मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज सासुबाई एक्सचेंजचा दुसरा भाग टाईप करत होते. भाग पुर्ण झाला आणि अचानक गायब झाला. मी बॅक वगैरे करुन पाहील पण दिसला नाही. एवढ टाईप केलेल परत मिळवता येईल का ?

जागू, अगं मध्ये मध्ये लेखन अप्रकाशित ठेवून सेव्ह करत होतीस का? तरच मिळेल. अन्यथा गयी भैंसवा पानी मे Sad

मागे काही महिन्यांपुर्वी पुस्तके खरेदीसाठी पुण्यात अबक चौकात गेले होते. तिथे काही पुस्तके खरेदी करताना मायबोली पुस्तक प्रदर्शन असा नामफलक वाचला, पण ते प्रदर्शन नेमकं कुठे भरलयं याचा शोध घेत घेत बराच उशीर झाला. घरी येऊन इंटरनेटवर सर्च करूया या उद्देशाने जेव्हा "मायबोली" असा शब्द सर्च केला तेव्हा मला मायबोली.कॉम वेबसाईट पहायला मिळाली. मुळात वाचनाची आवड, प्राथमिक शालेय शिक्षिकेची नोकरी आणि एका सामाजिक संस्थेला सलग्न कार्य सुरू असल्याने इथे सदस्यत्व नोंदवले. खेड्यापाड्यात इंटरनेट पोहचले आहे आता त्यासोबत अश्या सामाजिक आणि साहित्यिक आणि कलाकृतींचा वारसा जोपासणार्‍या आणि देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर विस्तारलेल्या या संकेतस्थळाचे अभिनंदन आणि आभार.

सौ. गोजिरी तन्मय देशमुख.
आळेफाटा.

अरे वा! छान अनुभव आहेत प्रत्येकाचे. मी सुद्धा माबो वर नविनच आहे पण रोज इथे डोकावल्याशिवाय करमत नाही.

मायबोलीची ओळख व अनुभव
इथेही अनेक मायबोलीकरांनी लिहिले आहे.
हे फक्त सहज आठवले, आणि एक माहिती म्हणून.>>>>> साजिरा, लींक बद्द्ल धन्यवाद!

आज माबोवर येऊन सहा वर्षे पूर्ण झाली. Happy

ऑफिसमधे मराठी टायपिंगसाठी सॉफ्टवेअर शोधत असताना मला मायबोलीचा शोध लागला. पहिली कविता वाचली होती सारंगची (आपण याला पाहिलंत का?) त्यानंतर इथे सदस्यत्व घेतले. मग थोडे दिवस वाचन करता करता एके दिवशी डोक्यात काहीही कथावगैरे नसताना एक कथा लिहायला घेतली. ती लोकांना फारच आवडली. मग त्या कथेची कादंबरी करत करत पार हिंदी सीरीयल करून टाकली. Happy त्यानंतर इथे लिहितच गेले. लिहिण्यापेक्षा जास्त वाचन करत गेले. मायबोलीचं व्यसन लागलय असे म्हणायला हरकत नाही.

मी याआधी वर्तमानपत्रातून अथवा मासिकांमधून काही लेख लिहिले होते. पण कथा लिहिण्याचा प्रयत्न मात्र मायबोलीमुळेच केला. आपण लिहिलेलं लोकांना आवडतय ही भावनाच त्यावेळेला प्रचंड आतविश्वास देऊन गेली. मायबोलीवर मी लिहायला लागले तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात त्रासदायक काळ. इथे येऊन सगळे ताप, त्रास दु:ख विसरायला व्हायचं. अक्षरशः नर्व्हस ब्रेकडाऊन झाले होते पण माबो वर लिहीणे आणि वाचणे हे तेव्हा माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर होते. माझ्यासाठी माबोचे हे उपकार फार मोठे आहेत.

धन्यवाद मायबोली.

मला मायबोलीचा शोध लागला गेल्यावर्षी. नुकताच अकरावीत प्रवेश केला होता. हातात मोबाईल (ब-यापैकी स्मार्ट असलेला) आला होता. फेसबुकचा कंटाळा आल्यामुळे मी सहजच गुगल सर्च मध्ये मराठी कथा सर्च केलं आणि मला मायबोली.कॉम ही वेबसाईट सापडली. इथे आल्यावर अनेक धागे वाचले. आधी काहीच समजायंच नाही. पण आता हळूहळू समजू लागलंय. मी एक वर्ष मायबोलीचा फक्त वाचक होतो. नंतर वाटलं आपणही या लोकांच्यात मिसळावं आणि इथलं सदस्यत्व घेतलं. आधी वाटायचं आपलं इथे काय होईल पण माबोकरांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. मी आभारी आहे सर्वांचा आणि मायबोलीचाही.

.

>>>>> आयडी बघून अरे म्हणवलं नाही तुला बाळा. <<<< Lol

>>>> मी लहान आहे तुमच्यापेक्षा. <<<<< हे पहा, इथे सगळ्यात "लहान आयडी" limbutimbu ही आहे. त्या पेक्षा अजुन लहान इथे कोणी असूच शकत नाही Proud

एक सदस्य अभिषेक नाईक याच्या कडुन मायबोलीबद्दल कळले आणि दहा महिन्यापूर्वी येथील सद्स्य झालो.
पण सुरवातीला काही महिने इथे यायला वेळ मिळाला नाही. गेल्या ४-५ महिन्यात अधुन मधुन येत असतो.

अनुभवः खुच चांगले लिखाण आणि चर्चा होते इथे, कुणी माहिती विचारली तर लोक चांगले मार्गदर्शन करतात.
तर दुसरी कडे, कुठे केव्हा राजकारण / धर्मकारण जात-पात कडे वळण घेतल्या जाईल हे सांगता येत नाही, आणि ते वळण घेतले की थोपत नाही असे दिसुन येते. त्यामुळे जरा निरुत्साह झाला होता. पण हे बहुतेक आपाआपसात चालते, चांगले बाफ सुद्धा त्यावेळी फुलत असतात हे लक्षात आले.

गेले ४ - ५ महिने अधुन मधुन इथे आलो त्यातून एकंदरीत मायबोलीची छाप चांगलीच आहे. मायबोलीच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा.

मी पुर्वी मनोगत आणी मि. पा. ची वाचक होते. मग असेच गुगलुन पाहील्यावर 'मायबोली' बद्दल कळले. आता मी मायबोलीची Fan झाले आहे. मराठी लिहाण्यास शिकले (computer var). विचाराना पक्की बैट्क मिळत गेली. आता मायबोली हा आयुश्यातला अविभाज्य घटक बनला आहे.
आत एक इच्छा आहे, या IDs ना प्रत्यकश्यात भेटायचे आहे.
दिनेश, लिम्बुटिम्बु, नन्दिनी, साती,अरुन्धति कुलकर्नि,निल्सन, बेफिकिर, कपोचे,मामी....

अश्विनी, जी टी जी अरेंज करा.
यातल्या बाकींना भेटायला मलापण मज्जा येईल!
Wink

फक्त वर्च्युअल वाद होतात तसे रियल लाईफ वाद झाले तर फायर ब्रिगेड बोलवायला लागेल.
Light 1

उलट साती प्रत्यक्श भेटल्यावर वाद होणार नाहीत, कारण फक्त वर्च्युअल वाद होतात!! खरेच जी टी जी करु,

या मग मुम्बैत! (इकडचे झाले, जानेवारी मध्ये)

>>>> यातल्या बाकींना भेटायला मलापण मज्जा येईल! <<<<< आँ ? Uhoh
बाकींना म्हणजे? तुमच्या "ड्यू आयडीज" सोडून बाकींन्ना का? Wink
का लिंबुटिंबु सोडून बाकींन्ना? Angry
अन कायहो? गेली कितीक वर्षे दरवर्षि ववि होतो, यायच होतत की भेटायला........ Happy अजुनही येऊ शकता....

लिंबुकाका, त्याला बाकीचे सगळे येतील का?
वरच्या यादीतले सगळे येणार असतील तर मी येईन हो वविला.
नसता लवकरच आपण आपलं दोघांचं मिनी गटग करू पुण्यात!
Happy

मी पण अगदी अलिकडेच सदस्यत्व घेतलंय एक महिन्यापूर्वी. अवधूत नामक कथा पण प्रसिद्ध करतोय. पण सध्या तरी खूप दुर्लक्षित आहे.

>>>> नसता लवकरच आपण आपलं दोघांचं मिनी गटग करू पुण्यात! <<<<
करुकी, गटगचा योग कसा येतोय बघु....
रीया, तू हविच.... Happy

Pages