New OCI/OCI Renewal करून घेणे, त्यातल्या समस्या, उपाय व अतिरिक्त माहीती...

Submitted by परदेसाई on 15 January, 2020 - 11:40

https://ociservices.gov.in/welcome

इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).

दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)

भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..

एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...

असल्या भानगडी बर्‍याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...

चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्‍याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...

यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..

Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23

मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..

मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मुलांसाठी ओसिआय प्रोसिजर करत आहे.. आता फोटो आणि सहि (इमेज) पटकन वर चढवता ( अपलोड) आले... सवय झाल्याने एका तासात सगळे कागद्पत्र आणि ऑन्लाईन प्रकार पुर्ण केले..

बरं झालं हा धागा वर आला... मुलींचे पासपोर्ट expire झाले आहेत... आता सगळे सोपस्कार + OCI सगळं परत करावं लागणार!

कॉक्स आणि किन्ग्स ची काय खबरबात.. ? भारतात पगार न मिळाल्यामुळे ते संपावर गेले म्हणे.. इथे कुणाला काही माहीत असल्यास सांगा..

कागदपत्रे पाठवल्यानंतर कोविडमुळे कॉक्स आणि किन्ग्स वाले ७२ तास हात लावत नाहीत.. (न्यूयॉर्क कॉन्सुलेट जनरल)..

माझे सगळे (कुटूंबाचे ) OCI करून पूर्ण झाले..... एकदा Reject झाल्यामुळे दुप्पट पैसे पाठवले त्यातले UPS पैसे वगळून उरलेले चेक ने पाठवले आहेत...

मी केलं नाहीये recently पण SOS Global Indian Group आहे फेसबुक वर तिथे वाचलं की दीड दोन महिने लागत आहेत सध्या ...तो ग्रुप जॉईन करून चेक करू शकता....अजून माहिती मिळेल कदाचित

कुणी केलं का ओसीआय नवीन वेबसाईट वर? कोणाला काही अनुभव? >> मी काल कन्येच्या OCI रिन्यूअल साठी सुरुवात केली. पहिल्यांदा OCI काढला त्यावेळेला प्रोसिजर CKGS वर आणि जरा वेगळी होती. आता VFS वर कुणाला अनुभव आहे का?

आतापर्यंत काढलेल्या माहितीनुसार नवीन प्रोसेस बद्दल काही प्रश्न पडले आहेत ते असे

१. https://ociservices.gov.in/welcome या संकेतस्थळावर पार्ट B नंतर जे Affidavit in Lieu of Originals व parental authorization हे सुद्धा अपलोड करावयाचे आहेत, ते notarized करून मग अपलोड करायचे आहेत का? असे असेल तर OCI Renew चा छापील अर्ज, हे दोन डॉक्युमेंट्स notarized करून, अपलोड करून मग प्रिंट करावे का?
२. OCI Renew चा छापील अर्ज : यात शेवटच्या पानावर notarized करावयाचे आहे. पण त्या फॉर्म वर जिथे साह्य करायच्या आहे तेथे अशी नोटरी साठी जागाच नाही आणि पेरेंट्स साठी सही करायला फक्त एकच जागा आहे. या ठिकाणी नोटरी करायला कुणाला अडचण आली का?

१. हे आधी नोटरी करून अपलोड करायचे
२. अडचण नाही आली. पान नं ३ वर, डीक्लेरेशन च्याा खाली भरपूर जागा होती.

लल्लन्टाप प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..

१. हे आधी नोटरी करून अपलोड करायचे >> ओके , पण मग अगोदर हे दोन डोकमेंट्स नोटरी करायचे मग अपलोड कराचे . त्यानंतर मेन अँप्लिकेशन ची प्रिंट काढून ती नोटरी करायची, कारण डोकमेंट्स लिस्ट मध्ये तोपर्यंत ते दोन लेटर्स दिसणार नाहीत.
२. अडचण नाही आली. पान नं ३ वर, डीक्लेरेशन च्याा खाली भरपूर जागा होती.>> हो जागा भरपूर आहे पण Form need to be notarized असे म्हटलेले नाही.

ओके , पण मग अगोदर हे दोन डोकमेंट्स नोटरी करायचे मग अपलोड कराचे . त्यानंतर मेन अँप्लिकेशन ची प्रिंट काढून ती नोटरी करायची, कारण डोकमेंट्स लिस्ट मध्ये तोपर्यंत ते दोन लेटर्स दिसणार नाहीत. >> बरोबर.

हो जागा भरपूर आहे पण Form need to be notarized असे म्हटलेले नाही. >> हे मलापण कन्फ्युसिंग होते, पन रिस्क ( परत कुरियर) नको म्हनून केले notarize.

oci renewal is simplified -
The new rules say each time cardholders under the age of 20 get a new passport they have to upload a copy of that document, and an up-to-date photo of themselves to the OCI portal.

After turning 20 this is not required, even if a new passport has been issued.

The passport and photograph only need to be updated once more - after the individual turns 50.

https://www.ndtv.com/india-news/oci-cardholders-rules-for-re-issue-of-ov...

बरं झालं. लल्लन्टाप धन्यवाद.
फक्त हे OCI च्या website वर कुथेच दिसत नाहि. नवीन passport आला तर कुठे docs upload करयची हे पण काही मिळाले नाहि. एखादा नवीन रुल आला तर तो website वर लगेच update करायला हवा खरे तर.

आज बातम्यातही लिंक आहे.. तेव्हा आम्ही सोडले तर इतरांचे भले होईल.. चांगले आहे.. कुठलिही कामं करताना सोप्पं होईल तितकं बरं..

>>ईथे आलीय थोडी माहीती <<
हा नविन नियम आता आल्याने, एक बाब क्लियर नाहि.

जे आत्ता २०+ आहेत, पण त्यांनी ओसिआय कधीच रिनु केलेला नाहि (लाइफलाँग, रिनु करा असा नियम पुर्वि नसल्याने), जुना पासपोर्ट ज्यावर ओसिआय स्टँप आहे तो प्रवास करताना सोबत ठेवला. त्यांनी आता ओसिआय रिनु करण्याची आवश्यकता आहे का, कि डायरेक्ट पन्नाशी ओलांडल्यावर...

राज असे बरेच गॉचाज आहेत. हळू हळू क्लीयर होतील अशी आशा धरूया. १८ वर्षांखालील ३ महिन्यांचा नियम पण अर्धवटच आहे. कदाचित बातम्यांमधे ठळक मुद्देच दिलेले असावेत.

बहुधा आत्ताचे ओसीआय कार्ड हे ज्या पासपोर्ट च्या संदर्भाने काढलेले आहे तो पासपोर्ट जर २० वयाच्या आधीचा असेल, तर एकदा रिन्यू करावे लागेल. मग पन्नाशीपर्यंत नाही.

हे असे भोंगळ, ओपन टू इंटरप्रिटेशन नियम बनवायचे, त्यात भारतात प्रवेश करताना काही आडकाठी करायची नाही. पण देश सोडताना तिरपाकडे नियम दाखवुन दंड घ्यायचा. हे मुंबईच्या इमिग्रेशन हापिसरने इनडायरेक्टली मलाच सांगितलं होतं. त्यात सुधारणा होणे नाही.

>>बहुधा आत्ताचे ओसीआय कार्ड हे ज्या पासपोर्ट च्या संदर्भाने काढलेले आहे तो पासपोर्ट जर २० वयाच्या आधीचा असेल, तर एकदा रिन्यू करावे लागेल. मग पन्नाशीपर्यंत नाही.<<
मेक्स सेंस. पण "सत्तेपुढे शहाणपण चालत नाहि", म्हणुन त्यांच्याकडुनच क्लॅरिटी मिळालेली बरी... Wink

"म्हणुन त्यांच्याकडुनच क्लॅरिटी मिळालेली बरी" - एक वेळ तुम्ही डेमोक्रॅट्स ना मत द्याल, पण भारतीय सरकारी कायदे / नियम वगैरे बाबतीत क्लॅरीटी मिळाणार नाही. Happy साधे कोव्हिड काळातले प्रवासाचे नियम वाचले तरी पटकन कळत नाही नेमकं काय करायचंय ते. बाकी शाब्दिक क्लिष्टता हा तर वेगळाच विषय आहे. (साधं 'traveler' न म्हणता, 'person(s) undertaking the voyage' म्हणतात Happy )

Pages