सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे सारस एक से एक सरस.
अस्मे कार्टून मस्त आलंय. डॅंबिस दिसतोय सारस. काहितरी उचापती करायच्या विचारात.
सारस शुभेच्छांसाठी धन्यवाद. सी थॅंक्यु, आज आजीला भेटवलस .

सर्व सारस शुभेच्छांकरीता सर्वांना थँक्यू/धन्यवाद Happy

>> मनिम्याऊ, श्रवु, विक्रमसिंह व कारवी... सुरेख सारस आहेत.
+१

>> हे क्यूट कार्टून सारस काढले आहे. थोडं चक्रम वाटतं पण ठीक आहे.

खूप खूप छान. रेषांवर हुकूमत आहे. वाह! लेखनासोबत हि सुद्धा कला आहे तुमच्याकडे माहित नव्हतं. :applause:

>> रेडिओवरची एक श्रुतिका नि शनिवारचा मराठी सिनेमा पलिकडे तिला "करमणूक" माहितीही नाही.

Happy आई आठवली :वंदन:

सर्वांचे सारस एक से एक आणि शुभेच्छाही....छान वाटते इथे येऊन.
अस्मिता मस्त आलेय नटखट सारस पिलू. आता पेन्सिल अशीच चालती राहू दे.
बाकी, हरवले ते हरवलेच अख्खे, तुकडे उतरले नाही कुणात, की मीच शोधले नाहीत. प्रसंगा-निमीत्ताने बोलण्याची/लकबीची/गुणांची लख्ख आठवण मात्र येते. मायेशिवाय जगायची सवयही होतेच हळूहळू.

>>>>भावातला करारीपणा, बहिणीतली शिस्त, तिच्या इतर नातवंडातील कर्मनिष्ठा, आणि पतवंडांच्या चोखंदळपणात ह्यात आजी एखाद्या पूर्ण जिग-सॉ पझल सारखी भेटून जाते
वाह!! किती सुंदर.
@अस्मिता - कसला गोड सारस आहे गं. चित्र काढून टाकत जा अधेमधे.

या सारस शुभेच्छांसाठी धागाकर्तीला आणि सर्व सारस शुभेच्छा देणार्‍यांना खूप खूप धन्यवाद.
अस्मिता, सारस फारच गोड आणि खोडकर दिसतोय!

दिवस १०९ चित्र २७ सर्वांना धन्यवाद!
TylerSpaeth.jpeg (Credit: Tyler Spaeth) स्टार किड्सपैकी आरव कुमारने सिनेमात यावे माझी फार इच्छा आहे. त्याने कुठले रिमिक्स करावे याची माझी यादी ही तयार आहे. अक्षरा हसन बरोबर 'ओ मारिया', नीतू कपूर बरोबर 'ना मांगू सोना चांदी' (प्रेमनाथ ऐवजी नीतू Lol ), आणि न्यासा देवगण बरोबर 'ओ मेरे दिल के चैन'.... कुणी म्हणाल "का गं बाई, सीमंतिनी, का????"...... राहिलं... मग चंपक जैन जेव्हा आरव नि इब्राहीम अली खानला घेऊन 'मैं खिलाडी तू अनाडी' काढेल तेव्हा लागतील ह्या डबाभर शुभेच्छा .... घ्या आताच!! Wink

किती क्युट छोटे छोटे सारस ! आणि शुभेच्छा ही.
मला बरंच फुज्ञा ही मिळालं शुभेच्छा बरोबर. नीतू कपूर ला प्रेमनाथ च्या जागी Rofl

सर्वांचे आभार. Happy

धमाल शुभेच्छा. आता कशी वाट लावतात याची वाट बघणे आले. Lol फुज्ञा शब्दाचा कॉपीराईट घ्यावा का या विचारात Wink

सारस खाऊन पिऊन तृप्त असतील तर त्यांच्या शुभेच्छा अजूनच छान असतील..
अशा अनेक तृप्त सारसांच्या शुभेच्छा तुम्हाआम्हाला लाभाव्यात ही सदिच्छा..


दिवस ११० चित्र २९ - चित्रे आणि शुभेच्छांसाठी सर्वांना धन्यवाद!!!
self2.jpg #michki मनिम्याऊने सांगितलेले वैशिष्ट्य आज तपासायचे ठरवले आणि खरचं की - सारस कसाही फेकला तरी खाली बरोबर सरळच उतरतो!! मी खुर्चीवरून फेकला, टेबलावरून फेकला, मी खुर्चीवर चढून मग फेकला... जवळ जवळ ३०-४० ट्रायल्स केल्या. बरोबर सरळच उतरला. काहीतरी एअरोडायनॅमिक्सची भानगड असणार. ९०० दिवसात कधीतरी शोधून वाचायला हवे. डब्यातले शेंगदाणे ते एअरोडाय्नॅमिक्सचे नियम असं काहीही शोधण्यासाठी आजच्या शुभेच्छा.

https://lh3.googleusercontent.com/Wgj2WNWie5bGChqdQwNp6iw-Sp3iec9AeH2ADRPXgNOmVJl43SzwU-sz3swDARdCqRK-vM-yRKzej0LvMkSmUNUh_dM_Vms6rEn-Z1JD859iqpL0Fk-6Arew12GkoYtKSqV9D_H0RUGkr9dRbArd4QeEvFkUTvxh-o1awUxsZBFELYT6DuyyxKh6duVwpU4udVdOsJOZZ-9lWixtLF_4sgE9zY9_Z5psVFntq2XcXVA4LvkBZKCpvkXy83nGFAfY1-yFxhQ3d6272pp0P2o0BQ8x4epU3HJL8PjxKxziKhz_16qQsXoOPJfRKJuSL8gOc06lLi2lUApzVtsucdxiR2jPLJ9bbQYVn2jiDd1fjr72grt_SHx42Ilc05JvmAzZKp-S1odNZGkBt7VUlW6Lrmg18aA-QQbocfsSfThISbfj0QiPDmNBt3FvQ9m4f5-Hhnm-S_FETrPxVEykOgEjxtVPphgFUuSlSKnwShPzBvg4HDq8brvvmpFh0fNz1tCubrJBKC88EmtuTCDDt4dThQdiUq81Hl3kfva0PHiP4v8nOcOX33nMoH_Dh9Sko63im6TtlWKs_eXEutlgooWmWn_dmA-Cgx2ey4CBMU_Abx9EiJxZVv_jMI9-bo5qXEIGbCeDyWIRObFSv6ViB_YxMwcqVno7hufIi__k1GGWn-GBJW8sfnW50aRlveX98ydDbRZzOXikFUKxJLhK5XOUfVMt=s704-no?authuser=0
.
मॅमो नेहमी क्लिअर येण्याकरता सर्वांना शुभेच्छा. Proud

<<मी खुर्चीवरून फेकला, टेबलावरून फेकला, मी खुर्चीवर चढून मग फेकला... जवळ जवळ ३०-४० ट्रायल्स केल्या. >>
बिचारा सारस.. Lol

सारस मस्त...शुभेच्छा ही मस्त..
मागे बनवला होता तेव्हा मुलांनी उडवून उडवून पाडला होता पण मी लक्ष दिले नव्हते आता परत बनवून बघते तो सरळ उतरतो ते. Happy

origami-212763_640.jpg
साभार pixabay
हिरवा रंग सृजनाचे प्रतीक
सर्वांच्या आयुष्यात हिरवाई फुलू दे ह्या शुभेच्छा Happy

निरू फ्लेमिंगो छान.
सी तुझ्या हातातला सारस सही सलामत राहो हि सारसालाच शुभेच्छा Lol गिरकेसिधेखडेहोनेवालेकोसारसकहतेहै
सगळ्यांचे सारस छान छान

दिवस १११ चित्र ३२ सर्वांना शुभेच्छांसाठी आणि चित्रांसाठी धन्यवाद!!!! बर्‍याच जागी मॅमो आणि अन्य प्रीव्हेंटेटीव्ह केयर सुरळीत सुरू झाल्या आहेत.
eagle.jpeg (credit: Sharon Gerald) बाल्ड इगल हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी. मात्र शिकार करणे, डीडीटीचा अतिवापर ह्या मुळे पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. राष्ट्रीय पक्षी नामशेष होवू नये म्हणून ९०च्या दशकात अनेक प्रयत्न झाले. आता ह्या पक्ष्यांची लोकसंख्या स्थिर आहे! "वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें" वृत्ती वाढीस लागण्यासाठी आजच्या शुभेच्छा!!

सुंदर सारस व सुरेख शुभेच्छा, बऱ्याच बाबतीत सजगता ही येतेयं या शुभेच्छांनी , गुड गोईंग सी Happy>>>>> +1 आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद

दिवस ११२ चित्र ३३ . सर्वांना धन्यवाद. निरू, रिकामी पोस्ट दिसते आहे. फोटो टाकला असल्यास नंतर कधी परत पोस्ट करा; Didn't go through.

giantcrane.jpeg (credit: fdecomite) कुणी विचारतं 'अमेरिकेत गेल्यावर कल्चरल शॉक बसला का?' झटका म्हणून काय विचारता... फेफरं आलं होतं मला. म्हणजे विचार करा भारतात गांधीजयंती २६ सप्टेंबर ते ऑक्टोबर ६ च्या दरम्यान कधीही साजरी करतो काय? नाही, २ ऑक्टोबरलाच करतो. अमेरिकेत मात्र युनिफॉर्म मन्डे हॉलिडे अ‍ॅक्ट आहे - शक्यतो सुट्ट्या विकेंडला जोडून दिल्या जातात. म्हणजे १५ जानेवारी ही मार्टीन ल्यूथर किंग यांची जयंती. मात्र या वर्षी सुट्टी १८ जानेवारीला मिळाली. ४ जुलै हा स्वातंत्र्यदिन असा "युनिफॉर्म मंडे" अंतर्गत येत नाही. पण ह्यावर्षी सुट्टी रविवारी आली म्हणून सोमवारी सुट्टी देऊन लाँग विकेंड.... सबब हा असा लोळणारा सारस Happy ... ज्यांना लाँग विकेंड आहे त्यांना मजेसाठी शुभेच्छा.

अईगं, भरुन आलं मला. आमच्या ऑफिस मधे अगदी उलट आहे. शक्यतो शुक्रवार, शनिवारी किंवा सोमवारी येणाऱ्या सुट्ट्या कॅन्सल करतात.माझा बॉस तर म्हणतो सगळ्या सुट्ट्या रविवारी आल्या तर किती बरं होईल. Sad
अमेरिकेत सगळंच आगळं.
लोळी लोळी सारस छान.

<<निरू, रिकामी पोस्ट दिसते आहे. फोटो टाकला असल्यास नंतर कधी परत पोस्ट करा; Didn't go through.>>

मी फोटो टाकला होता गुगल डूडल on सारस म्हणून..
पण तो माझ्या ब्राऊझरने दाखवलेला सारस वाॅलपेपर होता, same like doodle.
म्हणून काढून टाकलं.

origami-4074362_640.jpg
साभार pixabay
सर्वांनाच seasonal fruits भरभरून खायला मिळू देत
जांभळा सारस,
ह्या वर्षी स्वतःच्या मळ्यातली जांभळं खान्याचा योग आला, लग्नानंतर ४ वर्षांनी!!

दिवस ११३ चित्र ३५ सर्वांना थँक्यू! किल्लीताई, क्या बात है!!
Legcrane.jpeg (credit: Eidantoei) एकदा एक सारस विमानाने मुंबईला निघाला. जरा वेळाने बटण दाबून त्याने हवाईसुंदरीला बोलावले. ती आली. सारस हसून म्हणाला "काय नाय ग, जस्ट् मस्ती!". ती निघून जाते. परत दोन वेळा सारस तसंच करतो- "काय नाय गं जस्ट मस्ती". ती चिडून म्हणते, "आता परत केलसं तर त्या पर्सरला सांगेन. तो तुला आपटून धोपटून बाहेर फेकून देईल". सारस पुन्हा तसंच करतो - "जस्ट मस्ती". ती पुढ्यात पुडींग आदळते नि म्हणते - "बिझनेस क्लास मधलं आहे. आता गप बस". पुडींगच्या लालसेने सारसाशेजारी बसलेला बंडू बटण दाबतो. हवाईसुंदरी येते. बंडू म्हणतो - "काय नाय ग, जस्ट् मस्ती!" सुंदरी पर्सरला बोलावते. तो बंडूला आपटून धोपटून विमानाच्या बाहेर फेकतो. हात-पाय मारत खाली जाणार्‍या, ओरडणार्‍या बंडूला खिडकीतून पाहून सारस म्हणतो - "अरे, उडता येत नाही तर "जस्ट मस्ती" कशाला म्हणायचं!!"
पुडींग मिळण्यासाठी आजच्या शुभेच्छा.

Pages