सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

शी टुकार मालिका. तितकेच भिकार पटकथालेखन आणि तो बुटक्या चार फूटी उका व मुब( ओठातल्या ओठ बोलणारी).
मुब काही कथांमध्येच शोभते पण नेहमी, पेठी( विशिष्ट शहर) ताई लूक घेवून वावरते.
तो फ्लॅशबॅक प्रकारात, काय्च्याकाय अभिनय, ते कपडे( भयाण ट्युनिक) मग लेगिग्ज. अवतार भासते. त्या वय्यातील वाटत सुद्धा नाही.
मग, घरातील एकच समंजस व्यक्ति म्हणून, मुब काम करणार, सर्वांना सांभाळणार.ब्रेकाअप झाला, तेव्हापासून जो मूग गिळला, त्यावर हि अख्खी मालिका चालणार. आणि, मग मुब बोलणार, १५ वर्षाने कि , ती तिचे प्रेम विसरली नाही....
टिपिकल शॉट्स... पावसात भिजणं, योगायोगाने भेटणं... अचाट...
अग्दी अचाट, मनुचे बेजबाबदारपणे गरोदर होणे... लहान वय सुद्धा नाही की प्रतिबंध घेवून करणारी पिढी... मग अश्रू ढाळणं..
आणि काहीच हातात उरलं नाही सारखं लग्नाचा विचार...

अरे काय एकेक सिरियली.
उका मुब स्टोरी वाचुन माझ्या डोक्यात रंगदे तु मोहे गेरूआ वाजतं

अमा हाहाहा. भारी लिहीता.

सुहिता थत्तेंच्या कानातले झुमके किंवा जे काय आहे ते लक्षात राहिलं. फॅशन पोलिसांचं काय म्हणणं आहे त्यावर? >>> मी फॅशन पोलिस वगैरे नाही, मला खरंतर फार कळत नाही पण मला ते झुमके त्यांना शोभत नाही असं वाटलं. हे लिहायचं होतं दोन दिवस राहून गेलं. समहाऊ मला दुसरीकडे माझ्या भाचीला साडीवर रींगा दिल्यात, तेही आवडलं नाहीये. त्यामुळे मलाच काही आवडत नाही की काय असं वाटत रहातं.

आज मिरेच्या आईने आणि भावाने मल्हारला जे धारेवर धरलं ते बघून रागच आला, जशी काही यांची मनू लहान बाळच आहे. मिरेचे बाबा तर म्हणाले स्पष्ट की लग्न झाल्यावर मनू काही वर्ष तरी काही करणार नाही, किती आत्मविश्वास स्वतःच्या मुलीबद्दल आणि त्या मुलाकडून किती अपेक्षा यांच्या कर्तृत्व वगैरे. एव्हडीच जर पडलीये तर कशाला लग्न लावून देताहेत त्या मुलाबरोबर, स्वतःच पोसायचं ना ते मनू बाळ आणि बाळाचं होणारं बाळ.
निखिलची आई म्हणून स्मिता सरवदे Uhoh ती जास्तीत जास्त त्याची मोठी बहीण वाटते, नशीब ती त्याची आजी नाही दाखवली. निखिलची आई एव्हडी प्रगत विचारांची आणि बिनधास्त मग निखिल का असा बुळ्या. आदी मीराला ऐकवणार आहे तिच्या तुसड्या बोलण्याबद्दल जे बरोबरच आहे. आदीची आई पण मीराला हडळ म्हणणार आहे Biggrin

सुहिताना दिलेले झुमके त्याच्या वयाला आणि भुमिकेला शोभत नाहित, मानबा सारख्या तद्दन भिकार सिरियल मधे काम करुन सगळेच कलाकर अती परिचयात अवद्या टाइप झालेत.
या सिरियलची लेखिका रोहिणि निनावे असल्याने टिपिकल वळण घेवुन त्याची वाटच लागणार अस दिसतय एकदरित!
सौरभ मनुशी बोलतो इतक्या साध्या प्रसन्गात बादल्याच्या बादल्या बॅकग्राउन्ड म्युझिक ओतलय्,त्याच काय नक्की प्रयोजन तेच कळल नाही.

https://www.youtube.com/watch?v=JiVwVUZXShY

कोणी हि सिरियल बघता का? आत्ताच सुरु झाली आहे. ह्यात बरेच मराठी कलाकार आहेत. अश्वीनी ह्यात सुद्दा कजाग दाखवलीये.

मला तर ही सिरियल कोणे एके काळी झी हिंदी वर असलेल्या "हिटलर दिदी" ची मराठी व्हर्जन वाटते आहे. तेच अन तसेच स्टारकास्ट आहेत मुब च्या घरी. मराठीपणा ओतुन हिटलर दिदीची कॉपी केल्यासारखं वाटतंय. जर हे खरेच हिटलर दिदी वरून कॉपी केलेलं असेल तर पुढे असं काहीतरी होईल :
- हिटलर दिदी कडून कमावलेल्या पैशांवरून भाऊ-वहिनी मजेत संसार करतील.
- आई-वडील ह्यां-वाँ करून आयुष्य आरामात पुढे रेटतील.
- उका मुब साठी खस्ता काढत तिच्या मागे शक्य तेवढा लळत लोंबत जाईल
- कुमारी माताचं वेळेत लग्न लाऊन देण्यासाठी मुब अन उका खुप प्रयत्न करतील अन एकदाचं शुभमंगल झालं की तो ट्रॅक संपून दुसरं कुणाचं काही धुणं धुण्यासाठी झगडात बसतील.
- सगळ्यांचं उणं-दुणं निस्तरल्यावर जेव्हा मुब अन उकाला शांत वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यात लग्नाचं काहीतरी ठरेल.. मग तेव्हा मुब ला काहीतरी असाध्य रोग वगैरे.... त्यातुन बाहेर पडेपर्यंत प्रेक्षकांना दु:खाचे कड.
- शेवटी आपल्याच हाताने विस्कटवलेलं सगळं आपल्याच हाताने ठिकठाक करून राम राम.

निखिल कोण>>>>>>>> मुक्ता बर्वे चा मित्र दाखवलाय,त्याचं एकतर्फी प्रेम(?) असतं तिच्यावर

अन्जु तुझी भाची कोण गं? >>> इथे नाहीये ग, दुसरीकडे ती नायिकेची आई दाखवली आहे आणि साडीवर रींगा घालतेय.

मला तर राजन भिसेचं अफेअर दाखवतील असं वाटतंय, माहीती नाही का ते.

अश्वीनी ह्यात सुद्दा कजाग दाखवलीये.>>> दर १ मिनटाने कूरघोड्या करणारी नणंद दाखवलीये. अत्यंत फालतू रोल.

तिने फक्त मा न बा मधे सकारात्मक रोल केलेला, तिच्या पहील्या सिरीयलमधे अशीच होती ती, स्टार प्रवाहवर होती.

राजन भिसे कोण?

मिनटाने कूरघोड्या करणारी नणंद>>>>> भावजय हो. मुब आणि तिची रडकी बहीण नणंदा आहेत.

ओह! आणि त्याच्या आईची भूमिका कोण करतं?
मल्हारचे आई बाबा कोण आहेत?

मीराचे बाबा तिचा मोठा भाऊ वाटतात अगदी!

युट्युबवर बरेच उशिरा येतात भाग. आत्ता शेवटचा जो आहे त्यात नायिकेच्या आईने बोबडे रागवत फार वेळ घेतला आपला.
मल्हारची माता जी दाखवलीये तिला क्राईम पट्रोलमधे इंस्पेक्टर म्हणून पाहिली होती व त्यात ती मला आवडली. छान करते तो रोल. (नावे माहिती नाहीत व लक्षात पण रहात नाहीत)
नायकाचे पिताजी पडद्यावर आले की मी मालिका पळवते पुढे.

त्याच्या आईची भूमिका कोण करतं? >>> उमा सहस्त्रबुद्धे आहेत बहुतेक त्या.

मल्हारचे आई बाबा कोण आहेत? >>> मिहिर राजदा आणि समिधा गुरु.

मिनटाने कूरघोड्या करणारी नणंद>>>>> भावजय हो. मुब आणि तिची रडकी बहीण नणंदा आहेत.

मराठी नाही हो. हिन्दी सिरियलमध्ये दाखवलीये ती नणंद:

https://www.youtube.com/watch?v=JiVwVUZXShY

मल्हारची माता जी दाखवलीये तिला क्राईम पट्रोलमधे इंस्पेक्टर म्हणून पाहिली होती व त्यात ती मला आवडली >>>>>>>>>>> समिधा गुरु. अभिजीत गुरु म्हण़जे केडयाची खरी बायको.

मराठी नाही हो. हिन्दी सिरियलमध्ये दाखवलीये ती नणंद>>>>> oh ok! सॉरी! अभ्यास कमी आहे या क्षेत्रात Lol

मला तर राजन भिसेचं अफेअर दाखवतील असं वाटतंय>>>> निखिलच्या आईशी? Lol

(इथे फार लिहायला नको त्या तुपारे सारख्या इथूनच कथानकाच्या आयडिया घेऊन पाणी घालून पकवतील आपल्यालाच Lol )

अंजु, अंजु, अंजु, तू सिरीयल लेखिका का नाही झालीस? तुझा अंदाज बरोबर असेल असं वाटतं आहे कारण आत्ता youtube वर 48 व्या भागात काय घडणार याची झलक बघितली त्यात रा भि एका साड्यांच्या दुकानात साड्या घेत आहेत आणि नेमकं उका आणि मुब पण तिथे साडी खरेदी करण्यासाठी आले आहेत (बहुदा ती रडकी मनु आता हसरी मनु होतेय लवकरच Lol ) अस काही तरी दाखवलं! वडिलांना तिथे बघून आदिराज आश्चर्यचकित होतो वगैरे! (48 वा भाग भारतात दाखवून झाला का? मी youtube वर मधून मधून आदळणारे भाग बघते आहे फक्त)

केड्या कोण? >>>>>>>> तुम्हाला मानबाचा केडया माहित नाही? गॅरीचा पान्चट मित्र केडी म्हणजे अभिजित गुरु.

अंजु, अंजु, अंजु, तू सिरीयल लेखिका का नाही झालीस? तुझा अंदाज बरोबर असेल असं वाटतं आहे >>>>>>>>> हे अस तुपारेच्या वेळी सुद्दा झाल होत. माबोच्या धाग्यावरच्या आयडियाज चोरत होते. इथे कुणीतरी ' विक्रान्त शेवटी आत्महत्या करेल' अस लिहिल होत ते शेवटी खर ठरल.

वत्सला मला आजचा भाग परवा बघायला मिळतो.

मला त्या बाबांचा संशय का येतोय कारण ते सारखे चॅटिंग करत मी मीटिंग मध्ये बिझी आहे सांगत राहतात आणि हल्ली सगळ्या सिरियलवाल्याना अफेअर वगैरे angle दाखवायला आवडतो म्हणून डाऊट येतोय.

अजून मांजर, हडळ भाग बघायचा आहे माझा. पण मला तो प्रोमो खटकला, मांजर एकवेळ ठीक पण हडळ वगैरे अति नाही का, हा शब्दप्रयोग ती घरी वापरते तेव्हाही खटकतो मला. बरं कोणी डॉक्टरांसमोर अस सांगणे योग्य आहे का, तिथे तिने इतकं पर्सनल सांगणे चुकीचे आहे. सांगायचे होतं तर चांगल्या शब्दात सांगू शकली असती.

तो आदि मीराला सध्या जास्त भाव देत नाही आणि तिची वक्तव्य तिच्यावर उलटवतो ते बघायला मजा येते.

सुलु८२, मानबा नाही पाहिलं कधी. मराठी मालिका नाही पहात खूप वर्षापासुन. ही पण युट्युबवर आहे म्हणून जरा पाहिली व हॉटस्टारवर १-२ डोकावते.

Pages