सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवस १२९ चित्र ५५ सर्वांना धन्यवाद Happy
Simona_0.jpeg (Credit: Simona) शाळा ऑनलाईन झाल्या नि बालगीते जुनाट झाली. आता 'शाळेला निघताना पाऊस' त्याची काही गंमतच नाही कारण शाळेत जायला घरातून निघावेच लागत नाही. शाळेभोवती तळे साचले न साचले तरी सुट्टी मिळाली. लॉकडाऊनमध्ये आठवड्यातून रविवार तीनदा काय सहादा येऊन गेले. सध्या 'आकाशवाणी पुणे' इ फारसे ऐकले जात नाही त्यामुळे बालगीते अपडेट करायची जबाबदारी कुणावर आहे माहिती नाही Happy पण कुणीतरी आजच्या बाल पिढीच्या विश्वाशी समरस गाणी लिहील असा आशावाद आहे. त्या 'कुणीतरी'ला खूप खूप शुभेच्छा!!

दिवस १३० चित्र ५६ _/\_

SharonDodo.jpeg (Credit: Sharon Gerald) शार्क टँक शो भारतात येत आहे!!!!!! विविध लघुउद्योजक/ जिका आपले प्रॉडक्ट पेश करतात व चार शार्क उर्फ गुंतवणूकदारांकडून भांडवलासाठी पैसे उभे करतात असे साधारण शो चे स्वरूप आहे. हे लघुउद्योजक ह्या गुलाबी 'डोडो' पक्ष्यासारखे बरेचवेळा 'फ्लाईटलेस' असतात. शार्कच्या मदतीच गरज असते पण कंपनीत कमीतकमी वाटा द्यायचा असतो. कधी प्रॉडक्ट कैच्याकै वाटते, तर कधी शार्क लोक फार भामटेगिरी करतात असे वाटते, तर कधी शार्क त्यांचा शार्कपणा सोडून एकदम प्रेमाने पैसे देतात. भारतातले 'शार्क' कोण असतील ? सर्व शार्कपदासाठी उत्सुक लोकांना शुभेच्छा.

दिवस १३१ चित्र ५८ धन्यवाद! सियोना, तुझ्यामुळे ही पोस्ट सुचली. Happy
Elpadawan.jpeg(Credit: El padawan) भारतात शार्क होवू शकतील अशी चार नावे माझ्या मनात आली. या मध्ये विविध वयोगट, विविध इंडस्ट्रीज, शो साठी आवश्यक शोमनशिप, कामाचा अनुभव असे विविध निकष डोक्यात आले. त्यामुळे अर्थात या चारजणांपेक्षा अधिक योग्य इतरही मंडळी असतील, माझा अभ्यास इतकाच कामी आला! . १. विल्यम बिस्सेल - फॅब इंडियाचे मालक २. कुणाल बहल - स्नॅपडीलचे मालक ३. युसूफ हमीद - सिप्लाचे मालक ४. दिव्या गोकुलनाथ - बैजूस ची मालक किंवा फाल्गुनी नायर - नायकाची मालक. जे "शार्क" म्हणून शोभले नसते पण तरी ऋषितुल्य म्हणून हवे होते असे - व्हर्गिस कुरियन (अमूलचे जनक). आवडते "शार्क" शोधण्यासाठी शुभेच्छा!!!

https://www.strangewonderfulthings.com/278.htm ते खरंच फुलपाखराचे झाड आहे!!!!!!!!!!!!! मी रेड प्लांट लीव्हज बटरफ्लाय सर्च टर्म दिली तर सापडलं Lol

दिवस १३२ चित्र ५९
sheilasund.jpeg (credit:Sheila Sund)
लाईफ १०१: शिवणकाम नाही आले तरी चार टाके आयुष्य सोपे करतात - धावदोरा, टीप, उलटी टीप, आणि हेम. या चार टाक्यांसाठी (शिकणे व शिकवणे) शुभेच्छा!

दिवस १३३ चित्र ६० काय खेदजनक बातमी आहे! खरं तर आज टेक्नॉलॉजीमुळे एक एक सारस ट्रॅक करून संख्या वाढवू शकतो पण तिथल्या अधिकार्‍यात इच्छाशक्तीचा अभाव असेल तर परिस्थिती अजून बिकट होत जाईल. निरू बातमी शेयर केल्याबद्दल धन्यवाद. मृ धन्यवाद!!
modak.jpeg (Credit: Tiana Kelly) युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये नुकतीच काकतीय रूद्रेश्वर मंदिराची भर घातली. हे देऊळ तेलंगणात असून अतिशय हलक्या वजनाच्या विटांनी बनवलेले आहे. करोनाकाळानंतर प्रवास शक्य झाल्यावर ह्या स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत नमुन्यास भेट देण्यासाठी अगणित शुभेच्छा!!

दिवस १३४ चित्र ६१ धन्यवाद.
chess.jpeg(credit: Sharon Gerlad) अनेक जागी मास्कची सक्ती उठवण्यात आली होती कारण कोव्हीड केसेस कमी झाल्या होत्या. आता पुन्हा मास्क वापरण्याचे आदेश जारी करावे लागतील असे अंदाज वर्तवले जात आहेत कारण केसेस परत वाढीस लागल्या आहेत. करोना आणि मनुष्य यांच्यात जणू बुद्धीबळाचा खेळ चालू आहे. ह्या खेळात जिंकण्यासाठी शुभेच्छा!!

सुरेख शुभेच्छा सी ,धन्यवाद. मनिम्याऊ यांचा फोटो ही
छान. रूद्रेश्वराचा फोटो बघून आले, अतिशय सुंदर. आता त्याची नीट काळजी घेतील. चांगली बातमी.

छानै सारस.
प्रतिशुभेच्छा आणि आभार!

दिवस १३५ चित्र ६२ धन्यवाद!!
fdecomite.jpeg (Credit: fdecomite) लव्हलीना बोर्गोहाईन ही भारतीय बॉक्सर आज टोक्यो ऑलिंपिक्सच्या सेमीफायनल्स मध्ये गेली. जागतिक क्रमवारीत ती सध्या ३ नंबरवर आहे.... पण फिल्मी शुभेच्छाच द्यायच्या तर- अरे कासा नही, चांदी नही, अरे हाऊ मेनी टाईम्स आय हॅव टोल्ड, टोल्ड, टोल्ड... बेबी गोल्ड गोल्ड गोल्ड!!!! ... आणि हो, ती वेल्टरवेट गटात खेळते. आता वेल्टरवेट म्हणजे काय विचाराल तर १४०-१४७ पाऊंड खेळाडूंचा गट (६३.५-६७ किलो). आजचा सोनेरी सारस लव्हलीनाला शुभेच्छांसाठी.

दिवस १३५ चित्र ६३
red.jpeg (Credit: Dominic Alves) सध्या मी 'राधिका मदन' ची फॅन झाले आहे. तिच्या सिरीयल्स नाही पाहिल्या पण एक-दोन सिनेमे पाहिले नि काम आवडले. उगीचच सलमा हायेकची आठवण येते. आता फॅन म्हणल्यावर तिने कोणते रिमिक्स करावे असले बिनकामाचे विचार मनात आलेच. माझ्या विशलिस्टची तीन गाणी - 'तोहे लेके सावरिया निकल चली बे', 'इट्स दि टाईम टू डिस्को' (हो, अजून याचे रिमिक्स आले नाही १८ वर्षात!!) आणि 'हवा के साथ साथ' (ह्याचे ही अज्जून रिमिक्स नाही) !! आवडत्या कलाकाराची रिमिक्स लिस्ट बनवण्यासाठी शुभेच्छा.

सोनेरी सारस आणि डिझाइन वाला सारस..दोन्ही शुभेच्छा मस्त.
राधिका मदन चे मी दोन सिनेमे पाहिलेत अंग्रेजी मीडीअम आणि पटाखा. पटाखामधली बडकी भारीच. Happy

मलाही सलमा हाएक फार आवडते, राधिका मदनही मस्त आहे. कालच तिची 'फील्स लाइक इश्क' नेफिवर पाहिली, आवडली. आभार.

Pages