सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

सध्याच्या एपिसोड मध्ये मुक्ता बर्वे चा वॉर्डरोब बरा वाटतो आहे.. प्रोफ़ेशनल डॉक्टर सारखा... cotton plain कुर्ता अन स्टोल... आधिच्या भागात काय ते फुल फुलांचे डिज़ाइन असलेल्या हात भर ओढण्या...2007 2008 च्या सालातली fashion वाटत होती

हो ना, मराठी चांगलं नाव सुचलं नाही का, हे असं धेडगुजरी नाव द्यायची काय गरज होती.
मुक्ताचा कपडेपट आधीचा भयानक होता, खाली पेन्सिल पॅन्ट आणि वर फुलाफुलांची कुर्ती आणि ओढणी, धेडगुजरीच होता तो कपडेपट पण. आता जरा बरे कपडे दिलेत, तो लाल कुर्ता वगैरे.

बरसात शब्द आहे की मराठीत.

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली..... कुणी जाल का..

चांद भरली रात आहे प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे

मुक्ता आवडत असूनही ह्यात तिचा अभिनय consistent वाटत नाहीये. कधी ठीक काम करते कधी अगदीच नाटकी वाटते. एकूणच क्लोजअप्स फार आहेत. उमेश तर आवडतोच. पण पेशंटशी बोलणं, क्लिनिकमधला त्यांचा वावर ई. मधून दोघेही डॉक्टर असल्यासारखे वाटत नाहीत. :खीखी:

साडी विकणारा त्यादिवशी आई कुठे काय करते मध्ये होता, संजना आणि अन्याचे लग्न लावलं त्याने. बाकी साडी विकणारे कर्मचारी गणवेशात आणि हा एकटा वेगळा Happy शंभर भाग असतील तर विबासं वगैरे दाखवणार नाहीत. थोडया गमती जमती (त्यांच्या दृष्टीने), रुसवे फुगवे दाखवून दोन्ही बहिणी एकाच घरी नांदायला जातील एकदाच्या. मीराला आयुष्यभर बाळाची काळजी घेता येईल.

नकोच दाखवायला अफेअर वगैरे, उगाच फुटेज खातील. आधीच मनू मल्हार फुटेज घेतायेत. ते बाबा आईच्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायला म्हणून साडी घ्यायला आले असावेत.

वरती कुणीतरी लिहिलंय तसं - ते सारखं बाळा बाळा म्हटलेलं महान बोअर वाटतं Angry

अश्विनीचं पात्र उथळ वाटतं, पण ती कलाकार चांगलं काम करते. विशेषत: डोळ्यांतले बारीकसारीक हावभाव ती छान दाखवते.

(मी सोनि लिव अ‍ॅपवर वेळ मिळेल तेव्हा एखाद-दुसरा एपिसोड बघते, त्यामुळे मी मागे आहे अजून...) आदिराज, मीरा आणि अमोल हॉटेलमध्ये भेटतात, अमोल त्या दुबईच्या मुलाला निनावी फोन करतो, तिथे लेखक-दिग्दर्शकाला अमोलची स्टँड-अप कॉमेडियन म्हणून कला दाखवण्याची मोठी संधी होती .... एखाद्या चांगल्या इंग्रजी मालिकेने त्या सीनचं सोनं केलं असतं .... पण इथे तो सीन अगदीच सरधोपट, फ्लॅट गेला Uhoh

हो तो सीन अगदीच वाया घालवला आणि इतकं नाटकी बोलुनही समोरच्या पार्टीचा त्यावर विश्वास बसला. कुठल्याही सीनमध्ये मुक्ता आणि उमेशच हायलाईट व्हावेत म्हणून करतात की काय असं त्यांनाच ठाऊक. त्या निखिल, मीरा आणि आदीच्या हॉटेल प्रसंगी आदी त्या निखिलला वाट्टेल ते बोलतो, स्वतःच्या प्रॅक्टिसकडे लक्ष दे वगैरे आणि निखिलही ऐकून घेतो. खरंतर त्याला मीराने आणलेलं असतं. एक डॉक्टर म्हणून निखिल अजिबात स्मार्ट वाटत नाही की मुद्दाम त्याला तसं दाखवलंय उमेश उठून दिसावा म्हणून.

अश्विनीचं पात्र उथळ वाटतं, पण ती कलाकार चांगलं काम करते. विशेषत: डोळ्यांतले बारीकसारीक हावभाव ती छान दाखवते. >>> हो ती पहील्या मालिकेत पण छान करायची, जुई गडकरी नायिका असून हिची छाप पडायची. गडकरी सदा रडी होती त्यात.

मला एक माहिती हवी आहे. या सिरियलमध्ये सध्या मीरा किंवा ती आदीची बहीण, पायजमा टाइप पण उंचीला शॉर्ट (ज्याला पूर्वी आम्ही टांगेवाला म्हणायचो, माफ करा पण पटकन हाच शब्द आठवतो) म्हणजे पावलाच्या बरंच वर घालतात त्या प्रकाराचे नाव काय, सध्या ही fashion आहे का. मला फार ते इम्प्रेसिव वाटलं नाही.

मीरा छान दिसतेय हल्ली मात्र आणि चेहेऱ्याचा थोराडपणा कमी वाटतो.

बाकी सगळ्यांचे मेकअप चांगले असतात पण समिधाचा मेकअप का नीट करत नाहीत? Eye circles खूप दिसतात तिचे प्रत्येक फ्रेम मध्ये.

मला वाटलेलंच की आदीची आई काहीतरी अट घालणार. फक्त आदिचं लग्न झाल्याशिवाय नाही असं म्हणाली, उद्या म्हणेल मीराने आदिशी लग्न केलं तरच. मीरा आणि आदी खरंच अठराशे सत्तावन साली प्रेमात पडले होते असे वागतात, किती ते रडगाणं. मनू आणि मल्हारकडून शिका म्हणावं काहीतरी. आता निखिल रोज क्लीनिकमध्ये भेटल्यावर मीराला साक्षात्कार होईल.

आदि मीरा लग्न करतील, या दोघांचे व्हावं म्हणून. एका लग्नाची दुसरी गोष्टसारखं तात्पुरते काही दिवसांसाठी मग खरोखर प्रेमात पडतील, आताही आहेत एकमेकांच्या प्रेमात पण मीराला कबूल करायचं नाहीये. आदि छान करतो अभिनय, छोट्या छोट्या गोष्टीतही.

इतकं सरळ काही होणार नाही, आडवी गेलेली मांजर हीच अस समजेल आईला आणि शेवटी मनू मल्हार पळून जाऊन लग्न करतील की काय.

आदिच्या बाबान्च नक्कीच 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर' आहे. आज ते सारख 'माझी मह्त्त्वाची अपॉईण्ट आहे' वर जोर देत होते.

मनू मल्हारच्या घरी फक्त स्वयमपाक करायला जाईल वाटत. Lol आमच्या मुलीला स्वयमपाक उत्तम येतो हा, मनूची आई म्हणाली अस. तिच्या बाहेरच्या कामाचा काही उल्लेखच नाही.

आदीमायचा वाढदिवस रात्री 12 वाजता साजरा केला जातो तो एपिसोड बघितला आज. रात्री 12 वाजता पण आदिमाय कडक मेकअप एव्हढंच नव्हे तर पदराला पिन वगैरे लावून असते!!! Lol

हे असे बारकावे तपासण्याचे काम कोण करत मालिका/नाटक/सिनेमा तयार करताना? Assistant director का?

ह्यात मधूनच एक विनोदी संवाद असला की मागे पिपाणी वाजते. म्हणजे संवाद विनोदी आहे हे आड्य न्स च्या लक्षात येइल. आई च्या बर्थ डेच्या सीन मध्ये फॅमिली येते. मनूची ओळख करून दिली इथे खंग्री मॅन आहे. आदि चे डॉक्टर चौकशी करताना सर्वांना कमीत कमी शब्दात
पुट डाउन करतो आहे. असे लोक्स कायम आपल्याहून श्रीमंत व्यक्ती पुढे हांजी हांजी करतात. मुलींचे ड्रेस एकदम बोगस आहेत. घर बघून सर्व इंप्रेस होतात.

>>> मुक्ताचा कपडेपट आधीचा भयानक होता, खाली पेन्सिल पॅन्ट आणि वर फुलाफुलांची कुर्ती आणि ओढणी, धेडगुजरीच होता तो कपडेपट पण. <<<
एका लग्नाची दुसरी गोष्ट पासून, मुक्ताचा तो युनिफॉर्म बनला आहे. बेकार कॉम्बो असते.

आदीमायचा वाढदिवस रात्री 12 वाजता साजरा केला जातो तो एपिसोड बघितला आज. रात्री 12 वाजता पण आदिमाय कडक मेकअप एव्हढंच नव्हे तर पदराला पिन वगैरे लावून असते>>> होय ते मला हि कळलं नाहीय, एखादा गाऊन नसता का चालला ? इतकं अगदी चापून चोपून साडी पिन लावून आणि लिपस्टिक पण !!
आणि त्यानंतर ती म्हणते असा माझा वाढदिवस रात्री १२ वाजता कधी सेलिब्रेट केला नव्हता bla bla आता मला मस्त झोप लागेल .. पण त्या आधी हि ती मस्तच झोपलेली कि ..! २ दा हाका मारल्यावर उठली ..

आणि देवळाबाहेर असं टेबल टाकून डॉक्टर बसतात का ? येईल त्याला तपासायला ? उघड्यावर गोळ्या / औषधे मांडून ?
मला वाटतंय केवळ "देवळाबाहेर देव भेटला" या एका वाक्यासाठी तो सीन बनवला होता ,
कायच्याकाय!!

नशीब आदिबाबा सुटबुटात झोपत नाहीत. आदी स्त्रीरोगतज्ज्ञ असतो ना मग तो जनरल फिजिशिन सारखा टेबल मांडून कोणालाही औषधं देऊ शकतो Uhoh निखिलही बसणार काही दिवसांनी त्याच्या बाजूला मीराला इंप्रेस करायला.
मीराने सांगितले ना की मनू अभ्यासात हुशार आहे. बाहेर काय नोकरी नाही अजून आणि बाकी दिवे लावलेले इतक्यात नाही सांगणार.
मनू आणि मीरा दोघींचे ड्रेस गंडलेले होते. मनू तर फारच निस्तेज दिसत होती. अश्विनी नेहमीप्रमाणे झगमगत.
आदीच्या घरात बाहेरच्या चपला घालून आलेलं चालतं ई ई ई.

तेच कळत नाहीये, कुठल्या बेसीस वर हे मनू आणि मल्हारच्या लग्नाची बोलणी करणार आहेत, नो दोघांचे शिक्षण पूर्ण ना नोकरी ना मॅच्युरीटी.
ते आदीबाबा सगळ्यांचा अपमान करणार हे अति प्रचंड प्रेडीक्टेबल होतं, तरी त्या मानाने फार काही घालून पाडून बोलले नाहीत.

आदि मीरा लग्न करतील, या दोघांचे व्हावं म्हणून. एका लग्नाची दुसरी गोष्टसारखं तात्पुरते काही दिवसांसाठी मग खरोखर प्रेमात पडतील>>>>>>>

आणि हे फक्त नाटक आहे असे त्या निखिलला सांगून त्यालाही टांगून ठेवेल. तोही आपले आचरट प्रयत्न सोडणार नाही

घालून पाडून बोलण्याच्याही लायकीचे वाटले नसतील त्यांना देसाई. मल्हारची आई म्हणे हेच करायला जातोस का कॉलेजला, कोण कोणाला बोलतंय बघा Biggrin आई तसा मुलगा. मनू तर कधी दिसली नाही घरातली कामं करताना आणि घरकामच करायचं होतं तर शिक्षण कशाला घ्यायचं. मनू आता फॅशन डिझाईनर होणार, किती ती लाचारी.

आशुचॅम्प यांचा शेमबुड प्रतिसाद वाचला वाटते लेखिकेने Biggrin कानाला हात लावून माफी मागणे वगैरे निव्वळ फिल्मीपणा. आईला न विचारता आईस्क्रीम किंवा चॉकोलेट खाल्ल्यासारखे माफी मागत होते दोघे. प्रेम केलं तर त्यात माफी काय मागायची पण कमवायची बोंब आहे दोघांची तर हाजी हाजी करावीच लागणार मोठ्यांची.

बरंच काय काय घडलं की काय, मी अजून मीरा फॅमिली घरी आलीय आदीच्या इथपर्यंत बघितलं.

आदिच्या बाबान्च नक्कीच 'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर' आहे. आज ते सारख 'माझी मह्त्त्वाची अपॉईण्ट आहे' वर जोर देत होते. >>> हो ते सारखेच फोनवर माझी महत्वाची मिटींग आहे वगैरे सांगत बिझी असतात. त्यामुळे मला संशय येतोय, हाहाहा.

हो ते सारखेच फोनवर माझी महत्वाची मिटींग आहे वगैरे सांगत बिझी असतात. त्यामुळे मला संशय येतोय, हाहाहा. >>>>>>>> अगदी अगदी. बायकोच्या वाढदिवसाला सुद्दा थाम्बला नाही हा माणूस.

आदीमाय खरंच पांगळी आहे की पैसे जास्त झाल्यामुळे व्हील खुर्चीत बसून रोजंदारीवर नेमलेल्या मुलीकडून स्वतः ला हवं तिथं फिरवून घेत आहे हे कळत नाही. पांगळी असती तर एखादा गाऊन घालून बिना मेकप आणि विस्कटलेल्या अवतारात असती पण ती तशी न दिसता स्वच्छ केस धुवून एक अन् एक बट विंचरून विंचरून वेगळी सोडून, स्वच्छ धुतलेली, कांजी केलेली, इस्त्री केलेली साडी नेसून मस्तपैकी मेकप करून व्हील चेरवरून हवं तिथं फिरते.

Pages