Submitted by Adm on 16 June, 2021 - 16:11
दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा पाच वर्षांनी होणार आहे. यंदा हा सोहळा जपानमधल्या टोक्यो इथे पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ह्या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रिडाप्रकार खेळले जातील तसेच तब्बल ४२ ठिकाणी सामने रंगतील. ही स्पर्धा जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपली असूनही स्पर्धेवर कोव्हिड महामारीमुळे अनिश्चिततेचे सावट आहे.
ह्या काळातही शक्य होईल तशी खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. अमेरिकेत तसेच इतर देशांतही ऑलिंपिक ट्रायल सुरू झाल्या आहेत.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की गेल्या दोन वेळांप्रमाणे अॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.
ही वेबसाईटः https://olympics.com/tokyo-2020/en/
अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॅडमिंटन मेन्स डबल Sony ten 2
बॅडमिंटन मेन्स डबल Sony ten 2 वर लाईव्ह होती. त्याचवेळी मीराबाई चानूची मॅच Sony ten 3 वर लाईव्ह होती.
Star sports ने भारतीय entry
Star sports ने भारतीय entry च्या वेळी मंत्र्याचा close up अर्ध्या screen मध्ये दाखवून रसभंग केला
खेळाडू नीट दिसलेच नाहीत.>> खरंच त्या अनुराग ठाकूरचा चेहरा का दाखवला हे अनाकलनीय आहे.
पि. व्ही. सिंधू तर नीट दिसलीपण नाही.
महिला हॉकी मध्ये हरलो नेदरलँड
महिला हॉकी मध्ये हरलो नेदरलँड कडून
बॅडमिंटन मेन्स डबल बघितली काय
बॅडमिंटन मेन्स डबल बघितली काय कोणी. वर्ल्ड रँकिंग 3 चायना संघाला हरवलं आपण.फुल्ल टशन झाली. मजा आली >>> बघितली. +++10000.
बी साई प्रणिथ इस्रायेलच्या
बी साई प्रणिथ इस्रायेलच्या खेळाडू कडून धकादायक हारला
हाॅकीमधला नयूझीलंड विरूद्ध
हाॅकीमधला नयूझीलंड विरूद्ध विजय खूपच महत्वाचा, आश्वासक व आशादायक.
बोकलत
बोकलत
टवणे सर, अजून एक संधी
टवणे सर, अजून एक संधी प्रणितला आहे असे वाचले.
हे बीजेपीचे मंत्री एवढे
हे बीजेपीचे मंत्री एवढे गांवंढळ आणी प्रसिध्दीकरिता का हपापलेले असतात की त्यांना खेळाडूंपेक्षा स्वत:ची थोबाडे अधिक गोंडस वाटतात? कुठे चाललोय आपण? काल बातमी आहे की तुम्ही कामगिरी नीट केली नाही तर ॲथ्लेट्सवर कारवाई केली जाईल? तिकडे छप्पन इंची म्हणतात “निर्भय होकर खेलो” किती विरोधाभास हा!
किती टेन्शनमध्ये खेळाडू खेळत असतील !
अभिनंदन आणि धन्यवाद मीराबाई
अभिनंदन आणि धन्यवाद मीराबाई चानू.
बॅडमिंटन मेन्स डबल मी बघितली.
बॅडमिंटन मेन्स डबल मी बघितली. >>>>> हो मेन्स डबल्सची मी पण बघितली. चांगली झाली.
तिरंदाजी मध्ये पुन्हा एकदा निराशा >>>> हो ! तिरंदाज वाईट खेळले. खूप ६ / ७ पॉईंटर्स मारले.
टवणे सर, अजून एक संधी प्रणितला आहे असे वाचले. >>>> हो ग्रुप स्टेजमध्ये एका पेक्शा अधिक मॅचेस असतात. त्यामुळे अजून अगदीच बाहेर नाही पण एक मॅच हरली की अवघड होतं गणित.
Star sports ने भारतीय entry
Star sports ने भारतीय entry च्या वेळी मंत्र्याचा close up अर्ध्या screen ......
पण सोनी टेन टू चानेलवरही असेच केले गेले. ही एडिटिंग कशी केली गेली? हे चानेलस तर प्राइवेट आहेत. मंत्रालयाकडून आदेश दिले असावेत. इतर देशांंच्या वेळी त्यांचा कुणी उच्चपदस्थ असल्यावर दोनचार सेकंद त्याला दाखवले गेले तसेच हवे होते.
ते मंत्रीमहोदय जपानला
ते मंत्रीमहोदय जपानला गेलेलेच नाहीत. दिल्लीत एका स्टेडियम मध्ये बसून उद्घाटनाचा सोहळा पाहत होते.
----------
या ऑलिंपिक्समध्ये भारतीयांच्या कामगिरीबद्दल माहितीसाठी
https://twitter.com/Tokyo2020hi
सिंधू जबरी खेळली आणि एकदम
सिंधू जबरी खेळली आणि एकदम किरकोळीत जिंकली.
स्विमिंग रेसेच नेहमीप्रमाणेच अत्यंत भारी झाल्या!
मेन ४०० इंडिविज्युअल मेडलेमध्ये अपेक्षेप्रमाणे कालिझ आणि लिथरलँड ह्या अमेरिकनांनी बाजी मारली पण इंटरेस्टींग होतं ते ऑस्ट्रेलियन स्मिथच ब्राँझ मेडल. तो २० वर्षांचा आहे आणि इतक्या मोठ्या लेवलवरचं हे पहिलच मेडल. वय बघता तो अजून दोन ऑलिंपिक नक्कीच खेळेल. एकंदरीत ह्याला फॉलो करायला पाहिजे. दोन अमेरिकन इतके इमोशनल झालेले की ते फोटोमध्ये स्मिथला घ्यायला विसरूनच जात होते.
पुढची रेस सगळ्यात भारी. मेन ४०० मिटर फ्रीस्टाईलमध्ये ट्युनिशियाचा हाफनोई (?) अतिशय अनपेक्षितपणे जिंकला आणि गोल्ड मिळवलं. तो हीटमध्ये तळाशी होता पण फायनलमध्ये अफाट पोहोला ! तो पण फक्त २०-२१ वर्षांचा आहे. उज्ज्वल भविष्य.
)
नंतर बायकांच्या ४०० मिटर फ्रीस्टाईलमध्येही जपानी ओहाशी बाकी दोन अमेरिकन बायांना मागे टाकून जिंकली. जपानचं हे पहिलं गोल्ड. ओहाशी खूपच इमोशनल झाली होती.
आणि मग शेवटची मेडल रेस बायांची ४ बाय १०० फ्रिस्टाईल म्हणजे हल्ली बातम्यांमध्ये म्हणतात तसं काटें की टक्कर ! गेल्या दोन स्पर्धांमधले विनर ऑस्ट्रेलिया गोल्डमेडलचे प्रबळ दावेदार होते आणि तेच जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या नंबरवर पोहोणार्या बाईने अफाट लिड मिळवून दिला आणि तिच्या पोहोण्यानंतर त्यांचं गोल्ड पक्क झालं. त्यांनी स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड पण मोडला. खरी चुरस झाली ती दुसर्या आणि तिसर्या नंबर साठी. त्यात जवळ जवळ प्रत्येक फेरीत मागे पुढे होत होतं आणि कॅनडाने शेवटच्या १०० मिटरमध्ये मुसंडी मारून आणि त्यातही शेवटचा पन्नास मिटरमध्ये अमेरिकेला मागे टाकून सिल्वर मिळवलं. खूप चुरस झाली आणि एकदम मजा आली. (आम्ही घरात खूप ओरडा आरडा केला आणि मग ज्योई भुंकायला लागला.
त्याआधी मी स्केटबोर्डीगही बघितलं. दोन्ही जपानी चांगले करत होते पण काय झालं कळलं नाही.
प्रिया मलिक ला सुवर्ण,
प्रिया मलिक ला सुवर्ण, अभिनंदन.. हे वर्ल्ड रेसलिंग मधले आहे .
टेबल टेनिस - बात्रा 2-0
टेबल टेनिस - बात्रा 2-0 पिछाडीवरून अप्रतिम खेळ करून दुसरी फेरी जिंकली.
हाॅकी - मध्यंतराला ऑसीज विरूद्ध 0-4 अशा वाईट स्थितीत !!
मेरी काॅम विजयपथावर !
टेबल टेनिस - बात्रा 2-0
टेबल टेनिस - बात्रा 2-0 पिछाडीवरून अप्रतिम खेळ करून दुसरी फेरी जिंकली. ऑलिंपिकमधे तिसरी फेरी गाठणारी पाहिली भारतीय महिला !
हाॅकी - मध्यंतराला ऑसीज विरूद्ध 0-4 अशा वाईट स्थितीत !!
मेरी काॅम विजयपथावर !
(No subject)
पावसाचा जोर असला तर लांब उडीच्या स्पर्धेची प्रॅक्टीस करत परत या, जलतरण स्पर्धेत उतरायला थांबू नका !!!
भाऊ,
भाऊ, !!
काल हाॅकीमधे जर्मनीच्या
काल हाॅकीमधे जर्मनीच्या बलाढ्य संघाविरुध्द आपल्या महिला संघाने चांगलीच झुंज दिली. ( भारत 0, जर्मनी 1)
स्विमिंग रेसेच नेहमीप्रमाणेच
स्विमिंग रेसेच नेहमीप्रमाणेच अत्यंत भारी झाल्या! >> +१
४ बाय १०० फ्री स्टाईल फार भारी झाली. वुमेन्स बटरफ्लाय १०० मी मध्ये ही कॅनडाच्या मॅकनीलने सही गोल्ड मिळवलं.
वुमन्स ४०० मी फ्रीस्टाईल तर अशक्य भारी झाली. अमेरिकेची लडॅकी शेवटच्या ५० मी मध्ये मागे पडली आणि ऑस्ट्रेलियाच्या टिटमसने गोल्ड मिळवले. तिसर्या नंबरसाठी ही कॅनडाची समर मॅकिंटॉश येणार येणार वाटत असताना चायनाने शेवटच्या ५० मी. मध्ये बाजी मारली.
समर मॅकिंटॉश फक्त १४ वर्षांची आहे. बाकीच्यांच्या तुलनेत केवढी लहान दिसत होती, पण कसली पोहत होती! अजुन बरीच ऑलिंपिक्स आहेत तिला!
विमेन्स ६४किलो वेटलिफ्ट मध्ये कॅनडाच्या कॅरनला गोल्ड मिळालं. ब्रांझसाठी कोलंबिया आणि ब्रिटनच्यांना नाही उचलता आलं याचं फारच वाईट वाटलं. कसल्या भारी होत्या त्या पण.
>>आम्ही घरात खूप ओरडा आरडा केला आणि मग ज्योई भुंकायला लागला.>> पराग, आरडाओरडा रेकॉर्ड करुन https://sticktogether.ca/ इथे पाठव. कसली भारी आयड्या आहे!
मॅगी मॅकनिलला हाय पॉवरचा
मॅगी मॅकनिलला हाय पॉवरचा चष्मा आहे. पोहताना ती कॉन्टॅक्ट किंवा प्रिस्क्रिप्शन गॉगल्स वापरत नाही. त्यामुळे स्पर्धा संपल्यावर तिला बोर्डवरचे दिसत नसल्याने कळत नव्हते की ती कितवी आली आहे. त्या क्षणी तिचे भाव पाहण्यासारखे होते
महिलांच्या सायकल रोड रेसमध्ये नेदरलँडच्या चमूला पेलेटोनच्या पुढे नेमक्या किती स्पर्धक आहेत ते माह्हिती नव्हते. त्यामुळे जेव्हा त्यांनी फ्रान्स आणि इस्रायेलच्या दोन सायकलपटूंना मागे टाकले तेव्हा त्याच्याही पुढे ऑस्ट्रियाची अॅना किसेनहॉफर आहे हे त्यांना समजलेच नाही. नेदरलँडची अनेमिक वॉनव्लुटनने दोन्ही हात उंचावून सुवर्णपदक मिळाले आहे या भावनेने पोझ देत अंतिम रेषा पार केली. पण जेव्हा तिच्या कोचने तिला ती दुसरी आली आहे हे सांगितले तेव्हा ती प्रचंड हिरमुसली. जबरदस्त झाली ती रोड रेस.
अॅना किसेनहॉफर ही मुख्य स्पर्धकात गणलीही जात नव्हती. ती युरोपात व्यावसायिक स्पर्धांमध्ये भाग घेत नाही, तिला कोणी स्पॉन्सर नाही, तिला कोचही नव्हता. त्यामुळे तिचा विजय अजून खास. ती विनेन्नामधून अंडर ग्रज्युएट, केम्ब्रिजमधून ग्रज्युएट आणि कॅटलान मधून डॉक्टरेट आहे आणि युनिवर्सिटीत शिकवते, विषय "गणित"!!
कॅनडाचे १०मी डायविंगमध्ये थोडक्यात पदक हुकले. अर्ध्या गुणापेक्षाही कमी फरकाने. मेघन बेन्फेइटो आणि केली मॅकेची चौथी उडी फारच चुकीची झाली आणि गूण एकदम कमी झाले. चौथी उडी नेहेमीच्या पर्फॉर्मन्सपेक्षा ६०% जरी असती तरी त्यांना रौप्य वा कांस्य मिळाले असते. स्पर्धा संपल्यावर मेघने केलीला पाठुंगळी घेऊन आली पत्रकार परिषेदत. तीन-चारच आठवड्यापुर्वी केलीचा घोटा सराव करताना इतका जोरदार दुखावला की डॉक्टरांनी तिला ८ ते १० आठवडे पाउल टेकवायला सुद्धा मनाई केली होती. तरीही तिने जिद्दीने सराव चालू ठेवत, स्पर्धेत भाग घेतला. किती वेदनांचा तिने सामना केला तिलाच ठाउक.
पुरुष दुहेरीत चिराग आणि सात्विकने तैपेईच्या जोडीला हारवून स्वत:चे चान्सेस अगदी भक्कम केले होते. इन्डोनेशियाचे केविन संजया सुकामोइलो आणि मार्कस गिडिआन जे मिनिअन्स नावाने ओळखले जातात हे ग्रुपस्टेजमधले सर्व सामने जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. आणि तिथेच माशी शिंकली. तैपेईच्या जोडीने काय खेळ केला माहिती नाही पण त्यांनी मिनिअन्सना हारवले. त्यामुळे मिनिअन्स, तैपेई आणि भारत अश्या तिन्ही जोड्यांनी २ सामने जिंकले. पण गेम्स जिंकले-हारले या फरकावर मिनिअन्स आणि तैपेई जोडी पुढे गेली
हार्ड लक सात्विक आणि चिराग!!
अमेरिकेची लडॅकी शेवटच्या ५०
अमेरिकेची लडॅकी शेवटच्या ५० मी मध्ये मागे पडली आणि ऑस्ट्रेलियाच्या टिटमसने गोल्ड मिळवले. तिसर्या नंबरसाठी ही कॅनडाची समर मॅकिंटॉश येणार येणार वाटत असताना चायनाने शेवटच्या ५० मी. मध्ये बाजी मारली. >>>> परवा आणि काल मिळून बर्याच अंडरडॉग्जनी मेडल मिळवली. लिडीकी, लिलि किंग, रायन तिघेही गोल्डचे दावेदार पण सिल्वर किंवा ब्राँझवर समाधान मानावे लागले.
मॅकिंटॉश भारी आहे. ती आहे आहे फायनलला परत.
डायव्हिंगच्या सगळ्या मॅचेसही खूप भारी होतायत. परवा ब्रिट मुलांच्या जोडीने चायनाला हरवून गोल्ड जिंकलं. शेवटच्या उडीपर्यंत ठरत नव्हतं की कोणाला गोल्ड मिळणार! कॅनडाच्या मुलींना ब्राँझ मिळालं. त्या उडी मारायच्या आधीचे काउंट फ्रेंचमध्ये देत होत्या "आ दु त्वा"
जपाननेही भरपूर गोल्ड मिळवलीयेत आत्तापर्यंत.
स्कॉट करी, न्यूझीलंड चा रगबी
स्कॉट करी, न्यूझीलंड चा रगबी सेव्हन्स प्लेअर पण सायन्स टीचर आहे. सही खेळला तो. त्यांची आणि कॅनडाची मॅच अगदीच एकतर्फी झाली पण.
अमेरिकेला बरेच अपसेट्स
अमेरिकेला बरेच अपसेट्स मिळालेत यावर्षी! केटी लडेकी. आता सिमॉन बायल्स - स्टार जिम्नॅस्ट नी स्पर्धेतून माघार घेतली. शारिरीक आणि त्यासोबतच मानसिक दुखण्याशी झगडत असल्याचं तिने सांगितलं. हार्टब्रेकिंग झालं अगदी.
सिमॉननं फक्त टीम इव्हेन्टमधून
सिमॉननं फक्त टीम इव्हेन्टमधून माघार घेतली ना? फारच वाईट वाटलं.
टीम इव्हेन्ट मधून काल आणि आता
टीम इव्हेन्ट मधून काल आणि आता पुढचा कुठला ऑल अराउंड फायनल ईवेन्ट होता त्यातून पण विदड्रॉ केले म्हणे.
कित्येक महिने प्रॅक्टिस, अपेक्षांचा भार यातून गेलीच असेल, आणि इथपर्यन्त येऊन आता असं झालं, की समहाऊ शी वॉज नॉट एबल टु टेक इट एनी मोर की माघारच घ्यावी लागली त्याचे फार वाईट वाटले.
ओह्ह...
ओह्ह...
परवाच्या फ्लोर मध्ये ती एकदा मॅटच्या बाहेर गेलेली तो आणि व्हॉल्टचा इव्हेंट बघितलेला. ऑल टाईम अॅथलिटला माघार घ्यावी लागली बघुन वाईट वाटले. अर्थात अशा वेळी माघार घेणे हे जास्त कठिण असेल, ते केल्याबद्दल ती आणखीनच ग्रेट वाटली.
केटी लडेकी >>>> काय झालं ?
केटी लडेकी >>>> काय झालं ? काल गोल्ड मिळालं ना तिला..
उद्या ८०० मिटरला पण आहे.
ऑसी टीटिमस भारी आहे एकदम.
सिमोनची बातमी वाचून वाईट वाटलं. युएसची काही काही गोल्ड अगदी थोडक्यात निसटली ह्यावेळी. बाकी "इंग्लिश स्पिकिंग कंट्रीज" चांगली कामगिरी करतायत यंदा. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. जपान त्यांच्या यजमानपदाला साजेसा खेळ करतायत आत्तापर्यंत तरी.
चायनाचं गोल्ड हुकलं की मला फार फार आनंद होतो.. !
रच्याकने, ह्या सगळ्या धामधुमीत २०३२ चं यजमानपद ऑसीज ना मिळाल्याची बातमी निसटली. ब्रिस्बेनला होणार स्पर्धा. ह्यांची बरीचशी स्वीम टीम ब्रिस्बेनचीच आहे म्हणे.
केटी लडेकी >>>> काय झालं ?
केटी लडेकी >>>> काय झालं ? काल गोल्ड मिळालं ना तिला.. >>> ४०० मी मधे अनपेक्षित रित्या हुकलं ना तिचं. टिटमस ने घेतलं ते गोल्ड.
काल १५०० मी. मधे लडेकी ने मिळवलं फायनली.
Pages