खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे पाव मी कढईत केले. आणि भाजून झाल्यावर त्यांना वरून बटर लावून ते ओल्या सूती फडक्यात गुंडाळून ठेवायचे( फडकं घट्ट पिळून ).. बाकी कृती तीच. पण ओल्या फडक्यात ठेवल्याने मऊ होतात.

दाबेली, केक दोन्ही मस्त!

कढईतल्या पावाची रेसिपी लिहा प्लीज >>
यस बॉस, नक्की लिहा पाकृ.

IMG-20210326-WA0034.jpg
पावभाजी
पाव नाही मिळाले (lockdown आहे इथे )

मानवकाका,
३ तांदूळ अन रव्याच्या उकडीचे उंडे, मिक्स भाजी
४ दिवशी अन अंडा कोशिंबीर

अन ही आताच खाल्लेली लिट्टी चौखा ( आम्ही पुण्यात ज्यांच्याकडे आलोय त्या काकूने बनविलेले)

IMG_20210326_211716.jpg

वाह! सगळे पदार्थ मस्त.

माझ्या फोटोत toppings मधे multigrain cracker वर तव्यावर भाजलेले मोठ्या केळ्याचे काप, त्यावर ग्रीक दही. दुसऱ्यावर guacamole आणि उकडलेले अंडे.

वरचे सगळे पदार्थ तो पा सु आहेत
पहिला नंबर दाभेली चा!
चांगली दाभेली खाऊन युगं लोटली, असो Happy
मानव, हो नांदेड, परभणी, बीड लोकडोवन आहे संपूर्णपणे

IMG-20210327-WA0003.jpg
चिकू जूस
(चहा म्हणून सुद्धा खपेल हा फोटो )

IMG-20210327-WA0007.jpg
Lunch
मेथीची भाजी, वरण, दही मिरची

पोह्याचा चिवडा + रतलाम शेव + पापडी + चकली + कांदा + चार थेंब लिंबाचा रस ....म्युजिक हेडफोन .. तू नझ्म नझ्म सा मेरे... कॉफी आणि बरंच काही

या Happy

1616886048853.jpg

वेगळे असेना पण खतरनाक लागले.. बायको तर अजून एक वाटी बनवून आण म्हणून मागे लागलेली.. पण मी म्हटले आता पुढच्या शनिवारी.. पोटभर खाल्ले की मजा गेली Happy

तो FABER चा लोगो नक्की कशावर आहे?
गॅस स्टोव्हवर असेल तर त्या लोगो खाली चौकोनी सेलफोन (किंवा काय ते) कसे?

आप्पे मस्त!
गॅस स्टोव्हवर असेल तर त्या लोगो खाली चौकोनी सेलफोन (किंवा काय ते) कसे?>>> सेलफोन खाली नसावा. फोटो काढताना खाली त्याचे प्रतिबिंब दिसते आहे.

फोटो काढताना खाली त्याचे प्रतिबिंब दिसते आहे. >> बरोबर sonalisl. १००/१०० मार्क्स.
मी तर साफ नापास झालो.

पोह्याचा चिवडा + रतलाम शेव + पापडी + चकली + कांदा + चार थेंब लिंबाचा रस . >>> या सोबत फक्क्कड चहा हवा Happy

...म्युजिक हेडफोन .. तू नझ्म नझ्म सा मेरे... कॉफी आणि बरंच काही >>> हे कॉम्बिनेशन चालेल.

सोनाली - आप्पे खतरनाक . भूक लागली बघूनच .

Pages