टोक्यो ऑलिंपिक्स २०२१

Submitted by Adm on 16 June, 2021 - 16:11

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा पाच वर्षांनी होणार आहे. यंदा हा सोहळा जपानमधल्या टोक्यो इथे पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ह्या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रिडाप्रकार खेळले जातील तसेच तब्बल ४२ ठिकाणी सामने रंगतील. ही स्पर्धा जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपली असूनही स्पर्धेवर कोव्हिड महामारीमुळे अनिश्चिततेचे सावट आहे.

ह्या काळातही शक्य होईल तशी खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. अमेरिकेत तसेच इतर देशांतही ऑलिंपिक ट्रायल सुरू झाल्या आहेत.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की गेल्या दोन वेळांप्रमाणे अ‍ॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.

ही वेबसाईटः https://olympics.com/tokyo-2020/en/

अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*गोल्ड मेडल शेअर केलं. हॅरी पॉटर मूमेंट.* - ऑलिंपिकमधला सुवर्ण क्षण !!!
लोविना सेमीत विश्वविजेत्या प्रतिस्पर्धी विरूद्ध हरली पण बाॅकसींगमधे कांस्य पदक.
कुस्तीत भारतीय स्पर्धक विजयपथावर.
दु. 3.30ला भारतीय महिला हाॅकी संघाची सेमी फायनल ! शुभेच्छा !

खरंय, हें मंगळसूत्रच माझं सुवर्णपदक आहे ! फक्त, तें अडथळ्यांच्या शर्यती ऐवजीं बाॅकसींगमधलं मिळायला हवं होतं मला !!!
20210726_190356_0.jpg

कुस्ती - ५७ किलो वजनी गटात रवी कुमार दाहिया अंतिम फेरीत
स्त्रियांच्या ५७ किलो वजनी गटात अंशु मलिकला पराभूत करणारी मल्ल अंतिम फेरीत पोचल्याने अंशुला repechage फेरीत पदकाची संधी.

Lovlina Borgohain Won Bronze Medal.

Amazing. ...
All three medals till now are by women

Hats off to these spirited fighters..

यायायययाय... हॉकीमध्ये कांस्य पदक!!!! माझ्या लहानपणापासून फक्त पराभव आणि जुन्या दिवसांचे कौतुक ऐकत आलो होतो. काय तुफान सामना झाला हा. पहिल्या मिनिटात जर्मनीने गोल केला, मग ३-१ ने आघाडी घेतली जर्मनीने. आणि मग भारताने ४ गोल करत ५-३ आघाडी. आणि शेवटी ५-४ ने सामना जिंकला.

अफाट!!

हे पदक या ऑलिम्पिक्समधले माझ्यासाठी सगळ्यात खास पदक आहे. आता जर महिलांनीही सामना जिंकला तर मग खासच होईल.

हाॅकी- आनंदी आनंद !! उद्या महिला संघ हा आनंद द्विगुणीत करेलच !!पाहायला
* लहानपणापासून फक्त पराभव आणि जुन्या दिवसांचें कौतुक ऐकत आलो होतो. * - खरंय. नशीबाने ( म्हणजे, माझ्या वयामुळे ) मला त्या ' जुन्या दिवसां'ची ओसरती झलक तरी पहायला मिळाली होती. हाॅकीची खरी जादू !!

रवि दहियाचे अभिनंदन.

महिला हॉकी संघाने जर सामना जिंकला तर मजा येईल.

आदिती अशोक गॉल्फमध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. त्यातले काही समजत नाही त्यामुळे तिला जिंकण्याचा किती चान्स आहे, स्पर्धा कशी आहे वगैरे माहिती नाही.

Sad !!!

खतरनाक पेनल्टी शूट आउट - सो मेनी मिसेस अँड सेव्ज बाय बोथ गोलकीपर्स!! गो कॅनडा गो!!

ट्रॅक अँड फिल्ड मध्येही आन्द्रे दी ग्रास ने एक सुवर्ण, २ कांस्य, डेकॅथलॉनमध्ये डेमियन वार्नरचे सुवर्ण, ५०००मीटर्समध्ये मोहमद अहमदचे रौप्य. उत्तम कामगिरी.

हो. गेम फारच मस्त झाला.
पहिल्या हाफ मध्ये कॅनडा टोटल डिफेंसिव्ह होती. बॉल अलमोस्ट सगळा वेळ कॅनडाच्या पोस्ट कडे होता, आणि अर्थात स्विडनने संधी साधुन गोल केला. दुसर्‍या हाफ मध्ये थोडा अ‍ॅटॅक आणि पासेस होऊ लागले पण स्विडन तरीही स्विफ्टली बॉलचा ताबा घेत होते. त्यात एक पेनल्टी कॅनडाला मिळाली आणि जेसी फ्लेमिंगने बेस्ट शूट करुन सामना १-१ बरोबरीत आणला. मग अर्थात अटीतटीचा सामना चालू झाला.
एक्स्टा टाईम मधुन पेनल्टी मध्ये गेला, आणि कॅनडाच्या गोली लेबेने खतरा शूट्स अडवले. ती कसली सही आहे! मस्त हसत हसत खेळते आणि स्प्लिट सेकंद मध्ये गोल कुठे जाईल ते बरोबर ओळखुन अडवते. शेवटी स्विडन २-१ आघाडीवर होते आणि स्विडनच्या कॅप्टन सेगे ने गोल मिस केला. तो त्यांचा विनिंग शॉट ठरला असता पण बॉल उंच गेला.
आणि शेवटी व्हॅंकुअरच्या ज्युलिआ गासोने सामना जिंकवुन दिला! मजा आली!
हो! परवा दीग्रास मस्त धावला. तो आधी बास्केटबॉल खेळायचा. त्याची बॅक स्टोरी पण सही आहे.
डेमिअन वॉर्नर तर अमेझिंग आहे. कसला साधा वाटला तो. डिकॅथलॉन मध्ये गोल्ड जिंकल्यावर त्याच्या घरच्यांच्या बरोबर कॅमेरावर त्याची मुलाखत ऐकली. बायको, मुलगा, आई, काका, बहिण... एकदम लव्हेबल कुटुंब आणि डेमिअनपण!

भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदक
नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी दूर भाला फेकून आघाडी पटकावली. दुसर्‍या फेरीत ८७.५८ मी. अशी कामगिरी सुधारली.
झेको स्लोव्हाकियाच्या जेकबने पाचव्या फेरीत ८६.६७ मी फेक करून सहाव्या वरून दुसर्‍या स्थानी झेप घेतली होती. पण त्याचा सहावा प्रयत्न बाद ठरला.

गोल्ड जिंकलो. नशीब फेकफेकीच्या या स्पर्धेत शेठ न्हवते नाहीतर तीनही मेडल त्यांनीच मिळवले असते.

मस्तच ! फायनली गोल्ड!! अदितीला पण पदक मिळायला हवं होतं! अगदी जवळ येऊन हुलकावणी!
एकूण यावेळी भारताची कामगिरी खूपच सरस वाटली पण हार्टब्रेक फार झाले.

नीरज चोप्राचा थ्रो भारी होता ! अखेर सुवर्ण पदक.
आज भारताचा शेवटचा दिवस होता. आत्तापर्यंतची बेस्ट कामगिरी ! संपूर्ण टीमचे अभिनंदन !

नीरज चोप्रा! वॉव

आदिती अशोक थिडक्यात हुकले पदक, सुरेख आणि आत्मविश्वासाने खेळली ती.

सिफान हसान : ५००० मीटर आणि १००००मीटर सुवर्ण, १५०० मी मध्ये कांस्य! या तिनही अन्तरात सुवर्ण जिंकण्याचे तिचे ध्येय होते जे हुकले. पण धावपटुंच्या ऑल टाइम ग्रेट्स मध्ये तिने नाव नोंदवले आहे.

Pages