेवारी आहे. पण आताही चित्र पूर्ण बदललं असेल असं नाही.
या मालिकेत दुसरी बायको ही सुद्धा आधी एक विवाह झालेली आहे आणि दोघांनी घटस्फोट घेऊन लग्न केलंय
रजिस्टर्ड लग्नासाठी ३० दिवसांची नोटिस आणि दोघांची कागदपत्रे , ज्यात घटस्फोटाची ऑर्डर आली, द्यावे लागतात. मालिकेत ड्रामा आणण्याच्या गडबडीत या बारक्याशा तपशीलाकडे टीमने दुर्लक्ष केलं.
मला या सर्व सिरियल पाहुन
मला या सर्व सिरियल पाहुन राहून राहून एकच प्रश्न पडलाय, एकाच पुरूषाच्या मागे दोन बायकांनी लागण्या इतक्या आम्हि बायका मूर्ख आहोत असं या लेखकांना सांगायचं आहे का? जरा एक विवाहित स्त्री अफेअर करतेय, नवरा घर सांभाळतो असं का नाही दाखवत?
अमा सॉलिड लिहिताय . इथे वाचुन
अमा सॉलिड लिहिताय . इथे वाचुन सिरीयल बघावीशी वाटतेय आता . मुलगी लहान असल्यामुळे सिरियल्स बघणे घरी सगळ्यांनीच कमी केले आहे. त्यामुळे हि सिरीयल बघितलीच न्हवती कधी प्रोमो सोडून. तुम्ही online बघायला भाग पाडताय . म्युजिक साठी तरी बघेनच
रजिस्टर्ड लग्नासाठी ३०
रजिस्टर्ड लग्नासाठी ३० दिवसांची नोटिस आणि दोघांची कागदपत्रे , ज्यात घटस्फोटाची ऑर्डर आली, द्यावे लागतात. मालिकेत ड्रामा आणण्याच्या गडबडीत या बारक्याशा तपशीलाकडे टीमने दुर्लक्ष केलं.>> हो ना. संजना गुडघ्याला बाशिंग मोड मध्ये आहे न. ते बरोबर झालं असतं अरू आजारपणा तू न उठून माहेरी निघून गेली असती. मुले रुटीनला लागली असती. अवि व मिसेस गेले असते. आता घरी कोण आजी आजोबा व हे नवे जोड पे. मेड सर्वंट. एवढ्या मोठ्या घरात बाहेरनं जिना घेतला व वर किचन बनवले तर संजनाचे तोंड म्हातार्यांना बघावे लागले नसते. व त्यांना बघायला एक अजून रिटेनर ठेवायचा. हा का नाका.
मला वाट ले होते अरूला क्यान्सर झाला तर ती घराची जबाबदारी आपण हून संजनाला देइल व तिला ट्रेन करेल.
स्टेप मॉम सिनेमावाणी. मॉम टु स्टेपनी
अमा, मस्त लिहिताय. जरा येऊ
अमा, मस्त लिहिताय. जरा येऊ कशी तशी मी नांदायला पण बघायला सुरूहकरा.
स्टार काय झी काय एकुणेक सिरियली माझ्या डोक्यात जातात.
थॅन्कस टु सासूमा.
अमा...
अमा...
ते काय रिअल लाईफ आहे का? ..... बाहेरुन जिना आणि काही करायला.......!!
तसं पाहिलं तर केवळ घरावर हक्क राहावा म्हणून अनिरुद्ध इकडे राहणार...तो तर बाहेरुन पण मिळवता येइलच....
बाहेर टू बी एच के घए घेऊन रहावं सरळ...........संजना ही खुश आणि घरचेही............!!!
प्रेयसीला ते जमणार नाही.
प्रेयसीला ते जमणार नाही. तशीही ती फक्त प्रेम करायला हवी.>> हे मेल लॉजिक ने एकदम परफेक्ट सिचुएशन आहे. त्या बायकांनी आपापल्या गरजा सांगायला व क्लेम करायला सुरू केले की गडबड होते. >>>>>>>>> मला नाही पटले हे. अन्या स्वार्थी आहे. >>>>>> सुलू , मी ते उपरोधिकपणे च बोलले आहे, अन्या स्वार्थी आहे हे तर पहील्यापासून दाखवलंय. म्हणून तर त्याला संजनानेही सोडून द्यायला हवे होते , हीही गेली , तीही गेली असं दाखवायला हवं होतं ना. पण मग मालिका कशी वाढणार?
आणि संजना खरंच वेडी झालीये, घर नवऱ्याला देऊन बसलीये म्हणून अन्याच्या घरात घुसायचा आटापिटा चाललाय आता , बाकी त्या दोघांमध्ये कितपत खरंच सो कॉल्ड प्रेम उरलंय , शंकाच आहे. अन्याला वेळीच लाथाडलं असतं तर स्वत:च्या घरात एकटी सुखी असती आज.
बाहेर टू बी एच के घए घेऊन
बाहेर टू बी एच के घए घेऊन रहावं सरळ...........संजना ही खुश आणि घरचेही....... हे अन्या म्हणाला संजनाला पण तिलाच समृध्दी मध्येच रहायचंय.
तिलाच समृध्दी मध्येच रहायचंय.
तिलाच समृध्दी मध्येच रहायचंय.>> बाहेरचे पात्र! बाहेरुन जिन्याला पर्याय नाही.
खास खंग्री म्युझिकसाठी कालचा
खास खंग्री म्युझिकसाठी कालचा रिपीट एपिसोड बघतेय..... भारी मनोरंजन चालू आहे.... आणि माझं लक्ष संवादापेक्षा संगीतावरच जास्त आहे. क्रेडिट गोज टू अमा।।।
मस्त समीक्षण असतं रोजच.
अमा, मस्त लिहिताय. मी एकही
अमा, मस्त लिहिताय. मी एकही एपिसोड बघितला नाहीये आणि बहुधा बघणारही नाही. पण वाचायला मजा येतेय. विशेषतः खंग्री म्युझिकवाला चहा पिऊन आला वगैरे
) तिथे अजूनही काही जणांचा असाच प्रकार होता.
दोन लग्नं हा प्रकार तसा दुर्मिळ नसतो काही भागात. आता मी गावाचं नाव लिहीत नाही, पण माझा नवरा आमच्या लग्नाच्या आधी एका ठिकाणी नोकरी करायचा तेव्हा तिथल्या त्याच्या घरमालकांच्या दोन बायका आहेत हे त्याला कळलं तेव्हा त्याला धक्काच बसला, पण घरमालक एकदम कूल होते सांगताना. (तिकडच्या घरात दुसऱ्या वहिनी असतात, घरभाडं इथल्याच वहिनींना द्यायचं वगैरे काही तरी म्हणाले होते. चेहऱ्यावरची रेषा न हलवता
दोन लग्नं हा प्रकार तसा
दोन लग्नं हा प्रकार तसा दुर्मिळ नसतो काही भागात. आता मी गावाचं नाव लिहीत नाही>>> गावाचे सोडाच, इथे नवी मुंबईत आमचे अनेक नातेवाईक आहेत असे दोन लग्न वाले. थाटामाटाने अरेंजमॅरेज करून आणलेली बायको बंगल्यात आणि प्रेमाची मंदिरात लग्न केलेली बायको फ्लॅटमध्ये. त्यांची आताची पिढी पण continue करतेय द्विभार्या पद्धत
आणि कालच्या भागात निलिमा अशी
आणि कालच्या भागात निलिमा अशी ढॅंsssग करून अविनाशच्या मागून आली , त्या सीन ला खूप हसलेय
. तिकडच्या सेटवरून पटकन साडी बदलून पळत आली वाटतं.
अमा, तुमच्या या खांग्रि मॅन
अमा, तुमच्या या खांग्रि मॅन ला एकदा बघितलेच पाहिजे...
खंग्री मॅन पुढील प्रसंगांची कल्पना देत आहे
खंग्री इज इन फुल कंट्रोल ...वगैरे वाक्यांनी खूप हसू येते आहे....
अनुपमाचे काही एपिसोड्स
अनुपमाचे काही एपिसोड्स इतक्यातच पाहिले , अगदी त्याच वाटेने चालले आहे इथेही सगळे !
अनुपमा मधे लग्नं आणि लग्नातून दुल्हा पळून जाणे प्रकरण जास्त ड्रामॅटिक करून रंगवले होते, दुल्हन स्वतःच स्वतःला हळद लावणे, मेन्दी फिसकटायचा ड्रामा, दुसर्या बायकोचे लग्नासाठी इगोइस्टिक अणि डेस्परेट होणे, तिने सेक्शुअल हरासमेन्टची कंप्लेन्ट करीन धमकी देणे इ. मधे ५-६ एपिसोड रंगले होते !
इथे त्यामानानी थकलेला अन्या लवकर परतूनी आला
अनुपामा सारखेच सगळ होणार असेल तर अरु इथेच कायमची आणि नेक्स्ट चॅल्टर्स : २ बायका फजिती ऐका !
(No subject)
सुलू , मी ते उपरोधिकपणे च
सुलू , मी ते उपरोधिकपणे च बोलले आहे, अन्या स्वार्थी आहे हे तर पहील्यापासून दाखवलंय. म्हणून तर त्याला संजनानेही सोडून द्यायला हवे होते , हीही गेली , तीही गेली असं दाखवायला हवं होतं ना. पण मग मालिका कशी वाढणार?
आणि संजना खरंच वेडी झालीये, घर नवऱ्याला देऊन बसलीये म्हणून अन्याच्या घरात घुसायचा आटापिटा चाललाय आता , बाकी त्या दोघांमध्ये कितपत खरंच सो कॉल्ड प्रेम उरलंय , शंकाच आहे. अन्याला वेळीच लाथाडलं असतं तर स्वत:च्या घरात एकटी सुखी असती आज. >>>>>>>>> ++++++++१११११११११११
आता खंग्री मॅन ने बासरी वाल्याला अक्षता देउन बोलावले आहे
तिघांमध्ये अरु बेस्ट आहे अॅक्टिंग मध्ये
ते च तर अन्याचे स्वार्थी अस णे जस्टिफाय केले जाते पण संजना किंवा अरू आता माझे मी बघते मला हे हवे आहे कि काँफ्लिक्ट होते. >>>>>>>> सहमत. पण अरुने ते सतत उसासून, मान वर करुन बोलणे थाम्बवले पाहिजे. मला सन्जनाचीही अॅक्टिंग आवडते.
बाकी अमा, मस्त चिरफाड करता तुम्ही.
मला वाट ले होते अरूला क्यान्सर झाला >>>>>>>>>> हे अनुपमा मध्ये दाखवल होत. तिला ओवरीज कॅन्सर झाला होता. अनुपमा मरणार अशीच हवा केली होती.
अनुपामा सारखेच सगळ होणार असेल तर अरु इथेच कायमची आणि नेक्स्ट चॅल्टर्स : २ बायका फजिती ऐका ! >>>>>>>> आता अनुपमा मध्ये तिच्या कॉलेजच्या मित्राची एण्ट्री होणार आहे. गौरव खन्ना असणार आहे.
जरा एक विवाहित स्त्री अफेअर करतेय, नवरा घर सांभाळतो असं का नाही दाखवत? >>>>>>>>> दाखवलय ना. ह्याच सिरीयल मध्येच. सन्जना विवाहित आहेच की. अनिरुद्दचा भाऊ अविनाश घरही सांभाळतो आणि कामालाही जातो. निलिमाला काहीच येत नाही. 'जिवलगा' मधली काव्या आठवा.
'जिवलगा' मधली काव्या आठवा.>>
'जिवलगा' मधली काव्या आठवा.>> ती छान होती दिसायला व ड्रेस सुपर.
अरुंधती आणि संजना यांनी
अरुंधती आणि संजना यांनी भूमिका एक्स्चेंज केल्या.
कांचन आजारी पडून अरुंधती तिच्यासाठी इथे राहते की काय?
----------
यांच्या बंगल्यात डायनिंग रूम का नाही? सगळ्यांना बसल्याजागी खायचं आणून देतात. जेवतानाचा सीन कधी दाखवलाय का?
या घरात पाच लग्न - घटस्फोट
या घरात पाच लग्न - घटस्फोट आहेत. भडक करायला भरपूर वाव आहे.
शुभप्रभात:
शुभप्रभात:
कालच्या द्वार क्रॉस सीन ने सुरुवात होते. मोठा संवाद आहे.
अन्या विचारतो तू निघालीस!!!
सं अन्याचा हात हातात घेउन तिला धन्यवाद देते. मी चुकले अशी कबुली देते मी रागाच्या भरात बोलले म्हणते. अरु ला तू इथे कधीही येउ शकतेस अशी परवानगी देते. अरू त्यांना शुभेच्छा देते. व निघते.
दारापाशी अन्या आत जायला निघते तर सं थांबवते व नीलिमाला हाक मारते. नीलिमा उंबरट्यावर माप ठेवते. नीलिमाला एकदम देशमुखांच्या सुनांची रीत सापड्ते. खंग्री मॅन इज इन चार्ज. आता आजी प्रवेश. तिला थांबवते आत यायचे नाही संजना म्हणाते तुम्ही मला आड वू शकत नाहीस.
तुम्ही पोलीस आणणार म्हणलात. आई एकेक रागिट आवर्तने संवाद करत असते तर तिला चक्कर येते. अन्या आत धाव्तो अभी व अरू पण धावतत. खंग्री वरून एकदम इंडिअन म्युझीक. ते ही खंग्री चा क्लायमॅक्स व मग इम्डिअन म्युझीकचा क्लायमॅक्क्ष झांजा ढोल वगैरे दोघे एकम्द एक दिलाने संगीत देत आहेत. अरू मापटे पाडून परत घरात येण्याचा व संजना बघण्याचा सीन बघून अनेक टाकलेल्या पहिल्या बायकांनी डोळ्याला पदर लावला असेल.
कट टू शांत म्युझीक म्हातारी बेड वर. मैने बोला था नं उस का बीपी शूट हो गया था. व हार्ट अॅटॅक चा पण चान्स आहे. गांगल डॉक्ट्र अॅम्ब्युलन्स मागवतत. अप्पा गांगल ला विचारतात कांचन बरी होईल ना. आप्पांचे अवसान एकदम जाते. उसासे क्वीन अश्रू पुसत धीर देते आई बर्या होतील.
अन्या म्हणतो पैशाची काळ जी करू नका. अप्पा अन्न्या ची कॉलर पकडून म्हणतो अरे मला पैशाची काळजी नाही मी हात जोडतो का आमच्या जिवावर उठला आहेस. तुला जी काय थेर करायचीत ती आमच्या समोर नको. आम्हाला जगू दे. अवि पुरे म्हणतो. अप्पा रडतात. आजीला हॉस्पिटल ला ट्रान्सफर करतात. अरु पण जाते. संजना व अन्या बघत राहतात.
अन्या सं बेडरूम मध्ये आहेत अन्या चिडला आहे. त्याल येउ नकोस म्हणतात.. तमाशे झाले पियानो व अंतर्गत भांडणाचे संगीत दिले आहे.
सं म्हणते मी ओव्हर रिअॅक्ट झाले त्या बर्या होतील. तर अन्या अजून चिडतो. आईला पोलिसात जाण्याची धमकी दिलीस!! जेल मध्ये टाकणार
का अशी बड बड केलीस. अन्या जाब विचारतो. संजना रागाच्या भरात मी बोल्ले असे सांगते.
अपमान झाला तर बोंब मारू नकोस. असे अन्या सांगतो. अरु कायम गप्प बसायची आईचा स्वभाव तिला माहीत आहे. सं म्हणते मी का गप्प बसू.
बेसिक सि विल पण वागत नाहीत घरचे लोक तर अन्या म्हणतो तू तरी सिव्हील वागतेस का?! माय फॅमिली इज फर्स्ट हे तू विसरू नकोस.
तुला कायम राडॅ घालायचेच असतात. म्हणून निघून जातो. इस बेडरूम को अब झगडा भी देखना पडा.....
शान्त खंग्री म्युझीक संतूर चे स्व र आहेत.
मंडळी थकून घरी येतात. यश चक्क पाणी आणून देतो. अरू लगेच उसासे प्लस आई ग. नीलीमा आई क्श्या आहेत विचारते. अप्पा नीलिमाला चहा करायला सांगतात. संजनाला नको म्हणतात. अप्पा अन्याशी बोलत नाही.त मग तो अरू ला विचारतो. त्यांना हार्ट अॅटॅक येउ शकला असता असे अरू सांगते व दोन उसासे. व थँक्यु प्लस उसासे.
आप्पा निली ला तू माप का ठेवलेस विचारतात. नीलीमा रीती रिवाज पट्टी परत उगाळाते. अवि नीलिमाला गप्प बसवतो. व अभी फाइल घ्यायला आलेला असतो त्याला अरू म्हणते मी पटकन खिचडी टाकते. तुला डबा देते. अभी पण शांत राहायला सांगतो सगळ्यांना
अभी सीरीअल न्यायाने लगेच नको म्हणतो डब्याला.
अवि व अरू खिचडी टाकत गप्पा मारतात हा सीन छान आहे. अगदी सहज सुरेख कामे केली आहेत. एकदम घरगुती फील्स.
अरु लगेच तुम्ही किती कराल. उसासे टा कते. डाळ तांद ळ भिजवून घेतात पण फोडणीस टाकत नाहीत. शांत बास्री पियानो सतार संगीत आहे.
संजना टपकते व काहीतरी वाद परत काढायला बघते. पण अवि तिला मॅडम म्हणतो व नीट बोला म्हण तो. अरु तिला आता प्लीज शब्दा शब्दाला वाद काढू नकोस प्लीज जा म्हणते. दिवसाच्या तमाश्याचा च आईंना त्रास झाला. आईला स्म्जनाच्या बोलण्याचा त्रास झालेला आहे.
सस्पेन्स फुल खंग्री संगीत. तुम्ही वाइटच वागता असे संजना म्हण ते. मला पण सगळ्यांची काळजी आहे असे संजना म्हणते.
पण ते खंग्री मॅन ला पटत नाही. अवि अरूला पण बाहेर पाठिवतो.
मग अप्पा बेडरूम मध्ये मी कांचन ला घेउन जातोच फिरायला म्हणतो. यश त्याला पीटर पीटर करून तुम्ही बाहेर फिरायला तिला घेउन जा
म्हण तो अप्पा हताश झालेले आहेत. आता आमच्या वर मुलीची जबाबदारी आहे असे म्हणतात.
आमची अजून मुक्तता झालेली नाही.
अरू ला सासूची आठवण येते हा शॉट आहे. अल्बम वरून हात फिरवणे, अश्रु पात. ससूच्या आठवणीने गहिव रून येणे असे अनैसर्गिक प्रकार दाखवले आहेत. अरू नक्की सफर्स फ्रॉम होस्टेज काँप्लेक्स. अपहरण कर्त्यावरच प्रेम बसले आहे तिचे २५ वर्शात.
प्रोमो: मी सर्व आईंना काय काय करून घालीन म्हणते अरू. तर मोलकरीण पण त्यासठी तुम्ही इथे राहायला हवे म्हणते!!! यक्ष प्रश्न!!!
आता अन्या दोन्ही घरचा पाव्हणा उपाशी. नाट्य
ससूच्या आठवणीने गहिव रून येणे
ससूच्या आठवणीने गहिव रून येणे असे अनैसर्गिक प्रकार दाखवले आहेत. अरू नक्की सफर्स फ्रॉम होस्टेज काँप्लेक्स. अपहरण कर्त्यावरच प्रेम बसले आहे तिचे २५ वर्शात. >> या वाक्यांसाठि तुम्हाला १०० बदाम...
अमा..
अमा..
सासूच्या आठवणीने गहिवरून येणे असे अनैसर्गिक प्रकार दाखवले आहेत. अरू नक्की सफर्स फ्रॉम होस्टेज काँप्लेक्स.....या वाक्यासाठी माझ्याकडूनही तुम्हाला एक पाव भाजी आणि मँगो मस्तानी!
Stockholm Syndrome म्हणतात ना त्याला...?
गेले काही दिवस या धाग्यात खुप
गेले काही दिवस या धाग्यात खुप कमेंट दिसायच्या म्हणुन कालपासुन वाचायला सुरु केले...
अमा , तुम्ही रॉक्स..... मी अजिबात ही सिरीअल बघत नाही पण ऐकून माहिती आहे.
जी काही अशक्य पिसं काढलीत...मजा आली वाचुन...
खंग्री मॅन, संतुर, पियानो, व्हायोलिन...काय न काय....सासूच्या आठवणीने गहिवरून येणे असे अनैसर्गिक प्रकार ..हा हा हा...
@अमा , त्या झी मराठी च्या "येउ तशी कशी मी.." वर का अन्याय...तिकडे पण फिरकत जा की अधे मधे...
संजनाला अनिरूद्ध बरोबर पाहील
संजनाला अनिरूद्ध बरोबर पाहील की लंगूर के हाथ में अंगूर
ही म्हण आठवते
लेकिन अंगार नही देखा।
लेकिन अंगार नही देखा।
मला पण सगळ्यांची काळजी आहे
मला पण सगळ्यांची काळजी आहे असे संजना म्हणते.
पण ते खंग्री मॅन ला पटत नाही.
अमा रॉक्स.
मी आधी इथे वाचते आणि मग घरी जाऊन एपिसोड बघते. अमांच्या या षटकारांमुळे सिरियस मालिका पण कॉमेडी वाटू लागली आहे. पार्श्वसंगीत तर मुद्दाम ऐकले जात आहे.
अमा , भारी लिहिलय.
अमा , भारी लिहिलय.
अपहरण कर्त्यावरच प्रेम बसलंय >> हसून हसून मेले ...
Pages