https://ociservices.gov.in/welcome
इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्या बर्याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).
दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)
भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..
एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...
असल्या भानगडी बर्याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...
चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...
यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..
Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23
मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..
मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...
टवणे सर, फारएण्ड माहितीसाठी
टवणे सर, फारएण्ड माहितीसाठी धन्यवाद.
माझा पासपोर्ट कॅनडा पोस्टच्या संपामुळे अडकलेला आहे. तो आल्यावर OCI साईट वर पासपोर्ट डिटेल्स ( आणि फोटो) टाकेल. ५० च्या नंतरचा हा पहिला पासपोर्ट आहे आणि " re- issue " शब्दामुळे संभ्रम होतो. नुसते नव्या पासपोर्टचे डिटेल्स आणि फोटो अपलोड करण्या मुळे काम होणार असेल तर उत्तम.
BLS ला काढण्याचा निर्णय चांगला आहे.
<< नुसते नव्या पासपोर्टचे
<< नुसते नव्या पासपोर्टचे डिटेल्स आणि फोटो अपलोड करण्या मुळे काम होणार असेल तर उत्तम. >>
------ पन्नाशी नंतरचा नवा पासपोर्ट आला , मिळायला थोडा जास्तच वेळ लागला.
दुसर्याच दिवशी OCI अपडेट साठी विनंती केली. दोन वेळा प्रयत्न करावा लागला ( माहिती लिहीतांना थोडा विलंब झाला म्हणून system ने log out केले असेल ).
भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले. आता दहा वर्ष तरी OCI अपडेट करावे लागणार नाही यातच आनंद आहे.
ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट
ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट करायचं ना? नवा ओसीआय काढावा लागत नाही हे भाग्यच आहे.
भारतात असतांना OCI कडून नव्या
भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले >>> गुड
धन्यवाद इथे लिहून कन्फर्म केल्याबद्दल. आणि तोपर्यंत कन्फर्मेशन आलेले नसले, तरी भारतात जाताना इमिग्रेशनला काही अडचण आली नाही (नसावी) असे दिसते.
पापो चे नूतनीकरण केल्यावर ई
पापो चे नूतनीकरण केल्यावर ई-मेल पाठवून सूचित केले होते. त्या ई -मेलची एक स्थळप्रत काढून ती स्वप्रमाणित करून ठेवलेली आहे. अजून पर्यंत तरी कोणा महाभागाने त्या बद्दल पृच्छा केलेली नाही त्यामुळे नोंद (रेकॉर्ड) अद्ययावत झाली आहे असे वाटते बट यू नेव्हर नो !
<< ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन
<< ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट करायचं ना? नवा ओसीआय काढावा लागत नाही हे भाग्यच आहे. >>
------ ५० नंतर, नवा पासपोर्ट आल्यावर, केवळ माहिती अपडेट करायची आहे. " reissuance " शब्द वापरणे संभ्रमांत टाकतो , तो योग्य वाटत नाही.
राशन कार्ड , वोटर कार्ड जमा केले आहे याबाबत एक declaration जोडावे लागते.
https://www.cgitoronto.gov.in/docs/1730314174OCI%20Declaration.pdf
<< भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले >>> गुड Happy धन्यवाद इथे लिहून कन्फर्म केल्याबद्दल. आणि तोपर्यंत कन्फर्मेशन आलेले नसले, तरी भारतात जाताना इमिग्रेशनला काही अडचण आली नाही (नसावी) असे दिसते. >>
----- माहिती अपडेट झाल्याचे कन्फर्मेशन यायला ४ ते ८ आठवडे लागतात, पण त्या काळांत प्रवास / प्रवेश करायला काही अडचण आली नाही.
ज्या जुन्या पासपोर्ट मधे " life long " OCI चे स्टिकर आहे तो सोबत ठेवला होता. कुणी विचारणा केली नाही, दाखवण्याची गरज पडली नाही.
अपडेट ची प्रक्रिया सुरु असतांनाच्या काळांत, OCI च्या साईटवर " new passport information received " , "in process " आणि शेवटी "Granted " असे बदल दिसतांत.
Pages