जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
माझ्याकडून एक: माझा नवरा एकदा
माझ्याकडून एक:
हे सगळ झाल माझ ते ऐकल्यावर
माझा नवरा एकदा ६ सिटर मधुन येत होता. पावसाचे दिवस होते आणि याच्याबरोबर काही मुसलमान बायका होत्या. बंडगार्डन पुलावरून जाताना त्या म्हणाल्या "अरे वो देखो पानी कैसे खळखळ करके बह रहा है"
खळखळ करके ?
खळखळ करके ?

सीधी दाल
सीधी दाल
अश्विनी
अश्विनी
आमच्या शाखेत probationary
आमच्या शाखेत probationary officer बिहारची मुलगी होती, तिला शेरवा ( मराठ्वाड्यात रस्सा/gravy
ला पर्यायी शब्द) शब्द माहीत नव्ह्ता. तिला आमचा मराठी अधिकारी म्हणाला, " वो मटन रहता ना
उसका वरण."
मुग्धा, मराठी मुस्लींमात
मुग्धा, मराठी मुस्लींमात हिंदी अशीच बोल्ली जाते.
विप्रा, तो हिंदी शब्द सुरवा.
आमच्या एक आजीबाई 'इकडे तिकडे' च सुलभ भाषांतर करायच्या 'ईधर तिधर'.
आत्ताच आअचा अॅडमीन येउन
आत्ताच आअचा अॅडमीन येउन विचारुन गेला...
"जनरेटर के बाजुमे कोणी गाडी लगाया क्या ?..."
हमारा एक लिटर दूध तुम्हारे
हमारा एक लिटर दूध तुम्हारे अंगपर है..." >> लै लै भारी

माझा एक किस्सा..मोबाइल च्या कॅमेराहून एकाला फोटो काढायला संगितला.. फोटो येइना तेव्हा त्याला म्हणालो..
"अरे जरा उसको थोडा दाब के रक्खो.."
>>सिधी दाल >> टू मच...
>>सिधी दाल >> टू मच...
घर मै माजी है|` `यहां माजी
घर मै माजी है|`
`यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणकार्यात उत्तर.
`बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था...`
`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे. इनका की नाई नवस है के साबू विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका........
एक ऐकिव किस्सा एका मराठी
एक ऐकिव किस्सा
एका मराठी कुटुंबाची मध्य प्रदेशातल्या गावात बदली होते, बाई ला हिंदी येत नसते, पण शेजारणींशी बोलायची हौस भारी.
एक दिवस शेजारीण विचारते - "दोपहर मे क्या करती हो?"
मराठी बाई: घर का काम होगया ना, तो थोडा "गिरती" हूं!!! (आपण थोडावेळ पडतो त्याचं भाषांतर)
शेजारीण: क्या? गिरती हो?
मराठी बाई: हां उसमें क्या है? हमारे महाराष्ट्र में सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा "गिरते" है!!!!!!!
दक्षे
दक्षे
दक्षिणा साबून वाला किस्सा
दक्षिणा
साबून वाला किस्सा कणेकरांच्या एका पुस्तकातला आहे बहूतेक.
एका पुस्तकातला आहे बहूतेक >>
एका पुस्तकातला आहे बहूतेक >> येस्स मी पण तेच लिहिणार होतो..
वैभव... <<"हत्ती चिखलात लोळत
वैभव...
<<"हत्ती चिखलात लोळत होता" >> = 'हाथी कीचड में कूद रहा था' किंवा 'हाथी कीचड में लेटा-पडा था'...
मराठी बाई: हमारे शादी में नवरा नवरी को और नवरी नवरे को घास खिलाती हय...
हिंदि बाई: अजब तरीका है! हमारे शादी में दोनो एक-दुसरे को खाना खिलाते हैं...
मारे महाराष्ट्र में सब बाई
मारे महाराष्ट्र में सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा "गिरते" है!
होय होय पुस्तकातलाच आहे.
होय होय पुस्तकातलाच आहे.
>>>अरे ये तो वहा चिख्खल मे
>>>अरे ये तो वहा चिख्खल मे लोळ रहा था
अरे ये तो वहा चिख्खल मे जोरदार हालचाल कर रहा था..
समोरच्या दिलिपची आई नुकतीच
समोरच्या दिलिपची आई नुकतीच गावाहुन आली होती, दिलिप आणि त्याची बायको दिवसभर कामाला आणि दिलिपचा ५ वर्षाचा मुलगा घरीच आजीकडे (दिलिपच्या आईकडे)
एका संध्याकाळी आजीने समोरच्या मैदानात आपला नातु व एक ६ वर्षाचा मुस्लिम मुलगा मारामारी करताना पाहीले. आजीने दोघांना एक एक धपाटा दिला. त्या दुसर्या मुलाच्या बकोटीला धरुन त्याच्या आई कडे नेऊन आपल्या खास हिंदीत त्याच्या खोड्या सांगितल्या त्या अशा
आजी: ये देखो, मेरा नातु और तुम्हारा लडका मैदान मे झगडा झगडी कर रहे थे. तेरे लडके ने इसका मुस्काट दाबा और बाल ओढे,
अगर इसका श्वास बिस बंद पडता तो कितने को पडा होता, बोलो तुम?
इसके मा - बाप कामवाले हय मै अकेली क्या कर सकती हु
मैने दोनो के पाठी मे एक एक धपाटा डाला है, आप आपके लडके पे लक्ष रखो,मेरे को बार बार भांडण करने की हौस नही आयी है......:हाहा:
मस्त धागा... आठवले की लिहिते
मस्त धागा... आठवले की लिहिते अजून
आता चाफ्फा आला की इब्लिस्पणाचा पण धागा चालू करायला हवा!
हाथी किचड मे घुल मिल रहा था
हाथी किचड मे घुल मिल रहा था (अरे नाही रे..... लोळण्याला शब्दच मिळत नाही)
जाने दे लोळने दे फिर क्या..
जाने दे लोळने दे फिर क्या..:P
झगडा झगडीचा किस्सा सहीच
झगडा झगडीचा किस्सा सहीच !
माझी आई ईथे आली होती तेव्हा -- माझी मुलगी घरातल्या कामवाल्या बाईला काहीतरी बराच वेळ सांगत होती पण ती बाई काम करण्यात मग्न होती आणि तिचे मुलीकडे लक्ष नव्हते. ते बघुन आईला खूप राग आला आणि आई तिला म्हणली - अरे वो तुमको कबसे बुला रही है उसको ओ तो दे दो. ( हाकेला ओ देणे मधला ओ).. मग ती बाई म्हणे वो क्या दे दूं ?
क्रिकेट्ची मॅच चालु होती,
क्रिकेट्ची मॅच चालु होती, एकाला चेंडु जोरात लागला. त्याला दुसरा ओरडुन सुचवत होता.
अरे जल्दी चोल ले. (मसलले )
>>>हमारे महाराष्ट्र में सब
>>>हमारे महाराष्ट्र में सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा "गिरते" है!!!!!!!<<< दक्षिणा अशक्य .......

>>> जाने दे लोळने दे फिर क्या<<< बासुरी लोळत लोळत अनुमोदन ..
मेरे परडे मे तेरी शेळी आरडी
मेरे परडे मे तेरी शेळी आरडी (ओरडली) ....
(जुन्या हितगुजवरुन माझे टॉप
(जुन्या हितगुजवरुन माझे टॉप फाइव्ह आवडते)
Meeradha Thursday, November 22, 2007 - 6:35 pm:
आमचे शेजारी आणि watchman चा संवाद
(शेजार्यांना श्राध्दासाठी गोवरी पाहिजे होती)
शे.- watchman कहि गोवरि मिलेगी क्या?
व.-गौरी? कौन गौरी साब?
श.- अरे वो cow dung का.
व.-काउदन्ग? ये सरनेम है क्या?
श.- अरे नहि रे
व.- नये लोग है building मे?
शे.-अरे नहि वो गाय का गोल गोल होत है न वो चाहिये.
व.- गाय कहासे आयी साब?
शे.-अरे गोवरी मतलब गाय के संडासका(त्यांना बिचार्यांना गोबर हा शब्दच आठवत नव्हता) dry गोल गोल बनाते है ना वो चाहिये.
व.वो क्या वो ला के देता है मै साब. पहले हि ठिक से बोलना चाहिये ना
*********************************************
Rashmee Wednesday, October 17, 2007 - 4:54 pm:
मी US ला येत होते तेव्हा माझा मावस भाऊ (तो अगदी डाय हार्ड मुम्बई वाला आहे.) मला सोडायला विमानतळावर आला होता. तो माझ सामान गाडितून काढून कार्ट वर ठेवत होता आणी त्याचा मागे अगदी कमी अन्तरावर वर एक बाई(मुलगीच) ने येऊन आपली गाडी उभी केली . माझ्या भावाने आधितर रागाने मागे पहिल आणी त्याच्या पहाण्याने तिने घाबरून बहुतेक ब्रेक वरून पाय काढला आणी गाडी आणखीन पूढे आली. हे पाहून माझा भाऊ अगदी सन्तापून ओरडला " आज़ा मेरे आन्ग पे, ले ले मेरा जीव" . मी हातातल सामान सोडून कीती वेळ नुस्ती हसत उभि होते. ती मुलगी पण किती तरी वेळ हसत होती. आजही तो प्रसन्ग आठवला की ह.पु. होते.
*********************************************
Rutu_hirwaa Monday, July 02, 2007 - 6:15 am:
आमच्या ग्रूपमध्ये एक केरळचा मुलगा होता... जिजेश आम्ही मल्लू म्हणायचो त्याला
तसा हिन्दी छान बोलायचा तो नी मराठी थोडे थोडे समजायचे.. आणि एक इस्लामपूर चा मुलगा होता..मन्गेश त्याचे हिन्दी असे अगदी छान मराठमोळ्या वाटेने जायचे पण तो जिजेश शी हिन्दी बोलण्याची जिवापार कोशिश करायचा.. एकदा आमचे असेच बोलणे चलु होते कस्तुरिम्रुगावरून..
जिजेश ला अर्थातच काही कळेना.. झाले मन्गेश पुढे सरसावून म्हणाला
"अरे तुम कस्तुरीम्रुग नहि जानते वोह हरिण होता है न जिसके जिसके बेम्बी मे कस्तुरी होती है और वोह बात वो छोडके सब को पहिलेसे ही पता रेहेती है .. "
हे ऐकून आमची ह. ह. पु. वा. !! आणि जिजेश तर वेडा च झाला....त्याच्या डोक्यावरून विमाने च विमाने
*********************************************
वोह क्या हो गया हमारे ओटे से वो घसर गया और कुछ कळनेच्या आत धपकन निचु गिर गया. डॉक्टरने आराम करने को बोला है इसलिये वो लवंड रह है...
*********************************************
उसको मेल्या को क्या है, शाम को बैठ के इंटरनेट वर टिंगल टवाळी करता है, हमको घर पे जाके सब निस्तरने का रेहता है. हमको तो ५ बजे से घर को जाने का वेध लगता है...घर पे पोहचने तलक धाकधुक लगा रेहता है, हमारा कार्टा कुछ ना कुछ उपद्व्याप किया रेहता है...
अरे गोवरी मतलब गाय के संडासका
अरे गोवरी मतलब गाय के संडासका >>> लै लै हसतोय...

:हहगलो:
चिखल = किचड पण लोळणे =
चिखल = किचड
पण लोळणे = ?
>>
लोळना!!!
Pages