मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे :हहगलो:, Rofl , Rofl

माझ्या बाबतीत कालच झाल, हेड ऑफिस दिल्ली ला आहे, सगळे एकदम फर्ड हिंदी बोलणारे, मला सांगायच होत statement is incomplete , मी म्हंटल वो स्टेट्मेंट अर्धवट आया है, वो पूर्तवट होने के बाद टॅली करेंगे
मला अधुरा आणि पुरा आठवेच ना Proud

माझी मामी एकदा एका साऊथ इंडीयन मुलीशी बोलत होती..
ए तुम तुम्हारे केसोंको क्या लगाती हो?? बहोत अच्छी बू आती है...

ती मुलगी ब्लॅंक चेहर्‍याने बघत होती माझ्या मामीकडे..... Uhoh

हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...>>> Lol
दक्षे अशक्य आहेस अगदि.
आमच्या कंपनीत सेफ्टीच ट्रेनिन्ग देताना मरठी ट्रेअनरने सांगितल, " ट्रेनिन्ग लेने के ब्बाद तुम सब एकमेकको बताना".
पुढे....... हम कभी कभी सामान उपर टांगते है, तो वो डोकेमे गिरनेका धोका रहता है:. Proud

>>>>>>>> माझ्या मामीला म्हणायचे होते.. तु काय लावतेस गं केसांना?? ज्याचा खुप छान वास येतो..

हम कभी कभी सामान उपर टांगते है, तो वो डोकेमे गिरनेका धोका रहता है:>>>>>>> लिंब्या... लै भारी..

अशक्य आहे सगळे.. Rofl

आमच्या ऑफिस मधील (वि)संवाद
अक्षयः रोहिता तू गाजर का हलवा ले के आयेगी.
रोहिता : नही. ऊसमे बहोत मेहनत लगती है?
अक्षयः क्या खाक मेहनत लगती है?
रोहिता: अरे गाजर का किस करना पडता है
अक्षयः हलवा बनाने बोला है तो गाजर को किस क्युं करेगी तू?

हे जसं मराठीचं हिंदी... तस मुंबईकराचं (मुंबईतले युपी, बिहारी सुध्दा) हिंदी...

हिंदी - मुंबई हिंदी

भीड है - गर्दी है
जल्दी करो - घाई करो
प्याज कितनेका - कांदा कितनेका

पनू Lol

आमच्या शेजारी एक मारवडी कुटुंब राहात होते, त्या काकुंचं हिंदी असाच मजेदार होतं, एकदा आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या "हमारे बाल्कनी मै ना मुन्गियां आयी हैं, कैसे मारनेका?"

एकदा ती शेजराची मारवाडी ताई सॉफ्ट टॉईज शिकायला गेली होती ती क्लास वरुन परत आल्यावर माझ्या ताईने तीला विचारले "क्या आज कितने सॉफ्ट टॉईज शिके?"

माझ्या जिजाजींचं हिंदी पण अस्साच भन्नाट आहे, माझ्या ताईचा हा किस्सा आम्ही त्यांना सागिंतला तर एकदा तीला त्यानीं चिडवले "क्या आज कितने खेळणे शिके?" Biggrin

त्यांचाच अजुन एक किस्सा.. घरातला नवीन मिक्सर बिघडला होता तर त्याचं भांडं ब्लेड बदलायला दिलं होतं, खुप दिवस झाले तरी ते परत मिळालं नव्हतं तर जिजुंनी चिडुन त्या डिलर ला फोन केला " हमारे नवीन मिक्सर का भांडां आपको दुरुस्ती के लिये दिया था.. आपने तो उसके ऊपर डल्लाचं मार दिया. "

आणि माझे सासरे हिंदीचे प्राध्यापक होते... Uhoh

एकदा मी घरी जात होतो तेव्हा पाहीले की , आमच्या शेजार्‍यांचा विकी (लहान कुत्रा) गळ्यातल्या साखळी सकट चिखलात लोळत होता. मी त्याला धरले आणि शेजार्‍याकडे नेले (शेजारी मध्य प्रदेशवाला) व म्हणालो
मी: ये आपका विकी
तो: अरे कहा मिला मै ढुंढ रहा था
मी: अरे ये तो वहा चिख्खल मे लोळ रहा था
खरं सागतो लोळण्याला हिंदीत काय म्हणतात अजुन माहित नाही
कुणाला माहीत असेल तर या खालिल वाक्याचे हिंदीत रुपांतर करा
"हत्ती चिखलात लोळत होता"

आत्ताच घडलेला किस्सा:
मी आत्ताच एकाला (बिहारी मित्राशी) फोन वर बोलत होतो...

अरे तुम अभी मेरे बिल्डींग के निचे आ के गया?
मुझे फोन करना था ना, तेरे ऑफिस मे कुछ पेपर्स भेजने थे अरे आयता आया था तु.

वैभव, मी: अरे ये तो वहा चिख्खल मे लोळ रहा था>>>> Proud Proud Proud अगदी अशक्य! मला ही माहित नाही, लोळायला काय म्हणायचे ते.
" हमारे नवीन मिक्सर का भांडां आपको दुरुस्ती के लिये दिया था.. आपने तो उसके ऊपर डल्लाचं मार दिया. " >>> डल्लाचं .

एकदा आमच्या कडे एक केरळी काका जेवायला आले होते, भातावर कढी आणि साधं वरण होतं. त्यांना कढी नको होती, माझ्या आईला त्यांना विचारायचे होते - मग साधं वरण वाढु का? तर तिने विचारले सीधी दाल दू क्या?
सीधी दाल म्हणजे काय...:)

Pages