पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वतः देखील यातून गेलो आहे. त्यावेळी मला (आठ वर्षा पूर्वी ) ३५ लाख रुपये अधिक फ्लॅट दोघांच्या नांवावर रेजिस्स्टर केलेला असल्याने ( जरी लोन चा हप्ता मी एकटा भरत होतो तरी ) त्यामध्ये पण अर्धा हिस्सा मागितले होते. मी सरळ सांगितले उरलेलं अर्धे हप्ते तू भर म्हणून नाहीतर बँकेला फ्लॅट जप्त करू दे आणि पुढे पाहू. राहिला प्रश्न ३५ लाखांचा, तर कोर्ट कचेरी होऊन जाऊ दे.

२-३ महिने असेच तंग वातावरणात गेले आणि पुढे सर्व ठीक झाले (नो डिव्होर्स ). पण त्या वेळेला नात्यांमध्ये ( दोघांचे आई वडील, भाऊ, बहिणी etc.) जी कटुता आली ती आलीच. आता सगळे तोंडदेखले नीट बोलतात पण मनात मध्ये अढी ठेवूनच.

धमक्या देणाऱ्या बायकोला उलट धमक्या देऊन सरळ कोर्टात ज्याला खेचता येत नाही त्याला स्वतःच्या गरजेसाठी भावनिक आधार शोधायला मात्र कष्ट पडत नाहीत, पण त्या मुलीसोबत पुढची स्टेप घ्यायची वेळ आली की कोर्ट केस पुढे करायची... आपल्या समाजाचे प्रतिबिंब ह्यातच तर दिसते///

परफेक्ट प्रतिसाद! अशा लोकांना जितकी शिक्षा मिळेल तितकी कमीच. आणि या इसमाची बाजू घेणाऱ्याच्या स्वतःच्या मुलीला जर कोणी असं लग्नाचं वचन देऊन फसवलं तर? तिचा असा वापर करून घेतला तर? तर कदाचित हे लोक तेही आनंदाने स्वीकारतील.

साधना, आपले प्रतिसाद बहुधा माझा धागा फेक केस समजून येत आहेत.
पण त्यातही साक्षात सरस्वती आपल्या तोंडून बोलत आहे. खरेच असेच होते. बायकोची हौसमौज लाड पुरवणारा नवरा बावळट, तर ते न करणारा क्रूर Sad

२-३ महिने असेच तंग वातावरणात गेले आणि पुढे सर्व ठीक झाले (नो डिव्होर्स ). पण त्या वेळेला नात्यांमध्ये ( दोघांचे आई वडील, भाऊ, बहिणी etc.) जी कटुता आली ती आलीच. आता सगळे तोंडदेखले नीट बोलतात पण मनात मध्ये अढी ठेवूनच.
Submitted by PradeepD on 2 February, 2021 - 22:03
>>>>>>

नो डिव्होर्स हे छान झाले. सध्या छान सुरळीत चालू असेल अशी आशा करतो Happy
बाकी स्वतःचा अनुभव ईथे मांडणे कौतुकास्पद Happy

Sorry पण त्या मुलीची पण तितकीच चूक आहे..तिने सगळ्या शक्यता आधी पडताळून पाहायला हव्या होत्या..

टाळी कधी एका हाताने वाजत नाही.. तिच्या ह्या अडचणीसाठी ती स्वतःसुद्धा तितकीच जबाबदार आहे..

Sorry पण त्या मुलीची पण तितकीच चूक आहे
>>>
कोणती मुलगी, प्रकरणात आता दोन मुलींची चर्चा सुरू झालीय, एक घटस्फोट न दे नारी बायको, तर एक प्रेयसी

ऋन्मेष,
समाजाला न जुमानता वगैरे मला वरच्या केसमधे अजिबातच दिसत नाही.
>>>

स्वाती २, नक्की कश्यावरून आपण हे खात्रीने म्हणत आहात?
एक बायको सोबत नांदत नसलेला पुरुष आहे. त्याच्या मनात जागा रिकामी आहे, तिथे दुसरी मुलगी मनात भरली, तर त्याने कायद्यानुसार आपण अजूनही विवाहीत आहोत तर हा व्यभिचार समजेल म्हणत तिला नकार द्यावा की आयुष्यात लाभलेले हे प्रेम हातचे जाऊ न देता होकार देऊन मग पुढे घटस्फोटासाठी प्रयत्न करावे?

उस हाथ को तुम थाम लो जो मेहरबां SSSSS कल हो ना हो....
(बस्स, ह्या पोस्टीमागे बॅकग्राऊंड म्युझिकची कमी राहिली ती पूर्ण केली!!)

एकूणात बायको गेली सोडून ह्याचे दु:ख कमी नि ती पैसे मागते ह्याचे दु:ख जास्त असे दिसते. प्यार करे और नोट भी मांगे... टेक इट ईझी पॉलिसी...

Sorry पण त्या मुलीची पण तितकीच चूक आहे
>>>

हो नक्कीच. जर याच्या बायकोला गर्लफ्रेंडबद्दल सुगावा लागला तर कोर्टकचेरीतही गर्लफ्रेंडला खेचलं जाईल. त्या मुलीने तर आपलं लाईफ बरबाद करून घेतलं आता!
मुळात अशा पुरुषाविषयी आकर्षण तरी वाटतं कसं मुलींना देव जाणे.

ही केस फेक आहे कि नाही मला माहीत नाही. पण आधीच म्हटल्याप्रमाणे दुसरी बाजू पण सांगायला हवी होती.
घटस्फोटाच्या केसेस अशा सवंग चर्चेसाठी नसतात. दोन्ही कुटुंबे डिस्टर्ब असतात. मला मान्य आहे की काही केसेस मधे मुलींची चूक असेल.
पण हा अपवाद असेल ना ? अपवादाने नियम बनतो.

मुलींवर प्रचंड दडपण असतं. अशा दडपणातून बाहेर पडून न्यायासाठी भांडणं, कोर्ट केसेस करणं हे सोप्पं नाही. ग्रामीण भागात तर अजिबात नाही. कोर्टाची पायरी चढणे शहाणपणाचे नाही असे समजले जाते. लोक तडजोड करतात. शिक्षणामुळे मुलींना आपले न्यायहक्क माहीत झाले. त्याची सवय इथल्या लोकांना नाही. ते मागितले की मग आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी सुरू होतात.

माझ्या मैत्रिणीची केस इथे देण्याचा मोह वारंवार होऊनही टाळला आहे. मुलीवर दडपणाचे किती थर असतात त्याची प्रचिती घेतली आहे.

मुलाने दुसरं लग्न केलं तरी कोर्टात ते सांगता येत नाही अशी केस मला माहीत आहे. वकीलाने स्वत: सांगितले की पुराव्याशिवाय आरोप करता येत नाहीत. मुलाचे दुसरे लग्न झालेय हे ठाऊक आहे पण कुणीच कबूल करत नाही. मुलीला हाकलून दिले. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. पोलीस मॅनेज केले गेले. तिच्या तक्रारी घेतल्या गेल्या नाहीत. शेवटी फॅमिली कोर्टात केस होती. इतके सोपे नाही ते.

एकूणात बायको गेली सोडून ह्याचे दु:ख कमी नि ती पैसे मागते ह्याचे दु:ख जास्त असे दिसते.
>>>>>>>>

बायको सोडून गेली तेव्हा दुख त्रागा चीडचीड जे काही असेल ते करून झाले असेल.
आता पैसे मागतेय तर त्याची चीडचीड होणे स्वाभाविक आहेच.
कि बायको टाकून गेली तरी तिचाच फोटो पाकिटात घेऊन फिरायचे, तो बघून उसासे सोडत रडायचे, परस्त्रीकडे चुकूनही बघायचे नाही, असे आहे का?

बायकोची हौसमौज लाड पुरवणारा नवरा बावळट, तर ते न करणारा क्रूर }}}}}
या वाक्याचा आणि साधना यांच्या पोस्ट चा काहीच संबंध नाही. साधना यांच्या पोस्ट च्या रेफेरन्स मध्ये हे वाक्य लिहिणे हा खोडसाळ पणा आहे.

स्वाती यांचे म्हणणे पटले. मजबूत भांडायचे, अचानक थांबायचं, पण ऑफिशियल भांडण संपवायचं नाही, कौंसेलिंग वगैरे काही करायचे नाही, मध्ये अंतर ठेवून राहायच जैसे थे परिस्थिती ठेवायची. दुसरी पार्टी न्यूक्लिअर व्हायला लागली की मग बोंबलत हायर अथोरिटी कडे जायच. हे पोरगं आहे की दक्षिण कोरिया ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 February, 2021 - 12:44>>
माझ्या मते डिवोर्सचे निकालपत्र हातात नसताना डेटिंग हेच बिग नो! भारतात नो फॉल्ट डिवोर्स नाही. परस्पर संमती तरी लागते नाहीतर मग कारणे दाखवा. अशा परीस्थितीत >>आयुष्यात लाभलेले हे प्रेम हातचे जाऊ न देता होकार देऊन मग पुढे घटस्फोटासाठी प्रयत्न करावे?>> याला मी अडाणीपणा म्हणेन. बायको सोबत रहात नाही तर ते नाते आधी कायद्याने संपवा. समाज काही काळ व्यभिचारी म्हणेल आणि विसरुन जाईल , कायद्याचे तसे नसते. इथे परीचय/प्रेम/डेटिंग जे काही आहे त्या नात्याचे पुढे विवाहात रुपांतर व्हावे ही इच्छा आहे, त्यासाठी घटस्फोट मिळावा म्हणून आता ५०लाख/ १० लाख वाटाघाटी सुरु आहेत. प्रथम पत्नीला पोटगीसाठी कोर्टात जा म्हणायचीही धमक नाही. उद्या सध्याचे प्रेमपात्र 'लग्नाचे आमिश दाखवून फसवणूक ' असे आरोप करु लागेल तर काय करणार ?

रून्मेष >> डिपेंड्स... कधी काळी आवडती असेल बायको तर तिचे दुसरे लग्न होईपर्यंत उसासे टाकायला काय प्रॉब्लेम आहे - इगो?

हे पोरगं आहे की दक्षिण कोरिया ?? >> Biggrin

२-३ महिने असेच तंग वातावरणात गेले आणि पुढे सर्व ठीक झाले (नो डिव्होर्स ). पण त्या वेळेला नात्यांमध्ये ( दोघांचे आई वडील, भाऊ, बहिणी etc.) जी कटुता आली ती आलीच. आता सगळे तोंडदेखले नीट बोलतात पण मनात मध्ये अढी ठेवूनच.
>>>>>>
नो डिव्होर्स हे छान झाले. सध्या छान सुरळीत चालू असेल अशी आशा करतो Happy
बाकी स्वतःचा अनुभव ईथे मांडणे कौतुकास्पद
>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो . पुढे सर्व काही सुरळीत झाले, मुलगा झाला आणि हा लाईफ मधला चॅप्टर मार्गी लागला एकदाचा. Happy

स्वाती२,
अगदी तो 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' वाला मुद्दाच पेपर मधल्या भडक हेडिंग सहित डोक्यात आला होता. (हे 'आमिष दाखवून' काय प्रकार असतो? मुली लहान असतात का?)
इथे ती दुसरी मुलगी आणि हा डिव्होर्स की कतार मे असलेला माणूस यांच्यात स्पष्ट 'अजून माझा घटस्फोट झाला नाहीये.व्हावा असे प्रयत्न चालू आहेत. पण मला तुझ्याबद्दल वाटतं. तुझा 'नंतर सगळं ठीक होईल' यावर विश्वास असेल तर मैत्री चालू ठेवू' असं स्पष्ट बोलणं झालं असेल अशी अपेक्षा आहे.

स्वाती२,
अगदी तो 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' वाला मुद्दाच पेपर मधल्या भडक हेडिंग सहित डोक्यात आला होता. (हे 'आमिष दाखवून' काय प्रकार असतो? मुली लहान असतात का?)
इथे ती दुसरी मुलगी आणि हा डिव्होर्स की कतार मे असलेला माणूस यांच्यात स्पष्ट 'अजून माझा घटस्फोट झाला नाहीये.व्हावा असे प्रयत्न चालू आहेत. पण मला तुझ्याबद्दल वाटतं. तुझा 'नंतर सगळं ठीक होईल' यावर विश्वास असेल तर मैत्री चालू ठेवू' असं स्पष्ट बोलणं झालं असेल अशी अपेक्षा आहे.

मजबूत भांडायचे, अचानक थांबायचं, पण ऑफिशियल भांडण संपवायचं नाही, कौंसेलिंग वगैरे काही करायचे नाही, मध्ये अंतर ठेवून राहायच जैसे थे परिस्थिती ठेवायची. दुसरी पार्टी न्यूक्लिअर व्हायला लागली की मग बोंबलत हायर अथोरिटी कडे जायच. हे पोरगं आहे की दक्षिण कोरिया ??
>>>>>

आधी जे लिहिले आहे ते मुलीने केले आहे
पण शेवटी ब्लेम मुलाला का?
पुन्हा आपला समाज .. चूक कोणाचीही असो.... Sad

बायकोची हौसमौज लाड पुरवणारा नवरा बावळट, तर ते न करणारा क्रूर }}}}}
या वाक्याचा आणि साधना यांच्या पोस्ट चा काहीच संबंध नाही.
>>>>

साधना यांच्या पोस्ट खाली देतो, आपण कुठली वाचली अल्लाह जाणे

>>>

सपशेल गाढव आहे बाळ्या. स्वतःच पगार बायकोच्या हातात देत कशाला होता? बरे दिला तर आता संपला म्हणून गप्प बसायचे. वर आईबाबांचे पैसे आणून देत होता.... ती नक्की वटसावित्री करत असणार.. असलेच गाढव अजून सात जन्म मिळू दे आणि मला आरामात मौजमजा करायला मिळू दे म्हणून..

असल्या बावळट पोरांना असली महामाया भेटायला हवीच...
आधीचे खटले निभावायची अक्कल नसताना दुसरे लफडे करणाऱ्या पोराची एकदम किंवच आली... कसला डोक्यावर पडलाय हा मूर्ख....

---

डोक्यावर मिऱ्या वाटणाऱ्या बायकोला शेरास सव्वाशेर व्हायला ज्याला जमत नाही, तू तुझा खर्च भागव, मी माझ्या आईबाबाकडे भिकेचा कटोरा घेऊन जाणार नाही हे ज्याला बोलता येत नाही, धमक्या देणाऱ्या बायकोला उलट धमक्या देऊन सरळ कोर्टात ज्याला खेचता येत नाही ............

----

या वाचा...

खरंय तुमचं. चूक कोणाचीही असली तरी दोष मुलीलाच दिला जातो अजूनही Sad कुठलाच निर्णय ना घेता बिळात मान खुपसून बसला मुलगा गपचुप तरी मुलीलाच उत्तर कोरिया म्हणणारा आपला समाज Sad

अहो तेच तर. या पोस्ट चा आणि त्या वाक्याचा संबंध नाही हे तुम्हालाही पटले तर. यापुढे असे misinterpretation टाळा प्लिज.

उद्या सध्याचे प्रेमपात्र 'लग्नाचे आमिश दाखवून फसवणूक ' असे आरोप करु लागेल तर काय करणार ?
>>>>>>>>>>

लग्नाचे आमिष? असाही आरोप मुली करतात? सिरीअसली?
अरे सज्ञान मुलीशी भावनिक बंध जुळतेत त्याचे, तिलाही ठाऊक आहे याच्या पहिल्या पत्नीपासून अजून डिव्होर्स नाही, मग ते माहीत असूनही सोबत असणारी मुलगी बावळट नाही, तर बावळट मुलगाच.. आणि वर ती आमिष दाखवून वगैरे बालिष आरोपही करू शकते.. आणि कायदा तिथेही मुलीच्या बाजूने असतो??? हाईट आहे ही...

म्हणजे पोराने निगरगट्ट मवालीच बनून जगावे.. साध्यासुध्या पोरांसाठी ही दुनिया नाही Sad

'आमिष दाखवून' वाल्या आरोपांना काही जज आता आव्हान देतात.
मुळात लग्नपूर्व संबंध भारतात टॅबू असल्याने मुलगी आजूबाजूला विचारणाऱ्याना बहुतेक 'माझा होणारा नवरा आहे' सांगत असेल आणि त्यातून मग लग्न केलं नाही की असा कडवटपणा येत असेल.

मानव यांचा प्रतिसाद सर्वात जास्त पटला. अरे होउन जाऊ द्या ना कोर्टात - हा सूर्य हा जयद्रथ. कोर्टातही जायचं नाही, पैसेही द्यायचे नाही म्हणजे या मुलाला आपोआप काटा काढायचाय आपल्या बायकोचा. हा का ना का. काहीतरी एक कर बाबा - एक तर कोर्टात जा नाहीतर ती मुलगी मागते ते १० लाख का काय ते दे.
रडत काय बसलाय!!!

ऋन्मेष,
आपल्याला 'सिरीयसली' असे मनात आले तरी कायदे आहेत आणि त्याचा वापर/गैरवापर होतो. एकदा आरोप झाले की आपल्याला वकिल करा, कोर्ट-कचेरी वगैरे सगळे मागे लागते. मुलगा असो वा मुलगी, लग्नानंतर नाते सुरळीत नसेल तर वेळीच मदत घेतल्याने बर्‍याच गोष्टी सुकर होतात. उगाच भावनेच्या भरात चुकीची पावले उचलल्याने मनःस्ताप वाढतो. नात्यात काही घटस्फोट झालेत. वकिलांचा सल्ला न ऐकता इतर इगोवाल्या नातेवाईंकांच्या सल्याने वागून स्वतःचे बरेच नुकसान करुन घेणे ते नाते अगदी वाईट वळणावर आले होते , मात्र वकिलाचा योग्य सल्ला मिळाल्याने त्यातून अमिकेबल डिवोर्स -शेयर्ड कस्टडी वगैरे सगळे सुरळीत होणे अशीच बर्‍यापैकी व्यापाक रेंज बघण्यात आहे.

कायदे आहेत आणि त्याचा वापर/गैरवापर होतो. एकदा आरोप झाले की आपल्याला वकिल करा, कोर्ट-कचेरी वगैरे सगळे मागे लागते
>>>

हे मात्र खरे आहे.
बाकी माझी ईतकीच अपेक्षा आहे की एखाद्याला कायद्याचा गैरवापर करून फसवले गेले तर त्याला बावळट म्हणून हिणवण्यापेक्षा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा. अर्थात ही माझी अपेक्षा आहे, जो यात अडकला आहे त्याला गरज नसेलही कोणाच्या सहानुभुतीची...

कोर्ट केस हा उत्तम उपाय आहे

तिने 10 लाख घेतले तरी परस्पर सममतीने घटस्फोटाला
कोर्टातच जावे लागते
कोर्टात जावेच लागते
कोर्टात जावे लागतेच

वर्षाकाठी दोन तीनदा लग्नकार्याच्या वेळेसच भेटणा-या मुलाकडून इतके डिटेल्स ते ही प्रतिसादात प्रश्न विचारल्यावर कुठून मिळत असतील ?

कशावर जास्त प्रतिसाद खेचता येईल यावर विचार करावा लागतो त्याप्रमाणे लिहावं लागतं हो, तुम्ही उगा गरीब पोराला छळता Happy

कोर्ट केस हा उत्तम उपाय आहे
तिने 10 लाख घेतले तरी परस्पर सममतीने घटस्फोटाला
कोर्टातच जावे लागते
>>>>

मला आज घरच्यांच्या चर्चेत समजले की ती वाटाघाटीला येणार होती. जर १० लाख तयार असतील तरच मी पुढची बोलणी करायला येईल असे तिने म्हटले होते. यांनी तुर्तास हो म्हणून आधी तिला येऊ तर दे बोलायला असा पवित्रा घेतलेला. पण ठरलेल्या जागी ती आलीच नाही, मुलगा आणि त्याचा वकील बिचारा ताटकळत राहिले, त्याची चीडचीड झाली. आणि मग दोन दिवसांनी तिची नवीन मागणी आली, १० चे १५ लाख मागत आहेत.
कोर्टात केस फाईल केली गेली आहे की नाही मला कल्पना नाही. उगाच जास्त खोदून मी विचारत नाहीये सध्या घरच्यांना. पण याच्या बाजूने वकील मात्र आहे प्रकरणात एवढे वकीलासोबत ताटकळत उभा होता यावरून समजलेय. बहुधा नुकताच केला असावा किंवा आधीपासून असावा. म्हणजे नवीन मुलीशी लग्न करायला हिच्यापासून अधिकृत घटस्फोट मिळावा म्हणून आधीच केला असावा. कदाचित तिच्या बाजूनेही असावा. कल्पना नाही.

Pages