पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिचे कदाचित डोळे उघडतील. >>>> +७८६ सनव, मुलगा असो वा मुलगी, कोणाही अडकलेल्या फसलेल्या गरजूची मदत झाली तर आनंदच आहे. तिथे जात धर्म लिंग हे भेद आणायचेच कश्याला मुळात..

नवर्याच्या घरात ज्या बाया फुदफूदत असतात , त्या माहेरी गेल्या , पण मिळवत्या नसतील तर त्यांचे हाल कुत्रेही खात नाही

त्यांची अवस्था वाल्या कोळीसारखी असते , वाल्या पैसे मिळवत असतो , तेंव्हा घरच्यांना प्रिय असतो , त्याची नोकरी बंद पडली की घरचे बोलतात , आता पापाची जबाबदारी कोण घेणार ?

तसे ह्यांचे होते , 4 वर्षे माहेरी तुकडे तोडून झाले , नोकरीतील गॅप आणि शिवाय संसार नसलेली , ह्या बेसवर आता तिला पुढची नोकरीही कुणी कुत्रेही देणार नाही.

ती उगाचच ताणत आहे , 10 लाख द्या अन 15 द्या

तुम्ही नोकरी पैसे बाळगून आहात , वर तू नसलीस तर दुसरी आहे , हेही ठणकावून सांगाल तर तिचे काही चालणार नाही .

The apex court in a series of verdicts has asked the Centre to amend the law to introduce irretrievable breakdown as a ground of divorce but the law remains unamended and divorce is denied even if a couple are not living together for years and their relationship bruised beyond repair.

कित्येक धागे भरकटत नेऊन लोकांना त्रास देण्यात विकृत आनंद घेणारा आज धागा भरकटत नेऊ नका म्हणतोय
मज्जाच आहे सगळी Happy

काहीतरी एक कर बाबा - एक तर कोर्टात जा नाहीतर ती मुलगी मागते ते १० लाख का काय ते दे.
रडत काय बसलाय!!!

Submitted by सामो on 2 February, 2021 - 11:51

एकदम बरोबर!
ऋन्मेऽऽष तुला मुलाची बाजु माहित आहे, मुलीचीही काही असेल
लव कम अरेन्ज मॅरेज होते, म्हणजे स्वभावाची माहिती असणार.

मुलगा बरोबर का मुलगी बरोबर हे आपल्याला एकाशीच बोलुन कळणार नाही. प्रदिप यानी म्हणाल्याप्रमाणे कोर्टात जावे. ती पण काही काळ राहिली होती एकत्र. सर्वच मुली काही अशा घाणेरडे आरोप करणार्या नसतात. कदाचित काय असेल तेच बोलेल कोर्टात. आणि कदाचित देइल् पण डिवोर्स कोर्टात न जाण्यासाठी.

स्त्री आयडी येऊन त्या मुलीची बाजू घेतायत हे पाहून धन्य वाटत आहे...
मुलगा बरोबर की मुलगी काहीही माहिती नीट दिलेली नाहीय, तरीही मुलगीच बरोबर असा निष्कर्ष ...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

वरील माहिती हेडर पोस्टमध्ये सुद्धा टाकतो.

SC rules that if both parties from first marriage have amicably parted but case pending in court, then second marriage still valid.

New Delhi: The Supreme Court has clarified that a second marriage is valid even if divorce proceedings of the first marriage are pending in court, provided that both parties from the first marriage have amicably parted and have decided not to contest the decision.

https://theprint.in/india/governance/second-marriage-valid-even-if-divor...

ह्या अशा केसेसच्या बाबतीत जजमेंटल होता येत नाही, कोण खरं कोण खोटं हे समजत नाही पण मुलाने कोर्टात जावं. कोर्टात केस सुरु राहुदे. त्याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय लग्न करु नये. खरंतर ती सोडून गेल्यावर वर्षभरानंतर त्याने कोर्टात जायला हवं होतं.

हो

आणि घटस्फोट आणि पोटगी ह्या दोन भिन्न केसेस असतात

घटस्फोटाची केस निकाल लागून तिची पोटगीचा केस ती जन्मभर लढू शकते

The Supreme Court has clarified that a second marriage is valid even if divorce proceedings of the first marriage are pending in court >>> ती बातमी पूर्ण वाचली की लक्षात येईल की हे चुकीचे इंटरप्रिटेशन आहे. आधी कोर्टाने घटस्फोट मंजूर केला. मग त्याने त्यावर उच्च कोर्टात अपील केले. पण नंतर त्यांचे सेटलमेन्ट होऊन याने अपील मागे घेण्यास अर्ज केला, पण कोर्टाने त्यावर अजून निर्णय दिला नव्हता. त्यावेळेस त्याने दुसरे लग्न केले, ते लग्न वैध आहे.

म्हणजे दुसरे लग्न करण्यास एका कोर्टाने आधी घटस्फोट मंजूर केलेला असावा ही अट आहेच.

तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय >>> यात नवल ते काय?
तिला निगोशिएट करायचे आहे, तर ती मला दुसरे लग्न करायचे आहे, लौकर सेटल करूया आपण असे म्हणणार आहे का?
कदाचित नसेलही तिला दुसरं लग्न करायचं. पण ती हे सगळं बोलते आहे ते नीट वकिलाचा सल्ला घेऊन असे दिसते आहे.
मुलगी हुशार आहे.

म्हणजे दुसरे लग्न करण्यास एका कोर्टाने आधी घटस्फोट मंजूर केलेला असावा ही अट आहेच.

हो मीही म्हणूनच ते लिहिले की लवकरात लवकर घटस्फोट केस दाखल करा

एकत्र रहात नाहीत ,ह्या बेसवर घटस्फोट होईलच

राहिला पोटगी , कॅम्पेनसेशनचा प्रश्न , तर ती केस सुरू राहील , ती कोणत्या का कोर्टात जाईना , तिलाही समजून चुकेल की कोर्टही सुशिक्षित विनापत्य स्त्रीला फारसे कॅम्पेनसेशन देत नाही , बसू दे लढत

आणि घटस्फोट आणि पोटगी ह्या दोन भिन्न केसेस असतात
घटस्फोटाची केस निकाल लागून तिची पोटगीचा केस ती जन्मभर लढू शकते
>>>>>>

ओह ओके हे मला माहीतच नव्हते, किंबहुना हा असा विचारच केला नव्हता.
माझ्या त्या नतलगाने वकिलाशी संपर्क तर साधला आहे, आशा करतो त्याला देखील हे ठाऊक असावे.

अजूनही असतील हो Happy
शिव्यावगैरे द्यायच्या असतील तर स्ट्रेजनर येईल Happy

बाळा स्ट्रेजनर नाही रे स्ट्रेंजर. आठवण काढताना नाव तरी व्यवस्थित लिही.बाकी ते एक मिलियन म्हणजे एकावर किती शून्य असतात याचा अभ्यास केलास का तू?

माझ्या माहिती नुसार घटस्फोटाचा निर्णय देतात तेव्हा पोटगीही ठरवल्या जाते.
घटस्फोटाचा निर्णय दोघांनाही मान्य असेल आणि दोघे वेगळे रहात असतील, पण पोटगीबाबत कुठल्याही एका पक्षाला पुढे अपिल करून ती केस लढवायची आहे, तर ती केस सुरू असतानाही दोन्ही पक्ष दुसरे लग्न करण्यास मोकळे आहेत असा त्याचा अर्थ आहे.

@ मानवमामा ओके. हे असे असणे जास्त लॉजिकल वाटतेय, घटस्फोटाच्या केसचा निकाल देतानाच पोटगीबद्दल काय ते ठरणे गरजेचे. मग पुन्हा अपील करा केस पुढे न्या हे ठिक आहे.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे छळ केला आणि म्हणुन घटस्फोट हवाय ही केस एकच असेल असे नाही. केवळ छळ केल्याची केसही दाखल होऊ शकते. ती सुरू असताना दुसऱ्या पक्षाने घटस्फोटाची केस दाखल करून फायदा नाही पहिली केस निकालात लागल्या शिवाय कोर्ट ती दाखल करून घेणार नाही अथवा निकाल लागे पर्यंत त्यावर सुनावणी होणार नाही.

आला रे आला धिंचँग स्ट्रेनजर आला
आता येईल मजा
शिळी भाकरी अजूनही चघळत बसलाय जणू Happy
लोकांना फार कौतुक आहे रे तुझं
अजिबात संयम ढासळत नाही म्हणून Happy

केवळ छळ केल्याची केसही दाखल होऊ शकते. ती सुरू असताना दुसऱ्या पक्षाने घटस्फोटाची केस दाखल करून फायदा नाही पहिली केस निकालात लागल्या शिवाय कोर्ट ती दाखल करून घेणार नाही
>>>>>
म्हणजे मुलीने छळ केल्याची केस टाकली की मुलगा स्वतःतर्फे घटस्फोटाची केस टाकू शकत नाही. तिचा निकाल लागेपर्यंत थांबावे लागणार... असेच ना

हो.

अखेर सुटका मिळाली
१० लाखांची खंडणी मोजावी लागली !

मॅटर कोर्टाच्या बाहेर सेटल झाले.

आता एक पडलेला प्रश्न !

ती मुलगी पुन्हा दुसरे लग्न करून पुन्हा दुसरा डिव्होर्स घेऊन पुन्हा नवीन पोटगीसाठी पात्र ठरू शकते का?
कि एकच चान्स असतो?

अरे असं कशाला बोलतोस. तिला शुभेच्छा दे की - पुढच्या वेळी सोडायची वेळ आली तर मडोनासारखी तूच पोटगी देण्याइतकी सक्षम होशील. झालं ते झालं आता त्यालाही पुढचा रस्ता मिळाला. त्यालाही शुभेच्छा दे की पुन्हा पोटगी द्यायची वेळ नको. हल्ली जोडीदार सोडून गेला/गेली तर दु:ख कमी नि पैसा गेला तर जास्त असंच दिसतं मग आपण ही शुभेच्छा तशाच द्याव्या.

Pages