
[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]
सारस शुभेच्छा
शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.
खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.
म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!
आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.
कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.
असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.
धाग्याचे नियम काय -
शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.
शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही
(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)
अटेंशन टू डिटेल' करण्याची
अटेंशन टू डिटेल' करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी शुभेच्छा!!>>>>>>> शुभेच्छांसाठी खूप आभार.
छान सारस आणि शुभेच्छा
छान सारस आणि शुभेच्छा
छान सारस आणि शुभेच्छांसाठी
छान सारस आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद
दिवस १२१ चित्र ४६ धन्यवाद!!
दिवस १२१ चित्र ४६ धन्यवाद!!
(credit: Duststorm) काल लाल-काळ्या रंगसंगती वरून काय आठवलं ते सांगितलं. आज ह्या पांढर्या नि केशरी बुट्ट्याने काय आठवलं?? हे खरं तर उबंटू सॉफ्टवेयरचे लोगो आहे. पण मला आठवली कॅटनिस. दि हंगर गेम्स पुस्तकाचे ३ भाग ~१० वर्षापूर्वी आले. मागच्या वर्षी चौथा भाग आला. मला आज कळालं.... असंच काही तरी बिनमहत्त्वाचं पण तरी सुखावणारं कळण्यासाठी आजच्या शुभेच्छा.
ग्रे area मधल्या गोष्टी
ग्रे area मधल्या गोष्टी क्लिअर होऊ देत
संकल्पना स्पष्ट होऊ दे
Client ने व्यवस्थित requirement देऊ दे
ह्याच शुभेच्छा
(सी ताई style मध्ये )
साभार pixabay
दोन्ही सारस-शुभेच्छा छान.
दोन्ही सारस-शुभेच्छा छान.
आभार.
दिवस १२२ चित्र ४८ किल्लीताई
दिवस १२२ चित्र ४८ किल्लीताई
का गरिबाची थट्टा चालू आहे. असो. मृ आणि किल्लीताई धन्यवाद.
(credit: Steven Tom) रोज एक नवा व्हेरियंट - अल्फा, बेटा, गॅमा, डेल्टा.... तरी मी आशावादी आहे की ही पँडेमिक पटकन संपेल. ... का काय विचारता?? .... अहो, नायतर शास्त्रज्ञांनी व्हेरियंट्सना ग्रीक नावे कशाला ठेवली असती, मराठीच ठेवली असती. ग्रीक अक्षरे २४ आहेत तर मराठी ५२!! सर्वाधिक मूळाक्षरे असणारी भाषा शोधण्यासाठी शुभेच्छा.
सी आणि इतर सगळ्यांच्या हटके
सी आणि इतर सगळ्यांच्या हटके आणि कल्पक शुभेच्छा वाचून दिवस खरोखरच छान नोटवर जातो आहे! फारच सुरेख उपक्रम!
आजचा सारस मस्तै आणि शुभेच्छा
आजचा सारस मस्तै आणि शुभेच्छा पण.
आभार!
दिवस १२३ चित्र ४९ धन्यवाद मृ
दिवस १२३ चित्र ४९ धन्यवाद मृ आणि जि.
(Credit: Joy) शुक्रवार आला पण कामं संपली नाही. काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं खायचं आहे पण करायला वेळ नाही. अशावेळी (गेल्या वर्षीची) माझी हमखास "गो-टू" रेसिपी संजीव कपूरची अचारी पीनट बटर करी. कायतरी वेगळं आवडतं सैपाकात करण्यासाठी शुभेच्छा.
किती गोड सारस क्रंची दिसताएत
किती गोड सारस क्रंची दिसताएत
कुरकुरीत सारस शुभेच्छांसाठी
कुरकुरीत सारस शुभेच्छांसाठी धन्यवाद
दिवस १२४ चित्र ५० दोघींना _/\
दिवस १२४ चित्र ५० दोघींना _/\_
(credit: tommpouce) आज बीबीसी वर वाचलं डोरिक नावाच्या स्कॉटलंडमधील भाषेत पावसाला समानार्थी २० शब्द आहेत. मराठीत मला ३ च शब्द आठवले - पाऊस, मेघवृष्टी, पर्जन्य. मराठीत पावसाला समानार्थी शब्द आठवण्यासाठी शुभेच्छा.
वर्षाा बाकीच्यांना खो देते,
वर्षाा
बाकीच्यांना खो देते, अजून आठवू देत
सारस छान! शुभेच्छांसाठी धन्यवाद
शुभेच्छा साठी आभार!
शुभेच्छा साठी आभार!
सर्वच शुभेच्छा अभिनव, आभार !
सर्वच शुभेच्छा अभिनव, आभार
!
दिवस १२५ चित्र ५१ सर्वांना _/
दिवस १२५ चित्र ५१ सर्वांना _/\_
(credit: h2o_appleday) अमेरिकन 'क्यूसिन' म्हणल्यावर त्यात कोणते कोणते पदार्थ येऊ शकतात हे आठवावेच लागेल कारण अमेरिका हा 'इमिग्रंट्स' चा देश. भिन्न भिन्न खाद्यसंस्कृती जगभरातून एकत्र आल्या. अमेरिकन मातीत कुठला पदार्थ जन्मला? कपकेक!! १७९६ सालाच्या आसपास अमेरिकेत कपकेक बनवण्याची सुरूवात झाली असावी. याचा ब्रिटीश भाऊ 'फेयरी केक' पण त्यावर ना फ्रॉस्टींग असायचं ना आकार कपकेक इतका घसघशीत. डझन कपकेक फडशा पाडण्यासाठी आजच्या शुभेच्छा!!
डझन कपकेक फडशा पाडण्यासाठी
डझन कपकेक फडशा पाडण्यासाठी आजच्या शुभेच्छा!!>>>>>तुलापण शुभेच्छा
आभार!
दिवस १२६ चित्र ५२ मृ धन्यवादच
दिवस १२६ चित्र ५२ मृ धन्यवादच !!
(Credit: Darko Pevec) आज मी ठार नापास झाले. रोज एखादे सारस चित्र नि शुभेच्छा लिहीण्याचा प्रयत्न असतो. पण हा असला फोटो पाहून 'काय नतद्रष्ट कार्टं आहे!' हाच विचार आला, त्या फोटोग्राफरला द्यायला काही शुभेच्छा सुचल्याच नाही. जाऊ द्या... कागदी सारसबद्दल फालतूची एंपथी ज्यांना ज्यांना वाटली त्या सर्वांना आजचा दिवस छान जाण्यासाठी खूप शुभेच्छा.
ओह नो..हे काय असंच वाटलं ना
ओह नो..हे काय? असंच वाटलं ना चित्र पाहून
आजचा दिवस छान जाण्यासाठी खूप शुभेच्छा.>>>>> माझ्या कडून पण... आभार!
कोणीतरी येऊन त्याला सोडवेल
कोणीतरी येऊन त्याला सोडवेल अशी शुभेच्छा देते. तो सारस अख्खा राहण्याच्या शुभेच्छा!
सारस शुभेच्छांची गरज आहे मला.
सारस शुभेच्छांची गरज आहे मला. टाईम म्यानेजमेंट मध्ये रोजच फेल आहे. कामे खूप आहेत पण वेळ अपुरा पडतो.
यादी कर कामांची, किती दिवसात
यादी कर कामांची, किती दिवसात झाली पाहिजेत ते समोर लिही, त्या प्रमाणे आणि कामाच्या इंपॉर्टन्स प्रमाणे क्रम लाव.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादी करणं. काम झालं कि टिक करायचं.
तू करतच असशील पण तरी सांगितलं
तू करतच असशील पण तरी सांगितलं
धन्यवाद धनुडी सल्ल्यांसाठी .
धन्यवाद धनुडी सल्ल्यांसाठी . प्रयत्न करत आहे.
ओके, उद्या टाईम मॅनेजमेंट
ओके, उद्या टाईम मॅनेजमेंट स्पेसिफीक सारस
_/\_
दिवस १२७ चित्र ५३ सर्वांना
दिवस १२७ चित्र ५३ सर्वांना धन्यवाद
मस्त आहे निळा-करडा सारस.
मस्त आहे निळा-करडा सारस..शुभेच्छा पण छान. आभार!
धन्यवाद सीमंतिनी। या सारस
धन्यवाद सीमंतिनी। या सारस शुभेच्छा साठी
दिवस १२८ चित्र ५४ धन्यवाद!!
दिवस १२८ चित्र ५४ धन्यवाद!!
(Credit: PS3Attitude) सध्या ९० वणवे कॅनडा व उत्तर अमेरिकेत भडकलेले आहेत. त्यांची व्याप्ती एका दिवसात इतकी वाढली की सुमारे ३००० मैलांवर धूर गेला आहे. ३००० मैल म्हणजे साधारण काश्मीर ते कन्याकुमारी इतकं अंतर!!. आगीच्या परिघातील ४ मिलियन लोकांना कधीही विस्थापित व्हावे लागेल असा इशारा दिलेला आहे.... तर ३००० मैलांवरील शहरात धूरापासून बचावाची किंवा दम्याच्या औषधांचा पुरवठा इ काहीच तयारी नाही. पूर्वीही अशी संकटे आली होती पण ती मानवी हस्तक्षेपामुळे होती (उदा: जंगलात फटाके फोडणे, कँपफायर इ). ह्यावेळी अवचित वळीवाच्या पावसाबरोबर वीज पडली आणि उभे रान पेटले. अग्निशमन दले, स्वयंसेवक लढत आहेत. पण नशीबाच्या साथीची गरज आहे हे नक्की.... गरज आहे तिथे पावसासाठी शुभेच्छा !!
Pages