बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, सहमत.

देवकी, ती त्यांच्या कडची पद्धत असेल. कैऱ्या नेहमी नसतात ना.
चित्रान्न बाराही महिने केव्हाही करतात. मोहरी, जिरे, कडीपत्ता, उडीद डाळ, चना डाळ, शेंगदाणे, हिंग, हळद घालुन फोडणी आणि भात घालून लिंबु पिळतात.

फोडणीचा भात हॉटेलात सर्वात जास्त विकला जातो... मेन्यू मध्ये त्याचे नाव व्हेज बिर्याणी असे लिहिलेले असते...

अस्मिता, हाटलातुन आलेल्या भाताचा चिनी फ्राईड राईस मस्त होतो कारण तो खूप फडफडीत असतो म्हणुन. थोडा कोबी , ढबु मिरची, कांदा उभे कापुन बास होतात भातात.

ती VB कुठे गेली ??
आता आली तर म्हणेल " कुठे नेउन ठेवलात धागा माझा ???"
हेट बिर्याणी -> लाईक बिर्याणी -> बिर्याणी फॅन क्लब -> वेज वि. नॉन वेज बिर्याणी -> -> कुठली बिर्याणी मागवावी --> बिर्याणी रेसिपी -> किचन मधली भांडी -> फोभा .

हाटलातुन आलेल्या भाताचा चिनी फ्राईड राईस मस्त होतो कारण तो खूप फडफडीत असतो म्हणुन. थोडा कोबी , ढबु मिरची, कांदा उभे कापुन बास होतात भातात.>>>+१

कोणी नेटफ्लिक्सवरची “राजा रसोई और अन्य कहानियां“ सिरिज बघितली आहे का? एका भागात बिर्याणीचं खूप छान वर्णन आहे.. सिरिज नक्की बघावी

बाई दवे, फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून. मी स्वतंत्र धागा काढतो यावर !
>>
बाकी जाउद्या पण फो.भा वर धागा पायजेच. खरंच कोणतीही बिर्याणी ओवाळून टाकीन मी पण. रुन्मेश, हम तुम्हारे साथ है.
>>>

काढला Happy

https://www.maayboli.com/node/77730

इतक्या साऱ्या प्रतिसाद संख्या बघून बिर्याणी अजूनच नावडती झाली.

सगळे नाही पण काही प्रतिसाद वाचले, त्यावरून असे वाटते की बिर्याणी खरच मला कधीच आवडणार नाही, त्यापेक्षा पुलावच बरा.

लॉक डाउन आधी रोड साईडला 40 - 60 रूपयेला शाही(?) बिर्याणी विकणारे अन ती चवीने खाणारे बघितले आहेत. काय परवडत असेल अशी बिर्याणी बनवायला अन त्यांच्याकडून अपेक्षा तर काय ठेवत असतील लोक माहीत नाही.

ऑफिस मध्ये बरेचदा बिर्याणी पार्टी असायची, ते किलोवर मागवायचे, तेव्हाही मी माझा वाटा सगळ्यांना वाटून शेजवान फ्राइड राईस नाही तर पाव भाजी खायचे

सांगली येथे असणारी pride किचन हैद्राबादी बिर्याणी आणि डोंबिवलीत असणारी हैद्राबादी बिर्याणी हाऊस सेम टू सेम टेस्ट.

बेहरोझ ची बिर्याणी खाल्लीस तर बिर्याणी आय लव्ह यु या क्लबात येशील. Proud जबरी असते त्यांची. मी व्हेजच खाते, बाकी नॉनव्हेजच खातात. आणी शिळी बिर्याणी उलट जास्त मुरुन दुसर्‍या दिवशी जास्त चवदार लागते असे माझे वै मत आहे. ( बेहरोझ विषयी )

इतर ठिकाणी बेहरोज ठिकाय.
पण हैद्राबादला आलात की इथली हैद्राबादी बिर्याणीच खा, त्याची सर बेहरोजला नाही.

हॉटेल शादाब, मदिना सर्कल
हॉटेल पॅराडाइज, पॅराडाइज सर्कल - सिकंदराबाद
बावर्ची, आरटीसी क्रॉस रोड

हे मुख्य.
या व्यतिरिक्त खूप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.

Pages