New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हणुन त्यांच्याकडुनच क्लॅरिटी मिळालेली बरी >>> हो ते खरेच Happy मला सहसा मेल ला उत्तरे आलेली आहेत दोन तीन दिवसांत. ते ट्राय करा.

person(s) undertaking the voyage >>> Happy फेफ, साधे रेल्वे स्टेशनात "कल्याणला आलेल्या" नव्हे. "कल्याण स्थानकात आगमन झालेल्या" असते. त्यामुळे सरकारी जड भाषा हे कॉमन आहे.

पण जोक्स अपार्ट, गेल्या ३-४ वर्षातील अनुभव चांगले आहेत. वेब साइट वरचा किंवा फॉर्म वरचा मजकूर गोंधळात टाकणारा असला, तरी त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित मिळाली आहेत. सीकेजीएस व व्हीएफएस दोन्हीकडून.

बाय द वे, हे रिन्युअल वगैरे करण्याची मुदत ३० जून होती बहुधा, ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली आहे.. तोपर्यंत देशात जाण्याकरता दोन्ही पासपोर्ट व ओसीआय असले तरी चालेल.
(हे सध्याचे. हा बाफ काही काळानंतर बघणार्‍यांनी पुन्हा चेक करावे).

'person(s) undertaking the voyage' >> Lol Radha whose that part of the physique above the abdomen and below the chin आठवले Lol

वेब साइट वरचा किंवा फॉर्म वरचा मजकूर गोंधळात टाकणारा असला, तरी त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित मिळाली आहेत. सीकेजीएस व व्हीएफएस दोन्हीकडून. >> +1 फक्त तेच स्पष्टीकरण मूळ साईट वरच देऊन तिथले मुदलातले गोंधळ निस्तरणे जास्त सोपे का करत नाही कोण जाणे . आता हीच बातमी बघ. व्हीएफ एस च्या साईटवर ताज्या बातम्या मधे आहे पण बाकीची सगळी प्रोसीजर अजून जुनीच दिलेली ठेवली आहे (कालपर्यंत होती).

वेगवेगळ्या राज्यात मधूनमधून भारत सरकारतर्फे "तुमच्या दारात भारतीय वकिलात" या योजने अंतर्गत व्हीसा कँप घेतले जातात. तिथे अधिकार्‍याना प्रत्यक्ष भेटून शंकानिरसन करून घेता येईल. आणि ते तिथे प्रत्यक्षात अर्जही स्वीकारतील असे म्हटले आहे. उदा. पुढच्या महिन्यात आमच्या राज्यात कँप आहे.
https://www.indiainnewyork.gov.in/whatsnew?id=Nmxsb1ZZVm0wYVNIREFpeUJxbV...
Applications will be reviewed and accepted on the spot for further processing असे जाहिरातीत म्हटले आहे.

>>मला सहसा मेल ला उत्तरे आलेली आहेत दोन तीन दिवसांत. ते ट्राय करा.<<
आय्ला, हे म्हणजे तुम्ही सर्वप्रथम स्पेक्स (रिक्वायरमेंट डेफिनिशन) लिहिताना सगळ्या युज केसेस विचारात घेतल्या नाहित, आणि आता स्पेक्स मधे होल सापडल्यावर ऑन द फ्लाय स्पेक्स चेंज (वर्क अराउंड?) करतांय? बऽऽरं, अडला हरी... Proud

इतक्यात कोणी केलं आहे का OCI रिन्यू? कुणाचे काही अनुभव?

ह्या बद्दल त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही अजून.
https://www.ndtv.com/india-news/oci-cardholders-rules-for-re-issue-of-ov...

रिन्युअल करण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे. वरती फारएण्ड ह्यांनी पण हे सांगितलं आहे.
https://www.indianembassyusa.gov.in/pages/NjI,

गेले अनेक महीने OCI ची appointment कोवीडमुळे cancel/postpone होत होती. आज तिसर्‍या खेपेला सगळे documents चारचारदा चेक करुन गेलो. तर म्हणे आता याची गरजच उरली नाही. एप्रिल मधे नवीन नियम आलाय, त्यानुसार आता पासपोर्ट रिन्यू केल्यावर OCI रिन्यू करायची गरज नाही. आता OCI डायरेक्ट विसाव्या वर्षी एकदाच रिन्यू करावं लागेल.

Consulate ला इमेल करुन, कशासाठी appointment पाहीजे ते सांगितल्यावरच appointment मिळते. त्यामुळे इमेल मधे स्पष्ट लिहीलं होतं की पासपोर्ट रिन्यूमुळे OCI रिन्यू करायचंय. तेव्हा तर म्हणाले तश्रीफ लाईये. मग तश्रीफ घेउन गेल्यावर म्हणाले आता तश्रीफ मत रखीये, वापस ले जाईये. काय गाढवपणा, मग हे इमेलमधेच का नाही सांगितलं?

मंदार, डायरेक्ट विसाव्या वर्षी म्हणजे २० वर्षाखालील मायनरचा पासपोर्ट बदलला तरी जुन्या पासपोर्टवर काढलेले ओसिआय पण रिन्यू नको का करायला?

अमितव - करेक्ट! त्या केसमधे OCI रिन्यू करायची गरज नाही, जुनेच चालेल. आमची पण सेम केस आहे.
फक्त नवीन पासपोर्टचे डिटेल्स वेबसाईटवर अपलोड करा म्हणाले. ते नक्की कुठे अपलोड करायचे याचा शोध जारी आहे. कोणाला सापडल्यास इथे बॅटरी मारावी प्लीज Happy

वॉव! हे बेस्ट आहे!
पोटातला गोळा पन्नाशी पर्यंत पुढे ढकलल्या बद्द्ल अनोकोनेक धन्यवाद. Happy
आमचं ओसिआय आम्रविकेत काढलेलं. तिकडे न्यूयॉर्कचे नियम वेस्ट कोस्ट येईयेईतो बाद ठरतात, त्यात आता वेगळ्या देशात रिन्यू केरायला लागलं असतं तर त्यांनी नक्की एसएफला पाठवलं असतं एखादं डॉक्युमेंट घ्यायला!
आता पन्नाशीला परत दोन वर्षे बेएरियात जॉब करुन रिन्यू करणं सोपं झालं! Proud

>>त्या केसमधे OCI रिन्यू करायची गरज नाही, जुनेच चालेल. आमची पण सेम केस आहे.<<
नोप.

१. विस वर्षांपर्यंत प्रत्येकवेळी पासपोर्ट रिनु झाला कि ओसिआय पण रिनु करायचा.
२. विस वर्षांंनंतर पासपोर्ट रिनु केला तर ओसिआय फक्त एकदाच रिनु करायचा, पन्नाशी गाठेपर्यंत.
३. पन्नाशीनंतर पासपोर्ट रिनु केला तर ओसिआय फक्त एकदाच रिनु करायचा. हा खरा लाइफलाँग विजा. Wink

तटि: जुना पासपोर्ट (ओसिआय स्टँप असलेला) घेउन भारतात प्रवेश करण्याची सुविधा फेजऔट होणार आहे, किंवा झालीहि असेल. तुमचे ग्रह फिरलेले असतील तर योरप किंवा भारतात पोऑए वरुन माघारी पाठवतील. नशिबवान असाल तर मटका लागु शकतो...

मंदारने लिहिलेली माहिती बरोबर दिसते आहे.
हे बघा
https://www.cgitoronto.gov.in/news_letter_detail/?id=73

ऑनलाइन फॉर्म ज्यावर नवीन पासपोर्ट नंबर ओसीआय कार्डाशी जोडायचा आहे तो बहुतेक इथे आहे: https://ociservices.gov.in/welcome
मिसलेनिअस सर्विसेस अंतर्गत तो फॉर्म उपलब्ध आहे.

१. विस वर्षांपर्यंत प्रत्येकवेळी पासपोर्ट रिनु झाला कि ओसिआय पण रिनु करायचा. >>
नोप.

ही official website वरची लिंक पहा (नया हय यह Happy )
https://ociservices.gov.in/MiscNew.pdf
यानुसार, वीस वर्षानंतर पासपोर्ट रिन्यू केल्यावर एकदाच ओसीआय रिन्यू करावे लागेल. हा रुल नुकताच आलाय, मला काउंटरला सांगितल्यावर अर्थात विश्वास बसला नव्हता. मग एंबसीमधेच वेबसाईट उघडून कन्फर्म केलं आणी मगच तिथून निघालो.
वर टवणे सरांनी दिलेल्या लिंकमधेही तेच लिहीलंय.

>>ही official website वरची लिंक पहा (नया हय यह Happy )<<
आय्ला, बरोबर आहे तुमचं. आय स्टँड करेक्टेड!

पण हा नियम क्रांतीकारी वाटतोय -
i. The existing requirement to re-issue an OCI Card each time a new passport is issued to an OCI cardholder up to 20 years of age and once after completing 50 years of age has been dispensed with;

म्हणजे एखाद्याने विस वर्षांनंतर प्रथमंच ओसिआय घेतला, तर त्याला रिनुअलची झंझटच नाहि. अ‍ॅम आय रिडिंग इट करेक्टली? इफ सो, मेनी पिपल शुड बी आटोमॅटिकली ग्रँडफादर्ड... Proud

ती दरवेळी रिन्यू करायची भानगड गेले काही महिने होती. ती आता कमी झाली, कारण एकदाच करायचे आहे. नाहीतर लहान मुलांचे पासपोर्ट्स दर पाच वर्षांनी बदलतात, आणि प्रत्येक वेळेस ते करायचे होते (नियमानुसार)

दुसरे म्हणजे ज्यांना पुन्हा ओसीआय काढायची गरज आहे (विसाव्या किंवा पन्नासाव्या वर्षी) त्यांनाही यावर्षी सध्याचे ओसीआय व दोन्ही पासपोर्ट घेउन जायची मुभा ३१ जुलै पर्यंत होती, ती आता डिसेंबर पर्यंत वाढवलेली दिसते. एकाच ओळीत माहिती आहे इथे पण अजून कन्फर्मेशन येइल बहुधा. (तसे इव्हन जुना पासपोर्ट सुद्धा न्यायची गरज नाही अशी यातील शेवटची ओळ म्हणते, पण एक पासपोर्ट काही जड नाही)
https://indianembassyusa.gov.in/pages/NjI,

अ‍ॅम आय रिडिंग इट करेक्टली? >>> तेथे जरा गोची दिसते. बहुधा ५० व्या वर्षी एकदा करावे लागेल. ते बदललेले नाही. पण ती वरची ओळ मलाही गोंधळात टाकणारी वाटली.

म्हणजे एखाद्याने विस वर्षांनंतर प्रथमंच ओसिआय घेतला, तर त्याला रिनुअलची झंझटच नाहि. अ‍ॅम आय रिडिंग इट करेक्टली? >> येस सर!

तेथे जरा गोची दिसते. बहुधा ५० व्या वर्षी एकदा करावे लागेल. >>> नाही. त्या डॉक्युमेंटमधे लिहील्यानुसार, २० वर्षापर्यंत जेव्हाही नवीन पासपोर्ट मिळेल तेव्हा, आणी ५० वर्षानंतर एकदा, पासपोर्टची कॉपी आणी फोटो फक्त अपलोड करावा लागेल.

नाही. त्या डॉक्युमेंटमधे लिहील्यानुसार, २० वर्षापर्यंत जेव्हाही नवीन पासपोर्ट मिळेल तेव्हा, आणी ५० वर्षानंतर एकदा, पासपोर्टची कॉपी आणी फोटो फक्त अपलोड करावा लागेल. >> हो, मलाही असेच कंफर्मेशन मिळाले आहे. मी मुलीचा पासपोर्ट नवा काढल्यावर परत ओसी आय "रीन्यु/ रीइश्यू " केले नह्याला, ह्याला वर्षाच्या वर काळ होउन गेला आहे तेंव्हा आता नुसता नवा फोटो नि पासपोर्ट केला तर चालेल का ह्याचे स्पष्ट उत्तर शोधतो आहे. मिळाले तर इथे टाकेन. जास्त झंझट असेल तर सरळ व्हिसा घेईन वीसची होईतो असे ठरवलेय.

नशिबवान आहात. छान झालं.
होय, २० नंतर एकदाच ओसीआय काढले काम झाले. त्या व्यक्तीने ५० नंतर पासपोर्टची माहिती अपलोड करायची, मामला खतम.

असामी, मला तुमची पोस्ट नीट कळली नाहीये. OCI न घेता व्हिसा घ्याल असं म्हणताय का?

व्हिसावर लै लक्ष ठेवून बसावं लागतं. या ट्रिप ला मी आणि मुलगा भारतात यायला निघालो होतो तर आम्हाला एअरपोर्ट वर अडवलं होतं. ज्यांनी गेल्या वर्षभरात व्हिसा रीन्यू करून घेतलाय त्यांचेच व्हिसा valid आहेत आणि बाकीच्यांचे सस्पेंड केलेत असं काही तरी सांगत होते. आमचा व्हिसा आम्ही रिन्यू करून घेतलेला त्यामुळे आम्हाला येता आलं. आमचा प्रॉपर एन्ट्री व्हिसा आहे जो 5 वर्ष valid आहे for multiple entries ( विसाचं नाव आठवत नाहीये)

OCI न घेता व्हिसा घ्याल असं म्हणताय का? >> मुलीचे ओसीआय आहे फक्त नव्या पासपोर्ट बरोबर रिन्यू केले नाहिये तीन महिन्यांच्या कालावधी मधे. (तेंव्हा कोव्हीड जोरात हट्रानि व्हीएफ्स ट्रांझीशन झाले होते तेंव्हा सतत नवी माहिती मिळत असे म्हणून धुरळा खाली बसेपर्यंत थांबू असे ठरवले) त्याला आता वर्ष होऊन गेलेत. त्यामूळे आता नुसता फोटो नि पासपोर्ट ची कॉपी आता पाठवून चालेल का ह्याचे स्पष्ट उत्तर मिळण्याची वाट पाहात आहे. त्या आधी गरज पडली तर सरळ व्हिसा घेईन असे म्हणत होतो.

तीन महिन्याची एक्सपायरी डेट आहे का फोटो अपलोड करायला? >> मला न्यू यॉर्क एंम्बसी चे पीडीएफ पाठवले होते कोणि तरी त्यात होते तसे.

इथले चमत्कारिक अनुभव वाचुन मी प्रत्येकवेळेस ओसिआय घ्यायचा निर्णयच कॅन्स्ल करते त्यापेक्षा व्हिसा घ्यावा झाल.
तसही ओसिआय प्रिव्हेलेजेस मुलासाठी फार काय उपयोगाचे नाही, जेमतेम २ आठवड्यात बोरडम त्याना गाठतच त्यापेक्षा व्हिसा सोप्पा असेल तर तेच बर.

नवीन ओसिआय घेण्यासाठी आता तुमचा original US passport पाठवायची गरज नाही.
9 April 2021
Update for New OCI applicants – With effect from 12 April 2021, new OCI card applicants are not required to submit their original US passport along with their applications. Please enclose a clear self -attested US passport copy along with your application, notarized copy is not required. If you have applied after this change went into effect and the system charged you for an additional courier, you will need to submit a refund request.
https://services.vfsglobal.com/usa/en/ind/news/Update%20for%20New%20OCI%...

ओसीआय रिइश्यु नियम अजुन सोपे केले दिसतात.
नवा पासपोर्ट आला की, वय २० पर्यंत व ५०च्या वर नवे घेण्याऐवजी, नव्या पासपोर्टची कॉपी व ताजा फोटो ऑनलाईन अपलोड करायचा आहे.
२० च्या वर मात्र नवे एकदाच करावे लागेलच.

https://www.indianembassyusa.gov.in/pages/NjI,

According to the recent relaxation in requirements for OCI Card Reissue:

(i) Mandatory requirement of re-issuance of an OCI card each time a new passport is issued to a foreigner up to 20 years of age and once after completing 50 years of age, is dispensed with;

(ii) OCI cardholder is required to get the OCI card re-issued only once when a new passport is issued after completing 20 years of age. (Applicants may refer to https://services.vfsglobal.com/usa/en/ind/apply-oci-services for the process). The fees for this is US$ 25 and US$ 3 for Indian Community Welfare Fund (ICWF). You also need to pay US$ 15.90 to the Outsourcing Agency as service charge, and a fee for any Optional Services used like Shipping Labels;

(iii) OCI cardholder is required to upload ONLINE a copy of the new passport and a recent photo each time a new passport is issued up to 20 years of age and once after completing 50 years of age. The uploading of these documents may be done within three months of receipt of the new passport;

(iv) Foreign spouse of an Indian Citizen or spouse of foreign origin of an OCI cardholder is required to upload a copy of the new passport and a recent photo ONLINE each time a new passport is issued, along with a declaration on subsisting of marriage, copy of the Indian passport of the Indian spouse/passport and OCI card of the OCI cardholder spouse.

[In case of (iii) and (iv), please visit https://ociservices.gov.in/welcome and select the option ‘OCI Miscellaneous Services’ for uploading copy of the passport, recent photograph and other documents. This does not involve any submission of documents through the Outsourcing Service Provider or the Embassy and will be Gratis].

2. Further, on account of ongoing COVID-19 pandemic, in order to avoid inconvenience to OCI cardholders who are required to get their OCI cards reissued, it has been decided by Government of India to extend the timeline for re-issuance of OCI card from December 31, 2021 till December 31, 2022.

3. The requirement of carrying old and new passports, along with the OCI card, has been done away with. Henceforth, an OCI cardholder traveling on the strength of existing OCI card bearing old passport number is not required to carry the old passport. However, carrying the new (current) passport is mandatory.

Pages