बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूमायुन सायकोलॉजी, साधारणपणे जे पदार्थ आपण आजारपणात खातो ते पाहिले की आपल्याला आजारपणाच्या दिवसांची आठवण होते. आणि मग नकोसे वाटतात.

सर्दी जर आजारपणात धरली तर मी ओल्ड मॉंक घेतो
पण त्याकडे बघून काहीही आजारपणाच्या किंवा सर्दीच्या आठवणी येत नाहीत Happy

शास्त्रीरोडवर एक पराग नावाचे हॉटेल होते.... मेसचे खाउन किंवा पंजाबी वगैरे खाउन कंटाळल्यावर त्या एरियात रहाणाऱ्या तमाम हॉस्टेलाईट्ससाठी परागची दाल खिचडी हा एक चांगला चेंज असायचा!

@ आशूचॅम्प, ओल्ड मॉंक > जर हा दारू प्रकार असेल तर हिशोबच बदलतात. पिने वालों को पिने का बहाणा चाहिये असे म्हणतात. मग कभी खुशी कभी गम, रोज चाहिये रम, अगर नही मिली तो कुछ कुछ होता है अंजली तुम नही समझोगी, क्या पता कल हो ना हो, ईसलिये जब तक है जान दारू को कभी अलविदा ना केहना म्हणत पिणारे पितातच Happy

ओल्ड मोंक दारू आहे हे तुम्हाला माहीत नाही??
>>>>
संशय आहे खात्री नाही.. उगाच दारू समजून विधान केले असते आणि दारू निघाली नसती तर हसे झाले असते.

रुन्मेष , दाल खिचडी हे केवळ आजारपणात खायचा पदार्थ नाही. मला दाल खिचडी भयंकर आवडते. मोस्ट कंफोर्ट फूड !

ओल्ड मंक ही काय दारू नव्हे
काढा हाय तो Happy
इच्छा झाली की म्हणायचं काढा तो कपाटातून Happy

हसे झाले असते>>>>>
याची काळजी कधीपासून करायला लागला Happy

विरु - सिक्सर मारलात एकदम

मोस्ट कंफोर्ट फूड !
+७८६
माझेही.. बहुतेकांचे असते
म्हणून तर आजारपणात खातो Happy

ओल्ड मंक ही काय दारू नव्हे
काढा हाय तो Happy
>>>

मला खात्री नव्हतीच दारू असण्याबद्दल
च्रप्स यांनी दारू म्हटले Happy

Submitted by श्रवु् >>>>
हे बाटलं ओतताना (आणि चढल्यावर?) हातातून न पाडता कसे, कुठे धरायचे नेमकं? सुरईसारखा कान असतो?

सुरईसारखा कान वैगरे नसतो.. बहुतेक चढल्यावर त्याचे नाक चिमटीत धरून गप्पा मारत असतील ( धनंजय माने )

मी गाडी परत ट्रॅकवर आणायला मदत करते.

PEO (Pune Eat Outs) वर अनको पॉझिटिव्ह रिव्ह्यूज वाचल्या नन्तर आम्ही एका पार्टीला शिंदे मामा बिर्याणी - सिंहगड रोड, ऑर्डर केली. आमच्याकडे आलेले सगळे मित्रमंडळी प्रचंड फॅन झाले. बाकी स्टार्टर्स पण टेस्टी होते. पुण्याच्या कोणाला नंबर हवा असेल तर देईन.
( पण आम्हाला मुस्लिम बिर्याणीची सवय असल्यामुळे तुलनेत कॅम्पमधल्या बिर्याणीच जास्त आवडतात). शिंदे मामा बिर्याणीबरोबर मराठी बिर्याणीबरोबर देतात ती मसालेदार ग्रेव्ही दिली होती. मुस्लिम बिर्याणीबरोबर फक्त रायता मिळते.

आशुचॅम्प, तुम्हाला PEO वर invite केलं आहे, जर फुडी असाल तर ग्रुप आवडेल.

शिंदे मामा बिर्याणी - 9850421291
( आधी peo वर रिव्ह्यूज वाचुन घ्या)

PEO (Pune Eat Outs) काय आहे? >>> फेसबुकवरील पुण्यातील खादाडांचा ग्रुप आहे. Happy रेस्टॉरंटस, हॉटेल्स, रोडसाइड जॉइन्ट्स, रिसॉर्टस, होम कुक्स, होम बेकर्स या सगळ्याची माहिती, , रेसीपी शेअरिंग, फूड रिव्ह्यूज, शेतकऱ्यांच्या मालाची विक्री हे आणि असं, पण फुडबद्दलचं सगळं काही.
कसे जॉईन करता येईल? >>> peo ग्रुपमधल्या मेम्बरने तुम्हाला invite करावं लागेल. आशुचॅम्प आणि मी फेबु फ्रेंड्स असल्याने मी invite करू शकले.
तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ग्रुप शोधून सामील होता येतं का बघा बरं एकदा.

मी सोडला पुणे ईट आऊट.
ग्रुप खूप चांगला आहे.पण आयुष्यात आश्चर्य, एकसाईटमेंट राहिलीच नाही, सगळंच माहीत व्हायला लागलं म्हणून सोडला Happy

ग्रुप खूप चांगला आहे.पण आयुष्यात आश्चर्य, एकसाईटमेंट राहिलीच नाही, सगळंच माहीत व्हायला लागलं म्हणून सोडला >> व्वा.. याला म्हणतात अस्सल खवय्या/फुडी. नाहीतर आम्ही लवकर डिलिव्हरी देईल त्याला ऑर्डर देऊन मोकळे होतो. Happy

खूप टू मच नो ईट ऑल होण्याचे तोटे भरपूर असतात.
मुख्य म्हणजे आपल्या साठी कुणी काही केलं तर वाटणारं नवथर कौतुक, आश्चर्य कमी होतं.उद्या कोणी हौसेने माझ्यासाठी प्लेन मँगो केक मागवला तर मनात 'छया, यात अर्थ नाही, पुणे ईट आऊटवर किती मस्त मस्त मँगो रोझ केक बनवतात लोक' असं वाटून अर्थ नाही.
असंच खूप फेसबुक ग्रुप आणि खरेदीच्या साईट्स जॉईन करून पण होतं.

मला तरी वाटते की चर्चेत कुठली लिंक देणे माबो धोरणाविरुद्ध नसावे, अर्थात त्याचा उद्देश जाहिरातबाजी नसल्यास.

Pages