पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर उपाय म्हणजे कोर्टात केस लढणे.
कोर्टाची भानगड नको म्हणुन लोक असे पैसे देऊन सेटलमेंट करतात. मुलगी शिकली सवरली आहे, तिला नोकरीचा अनुभवही आहे, याची बाजू बरोबर असेल तर नाही द्यावी लागणार एवढी मोठी रक्कम.
तेव्हा आता पैसे देणार नाही, कोर्ट जे ठरवेल त्या प्रमाणे करू असा स्टँड घ्यावा. तारखा लागतील, वकीलांना फी द्यावी लागेल. कदाचित 2-3 लाख यात जातील, पण जाऊ द्यावे, ज्याने कोंडला त्याच्या घशात तर जाणार नाही.
आणि हा माणुस असा बधणारा नाही हे कळेल तिला कळेल. नात्यातल्या लोकांना कळेल. आजूबाजूला कळेल. भावी पत्नीलाही कळेल. त्याचाही फायदा होईलच.

इतकं एकतर्फी नसतं ते. मुलाची भावी नवरी पण तयार आहे म्हणजे त्याचं वि.बा. सं ही असू शकतं.

मुलीनं काहीही मागणी करो, मुलगा काही अंबानी नाही त्यामुळे त्याला द्यावी लागणारी पोटगी त्याच्या उत्पन्नावरच ठरेल.

आणि लग्न लटकून तर मुलीचंही राहिलंय. तिला घाई नाहीये ह्याचा अर्थ तिला संसारात इंटरेस्ट असावा पण मुलाचा संपलाय.

मुलीला संसारात इंटरेस्ट दिसत नाहीय...
मुलाने लवकर पैसे देऊन सुटका करून घ्यावी...
लग्नाला किती खर्च आला होता? दहा लाख योग्य रक्कम आहे की नाही ते सांगू शकत नाही...
यात खंडणी वगैरे काही वाटत नाहीय...
मुलीचे चार वर्षे वाया गेली आहेत... तिचे आधीच सेटिंग असेल तर ठीक आहे... दुसरे लग्न करायला त्रास दोघानाही आहेच...

गेली तीन-चार वर्षे आलीच नाहीये >> एक-दोन महिने वाट पाहून पुढे आईवडील आणि इतर जेष्ठांच्या मदतीने नाते / संसार योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न , कपल काउंसेलिंगसाठी प्रयत्न असे पुढे अजून चार महिने करणे, त्याचे साक्षीपुरावे ठेवणे आणि त्यानंतर गाडी रुळावर आली नाही तर वकिलामार्फत केस कोर्टात असे केले असते तर एकत्र रहायचे नाही आणि डिवोर्सही दयायचा नाही यात ही वर्षं वाया गेली नसती.
एका लग्नाचे घोंगडे भिजत पडलेले असे असताना
जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत. अशी परीस्थिती कशाला ओढवून घेतली? असे प्रकार डिवोर्स केसमधे दुसरी पार्टी बिबासं आहे म्हणून वापरु शकते. चांगल्या वकिलाचा सल्ला घेवून मार्ग काढावा. कोर्टात पोटगीचे ठरवताना मुलाचे उत्पन्न, मुलगी धडधाकट आहे , शिकलेली आहे तर ती नोकरी करु शकते, मूल नाहिये हे विचारात घेतले जाईल .

You-Guys-Are-Getting-Paid-Meme-Template-on-Were-the-Millers-1024x576.jpg

अमा Lol , जीएमई छाप पोस्टीत माझे ही दोन आणे- सोसायटीची वास्तूशांत किंवा फेंगशुई तत्सम काही इलाज करून घ्यावा. एकाच सोसायटीत अशा केसेस घडणे हा "निव्वळ योगायोग" म्हणवत नाही.

जेन्युईन प्रतिसादांचे आभार
ईतरांनीही धागा वर ठेवल्याबद्दल आभार. कोणाचाही प्रतिसाद कधीही फुकट जात नाही

@ मानवमामा,
तेव्हा आता पैसे देणार नाही, कोर्ट जे ठरवेल त्या प्रमाणे करू असा स्टँड घ्यावा. तारखा लागतील, वकीलांना फी द्यावी लागेल. कदाचित 2-3 लाख यात जातील, पण जाऊ द्यावे, ज्याने कोंडला त्याच्या घशात तर जाणार नाही.
>>>>>>

कोर्टकचेरी म्हणजे नाहक त्रास आहेच. त्यात २-३ लाख खर्च हा निश्चित आहे. त्यानंतर निकाल लागल्यावर काय लागेल याची शाश्वती नाही. म्हणजे हा काही खुनाचा वा चोरीचा खोटा आरोप नाही की ज्यात मी काही केलेच नाही तर डर कश्याला असा विश्वास घेऊन कोर्टाची पायरी चढू शकतो. कोर्टाने पोटगी द्या म्हटले की मग झक मारून द्यावी लागेलच, भले मुलाचा काही का दोष नसेना, भले मुलीने हे ठरवूनही का केले असेना.. कोण सिद्ध करणार तिच्या मनातले, वा काही तसेच तिचे षडयंत्र असल्यास..

बरे यात काळ किती जाईल हा वेगळा प्रश्न पोरगा लग्नाचा अडकला आहे. वेळ जाईल तसे खचत जाईल Sad

@ च्रप्स,
मुलाने लवकर पैसे देऊन सुटका करून घ्यावी...
लग्नाला किती खर्च आला होता? दहा लाख योग्य रक्कम आहे की नाही ते सांगू शकत नाही...
यात खंडणी वगैरे काही वाटत नाहीय...
>>>>>>>
लग्नाला आलेला खर्च मुलाला मुलींना दोघांनाही आला होता. आमच्यात अर्धा अर्धाच खर्च उचलतात. आणि मी त्यांच्या लग्नाला होतो. एकुलत्या एक मुलाचे व्हावे तसेच थाटामाटात केले होते त्यांच्या ऐपतीनुसार. मुलाचेही ते सगळेच वाया गेले असे झाले आता.

मुळात पैसे द्यायचेच का मुलीला?
दोघेही कमावते होते तर ती स्त्री पुरुष समानता ईथे का नाही येत? Sad
लग्नाआधी दोघेही कमावते होते.. तिने बिनधास्त जॉब सोडला.. त्यालाही सोडले.. वर पोटगीही हक्काने मागणार..
जर अश्या मुली अश्या कायद्याचा गैरवापर करत असतील त ते त्यात अडकलेल्या मुलांवरच अन्यायकारक नाही तर ईतर खरेच गरजू मुलींबद्दलही मुलांचे वा समाजाचे मन कलुषित करण्यासारखे आहे..

मुलाची चूक नसेल आणि मुलीलाच नांदायचे नसेल तर मुलाला नुकसान भरपाई मिळावी ईतकेही अपेक्षा नाहीत पण निदान पोटगी द्यावी लागली नाही अश्या केसेस घडल्या आहेत का? कोणाला काही आयड्या....

@ स्वाती,
एका लग्नाचे घोंगडे भिजत पडलेले असे असताना
जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत. अशी परीस्थिती कशाला ओढवून घेतली? असे प्रकार डिवोर्स केसमधे दुसरी पार्टी बिबासं आहे म्हणून वापरु शकते.
>>>>>>

हो हे माझ्याही डोक्यात आलेले. पण ती नवी मुलगी सुद्धा एक घटस्फोटीत आहे. आणि ती त्याला नवीन जॉबला भेटली म्हणजे ती त्याच्या आयुष्यात आधीची बायको सोडून गेल्यावरच आली असणार. आता त्याची आधीची बायको ना संबंध ठेवू ईछितेय, ना घटस्फोट देतेय अश्या परीस्थितीत कुठे प्रेमात पडू नये वा मन गुंतवू नये का? उलट या स्थितीत ते गुंतण्याची शक्यता जास्त आहे ना..

आणि तसेही तिने त्याला सोडताना असा कसलाही आरोप केला नव्हताच. कोर्टात केस गेल्यावर जिंकायला काही मुद्दा उचलला तर ते शक्य आहे. मग नवरा मारहाण करायचा, सासूसासरे त्रास द्यायचे वगैरे काहीही बोलू शकतेच..

दुर्दैवाने आपल्याकडे नवर्‍याने सोडलेल्या बायकोला सहानुभुती मिळते, तशी बायकोने सोडलेल्या नवर्‍याला मिळत नाही, उलट त्यानेच काहीतरी कांड केले असणार हा पहिला संशय घेतला जातो Sad

@ मेधावि,
इतकं एकतर्फी नसतं ते. मुलाची भावी नवरी पण तयार आहे म्हणजे त्याचं वि.बा. सं ही असू शकतं.
>>>
वर म्हटल्याप्रमाणे माझ्या माहितीनुसार हे प्रकरण नंतरचे आहे.
पण तसे तर वि.बा.सं तर मुलीचेही असू शकतेच ना. ज्यामुळे तिला या संसारात रस उरला नसेल. कोण बघायला गेलेय.

आणि लग्न लटकून तर मुलीचंही राहिलंय. तिला घाई नाहीये ह्याचा अर्थ तिला संसारात इंटरेस्ट असावा पण मुलाचा संपलाय.
>>>
नाही हो, याचे सारे प्रयत्न करून झाले. एकुलत्या एक मुलाला लगेच बायकोच्या म्हणण्यानुसार वेगळे भाड्याने राहायला सांगणारे घरचेही समजूतदार आहेत त्याच्या असे म्हणू शकतो, त्यांनीही प्रयत्न केलेत. पण तिला संसारात सोडा बोलणीही करण्यात ईंटरेस्ट नाही. मग यांनीही नाद सोडला. दोनेक वर्षे तर काहीच संबंध नव्हता दोघात. ना फोन मेसेज ना सोशलसाईटवर फेसबूक वगैरे कुठे कनेक्टेड होते. फक्त कागदोपत्री नवरा बायको होते. आता नवीन लग्न करायला घटस्फोट मिळणे गरजेचे आहे हे जाणवले तेव्हा गरज भासली म्हणून तिने तो देण्यासाठी पोटगी मागितली. अन्यथा मधल्या काळात तिने पोटगीही मागितली नव्हतीच. या काळात ती पुन्हा जॉबला लागलेली का याची कल्पना नाही मला. पण राहायला आईवडिलांसोबत आहे ईत्के माहित आहे.

आता त्याची आधीची बायको ना संबंध ठेवू ईछितेय, ना घटस्फोट देतेय अश्या परीस्थितीत कुठे प्रेमात पडू नये वा मन गुंतवू नये का? उलट या स्थितीत ते गुंतण्याची शक्यता जास्त आहे ना..>> भावनिक पातळीवर काहीही वाटले तरी शेवटी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने ती व्यक्ती विवाहित धरली जाते. कायदेशीर प्रक्रियेत तुमची बाजू कमजोर पडू नये म्हणून सावध रहावेच लागते.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. >>>>

त्यांची झाली सोडवणूक तर मग प्रश्न काय उरला?
द्या 10 लाख आणि घ्या सोडवणूक...
मायबोलीकरांनी क्रावूड सोर्सिंग करावे ही अपेक्षा आहे का??

रच्याकने, त्या इतरांना हीच बाय भेटली होती का? बाकी असल्या बावळट पोरांना असली महामाया भेटायला हवीच...

आधीचे खटले निभावायची अक्कल नसताना दुसरे लफडे करणाऱ्या पोराची एकदम किंवच आली... कसला डोक्यावर पडलाय हा मूर्ख.... तिच्या वकिलाला कळले तर 10 लाख काय 10 करोडही मागेल तो...

विबासं करण्यामागे तूमचा हेतू कित्तीही उदात्त असला तर कोर्टात तो विबासंच... कोर्ट मानवतावादी उर्फ तुमच्या बाळ्याच्या बाजूने विचार करणार नाही, समोरचा वकील बाळ्याचा विबासं किती भयंकर रीतीने मांडेल त्यावर तुमच्या बाळ्याला किती फटका बसेल ते ठरेल.

स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. >>>>

सपशेल गाढव आहे बाळ्या. स्वतःच पगार बायकोच्या हातात देत कशाला होता? बरे दिला तर आता संपला म्हणून गप्प बसायचे. वर आईबाबांचे पैसे आणून देत होता.... ती नक्की वटसावित्री करत असणार.. असलेच गाढव अजून सात जन्म मिळू दे आणि मला आरामात मौजमजा करायला मिळू दे म्हणून..

एनीवेज, स्टोरी मांडताना मूळ कथाबिज सशक्त होतं पण पटकथा सपशेल गंडली...

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का?>>>>>

(मूर्ख बावळट पोरांचे) लग्न न करणे हा यावर उत्तम उपाय आहे... न रहेगा बांस, तो बासुरी बजेगी कैसे???? आईबापांनी आपल्या पोरांना आधीच ओळखून योग्य ती पावले उचलून त्यांचे व पर्यायाने स्वतःचे रक्षण करावे....

ऋ, कुठलीही मुलगी गंमत म्हणून सुखासुखी लग्न मोडणार नाही असं वाटतं. बरं तिचं प्रेमप्रकरण वगैरे असतं तर तिलाच घाई झाली असती लग्न मोडायची. तेही नाही. म्हणजे तिला नक्कीच सासुरवास असणार. दुसरीकडे रहातानाही मुलाचा रिमोट आईवडिलांकडे असू शकतोच ना.

कोर्टकचेरी म्हणजे नाहक त्रास आहेच. त्यात २-३ लाख खर्च हा निश्चित आहे. त्यानंतर निकाल लागल्यावर काय लागेल याची शाश्वती नाही. >>>
हेच ना भाउ. लोक अशीच कच खातात, ९९% लोक युद्ध सुरू होण्या आधीच मैदानातून पळ काढतात हे वकिलांना माहीत असते. त्यामुळे आपली बाजू बारा गावाच्या पैलवानांना लोळवेल एवढी पैलवान असली तरी मांडीवर मोठ्याने थाप मारली तरी दुखेल एवढी अशक्त बाजू असणारेही सेटलमेंट कर नाही तर युद्धाला तयार हो अशी धमकी देऊन पैसे उकळून जातात.
जर खरेच मुलाची चूक नसेल, तर कोर्ट कशाला चुकीचा निर्णय देईल? सुरवातीला मुलगी/मुलीकडचे त्यांच्या वकिलाच्या नादी लागून वाट्टेल ते (अगदी वाट्टेल ते) आरोप करू शकतात, हेतू हा की घाबरून जास्तीत जास्त सेटलमेंटला तयार व्हावे. ९९% होतातही. पण जे १% बघू कोर्टात म्हणतात, तेव्हा असे वाट्टेल ते आरोप केलेल्यांची कोर्टात गोची होते. कारण कोर्टात ते आरोप सिद्ध करावे लागतात. तिथे भलते आरोप केलेल्यांची बाजू कोलमडते.

आमच्या नात्यात एक केस आहे अशी. त्यात तर इतके घाण आरोप मुलावरच नव्हे सासरे, मुलाचा भाऊ यांच्यावरही केले होते, सासू नंणंदावर अलका कुबलचा सासू नणंदा जेवढा छळ करतात त्याही पेक्षा जास्त छळ केल्याचे आरोप करून एफआयआर केला. पोलिसांंनी अटक केली मुलाला. पण हे आरोप पाहून त्याने ठरवले की बस, आता आपण मागे नाही हटायचे. सेटलमेंटला तयार नाही झाला. कोर्टात केस गेली. एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. इतके भलते आरोप केलेले की उलट तपासणी वेळी मुलीची त त प प झाली. कोर्टाबाहेर वकिलांच्या नादी लागून भलते आरोप केले म्हणत ती पास्तावली.
ही केस फक्त मुलीने केलेल्या आरोपांंवर होती घटस्फोटाची नव्हती. या केस मधून निर्दोष सुटल्यावर मुलाने घटस्फोटाची नोटीस पाठवली, मुलीने खोट्या तक्रारी करून छळ केला हा आरोप त्यात (जो कोर्टात सिद्ध झाला होता) त्यात होता. घटस्फोट मिळाला.

तू सांगतो त्या केस मध्ये मुलाची चूक नसेल (शारीरिक / मानसिक छळ, अत्याचार, वगैरे) तर त्याने बधायचे काम नाही. २-३ लाख हे वरील प्रमाणे केस दीर्घकाळ चालली तर आहेत. बधत नाही म्हटल्यावर मुलगीही विचार करेल ना की कोर्टात किती दीर्घ केस चालेल, काय निकाल लागेलं सांगता येत नाही. होईल तयार, मिळेल ते पदरात पडुन घेऊन दोघांच्या संमतीने घटस्फोट घ्यायला.

ऋ, कुठलीही मुलगी गंमत म्हणून सुखासुखी लग्न मोडणार नाही असं वाटतं.
>>> गंमत म्हणून नाही पण ज्याच्याशी लग्न करायची इच्छा होती त्याच्याशी न झाल्याने रस संपल्याने...
लैंगिक सुख पतीकडून मिळत नसल्यामुळे...
मुळात मुलगी लेस्बियन असल्याने पण घरच्यांनी आणि समाजामुळे लग्न केल्यामुळे...
अशी अनेक कारणे असू शकतात...

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. >>>> एव्हढ्या जवळीकीवर मिळालेली माहिती कितपत विश्वासार्ह ? दुसरी बाजू समजल्याशिवाय अशा केसेस मधे निष्कर्ष काढू नयेत. नाहीतर कोर्टबाजी करावीच लागली नसती.

हो ,

तिला आधी एक नोटीस पाठवा , नांदायला ये , ती उत्तर देईल किंवा देणार नाही

ती नांदत नाही , ह्या बेस वर मुलाने स्वतः घटस्फोटाला केस फाईल करावी

मुलगी उत्तर द्यायला नाही आली तर एक्स पार्टे केस होऊन तुम्हाला घटस्फोट मिळेल

(मूर्ख बावळट पोरांचे) लग्न न करणे हा यावर उत्तम उपाय आहे >>> हेच काही पोरं स्वतः त्यांच्या घरच्यांना सांगतात पण घरचे ऐकत नाहीत.

विवाह बाह्य संबंध आरोपाची चिंता करू नका

तिला तसे कोर्टात सिद्ध करावे लागेल , नुसत्या आरोपने काही होत नाही , तुम्ही मात्र चुकूनही तसे स्टेटमेंट करू नका

सध्या , ती तुमच्याबरोबर 3 वर्षे नाही , हा मुद्दा तुमच्या दृष्टीने अगदी सबळ व पुरेसा आहे . तुम्हीच घटस्फोटाच्या हालचाली सुरू करा

लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यात प्रत्येक बाजूला आपलेच खरे वाटते. 'मला मानसिक त्रास दिला' आणि 'आम्ही तिला काय मानसिक त्रास दिला? नुसत्या सौम्यपणे चुका दाखवल्या तर मानसिक त्रास कसा' वगैरे लूप अखंड चालू राहते. (हे बर्‍याच जवळच्या केसेस मध्ये पाहिले आहे.)
वकिल, कोर्ट, केस,हॅरेसमेंट साठी पोलीस केस या सूडाच्या प्रवासात क्लोजर मिळत असेल, पण वेळ वाया जातो आणि मनस्ताप होतो. (खर्‍याला डर नाही वगैरे मान्य असलं तरी अ‍ॅट व्हॉट कॉस्ट डू यु वॉन्ट टू विन द वॉर हा एक मुद्दा आहे.)
दोन्ही बाजूचे त्यातल्या त्यात समजूतदार नातेवाईक बोलून मधला तोडगा (म्हणजे थोडक्यात म्युच्युअल कंसेंट डिव्होर्स आणि कमी रक्कम पोटगी) निघाल्यास अधिक उत्तम. वर्षानुवर्षे कोर्टात भांडत बसून लग्नाचं उमेदीचं वय, नोकरीत रजा वगैरे फार चांगलं वर्क करत नसेल. कधीकधी पोटगी जास्तीत जास्त मिळवायला मुद्दाम काही काळ नोकरीत ब्रेक किंवा एन जी ओ कडे फुकट नोकरी केली जाते. पैसा जास्त मिळाला तर कोणालाही हवाच असतो.
बाकी विबासं, बाकी चिखलफेक यांच्यात जितके दुसर्‍या बाजूला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल तितकाच स्वतःचाही मानसिक संताप होत जातो.
आमचे एक लीडरशिप ट्रेनर म्हणायचे तसे: सूड हा तुम्ही दुसर्‍यावर फेकायला हातात घेतलेला पेटता कोळसा आहे. दुसर्‍यांना इजा होईल, पण तो हातात धरलाय तोवर तुम्हाला स्वतःलाही बरीच इजा होते.

इथे सूडाचा प्रश्न नसून आपल्याला कोर्ट कचेरीची खोट्या आरोपाची धमकी देऊन खंडणी वसूल करणे या बद्दल आहे.
लेखात दिलेल्या उदाहरणात एकच बाजू आहे कोण चूक, कोण बरोबर याबद्दल मला कुठलेच वक्तव्य करायचे नाही.
लोक आधीच घाबरून जातात आणि मग असा गैर फायदा उचलल्या जातो. लोक असे बधत नाही म्हटल्यावर असले प्रकार कमी होतील.
अशी उदाहरणे लोकांना दिसू लागली तरी पुरेसे आहे.

मी हे दोन्ही बाजूंसाठी विचार म्हणून सांगितलं.
जिथे एक बाजू मुद्दाम ब्लॅकमेल म्हणून असं करत असेल तिथे 'करच केस, आम्ही पण बघतो' म्हटल्या शिवाय पर्याय नाही. तिथे दुसरी पार्टी रिसिव्हिंग एंड ला असल्याने जे लागेल ते करावंच लागेल.
दोन्ही बाजूंची लढायची आर्थिक शक्ती आणि एनर्जी आणि वेळ किती आहे यावर आहे.

अशा एका मुलीने आणी तिचे कुटुंबाने एका स्नेह्यांना त्रास दिलाय. मुलीची बाजु म्हणजे योग्यच असं नसतं. असे कुटुंब स्वतःच्या मुलीला लग्न करुन सासरच्यांना त्रास देऊन पैसा उकळण्याची ट्रेनिंग देत असावेत. काहीही चुक नसताना एका मुर्ख मुलीमुळए आणी तिच्या दिडशहाण्या
कुटुंबामुळए मनस्ताप झालेला मुलगा आणी कुटुंबासाठी वाईट वाटते.

सपशेल गाढव आहे बाळ्या. स्वतःच पगार बायकोच्या हातात देत कशाला होता? बरे दिला तर आता संपला म्हणून गप्प बसायचे. वर आईबाबांचे पैसे आणून देत होता.... ती नक्की वटसावित्री करत असणार.. असलेच गाढव अजून सात जन्म मिळू दे आणि मला आरामात मौजमजा करायला मिळू दे म्हणून.. >>>>>> Lol सिरीयसली.

मुळात पहिल्या लग्नाचा झोल झाल्यावर माणसाला दुसऱ्या लग्नाची इच्छा कशी काय होते बापरे Lol नाही येत आहे ना ती मग नको येऊ देत. त्याला तरी कुठे ते हवंय. ती तीची जगतेय बिनधास्त मग याने पण तेच करावं. कशाला हवा डिव्होर्स अन् कोर्ट अन् पोटगी या गोष्टी?
ऋ त्याला आपल्या अन्या देशमुख चा आदर्श घे म्हणावं शिक काहीतरी ‌त्याच्या कडून Lol . पुढे जाऊन बायकोला गरज असेल तर येईल स्वतः आणि करेल सेटलमेंट‌,तर काय.

Pages