सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

मलाही आवडत नाहिये. मुक्ता, उमेश कामत आवडतात तरीही. आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार म्हणा. मुळात दोघे मोठे डॉक्टर, पोरं एम्बीए करणारी , तरी घरी सांगायची हिंमत नाही म्हणजे कठीण. एकुण यातले काही आवडेल असं वाटत नाही.

तो उमेश हॉटेलमध्ये योग्य स्टँड घेतो. तो मित्र कशाला मध्ये सल्ले द्यायला. मुक्ता ग्रेसफुल दिसत होती तिथे आणि उमेशचा अभिनय आवडला.

मी पण सध्या बघते आहे कारण youtube वर Sony Marathi रोज एक भाग सोडते आहे.
ओके ओके आहे मालिका. अंजु म्हणाली तसं त्यांचं लग्न लावून मोकळं करता येईल पण मराठी शिरेल आहे! घास वळवूनच खाणार ते!

उमेश कामत बरा वाटतोय पण मु ब! महाबोर आहे ती! एकूणच मला तिचा अभिनय तोच तो वाटतो.

>>आणि उमेश किती वेळा तो एकच शर्ट घालणारे आता , निळा चौकटीचा?
आधी डार्क नीळा होता, आता लाईट नीळा आहे. पांढर्‍या चौकटी exact सेम आहेत पण. दोन्ही रंग आवडले असतील, मग घेतले असतील बिचार्‍यानी Happy तेवढाच एक "आज काय घालू" हा डिसीजन थोडा सोपा केला त्यानी Proud

टुकार सीरीअल आहे एकदम. मुक्ता बर्वे वयस्कर दिसते. म्हणजे प्रेमाचा फ्लश वगैरे तिलाच काय मनूला पण शोभत नाही. मुक्ता मुंबई पुणे मुंबई चेच संवाद त्या च एक्स्प्रेशन्स. मनुचे पायजमे विनोदी आहेत. तो मानबा मधला जाडा गुजराथी अजून जाडा झाला आहे. राजन भिसे बिग नो नो.
ती आई पुणेरी बायका कश्या असतात असे इतर गावाकडील बायकांचे पूर्वग्रह शोधून बनवली आहे.

मुक्ताचा तो मी अडीच तास तुझी वाट बघत होते संवाद तर जाम विनोदी आहे. त्या वयाला शोभत नाही. ती विशीतली कुमारी माता पण
असे कधी बोलली नसेल.

उका हायली ओव्हर रेटेड व हाइप्ड बुटका माणूस व एक हाफ डिसेंट स्माइल. बाकी काये? आं
दोघे सर्व सोडून बंगलोर मध्ये जाउन राहु शकतात की. ह्यांना कसल्या ह्या वयात परवानग्या लागतात!!
मनूचे लफडे ट्रॅक बोगस आहे. मल्हार ला तर शेंबूड पुसायची पण अक्कल नाही असे दिसते.
त्याची आई एक ओढणी!!!

मनू मीराचे आईबाबा पुणेरी असतील अश्या लोकांच्या पूर्व्ग्रहातून बनलेले आहेत. व संवाद उगीच इंट लेक्चुअल.
मुलींना स्वाटंत्र्य दे णे वगैरे.

सुइता थट्टॅ प्लीज रिटायर. गो होम डू पुरन पोलीज प्लीज

अमांची पालखी आली की एकच हास्यकल्लोळ उठतो.... हसुन हसुन पुरेवाट Biggrin

सुइता थट्टॅ प्लीज रिटायर. गो होम डू पुरन पोलीज प्लीज>> चेरी ऑन द टॉप Rofl Rofl Rofl

उका मुब फॅन्स प्लीज लाइटली घ्या. पण त्यांची केमिस्ट्री आता खरंच शिळी भासते आहे. क्या करें . बासी बिर्यानी को तडका!!

दर 2 एपिसोड नंतर, फ्लॅशबॅक,
तू असं केलं ,असा वागलास दोषारोप
जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा शहाणे( डॉक्टर ) होते ना दोघे, मग तेव्हाच समोरासमोर बसून क्लिअर करायचं ना!

ब्रेकप झाला होता.. लग्न होऊन घटस्फॉट तर नव्हता ना झाला..? मग पॅचप करून घ्यायचं ना..! एवढं काय त्यात... थोडीच कोण्ता आंतरराष्ट्रीय करार मोडला...

मुक्ता आणि उमेश वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिका करणार नाहीत त्यामुळे ठराविक भागात संपेल >>> याच कारणासाठी आणि केवळ या दोघांसाठीच सध्या बघते आहे.

१०० एपिसोड्स - हे सोनी लिव अ‍ॅपवर डिफॉल्ट दिसतं बहुधा. Lol १०० च असतील याची शाश्वती नाही.

मल्हार आणि मनूत कोणतीही केमिस्ट्री नाही. जीवाची घालमेल म्हणजे डोळ्यात पाणी, इतकंच येतं दिग्दर्शकांना.

मल्हारची आई झालेली कोणे? किती तुपट चेहरा आणि गंडलेला मेक-अप आहे तिचा! Uhoh
सीनच्या सोयीनुसार तिचं डिझायनिंगचं इझल कुठेही ठेवलेलं दाखवतात.
मल्हारच्या घरचे बाकी सगळेच बोअर होतात, त्या घरातले सीन्ससुद्धा.

मराठी मालिकांमध्ये सीनच्या वेळेनुसार लायटिंग वगैरे करायची अजूनही पद्धत कशी नाही? मीराच्या आईला अ‍ॅडमिट करून आदिराज रात्री दीड वाजता घरी येतो, हे डायलॉग्जमधून सांगतात. पण घरात रानोमाळ दिवे, लखलखाट तसाच Uhoh

फार अपेक्षा ठेवता तुम्ही Happy

ती मनु माझं बाळ माझं बाळ करत नाचत आहे
नंतर बाळाची शु शी, दुपटी, लंगोट, ओकी करताना टेकीला येईल तेव्हा कळेल
तो ठोंब्या मल्हार काही कामाचा नाही
त्याला चहा सुद्धा करता येत असेल असं वाटत नाही
तो साथ देईल म्हणे, नुसते सोबत असणे म्हणजे साथ देणे नसते ओ

ती मनु माझं बाळ माझं बाळ करत नाचत आहे>>> आणि तिची बहीण तिला माझं बाळ माझं बाळ करते सारखी Lol , बाळांना असले धंदे करायची अक्कल कशी काय मग? एवढाच पुळका आहे तर तूच सांभाळ बाई बाळाला अन् बाळाच्या बाळाला.

मल्हार फारच ठोंब्या आहे खरंच . एकदाही तिच्यासाठी स्वत:हून concern दाखवताना दिसला नाही की तिला भेटायला येताना दिसला नाही ,, आणि हे बाळ सांगतंय भावाला की हो तो सिरीयस आहे माझ्यासाठी.

अमा....एकसे एक हाणलेत ओ...कसं गार गार वाटतंय.

मनुला गंमत गंमत म्हणून बाळ हवंय असं वाटतं. मुबनं तिला चांगलं कानफाटवून सिध्धं करायला हवं होतं. मल्हारला बाळ म्हणजे भातुकलीतलं वाटत असावं.

हे सर्व एक मेकांना बाळा बाळा म्हणतात ते फार डोक्यात जाते आहे. हिला इतक्या सुप्पर उका बरोबर जम्वून घेता येत नाही आणि तो छपरी मित्र बरा चालतो?! कुच्चभी.

पैसे कमवून आणते पण घरातली सर्व कामे आईच करते अजून हिची पस्तिशी आली तरी. हे काय? मनु चे ते तसे, भावाचा संसार इचित्रच आहे मग घरात जबाबदार कोण आहे नक्की? हे लोक खरे अ‍ॅडल्ट झाले आहेत का काय? ती भोचक वहिनी मुद्दाम बिनकामाची दाखव्ली आहे कारण मुब व मनु छान दिसाव्या म्हणून पण नणंदेचे इतके वर्चस्व मी तर खपवूनच घेणार् नाही. मी पण नावाची अश्विनी आहे.

आणि तिची बहीण तिला माझं बाळ माझं बाळ करते सारखी > हो खरय. ते बाळा बाळा म्हणणं अगदी आवडत नाही ( बाळाला त्याच्या पराक्रमामुळे बाळ होणारे तरी बाळा बाळा ! आणि वडिलांना बाळाचे प्रताप कळल्यावर आईला कळेपर्यंत पोटातल्या बाळाच्या बाबा ची चौकशीही नाही केली त्यांनी ! अजबच

मल्हारची आई झालेली कोणे?>>>> समिधा गुरू.महाबोर आहे ती. त्या टूकार नवरयाची बायको मधील केडी (अभिजीत गुरु) ची खरी बायको.विविध मराठी मालिकांचा संवाद आणि पटकथालेखक.

कसली मरणाची सुमार मालिका आहे. मुक्ता आणि उमेश म्हणे सो कॉल्ड भारी अ‍ॅक्टर्स!!! काय ते संवाद आणि संवादफेक. एकापेक्षा एक बावळट आहेत सगळे. Angry

चला माझ्यासारखा विचार करणारे बरेच जण आहेत तर!!!

Contemporary विषय घेऊन किती तरी विषयांवर सुंदर मालिका करता येतील पण नाही मराठी मालिका त्यातून बाहेर येणार नाहीत! तेच ते pauses आणि तेच ते हावभाव!

मराठी मालिकाच नाही तर हिंदीही अशाच असाव्यात. आता खरंतर हिंदी आणि मराठी बघतच नाही पण मुक्ता बर्वे दिसली म्हणून बघायला चालू केली. घोर निराशा झाली.

मल्हारची आई झालेली कोणे?>>>> समिधा गुरू.महाबोर आहे ती. त्या टूकार नवरयाची बायको मधील केडी (अभिजीत गुरु) ची खरी बायको. > मला आवडते ती. आणि तिची आई झालेली छान काम करते. तिला चालता येत नसतं का

मराठी मालिकांमध्ये सीनच्या वेळेनुसार लायटिंग वगैरे करायची अजूनही पद्धत कशी नाही? मीराच्या आईला अ‍ॅडमिट करून आदिराज रात्री दीड वाजता घरी येतो, हे डायलॉग्जमधून सांगतात. पण घरात रानोमाळ दिवे, लखलखाट तसाच >> राजा राणी च जोडी मध्ये असे डिटेलिंग खूप दिसत. म्हणजे जर ब्रेक फास्ट चा सीन असेल तर मागच्या घड्याळात नऊ साडे नऊ वाजलेले दाखवतात. रात्री झोपताना बायका पांढऱ्या सुती साड्या नेसतात, केसांची पिन ,अंबाडा वैगेरे सोडून जरा नॉर्मल झोपतात. बघताना अश्या अनेक गोष्टी जाणवतात ती सिरियल बघताना.

मी या मालिकेचा पहिला एपिसोड अर्धा बघितला आणि लगेचच पुढे एकही एपिसोड न बघण्याचा निर्णय घेतला!

मराठी मालिकांमध्ये सीनच्या वेळेनुसार लायटिंग वगैरे करायची अजूनही पद्धत कशी नाही?>> पूर्वी ती हर्षदा खानविलकरची एक मालिका लागायची त्यात (संवादात) रात्रीचे बारा की एक वाजलेले असले तरी सगळ्या बायकांच्या साड्या, दागिने, केसात गजरे सगळं जिथल्या तिथे! त्याच की दुसऱ्या कुठल्या मालिकेत ते लक्षात नाही, पण बायको नवऱ्याला म्हणते, (बाळामुळे) मला दिवसभरात केसात कंगवा फिरवायलासुद्धा वेळ झालेला नाही. आणि प्रत्यक्षात मात्र हेअरस्टाईल मेकअप वगैरे टकाटक होता.

<<रात्री झोपताना बायका पांढऱ्या सुती साड्या नेसतात, केसांची पिन ,अंबाडा वैगेरे सोडून जरा नॉर्मल झोपतात. >> हे असं असेल तर चांगलं आहे. 'गुंतता हृदय हे' मध्येही असं दाखवायचे.

भाग ४४:

दोघे क्लिनिक मध्ये आहेत. स्विगी वरून मागावलेली पार्सले आली.

शाणी मुलगी मीरा बाबांना फोन करते. आई मनू कश्या आहेत जेवल्यात का झोपल्यात का विचारते. मला दीड तास लागेल अशे सांगते. मग वीअर्द काइंडा सॉर्टा नॉट अ डेट सुरू होते. उका सेम डार्क चौकडीचा शर्ट.

उका म्हणतो तू सर्वांची टेन्शन तुझा डोक्यावर घेउ नको. मी आहे निदान ह्या बाबतीत तरी. उद्या मी malhar बरोबर येतो म्हण्तो ती म्हणते मी सांगते केव्हा ये. दिवे जातात. हाउ रोमांटिक सिक्युरिटी मेणबत्त्या देते. ह्यांना पण एक स्विगी पार्सल दिले आहे उकाने.

मग फार्र्र्चच रोमांटिन डिनर डे ट सुरू होते. इथे अ‍ॅकॉर्डिअन सदृश्य नाँस्टाल्जिक संगीत मारले आहे. बाहेर पाउस व कँ ला डिनर.
उका तिला म्हणतो तू पूर्वी रोमांटिक होतीस आता ओढलेली दिसतेस( अंड र स्टेटमेंट ऑफ द सेंचुइरी!!!!) स्वतः ला हरवून टाकू नकोस हा बदल माझ्या मुळे झाला आहे त्याचे मला गिल्ट येतो.

तू का बदललीस तर मीरा म्हणते बदल झाला. तो अशी डुढाचार्य होउ नकोस म्हणतो मला तसे आवडत नाही. माझ्यामुळे तुझा स्वभाव असा झाला. तू तुझ्या जगण्यातला आनंद हिरावुन घेतला आहेस हा विचार मला खूप त्रास देतो. फुल ऑफ लाइफच रहा. ( डझ शी लुक डेड टू ञू?
प्रिझम्शस शॉर्टी!!)

मग अ‍ॅकोर्डिअन वाला एकदम अ‍ॅटेक करतो. व मीरा पहिल्यांदी गाजर हलवा बनवून घेउन येते तो फ्लॅश बॅक आहे. मीरा उशीर झाल्यावर सॉरी म्हनाटॅ. मला मेसेज का केला नाहीस मी तुला ते अन लिमिटेड मेसेज वाला प्लॅन टॉप अप करून दिला आहे असे हिडन पॅट्रार्की मेसेज उका बोलुन दाखवतो. तिथेच झापडायला हवा होता

मग हलव्याचे कौतूक !!! इतकेच.

मैने तुम्हारे लिहे गाजर का हलवा बनाया है असे उका म्हणतो पण हे वाक्य सिनेमात आई मुलाला म्हणते( कहना क्या चाहते हे सिरीअल वाले?!)
आता उका व मल्हार घरी जाणार आहेत. मल्हार पार्टीला कपड्यआंचे बजेट नाही तरी बरं आई डिझाइनर आहे . उरलेल्या तुकड्यां तून काही झबली टोपडी शिव की ग माय बोब्या साठी. तोच एक यलो जर्सी टाआईप टीशर्ट व तेच न एक्स्प्रेशन.

Pages