New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

#१, २ ,३ किती व्हेग आणि गोंधळात टाकणार्‍या शब्दांत लिहिले आहेत!
एकदा म्हणतात री-इश्यु (इश्यू नाही री इश्यू) एकदाच करायचं. एकदा म्हणतात रि-इश्यू करायची गरज काढून टाकली आहे. टिपिकल भोंगळ कारभार. इंग्रेजी सुद्धा साधं सोपं सुटसुटीत न वापरता काहीतरी संस्कृतोत्त्भव इंग्रजी वापरुन संधी, समास, विग्रह करुन तीन चार ओळींचं वाक्य वाचुन त्याचा अर्थबोध करुन घेता आला तर करायचा. नाही तर एअरलाईन्स कंपनीशी भांडत बसायचं नाही तर आयत्यावेळी गोंधळ नको म्हणून ओसीआय असतानाही व्हिसाची फोडणी द्यायची. चक्रमपणा जाणार नाही आपला.

आम्ही गेल्या खेपेला २० खालील आणि २० वरील लोकांचे पासपोर्ट बदलल्याने ऑनलाईन अपडेट करुन गेलेलो आणि जुने - नवे पासपोर्टही जवळ ठेवलेले. कॅनडातून निघताना जुना पासपोर्ट एअरलाईन स्टाफने मागितला. मुंबईला मागितला नाही. जुना पासपोर्ट जवळ ठेवलेला बरा. कोण कधी कसा अर्थ काढेल सांगता येत नाही.

"इंग्रेजी सुद्धा साधं सोपं सुटसुटीत न वापरता काहीतरी संस्कृतोत्त्भव इंग्रजी वापरुन संधी, समास, विग्रह करुन तीन चार ओळींचं वाक्य वाचुन त्याचा अर्थबोध करुन घेता आला तर करायचा." - तरी मी ते 'person undertaking the voyage', 'vessel' वगैरे मिस करतोय. साधं पॅसेंजर ला 'पर्सन अंडरटेकिंग द व्हॉयेज' वगैरे म्हटलं की मला तर मी सुभाषचंद्रांसारखा जर्मन पाणबुडीतून जर्मनीहून जपानला निघालोय असं वाटायला लागतं.

साधं सोपं सुटसुटीत न वापरता काहीतरी संस्कृतोत्त्भव इंग्रजी वापरुन संधी, समास, विग्रह करुन तीन चार ओळींचं वाक्य वाचुन त्याचा अर्थबोध करुन घेता आला तर करायचा.
>>> Lol

आम्ही गेल्या खेपेला २० खालील आणि २० वरील लोकांचे पासपोर्ट बदलल्याने ऑनलाईन अपडेट करुन>>> लहान मुलांचे पाच वर्षाचेच देऊन ठेवतात , त्यात ओसिआयच्या फोटोची किती किरकिर असायची, बाळाचे कान कापायला सांगायचे हे इतके स्पेसिफिकेशन्स Proud

person undertaking the voyage', 'vessel' वगैरे मिस करतोय>>> Lol मला तर नेहमी सिंदबाद सारखे वाटत रहाते, त्याला फळी मिळायची आपल्याला भांडं. आपल्याला इंग्रजी suffer करायला लावतात भाषा मात्र मराठी सफरीची वापरतात.

ओसीआय चा धसका बसलेला आहे. दोनदा फेल झाले आहे. पण करायचे तर आहे Sad कधीतरी हिय्या करावा लागणार.

साधं पॅसेंजर ला 'पर्सन अंडरटेकिंग द व्हॉयेज' वगैरे म्हटलं की मला तर मी सुभाषचंद्रांसारखा जर्मन पाणबुडीतून जर्मनीहून जपानला निघालोय असं वाटायला लागतं. >> Lol

हो खरं. चारदा तरी वाचावंच लागतं.

हे नियम २०२१ मधेच बदललेले दिसतात. मी आज वाचले कारण पासपोर्ट संपेल, तर म्हटलं काही बदल केलेत का पाहिलेलं बरं. अमितव, तुम्ही बदलले तेव्हा हेच नियम होते का? म्हणजे फक्त पासपोर्ट पान व फोटो अपलोड केला होता का?

20 वर्षे झाल्यावर आणि पासपोर्ट रेन्यू झाल्यावर एकदा OCI रिन्यू करायचं.
इतर वेळी फक्त पासपोर्ट आणि फोटोची कॉपी अपलोड करायची.
यातला कुठला पार्ट पब्लिक च्या डोक्यात जात नाहीये?
उगाच आपलं मायदेशाला नावं ठेवत बसायचं.
मी हल्लीच मुलासाठी डॉक्स अपलोड केले. It was a breeze.
त्या मानाने US पासपोर्ट रीन्यू करायला जास्त यातायात होती.
तुम्हाला एक फॉरेन कंट्री अगदी थोड्या त्रासात सिटिझनशिप देतोय लोक्स. Appreciate it.

हो. मला वाटतं इथे किंवा सशलच्या धाग्यावर कोणीतरी लिहिलेलं हे नियम जेव्हा बदललेले तेव्हा.
फक्त पासपोर्ट पान व फोटो अपलोड केला होता का?>> हा काय प्रश्न झाला!! Proud नाव गाव फळ फूल ही माहिती चार ठिकाणी घालायची. फोटो आणि सही ची ३०० केबी (फोटो साईझ बाबत मायबोलीला काँपिटिशन आहे .. कोणाचं अपलोड जास्त अन-फ्रेंडली आहे त्याला) इमेज अपलोड करायची. पैसे आहेत का लक्षात नाही. मग दोन -तीन महिन्यांनी एक मेल येते की बाबा तुमची माहिती बदलली. पण ती माहिती एअरलाईन कंपनीला अ‍ॅक्सेसिबल नसते. आणि त्यांच्या/ त्यांच्या एजंटच्या जुना पासपोर्ट नको हे अपडेट गावी ही नसतं. त्यामुळे जुना पासपोर्ट जवळ ठेवायचाच.
आमची ओसिआय काढलेली कंट्री आणि आता रहात असलेली कंट्री बदललेली. त्यामुळे पत्ता बदल ही होता, अगदी हॅपी पाथ न्हवता तरी कॉर्नर केस नॅव्हिगेट करता आली.
सगळ्यात चांगली बाब म्हणजे बुड न हलवता सगळं होतं. व्हीएफएसचं तोंड बघावं लागत नाही.

मोरोबा, तुम्ही २ वाक्यात लिहिलंत ते नियम लिहिणार्‍यांनी ४० वाक्यात शब्दांचा गुंता करुन लिहिलंय म्हणुन गोंधळ होतो. Happy ते कोणीही असु शकतात मायदेशाला कोणीही नावं ठेवत नाहीये. Happy

अमितव, पॉईंट पोचला. Sad थँक्स, सविस्तर लिहिल्याबद्दल.

>> उगाच आपलं मायदेशाला नावं ठेवत बसायचं.
तुम्हाला एक फॉरेन कंट्री अगदी थोड्या त्रासात सिटिझनशिप देतोय लोक्स. Appreciate it.
Submitted by मोरोबा on 22 February, 2023>> मोरोबांचं हे पोस्ट माझ्या नवर्‍याने लिहिलं असावं असं वाटलं. त्याला एअर इंडियाला वगैरे नावं ठेवल्यावरही राग येतो.
ओसीआय, व्हिसा बिसा काढण्यापूर्वी आपली पत्रिका वगैरे चेक करुन घ्यायला हवी ग्रह बिह शांत आहेत ना हे बघायला. Wink

तुम्हाला एक फॉरेन कंट्री अगदी थोड्या त्रासात सिटिझनशिप देतोय लोक्स. Appreciate it. >> सिटिझनशिपचा फुलटॉस मारणार नाही म्हण्जे नाही! Proud
अहो अमेरिकेचा पासपोर्ट काढणे दिव्यच आहे. अमेरिकेत ड्रायवर लायसन काढणे हेही दिव्य आहे. अमेरिकेत गोळी न लागता रहाणे हे ही दिव्यच आहे. पण म्हणून भारतीय सिस्टिमला चांगलं म्हणू म्हणता! दोन्हीला नावं ठेवूया की आपण. Proud

कशाला हवा oci ... व्हिसा मिळतो online 5 वर्षाचा.. दोन दिवसात ई-मेल एप्रोवल येते...

मी यावर्षी ओसिआय करायचेच म्हणून या विकेंडला लॉकरमधून सगळे पेपर्स घेवून आले. २०२६ पर्यंतचा विसा आहे तो जुन्या पासपोर्टवर आहे. नवा पासपोर्ट आणि विसाचा शिक्का वाला जुना पासपोर्ट असे दोन्ही घेवून प्रवास करता येतो का ?
लेकाचे ओसीआय नव्हतेच. आमच्या अनुभवावरून त्याला सुचवू करुन घ्यायला.

>>> नवा पासपोर्ट आणि विसाचा शिक्का वाला जुना पासपोर्ट असे दोन्ही घेवून प्रवास करता येतो का ?
व्हिसा कोविडनंतर घेतलेला असेल तर चालेल. त्याआधीचे सगळे व्हिसा रद्द केले होते.

अमितव, अमेरिकेचा पासपोर्ट काढणे व ड्रायवर लायसन काढणे ठीक व्यवस्था आहे की. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला होता का? हे अस्थानी होऊ शकेल पण तेवढ्याकरता नवा धागा नको म्हणुन हेच स्थान पक्के केले.

person undertaking the voyage', 'vessel' वगैरे मिस करतोय> > Lol

हे नियम इमिग्रेशन काऊंटरवाल्या बाबू लोकांना माहित आहेत का पण हा कळीचा प्रश्न.

वीएफ्स मात्र गमतीशीर आहे. वीस वर्षांनंतरच्या फोटो वरून मित्राची केस आठवली. त्याने मुलाचा पासपोर्ट २० वर्षांचा झाल्यावर बदलला पण ओसीआय अपडेट केले नव्हते. ते काढायला वर्षभराने गेला नि नवीन फोटॉ काढले तर पासपोर्ट वरचाच फोटो हवा म्हणून परत पाठवले. त्याच्याकडे ते नव्हते तेंव्हा त्याने विचारले कि लेटेस्ट फोटो का वापरू शकत नाही ? मग दोन तीनदा पाठी पुढे करून चालेल असे सांगितले.

------अवांतर------
कॅनडात डीएमव्ही सदृष ठिकाणी वॉक-इन करुन ५-१० मिनिटांत ड्रायव्हर लायसन्स, रजिस्ट्रेशन, नंबर प्लेट आणि अर्धा एक तासात पासपोर्टचं काम करुन बाहेर पडता येतं. (कोव्हिड काळात गोंधळ वाढलेत) पण तेच अमेरिकेत (बे-एरियात तरी) पब्लिक पासपोर्टला रात्री पासून रांगा लावतात ऐकलंय. जवळच्या डीएमव्हीला अपॉइंटमेंट नाही म्हणून मी पार दोन काऊंट्या पलिकडे जाऊन ड्रायव्हर लायसन्स काढलेलं. कारण ज्या व्हिसावर होतो त्यावर दुसर्‍या कंट्रीचं लायसन्स फक्त आठवडा का दोन आठवडे चालतं. सवय झाल्याने गाडीशिवाय अमेरिकेत जगणे फारच कठिण आहे. वॉक-इन केलं असतं तर दिवस गेला असता. असंच दुसर्‍या देशातली गाडी रजिस्टर करणं उगाच कॉम्प्लिकेटेड करुन ठेवलं आहे अमेरिकेत. ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर करुन त्याच्या लेटर हेडवर फेडरल लॉ नुसार काय नाही ते लिहुन आणायचं. कॅलिफोर्निआ हे कॅलिफोर्निआ असल्याने त्यांचे पोल्युशन नियम अजुन तिरपाकडे. ते पण त्या लेटर हेडवर लिहुन आणायचं. हे परत डीलरशिपकडून चालत नाही तर कार तयार करणार्‍या कंपनी कडूनच पाहिजे.
तेच कॅनडात एका ठिकाणी सगळी कामं झालेली.
आता भारताशी (आपण रहात होतो त्या काळातील) तुलना केली तर अमेरिका बरीच आहे. पण कॅनडात आणखी सोपं झाल्याने अमेरिकेचा प्रकार गोंधळी वाटलेला.

तरी मी ते 'person undertaking the voyage', 'vessel' वगैरे मिस करतोय. साधं पॅसेंजर ला 'पर्सन अंडरटेकिंग द व्हॉयेज' वगैरे म्हटलं की मला तर मी सुभाषचंद्रांसारखा जर्मन पाणबुडीतून जर्मनीहून जपानला निघालोय असं वाटायला लागतं. >>> Lol

अमित - मी ते नियम गेले २-३ वर्षे फॉलो करत आहे. एकूण आता हे नियम प्र-चं-ड सोपे केले आहेत आणि सुनिधीने दिलेल्या माहितीत मला काही गोंधळ उडवणारे वाटले नाही. ही माहिती साधारण २०२१ मधे साइटवर आली. आणि त्यातही डिसेंबर २०२२ पर्यंत हे ही नियम शिथिल केले होते. आत्ता जानेवारीपासूनच ते खरे लागू झाले - अपलोड वगैरे. कदाचित माझ्या रेफरन्स मधे आधीची महाक्लिष्ट भाषा असेल पण हे नियम सोपे वाटतात. मुले लहान असताना ओसीआय काढले जाते. मग २० वर्षांनंतर एकदा री-इश्यू करायचे. त्यानंतर तीस वर्षे काही नाही. मग ५० नंतर नवीन फोटो ई. अपलोड करायचे. मधली १०-२० वर्षे जो कॉम्प्लिकेटेड प्रकार सुरू होता त्यापेक्षा हे खूप सोपे झाले आहे.

फक्त एकच कल्पना नाही. अपलोड केल्यावर एक ऑटोमेटेड नोंद आली. पण साइटनुसार एक कन्फर्मेशन यायला हवे. ते आले नाही. आता एक महिना झाला फोटो वगैरे अपलोड करून.

बाकी आपल्याकडची सर्कारी भाषा, वाक्ये अनावश्यक क्लिष्ट बनवणे, काही विशिष्ठ पारिभाषिक इंग्रजी शब्द ("संस्कृतोद्भव" हे सुपरलोल होते Happy ) हे जायला अजून थोडा वेळ लागेल. सरकारी लोकांच्या डीएनए मधेच ते आहे. एखादी गोष्ट "Free" आहे न लिहिता "Gratis" आहे लिहीणे वगैरे.

अमित हे जुने कोविडपूर्व काळातले सांगतोयस का ? की कोविडदरम्यात काळात ? अमेरिकेत ( इथे न्यूजर्सीत तरी) डीएमव्ही मधे खूप वेळ लागणे हे कोविड काळात आणि थोडे नंतर खूप जास्त होत होते. मी पहाटे ४ ला गेले होते लायसन्स रीन्यूअलसाठी लाइन लावायला. आता पुन्हा सुधारले आहे म्हणे.
पासपोर्टला ही तेच. गेल्या २ वर्षा मधे खूप स्लो झाले होते. आता पुन्हा अपॉइन्टमेन्ट घेउन जाता येतेय इथे तरी , तसे केले की अगदी झटपट काम.

लायसन्सला आमच्या राज्यात वॉक ईन बंदच केले कोविडनंतर. आता माहिती नाही. पासपोर्ट अ‍ॅप्लिकेशन तर पुर्वीपासुनच फक्त अपॉईंट्मेन्ट घेऊनच करता येते. आता ऑनलाईन सुरु केलाय. जायची, जुना पासपोर्ट पाठवायची गरज नाही.

>>तुम्हाला एक फॉरेन कंट्री अगदी थोड्या त्रासात सिटिझनशिप देतोय लोक्स. Appreciate it<<
धिस साउंडेड लाइक ए टँट्रम थ्रोन बाय ए ग्रंपी ओल्ड सोशॅलिस्ट. मोरोबां कडुन आलं याचं आश्चर्य वाटलं. Wink असो...

बाय्दवे, ओसिआय इज ए प्रिविलेज, भारत सरकारने मूळ भारतीय आणि त्यांच्या वंशजांना दिलेला; जे वेगळ्या देशाचे नागरिक आहेत. सो इंडिया इज नॉट ए फॉरेन कंट्रि टु देम. शिवाय माझ्या माहितीनुसार कोणाचीहि ओसिआय बाबत तक्रार नाहि, तक्रार आहे ती द वे इट हॅज बिन हँडल्ड बाय द "बाबूज". ओसिआय सुरु झाल्यापासुन माझ्याकडे आहे, आणि गेल्या १६ वर्षांत त्यात सतरांदा बदल केले गेले आहेत, डिस्पाइट इट वाज इंट्रोड्युस्ड अ‍ॅज ए लाइफलाँग विजा. ड्युय्ल सिटिझनशिप सारखाच प्रकार असल्याने दे डीडंट हॅव टु रिइन्वेंट द व्हिल ऑर बॉयल द ओशन. जस्ट लूक अराउंड हौ इट इज इंप्लिमेंंटेड. पण नाहि. इट वाज रॅन लाइक ए एफिंग एक्स्परिमेंट, अँड द अर्ली अ‍ॅडाप्टर्स वर ट्रिटेड लाइक ए स्केप्गोट. तक्रार हि आहे...

शिवाय माझ्या माहितीनुसार कोणाचीहि ओसिआय बाबत तक्रार नाहि, तक्रार आहे ती द वे इट हॅज बिन हँडल्ड बाय द "बाबूज". >> +१०००००

“सो इंडिया इज नॉट ए फॉरेन कंट्रि टु देम. शिवाय माझ्या माहितीनुसार कोणाचीहि ओसिआय बाबत तक्रार नाहि, तक्रार आहे ती द वे इट हॅज बिन हँडल्ड बाय द "बाबूज".” “दे डीडंट हॅव टु रिइन्वेंट द व्हिल ऑर बॉयल द ओशन” - टोटली अ‍ॅग्रीड

राज, तुम्हाला पूर्वी जे अनुभव आले त्याबद्दल सहानुभूति आहे. ओसीआयचं इंप्लिमेंटेशन बदलत राहिलं हे पण मान्य. तसं तर एचवन्बीचं पण बदलत राहिलंय. पण मी स्पेसिफिकली सुनिधी यांनी वर लिहिलेल्या रिन्युअलच्या सिम्प्लिफाईड नियमांबद्दल लिहिलं आहे. तुम्हाला फक्त एक रिन्युअल फॉर्म भरायचा आहे. दोन फोटोकॉपीज अपलोड करायच्या आहेत. नोटरी नाही की फोटरी नाही. त्यातही तुम्हाला 'सरकारी इंग्लिश' समजत नसेल किंवा काही डाउट असला तर सध्या जी कुठली इंटरमिजियरी एजन्सी आहे त्यांना फोन केल्यावर गाईड करतात. डॉक्स सबमिट केल्यावर लगेच अ‍ॅकनॉलेजमेण्ट येते आणि महिन्याभराने तुमचे डिटेल्स अपडेट झाल्याचं कन्फर्मेशन येतं. आणि हे सगळं फुकट. यात 'भोंगळ कारभार' कसला आला?
इंडिया इज नॉट ए फॉरेन कंट्रि टु देम>>
असहमत. पण इथे अवांतर नको. आय अ‍ॅग्री टू डिसॅग्री.

मला Photo Upload करताना पूर्वी खूप Problem होता, पण हल्ली कुणाकडून तक्रार ऐकली नाही...

आज ओसीआय साठी नवर्‍याने फॉर्म भरायला घेतला, तर पत्ता लिहिताना झिप कोड लिहिताना एरर मेसेज आला. (सेव केलेल्या भागापासून पर फॉर्म भरायला गेल्यावर टेंप आयडी , कॅपचा भरल्यावर रिकामा वेलकम बॅक स्क्रिन रहातो. ३-४ वेळा प्रयत्न केला. काय करावे?

ब्राऊझर बदलून/ वेगळ्या मशिनवरून बघू शकता. जावा वर्जन वेगळी मिळाली तर कदाचित जाईल पुढे. दोन दिवसांनी बघा. कॉम्प्युटर रीबूट करून बघा. लोकेशन बदलून बघा. ( लोकेशन कोणाची प्रश्न पडला तर यू आर ऑन राईट पाथ Proud )

Pages