आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, अशक्य भारी लिहिताय तुम्ही! या मालिकेचा टीआरपी वाढणार आहे. मी ही शिरेल बघत नव्हते पण इथले वाचून परवा अन्या घरातून निघून गेला आणि संजना तयार होऊन शोधतोय हा एपिसोड बघितला.
पार्श्वसंगीतावरची टिप्पणी आवडतेय. आधी कधी तिथे लक्ष दिले नव्हते. गेले 3-4 दिवस तुमचे रिव्ह्यू वाचून दिवसाची सुरुवात इतकी मस्त होतेय.

अमा, खूप हसवलंत. आज माझाच मूड जरा खंग्री झाला होता. ( पण पार्श्वसंगीत द्यायला नव्हतं कुणी Wink ) तुमच्या पोस्ट वाचून डोकं शांत व्हायला मदत झाली.

पूर्वी दोनचार बायका करत नव्हते असं नाही. पण ते फाटके नव्हते. प्रत्येकीला वेगळं घर आणि खर्चाला पैसे देणारे असत. . शेवटचा मोगल बहादूर जफर ६८. कितवी माहिती नाही पण शेवटची बायको वीशीच्या आतली.

मिलिंद गवळीचा चेहरा अजिबात हलत नाही. विशेषत: मूक reaction देताना. लग्नात हार घालताना, आईला बरं वाटतं नाही तेव्हा मख्ख चेहरा.
वाचिक अभिनय ठीक आहे.

पहिल्या बायकोला चालत असेल दुसरी आलेली तर बाकीचे राग करून काय होणार?
मध्यंतरी एका मराठी चित्रपटाची झलक पाहिली. अचानक पहिला प्रियकर जिवंत आहे हे कळते मग आता जो आहे त्याच्यावर प्रेम आहेच आणि याच्यावर पण प्रेम आहे. या दोघांबरोबर तिला संसार करायचा असतो.

परवा एक प्रोमो बघितला, त्या अरु कडून माप ओलांडले जाते संजना ऐवजी. मला तर वाटतं शेवटी सिरियलवाले अन्या आणि अरुला एकत्र आणणार. अरुने अजिबात अस होऊ देऊ नये.

अरू ला सासूची आठवण येते हा शॉट आहे. अल्बम वरून हात फिरवणे, अश्रु पात. ससूच्या आठवणीने गहिव रून येणे असे अनैसर्गिक प्रकार दाखवले आहेत. अरू नक्की सफर्स फ्रॉम होस्टेज काँप्लेक्स. अपहरण कर्त्यावरच प्रेम बसले आहे तिचे २५ वर्शात. >> अगदी अगदी. पुढचा एपिसोड नाही बघितला तरी चालेल.

तो अनुपमाचा नवीन प्रोमो काल बघितला, youtube वर बघायला मिळतात, तिथेच बघते. कॉलेज रीयुनियन मध्ये एक श्रीमंत मित्र येतो जो बहुतेक अनुपमा कॉलेजमध्ये असताना फिदा असतो तिच्यावर, तो त्या नायिकेपेक्षा खूप यंग दिसतो. त्या रीयुनियन मध्ये अनुपमाची मुलं, माजी नवरा त्याची आजी बायको कसे काय हजर काय माहिती.

असच सेम पुढे आई कुठे मध्ये दाखवतील, म्हणून लिहिलं इथे. कोणीतरी यंग दिसणारा श्रीमंत हीरो आणतील पुढे.

अन्जु,
तू सांगितल्यामुळे पाहिला प्रोमो, काय येडेपणा आहे कास्टिंग टिमचा , तो नवा हिरो तिचा एक्सक्लासमेट चक्क तिच्या मुलाच्या वयाचा दिसतोय !

तू सांगितल्यामुळे पाहिला प्रोमो, काय येडेपणा आहे कास्टिंग टिमचा , तो नवा हिरो तिचा एक्सक्लासमेट चक्क तिच्या मुलाच्या वयाचा दिसतोय ! >>>>>>>>>>> अगदी अगदी. राम कपूर किव्वा रोनित रॉयला घ्यायला हव होत. नाहीतर तिचा साराभाई व्हर्सेसचा हिरो सुमित राघवनलाच घ्यायला हव होत ना. तिच्याच वयाचा आहे.

परवा एक प्रोमो बघितला, त्या अरु कडून माप ओलांडले जाते संजना ऐवजी. मला तर वाटतं शेवटी सिरियलवाले अन्या आणि अरुला एकत्र आणणार. अरुने अजिबात अस होऊ देऊ नये. >>>>>>>> सहमत

मिलिंद गवळीचा चेहरा अजिबात हलत नाही. विशेषत: मूक reaction देताना. लग्नात हार घालताना, आईला बरं वाटतं नाही तेव्हा मख्ख चेहरा. >>>>>>>>> तिथे हिन्दीत सुधान्शू पाण्डेची तिच अवस्था आहे. मख्ख चेहरा.

मध्यंतरी एका मराठी चित्रपटाची झलक पाहिली. अचानक पहिला प्रियकर जिवंत आहे हे कळते मग आता जो आहे त्याच्यावर प्रेम आहेच आणि याच्यावर पण प्रेम आहे. या दोघांबरोबर तिला संसार करायचा असतो. >>>>>>>> अय्या ( निलिमा टोन) हे मराठी चित्रपटात दाखवलय? कुठल्या? सुप्रिया पिळगावकरच्या 'कुन्कू' ची अशीच स्टोरी आहे. तिचा पहिला नवरा महागुरुच असतो.

तू सांगितल्यामुळे पाहिला प्रोमो, काय येडेपणा आहे कास्टिंग टिमचा , तो नवा हिरो तिचा एक्सक्लासमेट चक्क तिच्या मुलाच्या वयाचा दिसतोय ! >>
हिरो नक्कीच संतुर वापरत असणार Happy

तू सांगितल्यामुळे पाहिला प्रोमो, काय येडेपणा आहे कास्टिंग टिमचा , तो नवा हिरो तिचा एक्सक्लासमेट चक्क तिच्या मुलाच्या वयाचा दिसतोय ! >>>>>>>>>>> अगदी अगदी. राम कपूर किव्वा रोनित रॉयला घ्यायला हव होत. नाहीतर तिचा साराभाई व्हर्सेसचा हिरो सुमित राघवनलाच घ्यायला हव होत ना. तिच्याच वयाचा आहे.
<< <<<
यस्स्,सुमीत राघवन परफेक्ट वाटला असता , केमिस्ट्री छान आहे त्यांची !

अमा, आज काय जास्तच ड्रामा वगैरे झाला की काय, लिहिले नाहीत अजून..
तब्बेत बरी आहे ना? काळजी घ्या

यस्स्,सुमीत राघवन परफेक्ट वाटला असता , केमिस्ट्री छान आहे त्यांची ! >>> हो. सुमित वागले की दुनियामध्ये बिझी आहेना.

शुभ प्रभातः

आज टिपेगाळू भाग दिसतो आहे.

शांत मंद्र भारतीय संगीत चालू आहे. आप्पा म्हणतात आम्हाला अरू बद्दल अपराधी वाटते. यश पण म्हणतो आपण सर्व तिच्या बरोबर आहेत. आपण फिट राहणे व एकमेकांसाठी उभे राहणे गरजेचे आहे. संतूर बासरी मागे व्हायोलिन यश पेप टॉक देतो आप्पाला व खिच्डी आणोन द्यायला जातो.

आता खंग्री मॅन रेडीच आहे कारण संजना पीडा चा सीन आहे. साधा रण इन्सेप्क्षन वाले लोक दुसर्‍या लेव्हल वरून तिसर्‍या लेव्हल वर स्वप्नात घसरतात त्या टाइपचे संगीत आहे. व थोडे सस्पेन्स जनक. संजना बेडरूमचे दार उघडून आत येते व बेड वर बसून उशीला कवटा ळते. तिला
अन्या तिला आय लव्ह यू तिथे म्हटला होता व तिच्यावर ओणवा झाला होता त्या सीन ची आठवण येते व ती सुखावते. म्हातारीला आजच आजारी पडायचे होते काय नाटकी आहे म्हणते. हे सर्व मनातच. सोलो सीन. अन्या येतो व कपडे बदलायला बाथरूम मध्ये जातो. तिच्या कडे काही फारसे लक्ष देत नाही. म्हणूनही ती संतापते.

संजनाला कपाटात अरू ची एक साडी सापडते ती ती नव्या दुसर्‍या बायकोसुलभ रागाने दूर फेकून देते. तिच्या मनातली आंदोलने चांगली दाखवली आहेत. अन्या आल्यावर म्हण तो अप्पा घाबरले आहेत. त्यांची काळजी वाट्ते. संजना म्हणते माझी काळजी नाही का वाटत.
मला तुमच्या घरच्यआंची मने जिंका यची आहेत आनंदात सर्वांबरोबर राहायचे आहे म्हणते. खंग्री सेट पीसे स परत परत टाकतो. नवे कंपोज करत नाही.

अरू सर्वांना खिच डी चारून रूम मध्ये येउन थकल्याचे रुटीन चार उसासे टाकते. आता महिला ( हळूवार कोरस) व बासरीवाला मैदानात आहेत. बासरीवाल्याने त्याचे रानोमाळ एकटे भटकायची बासरीची तान टाकली आहे. फोर ग्राउंडला अल्बम बघून सासूचे फोटो बघून. तिची आठवण करून टिपे गाळायचे उसासे क्वीनचे सीन आहेत. सीरीअल मध्ये सगळे एकमेकांना आम्ही आहोत तुझ्या बरोबर असे सांगत राहतात.
त्या वाक्याचा ह्या भागात function at() { [native code] } function at() { [native code] } जरा जास्तच मारा झाला आहेत.
मला तुमची बोलणी खायची आहेत म्हणते. आम्ही वाट बघत आहोत म्हणते. बिचारी होस्टेज महिला. यश येउन उसासे ला परत काही तरी आम्ही आहोत तुझाबरोबर लेव्हल संवाद करतो. बाबा संजनाला का समजाव्त नाहीत म्हणतो.

ह्यांचा काय भरोसा अरू म्हणते. मी त्यांच्याशी बोल् नार आहे इथली भांडणे सोडवायला मी सारखी कशी येणार!!! अगं जा तरी एकदा!! मग बघू. अरू काहीतरी समजुतदारीची शिक्षण माठाला देते. परत यश " आम्ही आहोत!!!!( वन तकीला शॉट प्लीज)

आता नेक्स्ट डेचा सीन आप्पा पेपर वाचतात. व कांचन ला काही तरी सांगायला जातात व रिकामी खुर्ची बघून रडायाला येतात. तेव्ढ्यात विमल येते व काही एक संवाद विदाउट फुल स्टॉप स्वल्पविराम बडबडते. मग अप्पा बोलतात अवि चहा आणतो. विमल आजींची चौकशी करते व अवि तिला आत हाकलतो.

आता परत " तू आहेस माझ्यासाठी " अजून एक आव र्तन( वन तकीला शॉट प्लीज!!) अभीचा फोन येतो व आज सोडतील असे म्हणातो.
फक्त आज्जुडीला अरुच्याच हातची रव्याची खीर खायची आहे. ती आणा म्हणतो. खीर पण म्हणणार" मी आहे तुझ्यासाठी!!"'

आपा परत गहिवरतो. लेका तीन बाळंत पणे झाली की तिची तेव्हा ग झाली च असेल की अ‍ॅ ड मिट.

आता संतुर मॅन मागे बासरी वाल्याची जागा भरून काढतो आहे. निलीमा सकाळीच वाशीला गेली आहे. !!( बॅड सून बिहेविअर पाँइट नो टेड. मुलगा किती समजुत दार) पण आलाय बासरीवाला एक तुकडा टाकतोच रिकाम्या खुर्चीत.

अन्या संजना बेडरूम . तिला बाजूला बघून अन्या दचकायचे नाटक करतो. सं लहान मुलीसारखे प्रत्येकाला मंगळ सूत्र दाखवून लग्न झाले लग्न झले म्हणते. अन्या जायची गड ब ड करतो. व आईला बघायला निघून जातो. संजना वैतागते व तिला फार भूक लागली आहे.

विमल अरू संवादः ही पन सुरा घेउन च बोलते. आगाउ कुठली. एकूण ती म्हणते आजी ला करून घालायला तुम्ही इथे राहायला हवे. मी काही संजनाचे ऐकनार् नाही.

अवि गुड न्युज सांगतो तर उसासे टाकत अरू ताई देवाचे आभार मानतात. व लगेच रव्याची खीर सर्वांसाठी करायला घेते. रवा भाजायला घेते
खिरीत बदाम वेलची पड णार आहे. अरु ची स्त्रीमुक्ती विरघळली वाट्ते.

प्रोमो: आप्पा घर अनिरुद्ध व अरुंधती च्या नावावर केले आहे. संजना वॉट म्हणते इथे खंग्रीने एक पीस टाकला आहे. संजना स्लीवलेस बिलोज घालून आहे म्हणजे मरून काळी प्रिंटेड साडी पण नेसली आहे. घर तिला म्ह ण त नाही "मी आहे तुझ्यासाठी?!

अमा.. Happy
नव्या दुसर्‍या बायकोसुलभ राग, अरू सर्वांना खिचडी चारून, बिचारी होस्टेज महिला...

वगैरे मस्त!

संजनाचं वय नक्की किती असावं? लग्नाबद्दल एवढी एक्साइटमेंट? तिही असल्या प्रॉब्लेमॅटिक लग्नाबद्दल? की आता मुद्दाम तिला व्हिलन म्हणून कुट्ट रंगवायची आहे म्हणून ?
आता अरूचं ते बिचारं आणि महान बनणं जाम बोरिंग वाटतंय.

शुभ प्रभातः

सुरुवात विमल आप्पानां अजुन पोहे हवेत का ते विचारते. त्यांना काल झोप लागलेली नाही. उसासे बाई अप्पांना वर जाउन झोपायला सांगतात.
आई आज येणार तुम्ही निराश होउ नका असा धीर देते. अप्पा तिला इथेच राहायची विनंती करतात. तिचं कोण करणार सेवा असे नाही. पण तू तिची प्रेमाची( मानसिक नोकर) तू थांब म्हणजे ती बरी होईल लवकर.

अन्या वरून खाली एकदम बोर्ड मीटिन्ग अटेंड करायच्या घाईत खाली येतो व हॉस्पिटल ला जातो असे सांगतो. जसे काही ह्यालाच तिची बेस्ट
काळजी आहे. यश लगेच काका गेला आहे म्हणतो. अन्या आस्चर्य चकित होतो. आईची तब्येत कशी आहे विचारतो व मी जातोच म्हणतो. तर
अप्पा म्हणतात तिथे गर्दी करू नका. खंग्री मॅन टॅ टॅ टॅ टे असे आगामी भांडणाची पूर्व सूचना देणा रे संगीत पीसेस टाकतो. मला माझ्या आई बद्दल सांग्णार का विचारतो. अरू ती बरी आहे म्हणते. व आज सोडतील सांfunction at() { [native code] } गते.

संजना एंट्री: तीच एकदम ताण सोबत घेउनच येते. वा वा बरे झाले मला वाटलेच होते फार काही सिरीअस नसेल म्हणून. आय मीन बरे झाले.
अप्पा उखडतात व म्हणतात तुमचे नशीब चांगले तिला अजून काही झाले असते ना तर मी तुम्हाला हाकलून दिले असते. पोलिसाला बोलावून दिले
असते. अन्या म्हण तो असा विचार करू नका संजना सॉरी म्हणायचा प्रयत्न करते मी तुमचा राग समजू शकते वगैरे. पण अप्पा म्हणतात तू माझे दु:ख नाही ना समजू शकत. माझी मनःस्थिती सध्या बरी नाही मी काही बोललो तर तुझा अपमान होईल परत ( इशू नको!!!) तर आत्त्ता गप्प बैस.
संजना लगेच काहीतरी बोलायला जाते तेव्हा अन्या तिला साधेच चुप करतो.

यश अप्पांना वर घेउ जायला निघतो उठताना अन्या आधार म्हणून हात पुढे करतो. तर अप्पा यश चा हात घेतात. अरू पण उठायला बघते व अन्या हात देउ बघतो तर संजना लगेच डोळे वटारते. अरू पण यशचाच हात घेउन उठते. सोफ्याचा हात आहे ना पण नाही.

आता पैसा वसून डोमेस्टिक इशू चे चित्रण आहे. दोन्ही बायकांचा संघ र्श. घरात जेवायला काय करावे. मोलकरणीस प्रेमाने वागवावे की व्यवहारी पणे. विमल म्हणते दुपारी काय करावे. ताक आहे तर अरु म्हणते ताकातला पालक कर.
संजना लगेच बट इन!!! मला विचारत जा ह्या घरची सून कोण आहे मी आहे कि नै ( लगेच नव्या मंगळ सूत्राला हात लाउन) मी आता तुझी वहिनी आहे. संजना अनुरुद्ध देशमूख अरु तर पाव्हणी आहे.
विमल स्मार्ट जवाब देते. अरूच माझी वहिनी तुम्ही सून असाल मरे
विमल मला माझ्याशी असे बोलो नकोस असे संजना म्हन ते व अन्याला म्हण ते अरू माझ्या बद्दल हिच्या कडे वाइट साइट बोलत असणार विमल नाही म्हणते. अरू म्हण ते मला काही बोलायची गरज नाही. काल नाही का गौरी तुझा आवाज ऐकून धावत आली.
तू सर्व समजून घेतले स तर तुला अधिकार मिळेल ओरबाडून मिळ णार नाही.
संजना मी पैसे देते व व्यवहार बघते. प्रेम बीम सर्व झूट आहे.
अरू सगळे तसे नसतात काही लोक पुढे जाउ प्रेमाने करतात. विमल ने केलेस तर सर्व हिशेब महागत पडेल. विमल इथून गेली तर आई अप्पांची अडचण होईल. ती जाईल असे वागू नकोस बाई. अन्या बोलतो : तू विमल कडून अरू कडून शिकून घेत नाही.

संजना बोट दाखवू मोड मध्ये मला काही कोणा कडून शिकायची गर्ज नाही. ते माझ्याशी चांगले वागतात म्हणून त्यांच्याशी वाइट वागू नकोस.
ब्ला ब्ला संजना सग ळे शिकून घेइन म्हणते.

खंग्री मॅन फॉर्मात आहे.

ती गेल्यावर अन्या अरू संवाद भारतीय संगीत संतूर : हिला सगळॅ रेडिमेड हवे. घरात सारखी कचकच करू नका बजावून किचन मध्ये जाते.

संध्याकाळी: आई येते म्हणून विशाखा फोन वर आहे केदार सारखा फोन करत आहे. अप्पा बेसबरीने इंतजार करत आहे. आजी येते पण व्हीलचेअर वर आहे. बहुत प्यार उमड आता है. आजी आत येते आप्पा तिला डोळे भरून बघतात व व्हिल चेअर बघून उदास होतात.
बासरी संतूर च्या आवर्तनांमध्ये चालू आहे सर्व. खंग्री पण मागू न असल्याची जाणीव करून देतो.
आता आपले पेटंट एच डी एफ सी एटी एम संगीत वाजते व अरू सासू ला बघुन हर्ष भरित होते व तिची दृ ष्ट काढून तिला आत घेते.
विशाखा आई प्रेमळ संवाद त्यामुळे संतूर हास्य उसासे टाकत एटी एम मधून चहा येतो. अरू पथ्य विचारुन घेते.
अरू एकदम सेवा मोड मध्ये व हास्य अश्रू उसासे टाकत खीर आव्डली का किती घाबरवलंत तुम्ही. म्ह ण ते. घरातली अड ग ळ साफ करायची आहे.

अन्या संजना येतात. दोन महिने पथ्य आहे.

अन्या आपली बेडरूम ऑफर करतो. संजन कश्या ला कश्याला म्हणते. हिला तीच बेडरूम ( तिचे कार्य क्षेत्र!!) हवी आहे.
ती आईला सॉरी म्हणते. आईला पण आता वाद घालायचा नाही आहे. संजना परत बेडरूम ऑफर करते तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा असे म्हणते.
( घर कुणाचं ब बोलतंय कोण!!) संजना ची मदत आई नाकारते.

आप्पा आता बाँब टाकतात. खंग्री मॅन आपल्या मनाची तयारी करायचे संगीत देतो. रहस्याची उकल गौप्य स्फोट टाइप.
प्रथम संजना आ हर्ष वायू होतो कि घर अन्याच्या नावावर आहे पण मग कळाते की ते अरूच्या पण नावावर आहे व तिचा पचका वडा होतो.
आता ती ओनर म्हणून इथे राहू शकते. नो अन्या परमिट नीडे ड. धाड धाड संगीत.

संजना अरूला समजवते. प्रॉपर्टी आपल्या नावावर् झाल्या चे सूख तिच्या चेहया वरून काही क्षण ओसंडते.
ती मरून साडी मस्त आहे.

प्रोमो: अरू कप डे हातात घेउन आहे तर संजना म्हणते काय हे बेडरूम समोर उभी राहून आमचे बोलणे ऐकतेस कि काय. अरू म्ह णते मला
त्याची गरज नाही. सो देअर. एक नव्या प्रकारचे सहजीवन सुरू झाले आहे.

Lol
अभिचं लग्न होऊन अंकिता रहायला आल्याने यशला झोपायला खोली नव्हती. अविनाश आणि त्याच्या बायकोसाठी खोली कुठून पैदा झाली?

कालचा अल्बम बघून फोटोवरून हात फिरवायचा सीन कायच्या काय. सासू फक्त हॉस्पिटलातच गेलीय.

अरुंंधतीला इथेच ठेवायला कांचनला आजारी पाडलंय. आता रोजचे मेलो ड्रामा आणि खंग्री मॅनला बोनस.

अरु ला इथेच ठेवणार म्हणजे रोजच्याच कटकटी. सासूला तरी ही का हवी? खरेच मानसिक गुलामगिरी आहे!
अनुपमा मध्ये फारच फिल्मी आणि भडक ड्रामा चालला आहे...इकडे थोडं सोबर आणि realistic ठेवावं अशी अपेक्षा!

Pages