पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० लाख दिले तरी घटस्फोटासाठी कोर्टात जावे लागेल हे बरोबर आहे. पण ते परस्पर संमतीने घटस्फोट म्हणुन, कुणा एकावर खटला भरून नव्हे. कुणा एकावर आरोप करून खटला न भरण्याची किंमत १० लाख + अजून काय बोलणी करण्यास येणार आहे ते.

एकतर १० लाख + बोलणी याला कबूल होऊन प्रकरण मिटवावे किंवा कबूल न होता कोर्टात स्वतः केस लढावी.
आपण केस लढायला तयार नाही कारण वेळ जाणार.
त्या ऐवजी इतर लोकांनी आपला वेळ खर्चून, मोर्चे काढुन, आंदोलन करून हा कायदा सुधरवावा, लौकर न्याय मिळेल अशी आपली न्यायव्यवस्था मजबूत करावी, आपण त्यांचा उपभोग घ्यावा? ते ही होईल, त्याला भरपूर वेळ लागेल.
पण त्यात केस लढणाऱ्या विचारांच्या लोकांची संख्या वाढायला हवी. मिटवून टाकू म्हणणाऱ्या लोकांची नव्हे.

आपण केस लढायला तयार नाही कारण वेळ जाणार.
>>>>
वेळ जाणार, पैसा जाणार, शारीरीक त्रास होणार, मानसिक स्वास्थ्य बिघडणार आणि घरच्यांना नाहक यात ओढले जाऊन बदनामी झेलावी लागणार ज्यासाठी ते तयार नसतील. केस लढावी हा निर्णय कदाचित त्याने एकट्याने घेणे सोपे आणि ऊचितही नसावे, कुटुंबाने मिळून घ्यायचा निर्णय आहे.

कल्पना नसताना धागे विणण्याची हौस दांडगी आहे. बेगानी शादी मे नाही नाही डिवोर्स मे ऋन्मेष दिवाना.
>>>>>

आज ही वेळ त्याच्यावर आहे, देव न करो उद्या माझ्यावर वा आपल्यापैकी कोणावरही, ईथल्या कुठल्याही पुरुषावर आली तर त्यासाठी तयार नको का राहायला? की त्याचे तो बघून घेईल आपल्याला काय, आपल्यावर अशी वेळ येणारच नाही म्हणत हातावर घडी घालून बसावे.
समाजसुधारणेचा वेग प्रचंड वाढत आहे, यात चांगल्यासोबत वाईट गोष्टी ज्याला साईड ईफेक्ट म्हणू शकतो त्या ओघाने होणारच. त्यामुळे त्यासाठी कायम तयार राहायला हवे.
आपण पुरुष आहोत, स्त्रियांसारखे समाजातील दुर्बल घटक नाही आहोत, या भ्रमातून पुरुष जितक्या लवकर बाहेर येतील तितके चांगले. त्यासाठी अनुभव यायची वाट बघू नका.

ऋन्मेष, ही टिआरपी मिळवण्यासाठी तुझ्या सुपीक डोक्यातून निघालेली काल्पनिक कथा असेल तर ठीक आहे. तसा स्पष्ट उल्लेख केला जावा अशी माफक अपेक्षा आहे.
जर खरोखरंच काही व्यक्ती या अशा कठीण प्रसंगातून जात असतील आणि तुझ्यापाशी मन मोकळं करून बोलत असतील तर तु असा धागा का काढला आहेस हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटतो.
It makes me sick to the core to see how you are peddling fresh gossip nuggets to get TRP for your thread. आज काय ती मीटिंगलाच आली नाही. आता तिने रक्कम वाढवून पंधरा लाख केली. याला मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे असे म्हणतात. दुसर्‍याने आपल्याला काही विश्वास ठेवून ज्या खाजगी गोष्टी सांगितलेल्या असतात त्यांचा असा पब्लिक फोरमवर बाजार मांडू नये ही साधी नीतिमत्ता तुझ्यात शिल्लक राहिलेली नाही का?
एकदा तुझ्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून हा प्रश्न स्वतःला विचार.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा अनेकांनी भांडवल म्हणून वापर केला. किमान त्यात त्यांचा आर्थिक फायदा होत होता हे कारण तरी आहे. तू हे असे धागे का काढतो आहेस याचा सिरियसली विचार कर.
डॉक्टर अभय बंग यांनी त्यांच्या माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकात एका obsessed लेखकाचं वर्णन केलं आहे. हा आयुष्यातील प्रत्येक अनुभवाकडे लेखनासाठीचं मटेरियल म्हणून पहात असतो. वाढता वाढता हे वेड इतक्या पराकोटीला जातं की जेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो तेव्हा देखील त्याच्या मनात हेच विचार चालू राहतात. दर अनुभवाचे धाग्यात रूपांतर करण्यात आपण आपली नीतिमूल्ये तर गहाण टाकत नाहीओत ना याचा विचार कर. तुला शुभेच्छा!

जिज्ञासा आपण ही पोस्ट वेगळा धागा म्हणून काढल्यास छान ऊपयुक्त चर्चा होईल.
माझा हा किंवा कुठलाही धागा आपण केसस्टडी म्हणून वापरू शकता. माझी हरकत नसेल.

बारीकसारीक डिटेल्स सोडले तर असेल खरा एखाद्यावेळेस कारण आपल्या सर्वांच्या माहितीत अशा केसेस असतातच. नसला तरी जे कोणी यातून जात असतील किंवा जातील भविष्यात त्यांना कामाच्या चार गोष्टी कळतील इथे. असे किंवा कोतबोचे धागे हे Schrödinger's Cat सारखे असतात.

जिज्ञासा ,
तुमचे प्रतिसाद खूप सेन्सीबल असतात नेहमीच. हा अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. पण ऋन्मेष म्हणतो तसा हा एका संपूर्ण वेगळ्या चर्चेचा विषय आहे. अशी चर्चा व्हावी असे मनापासून वाटते.

कोर्टात जा , कोर्ट प्रोसेस सुरू करणे गरजेचे आहे,

तिला बोलणी करायला यावेच लागेल

ती नाही आली तर बिनाशरत घटस्फोट आपोआप मिळेल

ती 1 कोटीवरून 10 लाखावर आली , कोर्टात तिला शून्यावर आणा , 3 महिने नांदून 3 वर्षे न आलेल्या बाईला कितीही रडली तरी कोर्ट सहानुभूती देणार नाही

10 लाखांची सेटलमेंट कधीही करता येईल
घटस्फोट दिल्याशिवाय तिलाही 10 लाख मिळणार नाहीत , हे तिलाही माहीत आहे , कशाला तिच्याकडे लक्ष देता?

कोर्टाने 50 वर्षे घटस्फोट दिला नाही , असे कधी घडले आहे का ?

मला यावर अधिक चर्चा करण्यात रस नाही. प्रत्येकाची मूल्ये या बाबतीत वेगळी असतील कदाचित. मायबोलीवर अनेकांनी स्वतःच्या खाजगी प्रश्नांसाठी मदत मागितली आहे आणि त्यात मला गैर वाटत नाही. पण दुसऱ्याच्या खाजगी आयुष्याचे भांडवल करून धागे चालवणे माझ्या मूल्यांत बसू शकत नाही.

@ जिज्ञासा,
आधी आपण ईतकी मोठी आणि छान पोस्ट लिहिली आणि आता आपण त्या विषयावर चर्चा करण्यात रस नाही असे म्हणत आहात. अश्याने असा चुकीचा संदेश जाईल की आपल्याला नुसते ऋन्मेषला वा त्याच्या धाग्याला टारगेट करण्यापुरतेच रस होता. जे कदाचित तसे नसावे.
आपण तीच पोस्ट कॉपीपेस्ट करून नवीन धागा काढला तरी तिथे छान उपयुक्त चर्चा होईल. मी काढला असता, पण ती विषयचोरी होईल. आणि मग मला स्वतःच्याच धाग्याचे उदाहरण त्यात देता येणार नाही. दिले तरी प्रामाणिकपणे हा विषय मांडता येणार नाही.
असो, बाकी आपली मर्जी, माझ्याकडूनही हा टॉपिक या धाग्यावर कट !

3 महिने नांदून 3 वर्षे न आलेल्या बाईला कितीही रडली तरी कोर्ट सहानुभूती देणार नाही
>>>>>
मी माझे एक मत म्हणून त्या मुलापर्यंत हे आणि ईथले असेच सिमिलर सकारात्मक विचार पोहोचवतो. तसे दूरच्या नात्यातलाच आणि समवयीन असला तरी आमची ट्युनिंग मित्रासारखी वगैरे नाहीये. आमच्या दोघांत प्रत्यक्ष यावर बोलणे चाट होईल याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे थेट न बोलता ईतरांच्या मार्फत त्याला हे सांगावे लागेल.

ऋन्मेष, माझ्या सल्ल्यातही तुला नवीन धाग्याचे पोटेन्शियल दिसते आहे याइतकी दुर्दैवी गोष्ट कोणती! अति झाले आणि आता हसू ही येत नाही अशी अवस्था झाली आहे तुझ्या लेखनाची. तुझ्यातील चांगल्या लेखनगुणांची तुला जाणीव व्हावी आणि तुझी ही घसरण थांबावी यासाठी तुला शुभेच्छा! टेक केअर.

ऋन्मेष, माझ्या सल्ल्यातही तुला नवीन धाग्याचे पोटेन्शियल दिसते आहे याइतकी दुर्दैवी गोष्ट कोणती!
>>>>>>>

एखाद्या विषयावर धागा निघून चर्चा घडावी याकडे मी सकारात्मक नजरेने बघतो. जोपर्यंत चर्चा घडत नाही तोपर्यंत आपल्याला आपली मते ईतरांशी ताडून पाहता येत नाही. मला जे समजले तेच अंतिम सत्य असे जर मी मानले तर मला कधीच धाग्याची चर्चेची गरज पडणार नाही. पण सुदैवाने ते तसे नाहीये. तुम्हाला यात दुर्दैव दिसत आहे कारण मी किंवा माझ्यासारखी लोकं अमुकतमुकच असतात तुम्ही हे ठरवूनच टाकले आहे. त्यावर तुम्हाला दुसरा विचार नकोच आहे Happy

Proud मायबोलीवर पुरुषप्रधान धागा निघाला की स्त्री पिशाच्चे त्रास देतात, अशोक वनात सीतामैय्या राम राम म्हटल्यावर त्या आजूबाजूच्या होत्या त्या कशा करत होत्या ,

तिकडे लक्ष देऊ नये

लवकर डिवोर्स मिळविण्याचेही उपाय आहेत.
एखाद्या वकिलाला भेटा.

४ नोव्ह २०२० रोजी सुप्रिम कोर्टानी लँडमार्क जजमेंट देत अशा गाईडलाईन्स दिल्यात की इथून पुढे स्त्रीयाही स्वतःचं शिक्षण, संपत्ती व नोकरी वगैरे माहितीचं एफिडेव्हीट सादर करायचं आहे. त्यामुळे आधीसारखं पैसे उकळणे आता बंद झालय. ती जर कमावती असेल तर १ रुपयाही द्यावं लागणार नाही.

तसे दूरच्या नात्यातलाच आणि समवयीन असला तरी आमची ट्युनिंग मित्रासारखी वगैरे नाहीये. आमच्या दोघांत प्रत्यक्ष यावर बोलणे चाट होईल याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे थेट न बोलता ईतरांच्या मार्फत त्याला हे सांगावे लागेल. }}}}}}

या माणसाबद्दल तुम्हाला अनेक गोष्टींची कल्पना नाही (तुमच्याच एका पोस्ट मधे लिहिले आहे, वकील आहे का, कधी घेताला, इ. ) त्या माणसाशी काहीही जवळीक नाही. जवळीक जाऊ दे थेट कॉन्टॅक्ट सुध्दा नाही. तुमच्या कडे असलेल्या डेटा चा सोर्स काय? ऐकीव माहिती आणि गॉसिप ?? सुपर संशयास्पद नाही वाटत का तुम्हालाच ? वर म्हणता की मी चर्चा करून ताडून पाहतो. तुमच्याकडे असलेला डेटा च जिथं तुम्हाला डाऊटफुल वाटत नाही तिथे डोंबल तुम्ही चर्चेवर आत्मपरीक्षण करणार !! तुमचं स्वतःचं या सिच्युएशन चे understanding तुम्ही व्हेरिफाय कसे करणार हा प्रश्न तुम्हाला पडला का? काय केले त्याबद्दल? कसे केले? जाऊन प्रत्यक्ष बोललात का यात असलेल्या 3 माणसांशी ? (एक मुलगा आणि दोन मुली) काय राव, इथे स्वप्नील जोशी, सई आणि शरूख असते तर तुम्ही लय जास्त due diligence दाखवला असता गॉसिप करणाऱ्या लोकांचा निषेध विरोध केला असता तेवडा तरी दाखवा की
वर या धाग्याला "समाजात सध्या होणारे होऊ घातलेले पुरुषांवरचे अत्याचार, समाजोपयोगी धागा" असलं काहीतरी उदात्त रुप द्यायचं. यात काही किळस वाणेही वाटत नाही. कसे जमवता हो हे ??

ब्लॅककॅट, तुम्ही या धाग्यावर दिलेले सर्व सल्ले उत्तम आणि to the point आहेत. मात्र या धाग्याच्या उद्देश सल्ला मिळवणे हा नाही हे तुमच्या लवकरच लक्षात येईल होपफुली.

तुमच्याकडे असलेला डेटा च जिथं तुम्हाला डाऊटफुल वाटत नाही तिथे डोंबल तुम्ही चर्चेवर आत्मपरीक्षण करणार !!

लोक रामरावणापासून मोदी राहुल पर्यंत कशावरही बोलतात

मी माझे एक मत म्हणून त्या मुलापर्यंत हे आणि ईथले असेच सिमिलर सकारात्मक विचार पोहोचवतो. >>
माफ करा, पण तुमच्या विधानांमध्ये विसंगती आहे असं नाही वाटत का तुम्हाला.
तुम्ही मघाशी एका प्रतिसादात "..असं असावं" अशी शक्यता व्यक्त करत होता.
आता म्हणता की, त्या मुलापर्यंत सकारात्मक विचार पोहचवतो. म्हणजे तुम्ही त्याला 'बाबारे, तुझ्या व्यक्तीगत समस्येबद्दल, तुझ्या भावी लग्नाबद्दल तु सांगितले नसतांनाही मी मायबोली या संकेतस्थळावर चर्चा करत असुन तुझ्यापर्यंत केवळ सकारात्मक विचार पोहचवत आहे." हे पण सांगितले असेलच.

शाहरुखला लव्हेरीया झाला होता, ऋन्मेषला धागेरीया झालाय. दिवस ते मध्यरात्र साधारण ३ -४ धागे सहज येतायत. पहिले पान बघा.

वीरु, जे माहीत आहे ते माहीत आहे बोलतोय, जे माहीत नाही ते माहीत नाही बोलतोय, तसेच जे संदर्भावरून असावे असे वाटतेय ते असावे असे बोलतोय.
मुलाशी प्रत्यक्ष बोलणे नाही, पण एखाद्या मधल्या नातेवाईकामार्फत त्याच्याकडे योग्य तो सल्ला पोहोचवू शकतो.
थोडा वेळ थांबा आज संध्याकाळी अजून जरा माहिती समजलीय, जरा कन्फर्म झाली की सांगतो रात्री किंवा उद्या..

बाकी मला ईथे कोणी किस्से रचणारा समजत असेल, कोणी टीआरपी धाग्यांसाठी हपापलेला समजत असेल, किंवा कोणी मानसिक रुग्ण समजत असेल तरीही ईथे सिरीअसली सल्ले देणारेही बरेच आहेत आणि त्यापैकी जर एखाद्याचा सल्ला उपयुक्त वाटून मी त्याच्यापर्यंत पोहोचवू शकलो, आणि तो सल्ला क्लिक होत तो या अडचणीतून सुटला तर मला ईथे लोकांनी काहीबाही समजणे ही फार छोटी किंमत आहे.

तसेच याऊपर काही मूकवाचक असतील जे स्वतः किंवा ज्यांच्या ओळखीतले अश्या अडचणीत सापडले असतील तर त्यांना कदाचित काही चांगला मार्ग मिळू शकेल. धीर मिळू शकेल. कारण वकिलाकडे जाण्याआधी वा कोर्टाची पायरी चढण्याआधी आपल्याला थोडीफार माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे अशी कोणाची मदत होत असेल तर तो माझ्यासाठी बोनस असेल.

बाकी ज्यांना हा किस्सा रचित वाटत असेल त्यांना मी ईतकेच विनंती करेन की मग आपण प्लीज धाग्यापासून दूर राहा. खोटे वाटत असेल तर काही हरकत नाही, हा धागा आपल्या उपयुक्त सल्यांना मुकला असे समजेन. पण निदान जे विश्वासाने सल्ले देत आहेत त्यांचा बुद्धीभेद तरी करू नका. त्यांना देऊ द्या ना सल्ले. त्यामुळे प्लीज धागा भरकटवून, अवांतर पोस्ट वाढवून ईथे आलेले ते चांगले सल्ले हरवून जातील किमान हे तरी करू नका _/\_

खरं आहे रुन्मेष.

एखादी अभागी मुलगी जर अशा पुरुषाच्या जाळ्यात सापडली असेल जो तिला लग्नाचं वचन देऊन वापर करून घेतोय आणि 'काय करू, पहिली बायको सोडतच नाही' म्हणतोय तिचे कदाचित डोळे उघडतील.

तिचे कदाचित डोळे उघडतील. >>>> +७८६ सनव, मुलगा असो वा मुलगी, कोणाही अडकलेल्या फसलेल्या गरजूची मदत झाली तर आनंदच आहे. तिथे जात धर्म लिंग हे भेद आणायचेच कश्याला मुळात..

Pages