Submitted by Adm on 16 June, 2021 - 16:11
दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा पाच वर्षांनी होणार आहे. यंदा हा सोहळा जपानमधल्या टोक्यो इथे पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ह्या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रिडाप्रकार खेळले जातील तसेच तब्बल ४२ ठिकाणी सामने रंगतील. ही स्पर्धा जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपली असूनही स्पर्धेवर कोव्हिड महामारीमुळे अनिश्चिततेचे सावट आहे.
ह्या काळातही शक्य होईल तशी खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. अमेरिकेत तसेच इतर देशांतही ऑलिंपिक ट्रायल सुरू झाल्या आहेत.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की गेल्या दोन वेळांप्रमाणे अॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.
ही वेबसाईटः https://olympics.com/tokyo-2020/en/
अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
४०० मी मधे अनपेक्षित रित्या
४०० मी मधे अनपेक्षित रित्या हुकलं ना तिचं. >>>> अच्छा. मला वाटलं सिमोनसारखं काही झालं ! ८०० मिटरला परत लिडेकी, टिटीमस होणार पुन्हा.
टेबल टेनिस- चीनचा अनुभवी
टेबल टेनिस- चीनचा अनुभवी सुवर्णपदक विजेता वि. टीपीईचा तरूण खेळाडू ( सेमीफायनलला). टेटेची सर्वोत्तम अटीतटीची व अप्रतिम कौशल्यपूर्ण मॅच ! चायनीज 4 -3 जेमतेम जिंकला !
कालची कॅनडा-कोरिआ वुमेन्स
कालची कॅनडा-कोरिआ वुमेन्स बास्केटबॉल मस्त झाली. हाफ पर्यंत कॅनडा दोन्/तीन पॉईंटने पुढे होता. शेवटच्या क्वॉर्टर मध्ये एकदा १० ला लीड मिळवला आणि मग मात्र तो टिकवुन ठेवला. अॅटॅक आणि डिफेन्स दोन्ही मस्त केलं पोरींनी. आता एलिमिनेशन्स मधली पुढची गेल्यावेळच्या विजेत्या स्पेन बरोबर शनिवारी आहे बहुतेक.
मेन्स रोईंग डबल्स बघायला मजा आली. क्रोएशिआचे सिंकोव्हिक ब्रदर्स जिंकले. रोमेनिआला सिल्वर मिळाले. परवा वुमेन्स रोईंग मध्येही रोमेनिआला गोल्ड मिळालेले. मेन्स मध्ये कॅनडा ब्राँझ मिळवतंय असं शेवटच्या काही सेकंदात वाटून तसं काही झालं नाही. डेन्मार्क लेस दॅन अ सेकंद पुढे आलं.
मेरी कोम हरली तिच्याकडून
मेरी कोम हरली
तिच्याकडून अपेक्षा होती. सिंधू , दीपिकाकुमारी आणि पदकाच्या आशा जिवंत ठेवल्यात अजून. हॉकी पुरुष संघही घोडदौड करतोय अस वाचलं.
तीरंदाजी -अतनु दास ने लंडन
तीरंदाजी -अतनु दास ने लंडन ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या कोरियन खेळाडूला टायब्रेकरमध्ये हरवलं. तोही शेवटच्या आठ मध्ये पोचलाय
अतनु दासची मॅच मस्त झाली काल.
अतनु दासची मॅच मस्त झाली काल.
स्विमिंगमध्ये महिला ४ बाय ४०० मध्ये चीनने अनपेक्षित रित्या सुवर्णपदक मिळवलं. खरा सामना ऑस्ट्रेलिया वि अमेरिका होणार अशी अपेक्षा होती. पहिल्या तीन लेग्ज नंतर अमेरिकेला ब्रांझवर समाधान मानवं लागणार की काय अशी वेळ होती पण लेडीकीने शेवटचा लेग जोरदार पोहून ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं. तिने शेवटचा पन्नास मिटरमध्ये प्रयत्नांनी पराकाष्ठा करत चीनी बाईलाही मागे टाकायला प्रयत्न केला. स्पीड खूप वाढवला होता पण आधी गमावलेला लीड कमी करण्यात अपयश आलं! आधी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया (टीटिमस!) ने बरीच मेडल मिळवली.
मागच्या वेळी फेल्प्सला हरवणारा सिंगापुरी बच्चा जोसेफ स्कुलींग १०० मिटर फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत पोचू शकला नाही. पण अजून बटरप्लायची रेस बाकी आहे.
सकाळी सकाळी अमेरिका वि टर्कीची व्हॉलिबॉलची मॅच मस्त झाली. अमेरिकन बाया पाचव्या सेट (?) मध्ये जिंकल्या.
रच्याकने, परवा इराण वि अर्जेंटीना पुरुषांची बास्केटबॉलची मॅच लागली होती. इराणी पुरुष एकदम "अमॅच्युअर" पद्धतीने खेळत होते. एकदम गल्ली क्रिकेट बघितल्यासारखं वाटलं.
https://youtu.be/NBkyth_KT3E
https://youtu.be/NBkyth_KT3E
हे बघाच!!
अशक्य केलंय.
(No subject)
बीच वर सनबेदिंग करणार्या
अर्थात बघायला जाम फनी असलं तरी करणारा माणूस रिस्क घेऊन हे असं खरंच करतो की त्यांची परमिशन घेऊन री-एनॅक्ट करतात कोण जाणे.
बीच वर सनबेदिंग करणार्या
बीच वर सनबेदिंग करणार्या माणसाशी रेस्लिंग बघून फार हसले. >>>> हो सेम !!
भारी आहे व्हिडीयो..
दीपिकाकुमारीनेही शूट ऑफमध्ये
दीपिकाकुमारीनेही शूट ऑफमध्ये सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली
https://olympics.com/tokyo-2020/olympic-games/en/results/archery/results...
लोविना बाॅकसींगमधे आक्रमक
लोविना बाॅकसींगमधे आक्रमक खेळत क्वार्टर फायनल जिंकली !
महिला हाॅकी टीमने आज सुंदर समन्वय दाखवत अप्रतिम खेळ केला. तब्बल 14 पेनल्टी काॅरनर आयरलँड विरूद्ध मिळवूनही शेवटीं फक्त 1-0 असा विजय मिळवून क्वार्टर फायनलकडे आगेकूच.
दीपिका कुमारी उपान्त्य पूर्व
दीपिका कुमारी उपान्त्य पूर्व फेरीत पराभूत.
लवलिना बोरगोहेन मुष्टियुद्ध.
लवलिना बोरगोहेन मुष्टियुद्ध. उपान्त्य फेरीत पोचली. एक पदक पक्के
एक पदक पक्के>>>
एक पदक पक्के>>>

सिंधू जिंकली . आता एक मॅच
सिंधू जिंकली . आता एक मॅच जिंकली की पदक पक्के . किती सुंदर खेळली ती जपानविरुद्ध . आतापर्यंत तिने एकपण सेट गमावला नाही . ह्या वेळी सुवर्ण जिंकेल असा confidence नक्कीच दिसतोय . तिला शुभेच्छा
सिंधुचा सामना ताइ त्झु यिंगशी
सिंधुचा सामना ताइ त्झु यिंगशी आहे. ताइ त्झु यिंग ही परिपूर्ण खेळाडू आहे, तिच्या खेळात कुठलीही कमकुवत बाजू नाहिये. बघुया पुढला सामना सिंधुला कसा जातो ते! फिंगर्स क्रॉस्ड
मी यामागुची बरोबरच्या मॅचची क्षणचित्रे पाहिली. सिंधुचा नेट आणि कोर्टच्या पुढल्या भागातला खेळ खुपच सुधारला आहे. ताइ त्झु यिंगबरोबर तिने नेट खेळ केला तर खूप फायद्याचा ठरेल. ताइ त्झु यिंगसुद्धा मुख्यत्वे करून पॉवर खेळाडू आहे. तिचा र्हिदम नेट/ड्रॉप/ड्रिबल ने नक्कीच बिघडेल.
आणि सिंधुचा आत्मविश्वास तुफान आहे. यामागुचीबरोबर ती १८-२० मागे होती दुसर्या गेममध्ये. तिच्या हातून २-३ साध्या टाळत्या येण्यासारख्या चुका झाल्या होत्या. मात्र ती एकदम शांत होती. तिथून सलग ४ गूण मिळवत तिने सामना जिंकला. तिने मानसिक स्वास्थ्य यावर खूप मेहनत घेतलेली दिसते.
*आणि सिंधुचा आत्मविश्वास
*आणि सिंधुचा आत्मविश्वास तुफान आहे.* - फिटनेस, सटॅमिना व प्रतिस्पर्धी ओळखून आंखायचया डावपेंचाची जाणही खूपच सुधारलयाचं जाणवतं. . शुभेच्छा.
अतनु दास पराभूत. सामना
अतनु दास पराभूत. सामना चुरशीचा झालेला दिसतोय
https://olympics.com/tokyo-2020/olympic-games/en/results/archery/results...
सिन्धु हारली
सिन्धु हारली
होय , सिंधुचा अपेक्षित खेळ
होय , सिंधुचा अपेक्षित खेळ झाला नाही
सिन्धूने कांस्यपदक मिळविले. .
सिन्धूने कांस्यपदक मिळविले. ..
हाॅकी - ग्रेट ब्रिटन विरूद्ध
हाॅकी - ग्रेट ब्रिटन विरूद्ध अप्रतिम खेळ करत भारत 3-1 ने जिंकला ! आतां सेमीत विश्वासपूर्वक प्रवेश!! शुभेच्छा!
हाॅकी - आनंदी आनंद !! महिला
हाॅकी - आनंदी आनंद !! महिला संघाने आज कमाल खेळ केला व सेमीत प्रवेश !! बलाढ्य ऑसीज संघाला हरवलं 1-0 !
अभिनंदन व शुभेच्छा!!
भारतीय महिला हॉकीच्य
भारतीय महिला हॉकीच्य सेमीमध्ये !! चक दे इंडिया !
भारतीय महिला हॉकी संघांनं
भारतीय महिला हॉकी संघांनं सगळ्यांचे अंदाज चुकवत पहिल्यांदाच ऑलिंपिक महिला हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
महिला आणि पुरुष हॉकी संघाला
महिला आणि पुरुष हॉकी संघाला पदकासाठी शुभकामना!
अरेरे, पुरूष हाॅकी संघाने
अरेरे, पुरूष हाॅकी संघाने पहिली 45 मिनीटं अप्रतिम खेळून शेवटच्या सत्रात कांहींशी ढिलाई करत 2-2 स्कोअर वरून 2-5 अशी हार पत्करली !! बॅड लक !!
( पण, हाॅकीचं आपलं हक्काचं स्थान 50 वर्षांनंतर परत मिळवण्याची ताकद या संघात आहे , हे निर्विवाद! )
गोल्ड मेडल शेअर केलं. हॅरी
गोल्ड मेडल शेअर केलं. हॅरी पॉटर मूमेंट.
https://twitter.com/al_watanQatar/status/1422232075034415105
Pages