मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत किस्से सगळे... माझ्या काकाने एकदा फोनवर कोणालातरी सांगितलं होतं "हमारे यहा तो इत्ता इत्ता बडा बडा गारा पड रहा है!"

एकदा माझा बॉस फोनवर कोणालातरी सांगत होता "२२ (हे मराठीतच) तारीख को गणपती बसते है" ... मला प्रचंड हसायला आलं.. मी केबीनमधुन उठुनच गेले आणि बाहेर येउन खूप हसलो आम्ही सगळे Rofl

Dakshina
Wednesday, July 18, 2007 - 5:34 am:
-----------------------------------------

माझा collegue हिंदी अत्यंत चुकिचं पण खूप अत्मविश्वासाने बोलतो.

मगच्या आठवड्यात आम्ही कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये गेलो होतो काहीतरी काम होतं म्हणून, तर तो Care Taker दोनदा तीनदा म्हणाला, सर खाना खाके जओ... खाना खाके जओ... तर हा त्याला म्हणे देख कृष्णा... तु मुझे ज्यादा आग्रह मत कर.. नही तो मै सारा खाना खायेगा और तेरे लिए कुछ उरेगा नही...

काल आणि एक किस्सा घडला... seat allocation बद्दल कोणाशीतरी फोनवर बोलत होत... तिकडचा काहीतरी बोलला वाटतं की जागा नाहीए... तर हा म्हणे... 'देख देवेन तू मुझे ये सब मत बोल, मुझे मलूम है. उधर जगा की कोई कमतरता नही हैं.......

आणि जस्ट २ मिनिटांपुर्वी, त्याच्या assistant ला झापत होता.. देख चिन्मय, तु बिल में कुछ गडबड मत कर, क्यूंकी मैं हर बिल इतना बारकाईसे नहीं देखता....

कॉलेजमधे असताना आम्ही काही मित्रमंडळी बसस्टॉपवर उभे होतो. शेजारीच भिंतीवर पब्लिक टेलीफोनचा तो पूर्वी असायचा तसला काळा बॉक्स लावलेला होता. एक माणूस तिथे फोन करायला आला. काही केल्या डायल टोन येत नव्हता. तो माणूस अगदी वैतागला. ते पाहून आमचा एक मित्र म्हणाला - "उसको जरा ठोकके देखो|"

माझ्या मामीला तिची मद्रासी शेजारीण शंकरपाळी कशी करायची ते विचारत होती. मामीनं तिला सांगितलं -तेल, पानी और शक्कर सेम क्वांटिटी में ले लो. उसको उबालो. ठंडा होने के बाद उसमें जितना मावेगा उतना आटा डालो. (मामीला म्हणायचं होतं - त्यात जितकं मावेल तितकं पीठ घाला.) ते मावेगा म्हणजे काय ते त्या शेजारणीला काही केल्या कळेना. मग अजून एक हिंदी-भाषक शेजारीण मदतीला आली. खरं वाक्य असं असायला हवं होतं - उसमें जितना खींचेगा उतना आटा डालो|

<<<<<एक प्रचलित गाणं (कोकणी मुसलमान भाषेतील)
मुम्बै वालीच्या लागुन नादी
माझी उलथून टाकली शादी
काय सांगु मेरी बरबादी रे
सुन मेरी अमीना दीदी

त्याच्यापुढच एक कडवं :

मेरा फरदीन कामाला मिलमें
लई मोहब्बत उसके दिलमें
दावतो शिणेमा , दावतो शिणेमा
बाकस ( बॉक्स) मंदी गं
सुन मेरी अमिना दिदी...

माझ्या वडीलांच्या शाळेत एक हेडमास्तर होते. एकदा सोलापूरात खूप दंगली उसळलेल्या होत्या. त्यानी पोलिस स्टेशनला फोन लावला आणि कारण नसताना हिंदित बोलले" हमारे इस्कूल मे पोलिस भेजो." तिकडून उत्तर आले" देखता हू. एक या दो को भेज देता हू" त्यावर ह्यांचे उत्तर तयार" एक दो से क्या भागेगा हमारा? अछेसे(म्हणजे चांगले) तीन चार भेजो"

अशक्य आहेत सगळे संवाद..ऑफिसमध्ये वाचायचं म्हणजे शिक्षा आहे... Proud

माझ्या समोर परदेशी म्हणुन राहतात. मुलगी आईला सान्गते जल्दी स्टोव्ह बन्द कर नहितू दुध उतु जायेगा. चपाती कैसे बनाएगी मै आटा मळनेका है अभी.

क्या बात है, धन्यवाद आर्या पुढील अंतर्‍याची आठवण करुन दिल्या बद्द्ल. मी विसरलोच होतो, पण धम्माल येते ना ते गाणं ऐकताना?

एक बार क्या हुवा, मै रस्ते से जा रहा था तभी देखा की बिच मे ही एक साप आडवा पडा था,
मुझे पता नही जिंदा था या मरेला,लेकिन मैने विचार किया, की फुकट विष की परिक्षा क्यो लेनेका

माझ्या बहिणीने गावातून पहिल्यांदा मुंबईला आल्यावर स्टीलच्या दुकानात जाऊन त्या दुकानदाराला सांगितले की "वो जो पीठ चाळते है ना जिससे वो दे दो". तो दुकानदार म्हटला की आपको चाळणी चाहिये क्या, तो ऐसा बोलो ना.

माझ्या बाबांचे मित्र कम कलीग शेखकाका शुद्ध मराठी बोलतात पण सगळे विनाकारण त्यांच्याशी आपापल्या हिंदीत बोलत असतात. एकदा बाबा त्यांना म्हणाले, "पण तू नाशिक जानेवाला था ना? वो पोरों के लिये!"
त्यांची मुलं नाशिकला आजोळी गेली होती सुटीत.

कहर आहे! Rofl रोज एक चमचा औषधाप्रमाणे रोज एक किस्सा वाचला की दिवसाचे मस्त सुरुवात होते! Happy

पुर्वी मोदी झेरॊक्समध्ये सर्व्हिस इंजीनीअर म्हणून होतो तेव्हाची गोष्ट....

एका मराठी ग्राहकाकडे गेलो होतो. त्याच्या मशिनमध्ये काही तरी प्रॊब्लेम होता.
त्याला शुद्ध मराठीत विचारले.

"साहेब, नक्की समस्या काय आहे?"

"वो क्याय ना साब, जब प्रिंट काढता हूं ना, तब वो कडे कडे से काळा आता है! और मध्ये मध्ये पण छोटा छोटा डाग पडता है काळा!" Proud Lol

माझी मुलगी नुकतीच हिंदी बोलायला लागली होती.

आमच्या शेजारी मुसलमान होते, त्यांनी इदनिमित्त मोठा बकरा आणलेला, त्याला मागच्या दारी बांधले होते. तो भिंतीवरुन मान उंचाऊन मी लावलेल्या झाडांचा पाला खायचा. माझ्या मुलीने शेजा-यांच्या समवयस्क मुलाला बोलावुन आणले आणि ते दाखवुन त्याला सांगितले, ' तुम्हारा बकरा आमारे झाड के पाले को खाता है, उसको तिदर लेके जाव और उसका चिकन करके उस्को खाव' मी मागुन ऐकत होते... Happy

<<<क्या बात है, धन्यवाद आर्या पुढील अंतर्‍याची आठवण करुन दिल्या बद्द्ल. मी विसरलोच होतो, पण धम्माल येते ना ते गाणं ऐकताना?

वैभव धम्माल म्हणजे अगदी अगदी...मी खुप लहानपणी धुळ्याच्या शेतकी कॉलेजच्या गॅदरींगला ऐकलेले हे गाणे तेव्हापासुन पाठच...!:)

अजुन एक कडवं ऐकायचय?

म्हमईला घरं म्हंजी एकेक खुराडं
एका खुरा-ड्यात चार चार बि-हाडं
बिचमे गोधडी.....बिचमें गोधडी पार्टीशनमंदी गे
सुन मेरी अमिनादीदी...! Proud

आत्ता मी माझ्या टिम मेटशी बोलत होतो....

आज प्रोडक्ट रिलिज मधे कुछ गफला नही ना ? कारण मै दिल ठोकके क्लायटं को बोलदिया हु की रिलिज ऑन टाईम है....

Uhoh

माझी मावशी तिच्या मैत्रिणिला कोणती तरी रेसेपी सांगताना म्हणाली... अब उसपर लिंबू पिल के कोथिंबीर, गीला नरियल छिडकने का और बस हो गया!

वर कोणी बागवानी हिन्दीचा उल्लेख केला आहे. त्याला 'बागलाणी हिन्दी" असे म्हणतात. बागवानीही असेल कारण बागवान मुसलमानान्चा सौद्याच्या निमित्तने सारखा शेतकर्‍यांशी संबंध येतो त्यामुळे ते ही 'क्रिऑल' भाषा बोलत असावेत :). हे उलटे आहे. त्यात खेड्यातले अशिक्षीत मुसलमान मराठी मिश्रीत हिन्दी बोलतात . आमच्या गावा शेजारी पिम्पळगाव तुर्क म्हणून एक खेडे आहे. तिथले मुसलमान बहुधा शेतकरी.भाषा खिचडी. 'दोन रुपयके लिये कायकू इतना जीव काढता है रं?' त्यामुळे आमच्या गावात पिप्पलगावसे आयेला अशी एक फ्रेज होती

आमच्या हायस्कूलच्या ग्यादरिंगात एका मुलाने असे एक गाणे म्हटले होते. एक खेड्यातला मुसलमान प्रवासात आपला कुटुम्ब कबीला घेऊन निघाला असतो .तेव्हा तो आपल्या खिचडी भाषेत ज्या सूचना देतो त्याचे गाणे...

'गाडी अब्बी आयगीच बरका,
गाडीमे तू जल्दी घूस,
सम्भाळ आपले गठुडे समदे,
फिर पावनेकु इच्यार पूस

अगं फातमा, अगं फातमा....'

Pages