पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर मुलगा ते दोघे जण मागची ३ वर्षे वेगळे रहात आहेत हे सिद्ध करु शकला
तर कोर्टबाजी करायला प्रोब्लेम येणार नाही.

आधीचे खटले निभावायची अक्कल नसताना दुसरे लफडे करणाऱ्या पोराची एकदम किंवच आली>>> आपल्याकडे मुलांचे लग्नाचे वय आता बत्तीस-पस्तीस पर्यंत येऊन ठेपलंय. त्यातून असलं लफडं निस्तरायचं म्हणजे आणखी चार-पाच वर्षे जाणार. मग तोपर्यंत काय त्याने जगन्नाथाची पूजा करत बसायचं का? की "माझं बायकू नाही रे सुख देत! यक थोडं तुमचं पोरगी देता का हो?" असं मागून कोणी पोरगी देत नाही म्हणून बोगारवेशीचं रस्ता धरायचं? Proud

कुणीतरी आता 'पुरुष लाईव्ह्ज मॅटर' मुव्हमेंट सुरू करायची वेळ आलीय Happy ऋन्मेऽऽष तू घे पुढाकार!

अशी एक केस पहाण्यात आहे.
माझ्या ओळखीचा जुन्या कंपनीतला मित्र अचानक नवीन कंपनीत भेटला. त्याला दुसर्‍या एकाने माझ्यासमोर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. मी चक्रावलो कारण ४ वर्षांपुर्वी त्याच्या लग्नाची पत्रिका मला मिळालेली. नंतर त्याने त्याच्या पहील्या लग्नाची गोष्ट मला थोडक्यात सांगितली.
मुलगा मुंबईत रहाणारा हिंदी भाषिक, मुलगी दिल्लीची, आर्मीतल्या अधिकार्‍याची मुलगी. मुलगी मास्टर्स करत होती म्हणुन लग्नानंतरपण मुंबईतच पण होस्टेलवर रहायची. नांदायला कधी आलीच नाही. रविवारी सकाळी येउन संध्याकाळी परत जायची. मध्येच मास्टर्स सोडुन दिल्लीला गेली. तिकडे आई/बाबांकडे न रहाता वेगळी राहुन छोटी नोकरी करायला लागली. नंतर तिच्या बाबांनी तिच्याशी बोलणंच सोडलं कारण ती ऐकत नाही म्हणुन आणि मुलाची माफी मागितली. पण मुलगी घटस्फोट द्यायला तयार नव्हती. केस तिच्या सोयीसाठी दिल्लीच्या कोर्टात चालली. हा दर तारखेला तिथे जायचा. तिचा वकील नुस्ता चालढकल करत राहीला. मध्ये एकदा न्यायाधीश पण चेंज झाले. १ कोटीची पोटगी मागितलेली. याने एक ऑनसाईटची संधी सोडली कोर्ट केस साठी. शेवटी मुलाच्या बाबांना कोणी सल्ला दिला की मिटवुन टाका प्रकरण नाहीतर मुलाची उमेदीची वर्ष बर्बाद होतील. त्यांनी २० लाख देउन घटस्फोट मिळावला.
सध्या तो नवीन लग्नानंतर एक्दम खुश आहे. एक मुलगा पण झाला गेल्या वर्षी. हा विषय पुन्हा कधीच काढला नाही मी त्याच्याकडे.
हे प्रातिनिधीक उदाहरण आहे असं नाही म्हणायचं मला. पण ऋन्मेषच्या किश्श्याशी मिळतंजुळतं आहे म्हणुन इथे टाईपलं.

एका लग्नाचे घोंगडे भिजत पडलेले असे असताना
जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

एक लग्न झालेले असताना परत लगेच दुसरी पण पटवली? मुलगा आहे का बाजीराव पेशवा Biggrin
हे वाचल्यावर मुलगा अजिबात बिचारा वगैरे वाटत नाहीये. चांगला पोचलेला दिसतोय. बिचारी ती दुसरी मुलगी.

आधीचे खटले निभावायची अक्कल नसताना दुसरे लफडे करणाऱ्या पोराची एकदम किंवच आली... कसला डोक्यावर पडलाय हा मूर्ख....
>>>>

मन जिंकले या प्रतिसादाने. कारण या प्रतिसादात आपल्या समाजाचा आरसा लपला आहे. एक स्त्री पुरुष यांच्या नात्याला ईथे कसे सहजपणे लफडे म्हणून बघितले जाते हे यातून दिसते.

लग्नानंतर साधारण दोन वर्षे झाली, पण एखाद्याला बायकोचा सहवास सोडा, दर्शन सोडा, दोन शब्द बोलणेही झाले नसेल तर अश्या परीस्थितीत त्या मुलाला दोन गोष्टींची गरज भासते. एक म्हणजे भावनिक आधार लागतो. कदाचित तोच त्याने त्या नवीन जोडीदारात शोधला असेल. हे शक्यता खरे तर पहिली मनात यायला हवी.
पण पब्लिक गॉसिपप्रेमी असते, त्यांना प्रेमात नाही तर लफड्यातच रस असतो. म्हणून तिथे भावनिक गुंतवणूक असली तरी ती लोकांनी समजून घेणे अवघडच.

तसेच, दुसरी गरज म्हणजे शरीराची भूक. स्पष्ट भाषेत सेक्सची गरज. जी लग्नानंतर काही काळापुरतेच अनुभव घेतल्यावर आणखी तीव्र होणे स्वाभाविक आहे. पण ती गरज समजून घ्यावी ईतका आपला समाज अजून प्रगल्भ झाला नाहीये. त्यामुळे ईथे मी त्या अपेक्षा ठेवणारही नाही. जो अश्या समाजाला न जुमानता हे पाऊल उचलतो त्याला स्वतःला व्यभिचारी, लफडेबाज म्हणवून घ्यायची तयारी ठेवावीच लागणारच. त्याला नाईलाज आहे.

ऋ, कुठलीही मुलगी गंमत म्हणून सुखासुखी लग्न मोडणार नाही असं वाटतं.
>>> गंमत म्हणून नाही पण ज्याच्याशी लग्न करायची इच्छा होती त्याच्याशी न झाल्याने रस संपल्याने...
लैंगिक सुख पतीकडून मिळत नसल्यामुळे...
मुळात मुलगी लेस्बियन असल्याने पण घरच्यांनी आणि समाजामुळे लग्न केल्यामुळे...
अशी अनेक कारणे असू शकतात...

>>>>>

वर च्रप्स यांनी काही शक्यता दिल्या, काही मी सुद्धा जोडू शकतो,
पण एक मात्र नक्की, एखादी मुलगी सुखासुखी लग्न मोडणार नाही, पण मुलगा मोडू शकतो हा घाईघाईत निष्कर्श निदान मॉडर्न मुलांमुलींबाबत तरी काढायला नको.

तिला आधी एक नोटीस पाठवा , नांदायला ये , ती उत्तर देईल किंवा देणार नाही
ती नांदत नाही , ह्या बेस वर मुलाने स्वतः घटस्फोटाला केस फाईल करावी
मुलगी उत्तर द्यायला नाही आली तर एक्स पार्टे केस होऊन तुम्हाला घटस्फोट मिळेल
Submitted by BLACKCAT on 1 February, 2021 - 07:53
>>>>>

ब्लॅककॅट धन्यवाद, नोटेड. त्यांच्या केसमध्ये काय घडलेय हे बघतो चौकशी करून. वर अजूनही काही चांगले मुद्दे आलेत चर्चेत. ते कोट करून त्याला व्हॉटसप करता येईल. धाग्याची लिंक तर देता येणार नाही, पण काही चांगले मुद्दे आले तर नक्की पोहोचवेन मी त्याच्यापर्यंत.

मला मानसिक त्रास दिला' आणि 'आम्ही तिला काय मानसिक त्रास दिला? नुसत्या सौम्यपणे चुका दाखवल्या तर मानसिक त्रास कसा' वगैरे लूप अखंड चालू राहते. (हे बर्‍याच जवळच्या केसेस मध्ये पाहिले आहे.)
वकिल, कोर्ट, केस,हॅरेसमेंट साठी पोलीस केस या सूडाच्या प्रवासात क्लोजर मिळत असेल, पण वेळ वाया जातो आणि मनस्ताप होतो. (खर्‍याला डर नाही वगैरे मान्य असलं तरी अ‍ॅट व्हॉट कॉस्ट डू यु वॉन्ट टू विन द वॉर हा एक मुद्दा आहे.)
>>>

@ मी अनु, हो खरे आहे Sad
त्यात मुलाची बाजू मुळातच कमजोर असणे स्वाभाविक आहे. केसची सुरुवातच नवर्‍याने आणि त्याच्या घरच्यांनी काय त्रास दिला जे ती गेली याने होत असावी.

मुलाची बाजू चांगली मांडली आहे. विचार करायला लावणारी.
पण मुलींना ज्या ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागते त्याचा विचार होत नाही.
तिला पडती बाजू घ्यायला सांगणारे शंभर जण भेटतील, साथ देणारे एखाद दुसरे असतात.

आमच्या ओळखीतली एक बाई आहे. नव-यानंतर तिने मुलाला एकटीने वाढवले. तो ही कॉम्प्युटर इंजिनीयर झाला. कदाचित परदेशात सेटल पण होईल. पण त्यांचे विचार बुरसटलेले आहेत असे जाणवायचे. एक दिवस ही बाई मुलाला घेऊन थेटच माझ्या मोठ्या चुलतबहीणीसाठी आली घरी. तसं तिने सांगितलं नाही. पण माझा मुलगा देखणा, माझा मुलगा इंजिनीयर. आमच्या काही अपेक्षा नाहीत. पण मुलीने कामाला जाताना स्वयंपाकपाणी करायला पाहीजे , आल्यावर पण बघायला पाहीजे इतकंच.

मग आम्ही पण सगळे एका सुरात म्हणालो , अशी मुलगी मिळाली की कळवूच.
तिची बहुतेक अपेक्षा होती कि आम्ही म्हणावं की मुलगी आमचीच आहे. कशाला लांब बघता.

नंतर या बाईला जिने आमचं घर सुचवलं होतं , तिने आम्हाला विचारलं की तुम्ही तिचा अपमान का केला ?
या घरात जर मुलगी दिली असती तर काय झालं असतं ?
नशीब तिच्या अपेक्षा आधीच समजल्या. नाहीतर मुलगी आगाऊ आहे असा शिक्का बसला असता. विचार नाही जुळले की मोठ्ठा प्रॉब्लेम येतो जो मुलीला फेस करायचा असतो. मुलगा म्हणतो का कि एक वेळचा स्वयंपाक मी करेन म्हणून ?
त्यांना कसं कळणार ?

खरंच की Lol
मी प्रतिसाद टाईप करेपर्यंत अजून दोन कमेण्टी आल्या पण.

हे प्रातिनिधीक उदाहरण आहे असं नाही म्हणायचं मला. पण ऋन्मेषच्या किश्श्याशी मिळतंजुळतं आहे म्हणुन इथे टाईपलं.
Submitted by व्यत्यय on 1 February, 2021 - 19:08
>>>>>.

हा किस्सा ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद व्यत्यय.

मला मान्य आहे आजही बहुतांश केसेसमद्ये जाच मुलीचा होतो, आजही टक्केवारीचा विचार करता स्त्रिया हाच समाजातील शोषित घटक आहे, पण सर्व समाजात एकसारखी स्थिती नाहीये,. ग्रामीण भागात वा कमी शिकलेल्या मुलींची वेगळी स्थिती तर मेट्रोसिटीत वेगळी स्थिती असू शकते, आहे. हे समजून घ्यायला हवे. ईथे शोषितांमध्ये मुलांची टक्केवारीही आधीच्या तुलनेत वाढत आहे. अशी उदाहरणे आता अपवादात्मक उरली नाहीयेत. सुक्यासोबत ओले जळायचे प्रमाण वाढत असेल तर आता त्या बाजूनेही विचार करायची वेळ आली आहे. यावर काही किस्से मला सविस्तर पुन्हा कधीतरी लिहायला आवडतील.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. >> मग याने आणि सेटलमेंट करता प्रयत्न आणि नंतर डिव्होर्स करता अर्ज का नाही केला कोर्टात ? एका वर्षाच्या सेपरेशन नंतर डिव्होर्स फाईल करता येतो. आता पर्यंत डायव्होर्स मिळाला पण असता. इतके वर्ष का टीवाल्या बावल्या करत राहिला ? कोर्टाने ठरवली असती ना पोटगीची रक्कम . ती काही का मागेंना . कोर्टाने ठरवलं असत. त्याचा पगार काय ? हिने आधीची नोकरी का सोडली ? तिची नोकरी करण्याची पात्रता आहे अशा शक्यता विचारात घेऊन तिला पोटगी देण्यात आली असती

ऋन्मेष,
समाजाला न जुमानता वगैरे मला वरच्या केसमधे अजिबातच दिसत नाही. कायद्याबाबत अडाणीपणाने वागणे किंवा पुढलं पुढे बघू अशी वृती दिसते. पत्नी जरी सोबत रहात नसली तरी कायद्याच्या दृष्टीने व्यक्ती विवाहितच धरली जाते. अगदी लिगल सेपरेशन झाले असले तरी घटस्फोटाचे पेपर्स हातात नसतील तर काही अर्थ नाही. त्यामुळे वैवाहिक स्थिती कायदेशीर रित्या बदलून घेण्याला प्राधान्य देणे गरजेचे होते. घटस्फोटित व्यक्तीसोबत लग्नाच्या हेतून नाते वाढवायचे आणि मग आता लग्न करायचेय तेव्हा घटस्फोट लागेल नाही का असे म्हणत जागे होवून प्रथम पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करायला जायचे हेच हास्यास्पद. इथे मुलाला १० लाख पोटगी/खंडणी का द्यावी लागावी असा प्रश्न मांडला असला तरी खरा त्रास हा लग्नाच्या नात्याची अपेक्षा ठेवणार्‍या घट्स्फोटित मुलीच्या वाट्याला आलाय. मुलीने देखील मुलाचा घटस्फोट झालेला नसताना कुठल्या आशेवर हे नाते वाढवले असा प्रश्न पडलाच.

खरंतर तुम्ही वर्णन केलेल्या मुलाबद्दल वाचून सहानुभूती वाटतेय (अर्थात न्याय बाजू असू शकते हे गृहीत धरूनच) पण मला असं वाटतं त्याने आऊट ऑफ कोर्ट थोडं घासाघीस करून मामला रफा दफा करावा अर्थात दुसरं लग्न करायचं असेल तर..नसेल तर ह्या भानगडीत पडूच नये कारण मुलगा कितीही बरोबर असू दे कोर्टात मुली वकीलाने पढवल्याप्रमाणे अक्षरशः खोटे आरोप आणि अब्रूची लक्तरेही काढायलाही पाहत नाही. मुलगा निर्दोष असला तरीही तो ते सिद्ध करू शकत नाही..

उदाहरण द्यायचं झालं तर.

1. मारहाण करतो, अवदसा, भवाने, असले आणि रां* आणि बरेच अश्लिल शब्द वापरून अपमान करतो..

2. शरीरसुख देत नाही किंवा ह्याच्यात कमी आहे.

3. जबरदस्तीने किंवा अनैसर्गिक शरीर संबंध ठेवायचा प्रयत्न करतो किंवा केलं आहे.

4. सारखा संशय घेऊन मानसिक त्रास देतो.

5. आईवडीलांकडून पैसा आण म्हणून तगदा लावतो..

आणि गंमत म्हणजे असले आरोप पुरूष सहसा करच शकत नाही..

1. मारहाण करते बोलला तर स्वतःचीच मानहानी केल्यासारखं होईल आणि प्लस सहानुभूती मिळण्याऐवजी हसंचं होईल..

किंवा काहीचा पुरूषी अहंकार दुखु शकतो त्यामूळे हा आरोप तरी करू शकत नाही..

2.पुरूषांवरून शिव्याच नाहीत.. नामर्द, षंढ असं बोलते म्हटल्यावर वकील शब्दकोष काढून समानार्थी अर्थ सांगेल..बाकी रां* हया शब्दाच्या ऑपोजिट पुरूषांचा अपमान होणारा शब्दच नाहीये..आणि तसंही हे कुणी भरकोर्टात बिनदिक्कत सांगेल असं वाटत नाही.

3.शरीरसुखाचा विषयच येत नाही कारण बायको असली तरी मनाविरूद्ध केलेला सेक्स हा बलात्कारचं.. हा कायदा अंमलात आलाय.. बायको शरीरसुख देत नाही म्हटल्यावर म्हणजे तुम्ही जबरजस्ती करू पाहत होता लगेच मुद्दा फिरतो.. आणि स्त्री पुरूषांवर सेक्ससाठी जबरजस्ती करू शकत नाही हा अजुनही समज आहे तसाच आहे..करा नाहीतर नका करू..पुरूष ह्यात नेहमीच गिल्टी असणार.

5. आईवडीलांकडून पैसा आणायचा तगाद लावते हा आरोप कमावत्या पुरूषासाठी खुपच बालिश असेल..

फार फार तर संशय घेते आणि शिव्या देते इतकच काय ते बोलू शकतो पण इतकं वेटेज नाही पडत जेवढ मुलीच्या बाबतीत पडतं ..

हे मुख्य पाच आरोप अगदी खोटे असले तरी कोर्टात ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करता येत नाही..

आणि मुलीचे आईवडील काय मुलगी कितीही दिवटी असली तरी आपल्या मुलींचीच बाजू घेऊन बोलणार.. खरं बोलणारे आणि ते ही मुलीच्या विरूद्ध असे तर ह्या काळात जन्मालाच आले नाहीत.

माझ्या एक परिचिताचं एका मुलीला दिलेल्या साध्या शिवीवरून करीअर बरबाद झालं.. ही तर खूप मोठी गोष्ट आहे..

अजून एका मित्राची बायको तर कहर होती.. भांडुपच्या दहा बाय दहा च्या खोलीत तो राहायला होता.. पगार बारा हजार.. त्याची बायको काहीच करत नव्हती.. बिचारा बारा तास काम (सिक्युरीटी फिल्ड) करून आल्यावर जेवण वैगेरे करायचा...ते पण त्याने सहन केलं पण हीला कधी दागिनेच हवे असायचे तर कधी गाडीच हवी असायची.. पैसे जमवून घेतो बोलायचा तर रोजच भांडण उकरून काढायची आणि बिचार्याने एके दिवशी वैतागून आत्महत्या केली..

काहीही करा पण सगळे पुरूष लबाड असतील तर बायकाही काही कमी नसतात..

आणि पुरूषांनो लक्षात ठेवा

"A women is always innocent until proven guilty and a men always guilty until proven innocent "

अश्या परीस्थितीत त्या मुलाला दोन गोष्टींची गरज भासते. एक म्हणजे भावनिक आधार लागतो. कदाचित तोच त्याने त्या नवीन जोडीदारात शोधला असेल. हे शक्यता खरे तर पहिली मनात यायला हवी.
पण पब्लिक गॉसिपप्रेमी असते, त्यांना प्रेमात नाही तर लफड्यातच रस असतो. म्हणून तिथे भावनिक गुंतवणूक असली तरी ती लोकांनी समजून घेणे अवघडच.

तसेच, दुसरी गरज म्हणजे शरीराची भूक.//

स्वतःचा घटस्फोट झालेला नसताना दुसऱ्या मुलीला लग्नाचं आश्वासन देणं, तिला रिलेशनशिपमध्ये गुंतवणे - हा तर स्वार्थीपणा झाला ना. म्हणजे या इसमाने एक लग्नाची बायको आणि दुसरी ती मुलगी- दोघींच्या आयुष्यात प्रॉब्लेम करून ठेवलाय.
जर त्याने तिला सांगितलं असतं की लग्न बिग्न काही मला माहित नाही, मला फक्त सध्या माझी भावनिक आणि शारीरिक भूक भागवायची आहे- तर गोष्ट वेगळी. पण इथे तर दिसतंय की ती मुलगी लग्नाची अपेक्षा ठेवून होती.

नवरा स्वतः मिळवतो , घरावर खर्च करतो ते त्याला स्वतःला सुख मिळावे म्हणून

ते त्याला बायको देणार नसेल , तर त्याने ते घरात किंवा बाहेरही कुठेही अन कसेही मिळवावे , बाकी जगाने त्यात नाक खुपसू नये.

उंबरठा शिणीमात गिरीश कर्नाडला सोडून संत स्मिता पाटील निघून जाते , तेंव्हा कालांतराने तोही दुसरी बाई ठेवतो ( त्यात तो पेशाने वकिलच दाखवला आहे , त्यामुळे कदाचित त्याला ते जमले असावे, आम्हाला नव्हते जमले ) पुढे स्मिता पाटील परत आल्यावर ती नवर्यालाच भलबुरे बोलू लागते , तोही तिला सांगतो , तुला हे स्वीकारून रहायचे असेल तर रहा नाहीतर फाफल पाहिजे तिथे.

त्यामुळे बाकीचे लोक काय टीका करतात , ते करू देत , घर तुमचे , पैसा तुमचा , शरीर आणि मनही तुमचेच आहे , तर त्या विवाह बाह्य संबंधावरून बाकीच्यांचे ऐकून घ्यायचे कारण नाही.

बायको अन तुम्ही कित्येक वर्षे एकत्र नाही , हे तुमच्या बाजूने घटस्फोटाला मजबूत कारण आहे , आजकाल घटस्फोट प्रकरणे फार काळ कोर्टात रेंगाळत नाहीत , कोर्ट चार पाच तारखा लावते कारण प्रकरणाची शहानिशा करणे गरजेचे असते म्हणून , तो काय नोकरीचा इंटरव्ह्यू नाही की सिव्ही अन डिग्री सर्टिफिकेट बघितले अन दिले जजमेंट लिहून 20 मिनिटात , सहा महिने सेपरेशन पेरिअड लावावा लागतो , तुमचा तो आधीच झाला असेल तर तो कनसिडर होतो की नाही , ते माहीत नाही. कदाचित होत असेल.

तुमचे विवाह बाह्य संबंध असले तरी तो मुद्दा सिद्ध करायला बायकोला पुरावे सादर करावे लागतील, असे पुरावे खाजगी डिटेक्टिव्ह देऊ शकतात म्हणे , पण त्यांचे खर्च अववाच्या स्ववा असतात , तुमचे रिलेशन शिप हे ती बायको निघून गेल्यानंतरचे आहेत , त्यामुळे घरातच तिला मोबाईलवर वगैरे सापडले , असेही ह्या केस मध्ये होणार नाही, त्यामुळे सगळी भीती काढून टाका,

नवर्या बरोबर रहात नाही , मूलही नाही , ग्रॅज्युएट असून स्वतही नोकरी करत नाही , आहे ती नोकरी सोडली , शिवाय पोटगी मागते तर कोर्ट स्वतःच त्या बाईचे थोबाड रंगवेल. पूर्वीच्या काळी स्त्रियांना रिसोर्सेस नव्हते , नवरे अधिकाराचा गैर वापर करून त्यांना टाकून देत मोदीगिरी करत होते , म्हणून तसे कायदे होते , आज कोर्टदेखील ते कायदे जसेच्या तसे वापरत नाही.

https://m.timesofindia.com/city/delhi/wife-who-can-sustain-herself-not-e...

NEW DELHI: A wife who is capable of working and sustaining herself is not entitled to claim maintenance from her husband, a Delhi court said, while rejecting a woman’s plea seeking interim maintenance from her estranged husband.

कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. >>> कामाला बाई होती तर कोणत्या कामावरून वाद झाले ?

काही आयडींचे तेच ते अपेक्षित प्रतिसाद वाचून अपेक्षा सुफळ संपूर्ण झाली. ऋन्मेषनी काढलेला धागा कितपत खरा आहे का माहीत नाही पण अपेक्षित प्रतिसाद वाचून गंमत वाटली.

बाकी ऋन्मेष तुम्ही मांडलेली समस्या खरी आहे असे मानून चाललं तर तुम्ही एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा.

अश्या लढ्यात जी पार्टी जास्त आक्रमकपणे बाजू माण्डते, बारगेनिंग पॉवर बाळगते ती जिंकते.
मुलाला अडकवायचं असेल तर त्याच्यावर पूर्वीचं प्रकरण असल्याअसल्याचे,, नपुंसकत्वाचे आरोप होतात, स्वतःला इजा करुन घेऊन ते डोमेस्टिक व्हायोलन्स चे पुरावे म्हणून दाखवले जातात. मुलीला अडकवायचं असेल तर तिचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, लग्ना आधी प्रकरण होतं, आईबाबांचा छळ करते वगैरे मुद्दे मांडले जातात. दोन्ही बाजूच्य केसेस आजूबाजूला पाहिल्या. कोर्ट केस किंवा बाहेर सेटलमेंट, हे सर्व लवकर मिटवून दोन्ही बाजूंनी मूव्ह ऑन व्हावं. नव्या पार्टनर सोबत किंवा एकटं जगायचं असेल तर एकटं, स्वतःचं आयुष्य नीट प्लॅन करावं.
तसं पाहिलं तर १० लाख खूपच कमी रक्कम आहे.वाढत नाही तोवर देऊन मोकळे व्हावे. मुलीबरोबर थोडे का होईना आनंदाचे क्षण, भावनिक गुंतवणूक असेल. त्याचा मान ठेवून १० लाख द्यायला हरकत नाही.
आता अगदी जवळच्या २ केसेस मध्ये हा आकडा अनुक्रमे ६८ लाख आणि ७५ लाख इतका आहे.

१० लाख कमी आहेत तर देऊन टाकावे. ७५लाख आकडा आहे म्हणजे काय अनु? हा काय मार्केट रेट आहे काय? मुलाची परीस्थिती, ऐपत,मुलीची कुवत, पैसे लुबाडण्याची लबाडी चेक होणार की. हे काही मागितले १०-२० लाख की द्या नाहीतर रक्कम वाढेल असं नाही.

हो नक्कीच.
हे सगळं चेक व्हावं. पण हे सगळं चेक करण्याची शक्ती, कुवत,वेळ नसल्यास 10 लाख हा ओके टाईप आकडा आहे
(15-20 लाख पॅकेज असलेल्या मुली फक्त रक्कम चांगली मिळावी म्हणून 6 महिने ngo कडे नोकरी करताना, किंवा 'नवी नोकरी मिळालीय सांगू नका' म्हणून मोठी तगडी सेटलमेंट किंवा 1 फ्लॅट घेताना पाहिल्या आहेत.त्यामुळे कितीही लूट,अन्यायकारक वाटली तरी पैश्याचा हिशोब ज्या बाजूला कमी आहे तो मार्ग पकडावा.वकीलावर विश्वास असल्यास आणि चांगला मिळाल्यास वकील.अन्यथा त्यातल्या त्यात कमी पैसे देऊन सुटका करून पुढचा संसार चांगला.)

डोक्यावर मिऱ्या वाटणाऱ्या बायकोला शेरास सव्वाशेर व्हायला ज्याला जमत नाही, तू तुझा खर्च भागव, मी माझ्या आईबाबाकडे भिकेचा कटोरा घेऊन जाणार नाही हे ज्याला बोलता येत नाही, धमक्या देणाऱ्या बायकोला उलट धमक्या देऊन सरळ कोर्टात ज्याला खेचता येत नाही त्याला स्वतःच्या गरजेसाठी भावनिक आधार शोधायला मात्र कष्ट पडत नाहीत, पण त्या मुलीसोबत पुढची स्टेप घ्यायची वेळ आली की कोर्ट केस पुढे करायची... आपल्या समाजाचे प्रतिबिंब ह्यातच तर दिसते. कसलीही जबाबदारी घ्यायची नाही पण फुकट मजा मारायला मिळत असेल तर ती मात्र मारायची...

Pages