मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

☺☺☺

काय सुंदर धागा वर काढलाय... मजा आली वाचून.. पण खंत म्हणजे हे इतके लोक ज्यांनी आपला अनुभव लिहिला आहे बहुतांश लोक आता ऍक्टिव्ह दिसत नाहीत...

मस्तच आहे हा धागा . मला तर बाप्पानेच मायबोली शोधून दिलीये Happy . पुण्याचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे फोटो बघत होते एकदा गुगलवर. तर एक छान प्रचिं चा धागा सापडला आणि तोही मराठीत( तेव्हा प्रचि म्हणजे काय हेच माहित नव्हते Happy ) एवढं भारी काहीतरी मिळाल्याचं फिलिंग होतं ते. मग गुलमोहर ललितलेखन कविता अन् काय काय मिळालं. माझी वाचनाची हौस माबो ने मनापासून पुरवली :). तेव्हा देवनागरी लीहीता येत नसल्याने प्रतिसाद देत नव्हते पण गप्प बसवेना मग काय काय जुगाड करून शिकले. आजही अॉफिसची कितीही कामं असली तरी एक विंडो माबो ची ओपनच असते. जवळची मैत्रीण आहे माबो माझी अन् मी माबोची Happy

काय सुंदर धागा वर काढलाय... मजा आली वाचून.. पण खंत म्हणजे हे इतके लोक ज्यांनी आपला अनुभव लिहिला आहे बहुतांश लोक आता ऍक्टिव्ह दिसत नाहीत... +१

अशीच कधीतरी मराठी कथा शोधत असताना माबोशी ओळख झाली. मग काय रोजचीच हजेरी सुरू झाली. एक वर्षभर तरी रोमात राहून माबोवरील लिखाण वाचत होते. बेफिंची फॅन झाले आणि न राहवून खास प्रतिसाद देण्यासाठी आयडी घेतला. आज सात आठ वर्षे झाली नियमित माबोवर येते. मराठीत फास्ट टायपिंग जमत नाही त्यामुळे जास्त प्रतिसाद देत नाही पण एकूण एक धागा त्यावरील प्रतिसाद वाचत असते.
मला ओळखीचे असू दे नाहीतर अनोळखी, कुणाशीच जास्त बोलता येत नाही म्हणजे मला व्यक्त होता येत नाही म्हणूनच मी इथे व्यक्त होत नाही कारण मला भीती असते की माझ्या प्रतिसादावर उपप्रतिसाद आला तर मला उत्तर द्यावे लागेल. तरीही जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तेव्हा माबोकरांनी मला खूप मदत केली आहे, योग्य सल्ले दिले आहेत. याच कारणामुळे असेल माझे पाय इथून हलत नाहीत. माझी दिवसाची सुरवात माबोने होते ते रात्री झोपताना ही इथलेच काहीतरी वाचत असते. या दरम्यान मी अगणित वेळा इथे येत असते. पण नेहमी वाचनमात्र.
इथल्या आयडी माझ्या जीवनातल्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. मी तर कुणाच्या खिजगणतीतही नसेल पण मला सगळेच खूप ओळखीचे वाटतात.
आता पुढची वाक्ये मनात तयार होत आहेत पण नीट व्यक्त करता येत नाहीत. तूर्तास इतकेच.

मस्तच धागा आहे हा! छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद वाचून.

कागदी (कामट्या न वापरता) आकाशकंदील कसा तयार करायचा ते शोधता शोधता मी मायबोलीवर येऊन पोचले होते. २००९ च्या दिवाळीच्या आधी. पण सदस्यत्व तेव्हा घेतलं नव्हतं. नंतर बहुधा बासुरीच्या 'झबी' वर प्रतिसाद लिहिण्यासाठी घेतलं. तेव्हा कौतुक शिरोडकर, विशाल कुलकर्णी, बेफिकीर यांच्या कथा खूप यायच्या. त्यामुळे मी मायबोलीची रेग्युलर वाचक झाले. पण प्रतिसाद जास्त लिहायचे नाही. ऑफिसात मायबोली सतत ओपन असायची माझ्या कंप्यूटरवर. नंतर नोकरी सोडली, बाळ झालं आणि मायबोलीवरचा वावर बराच कमी झाला. तो थेट चारपाच वर्षांपूर्वी स्मार्टफोन घेतल्यावर वाढला. Happy

अनुभव चांगलाच मिळाला मायबोलीचा. शाळेत लिहिलेल्या निबंधांनंतर मी काहीच लिहिलं नव्हतं. मायबोलीवर भीत भीत का होईना, पण लिहायला लागल्यामुळे आत्मविश्वास आला.

इथले आयडी आता खूप ओळखीचे वाटतात. प्रत्यक्षात खूप कमी जणांना भेटले आहे ( मभादि २०१९ ची टीम - किल्ली, हर्पेन, सिम्बा. पण प्राचीन येऊ शकल्या नाहीत तेव्हा) आणि शाली (हरिहर). २०१९ आणि २०२० दोन्ही मभादिंचा अनुभवही खूप काही शिकवून गेला. काही जणांशी/जणींशी इमेलवर संपर्क असतो.

कुठल्याच गप्पांच्या पानावर मला रमायला जमलं नाही मात्र.

माझ्या पूर्वीच्या प्रोफाईलला माझ्याविषयी लिहिलेला मजकूर दिसत असे. आता मी टाईप केला पण नाही दिसत. असे का होतेय?

मस्तच धागा आहे हा! छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद वाचून. >>> +७८६

एक सदस्य अभिषेक नाईक याच्या कडुन मायबोलीबद्दल कळले आणि दहा महिन्यापूर्वी येथील सद्स्य झालो.
Submitted by मानव पृथ्वीकर on 5 February, 2016 - 11:26
>>>>>
अरे वाह मानवमामा, चारपाच वर्षांपूर्वीची पोस्ट आणि त्यात माझे नाव. आता तुम्ही छान रुळला, रमला आहात ईथे तर तुम्हाला माबोचा रस्ता दाखवायचे क्रेडीट घ्यायला हरकत नाही Wink

२०१४ पण नाही, त्या आधीच मायबोली सुटली माझ्याकडून. रानपाखरे असा आयडी होता तेव्हांचा. आता उपलब्ध नाही. किसान आंदोलनाच्या निमित्ताने मायबोलीवर परतले तर इथे सन्नाटाच वाटला. त्या वेळी जनलोकपाल आंदोलन चालू असताना मायबोलीवर किमान दहा पंधरा धागे एकाच वेळी चालू होते. आताची मायबोली खूप वेगळी आणि पार्शल वाटतेय. कथा, कादंब-या तर नाहीतच. कवितांचा दर्जा पण इतका काही खास नाही. उगीचच रमायचं म्हटलं तर काहीच्या काही विषय चालू आहेत. विषय सोडून प्रतिसाद आहेत.

Pages