भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉमी पण असतो ना कोणाचा तरी. ती नावं भारी आहेत. व्हिक्टोरिया, सिंडरेला, अलेक्झांडर बोका आणि दुष्यंत!>>>>
श्यागी का फ्यागी Happy

रच्याकने त्या फडकुले काकू खऱ्यात होत्या, म्हणजे पुलं नी लिहिलं आहे तशा फार्सीकल नाहीत पण त्यांच्या ओळखीत होत्या आणि त्यांच्याकडे पोपट पण होता आणि पुलं नी त्यांना सांगितले होतं या पोपटावर मी लिहीन कधीतरी
फडकुले यांचे नातेवाईक आमच्या ओळखीत आहेत त्यांनीच हा किस्सा सांगितला

अय्यो ओडू किती गोडू! किती कळतं त्यांना आपली चिडचिड होतेय ते. बिचारे! त्यांचं लाईफ किती सिंपल असतं खरंच!

ओडिनचे किस्से स्ट्रेसबस्टर असतात.
रच्याकने त्या फडकुले काकू खऱ्यात होत्या, म्हणजे पुलं नी लिहिलं आहे तशा फार्सीकल नाहीत>>> अन्दाज होताच!

माउईची रीसेन्ट गंमत लिहिणार होते पण धागा शोधायचा कंटाळा केला होता. थॅन्क्स समीर.
सगळ्या कुत्र्यांना टोयलेट रोल्स चे काय अट्रॅक्शन असते न कळे. माउई अजिबात अपवाद नाही. संधी मिळाली की ( चुकून एखाद्या बाथरूम चं दार उघडं राहिलं) पहिला हल्ला टोयलेट रोल वर असतो. चाक फिरवावं तसं तो रोल फिरवून रोल उलगडून तुकडे तुकडे करून कचरा करणे हा आवडता उद्योग. त्यामुळे आम्ही सगळी दारं बंद आहेत ना ते नेहमी चेक करतो. पँडेमिक च्या काळात टंचाई असताना तर असला मौल्यवान माल फार जपून ठेवावा लागत होता.
परवा एका वीक डे ला ऐन कामाची अन मीटिंगांची वेळ होती, मुलांच्या शाळा कॉलेजेस ऑनलाइन सुरु होती, कधी नव्हे ते घर एकदमच शांत होतं! माव्या वर मुलीच्या खोलीत तिच्यासोबत आहे अशी माझी समजूत. तिला वाटले तो खाली माझ्या ऑफिस मधे झोपला असवा. अन अचानक त्या शांततेचा भंग मुलीच्या कर्क्श्य किंकाळीने झाला! "माउईईईईssssss!!!!!" अर्थातच ती किंकाळी त्या शांततेचा उगम कळल्यामुळे होती Lol वर जाऊन पाहिले तर दृष्य पाहाण्यासारखे होते. माउई ला कशी कोण जाणे नेमकी एक उघडी बाथरूम सापडली होती. अन त्यात पण आतले सप्लाय स्टोरेज चे छोटे क्लोजेटही उघडे होते! लॉटरीच लागली ना त्याची! एक, दोन नव्हे तर स हा टॉयलेट रोल्स याने उघडून उलगडून ती कागदाची भेंडोळी बाथरूम आणि त्याला जोडून असलेल्या बेडरूम भर पसरली होती! Uhoh त्यात लोळणे, स्वतः ला गुंडाळून घेणे, त्यच्या आतले ते पुट्ठ्या चे रोल बाहेर काढून ते चावणे असे मज्जे मज्जेचे उद्योग करण्यात मग्न असल्यामुळेच घरात ती (आता भयाण वाटणारी) शांतता होती! मी आणि मुलीने त्याला ओरडायचा प्रयत्न केला पण एकूण त्याचा तो अवतार, थोडा नॉटी थोडा गिल्टी फेस बघून भयंकर हसायलाच यायला लागलं Rofl खरं फोटो काढाय्ला हवा होता, पण तेव्हा सुचले नाही.
काय करणार, आवरला मग सगळा राडा. तोपर्यन्त माव्याचा चेहरा निर्ढावून "नो रीग्रेट्स फेस" पर्यन्त आला होता. Happy

अरे देवा Happy फारच व्याप करून ठेवला
(अवांतर: पेशन्स असेल तर ते सगळे उलगडलेले रोल पाण्यात भिजवून मोठा पेपर मॅशे बाउल करता येईल.कुणाला कशाचं तर कुणाला या
कश्याचं Happy )

आमची शिझुका. चार महिन्यांची आहे आता. बरेच दिवस विचार चर्चा करून आणली शेवटी घरी. आता तिने घर ताब्यात घेतले आहे. अंगावर उड्या मारून खेळणे हा आवडता उद्योग आहे. विशेष करून बऱ्याच वेळाने आम्ही दिसलो तर. एक शंका खेळताना तिचे दांत कीवा नख लागून रक्त आल तर प्रत्येक वेळी injuction घेण गरजेच आहे का? तिला rabies चे दोन डोस दिलेत. आम्ही राबीपूर प्रत्येकी चार injuction घेतली खूप भीती सुरवातीला वाटत असल्या मुळे. कृपया अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन व्हावे.Shizuoka.jpg

potty training बाबतही मार्गदर्शन हवे आहे. सध्या अवघे विश्व ची माझे ।। चालू आहे.

विद्याधर, - क्यूट फोटो. बाकी शिझु पपीचे नाव शिझुका - भारीच क्रिएटिव्ह हो Proud
पॉटी ट्रेन करण्यासाठी तुम्ही काय करताय सध्या? ते लिहा म्हणजे इतरांना अजून युक्त्या माहित असल्यास लिहिता येतील.

माऊ ई ची dhàmal.
शिझुका मस्त आहे.
हा धागा वाचायला लागल्यापासून यू tyubvarcha Max the labrador nehami baghateà

सध्या सकाळी तिला वॉशिंग मशीन च्या बाथरूम मध्ये बांधणे चालू आहे पान हा प्रयोग रोज यशस्वी होत नाही. दुपारी कीवा ठराविक वेळानंतर तिला तिथे नेली तरी ती शू करत नाहीच. यासाठी बाजारात स्प्रे उपलब्ध आहेत म्हणे. पान ते कसे वापरतात याची माहिती नाही.

हाहाहा माऊई जबरा धिंगाणा
तुमचा पेशन्स अफाट आहे खरंच आणि माऊई लोकरीचा गुंडा आहे
ओड्याने खात्रीने फटका खाल्ला असता

आम्ही आजच नुकतेच दोघेही अपटलोय जोरात
रोज सकाळी त्याला रनिंग वॉक ला नेतो
तो पळत नी मी सायकलवर
सायकलला लीश बांधलेला असतो
आज अचानक एक भटका दांडगा कुत्रा भुंकत अंगावर आला
ओडीन घाबरून विरुद्ध दिशेला पळाला आणि वळून माझ्या मागे लपायला गेला
त्याच्या या धांदलीत आणि त्या कुत्र्याने ओडीन ला चावू नये या गडबडीत माझा बॅलन्स गेला आणि सायकल सकट ओडीन च्या अंगावर पडलो
तो केकटला जोरात
पटकन उठून त्या कुत्र्याला हाकलले आणि मग ओडीन कडे पाहिले त्याला पुढच्या पायाला जखम झाली थोडी आणि मला मुका मार

उगाच कारण नसताना व्याप सगळा

कुत्र्याने ओडीन ला चावू नये या गडबडीत माझा बॅलन्स गेला आणि सायकल सकट ओडीन च्या अंगावर पडलो >>> अर्र ! अरे बाप रे. घाबरला असेल अजूनच बिचारा ओडिन. लागले असेल ते वेगळेच.

हो आज दिवसभर जरा झोपूनच आहे
खेळायला नेलंच नाही बाहेर
जखम थोडी खोल आहे
Wound healing चा स्प्रे आहे तो मारून घेतलाय
पण बाकी ठीक आहे

विद्याधर काकतकर -
सकाळी तिला वॉशिंग मशीन च्या बाथरूम मध्ये बांधणे चालू आहे >>> ती ४ महिन्याचीच आहे ना, मग तिला फ्रिक्वेन्टली न्यावे लागणार. लहान पपीज ना सुरुवातीला दर २ अडीच तासानी बाहेर न्यावे लागते. थोडे थांबावे लागते (भरपूर पेशन्स हवा.) मग बाहेर पॉटी करायला जमली की लगेच पॉटी हा शब्द वापरयाचा. कौतुक करायचे. तिथल्या तिथे छोटी ट्रीट द्यायची, घरात करताना दिसल्यावर रागवायचे. करून झाल्यावर नाही तर करताना दिसल्यास. असे अनेक वेळा केल्यावर त्यांना समजते पॉटी घरात नाही तर बाहेर.
https://www.akc.org/expert-advice/training/how-to-potty-train-a-puppy/ इथे वाचा.
https://youtu.be/pwwwxXnCWpE - हे माझे आवडते चॅनल आहे - व्हिक्टोरिआ स्टिलवेल. आम्हाला खूप फायदा झाला तिच्या टिप्स चा.

Ho he चॅनेल मस्त आहे मैत्रेयी!एकदा तिने घरातल्या लोकांना चावणाऱ्या कुत्र्याला कसे शिकवायचे ते सांगितले होते.ते पाहून मी अख्खा दिवस डिस्टर्ब होते.कारण आमचा चावरा कुत्रा नंतर दुर्लक्षित झाला होता.म्हणजे सर्व व्हायचे त्याचे,पण एक कर्तव्य म्हणून.

Pages